प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून

जादू, प्रास्ताविक :- जादु या शब्दाची व्युत्पत्ति यातु या शब्दापासून लावतात. झोरोआस्तरचे अनुयायी जे मग त्यांच्यापासून मॅजिक हा जादुवाचक इंग्रजी शब्द निघला आहे. इ.बी. टेलर हा जादूविषयीं असें लिहितो कीं, जादूला अतींद्रियशास्त्र  (ऑकल्ट सायन्स) अगर मिथ्याशास्त्र ( सूडोसायन्स)  असें नांव देतात. रानटी लोकांची चिन्हात्मक जादू व नवीन युगांतील ब्रह्मवाद या दोघांची उत्पत्ति मिथ्याज्ञानांत असून, त्यांचा परिणाम अंधश्रध्देप्रमाणें अपायकारक होतो. कांहीं पंडित म्हणतात कीं जादू व धर्म एकच. जादूचे संस्कार जरी धर्मसंस्कारासारखे नसले तरी त्यांची संगति एकसारखीच असते. सर्व संस्कारांच्या मागें एकच पौराणिक कल्पना आहे आणि ती कल्पना आत्म्याची होय. आत्म्यापासून क्रमश: ज्या पद्धती निघाल्या त्या देवपूजा, जादू, निर्जीववस्तुपूजा आणि देवकपूजा या होत.

प्राथमिक पूजा म्हणजेच जादू; जादूची कल्पना धर्म अस्तित्वांत येण्याच्या पूर्वीची आहे. कार्यकारणभावावर जादूचें अस्तित्व बरेंच अवलंबून आहे. ख्रिस्ती देशांतून प्रार्थनामंदिरांत पाळावयाचें संस्कार ज्या विशिष्ट हेतूंनीं उत्पन्न झाले तसल्याच हेतूंनीं मध्यऑस्ट्रेलियांतील देवळें निर्माण झालीं. कोणी देवळांच्या कल्पनेस प्राथमिक धर्म म्हणतात, तर कोणी या देवळांनां जादूंत ढकलतात.

'ठरलेल्या कारणांचा नेहमीं ठरलेला परिणामच घडेल' असें शास्त्रज्ञ जादूगारदेखील गृहीत धरीत नाहीं. जादूगार बहुश: एखाद्या विशिष्ट शक्तीची मदत घेऊन, आपला कार्य भाग उरकतो. यालाच टेलरनें गूढशास्त्र म्हटलें आहे.

(या विषयाचें तात्विक विवेचन ब-याच ग्रंथद्वारें करितां येईल. पैकीं पुढील ग्रंथ प्रमुख होत:- टेलर रिसर्चेस इन् टु दि अर्लि हिस्टरी ऑफ मनकाईंड; जेव्हॉन्स-इन्ट्रोडक्शन टु दि हिस्टरी ऑफ रिलिजन; लँग-मॅजिक अँड रिलिजन.)

हिंदुस्थानांतील जादु विद्या :- प्राचीन हिंदुस्थानांतील पवित्र धार्मिक विधींमध्यें जादुविद्येचा बराचसा अंश आढळून येतो विन्टरनिझच्या मतें जादुविद्या मूल धार्मिक विचाराच्या अनेक रूपांपैकीं एक आहे व धर्माच्या हलक्या प्रतीच्या रूपांपासून ती भिन्न नाहीं.

सर्व प्रकारचे मानसिक व शारीरिक रोग पिशाच्यांच्या कृत्यांनीं उत्पन्न होतात असा इतर देशांतल्याप्रमाणें हिंदुस्थानांतहि समज आहे. म्हणून रोग बरे करण्याकरितां मंत्रांचा व भारलेल्या वस्तूंचा उपयोग करण्यांत येतो. मंत्राशिवाय, वनस्पती व हस्तस्पर्श हयांचाहि रोगांपासून मुक्त होण्याकरितां उपयोग केला जातो. हिंदुस्थानांतील मंत्रांचा सर्वांत प्राचीन संग्रह अथर्ववेदांत आढळून येतो   (वेदविद्या-अथर्ववेद प्रकरण पहा.)  हया मंत्रांबरोबर जे विधी करावयाचे असतात ते देखील कांहीं प्राचीन ग्रंथांत आढळून येतात. रोगांनां सजीव प्राणी समजून त्यांचें व त्यांच्या चिन्हांचें केलेलें वर्णन सुश्रुत वगैरे वैद्यकग्रंथांत आढळून येतें. वनस्पती व सजीव प्राण्यांमध्यें रोग उतरवून तो बरा करणें व पाण्याच्या प्रवाहाबरोबर तो काढून टाकणें ही पद्धतीहि आढळते. समानधर्मी वस्तूंचा रोगांवर व्यापार घडवून त्या योगानें रोग बरें करणें हें सहानुभूतिक चिकित्सेचें तत्त्व आर्यांनां माहीत होतें.

रोग आणि जादुविद्या यांच्याशीं संबंध असलेले देव वरूण व रूद्र हे आहेत. तथापि सामान्येंकरून राक्षसांचा व पिशाच्चांचा त्या गोष्टींशीं संबंध आहे असें मानितात. अग्नि हा सर्व पिशाच्चांचा नाशकर्ता आहे अशी समज आहे. म्हणून अग्नीला आहुति अर्पण करणें, सुगंधी वस्तू जाळणें व त्यांचा धूर घेणें या गोष्टी पिशाच्चें व त्यांनीं उत्पन्न केलेले रोग नाहीसें करण्यास समर्थ आहेत असा प्राचीन लोकांचा समज होता. राक्षसपिशाच्चांखेरिज अप्सरा व गंधर्व मर्त्सप्राण्यांनां भुलवून व फशी पाडून त्यांचा नाश करितात. सुगंधी वनस्पतींच्या साहाययानें हया अप्सरांनां व गंधर्वांनां पळवून लावितां येतें.

ज्याअर्थी पिशाच्चें मनुष्यजातीचें नैसर्गिक शत्रू आहेत त्याअर्थी लहान मूल किंवा गर्भ यांनां त्यांच्याकडून दुखापत होण्याची फार भीति असते. म्हणून माता व बालक यांचें दुष्ट पिशाच्चापासून रक्षण करणारे पुष्कळ मंत्र व विधी आढळतात. चौक व उंबरठा हें भुतांचें आवडतें स्थान होय. सुवर्णाचा जन्म अग्नीपासून झालेला आहे, हया समजामुळें सुवर्णालादेखील मंगलकारक धर्म प्रात्प झाले आहेत.

नांव समजल्याशिवाय भुतांनां कांहींहि अपकार करितां येत नाहीं, हया हिंदु लोकांच्या समजामुळें पहिल्या मुलाचें नांव गुप्त ठेवण्याची चाल आहे. शस्त्रांनीं देखील पिशाच्चांनां हांकून लावितां येतें. शृंगारिक प्रेमाविषयीं मंत्र आणि विधी ज्यांत आहेत असा स्त्रीवशीकरणाचा भाग भारतीयांच्या जादुविद्येंत आढळून येतो .

दुस-या मनुष्याला ताब्यांत आणण्याकरितां मंत्र व विधी सांगितले आहेत. त्याचप्रमाणें शत्रूचें उन्मलून करण्याकरितां राजानें करावयाचें विधी देखील आढळून येतात. मेणाच्या आकृतीवर जादू करून त्या मनुष्याला इजा करतां येते. त्याप्रमाणें एखाद्या मनुष्याचीं नखें, केंस, अथवा पायाखालची माती यांवर चेटुक करून त्या मनुष्याला त्याचे दुष्परिणाम भोगावयाला लावितां येतात अशीहि समजूत दृष्टीस पडते.

ज्यांना योगी अशी संज्ञा आहे. तो वर्ग धंदेवाईक जादुगारांचा म्हणतां येईल. आपणाला किमया अवगत आहे असा बहाणा करून हे भोळया लोकांपासून बराच पैसा उपटतात. तसेंच मांत्रिक लोक होत.

विवाह, गर्भारपण, बाळंतपण या कालीं जादूसारखे विधी कांहीं जातींतून करण्यांत येतात. दुष्काळांत बायकांनीं नागव्यानें जमीन नांगरली असतां चांगलें पीक येतें अशी जी कोठें कोठें समजूत असते तिचाच अवशेष दक्षिण हिंदुस्थानांतील बलिजा, पल्ली, कम्मा वगैरे जातींतील विवाह प्रसंगीं दृष्टीस पडतो. आपल्यांतील ब-याचशा धार्मिक चाली जादुविद्येच्या सदरांत पडण्यासारख्या आहेत.

उदाहरणार्थ, लग्नांतील घाणा भरण्याचा विधि, पुंसवनविधि, वास्तुशांति, इत्यादि गळयांत ताईत, हातांत गंडे, रूद्राक्ष वगैरे घालण्याचीं कारणें उघड आहेत. या वस्तू जादूनें भारलेल्या असल्यानें वापरणा-याला बाधा होत नाहीं अशी समजूत असते. कांहीं जादूचीं गणिती कोडीं असतात; त्यांतील उभी, आडवी, तिरपी बेरीज कांही ठराविक असते. हीं कोडीं गुणकारक असतात असें मानण्यांत येतें. कांहीं स्तोत्रांतहि विशेष शक्ति असते अशी समजूत आहे. लढाईच्या वेळीं शिवकवच, हनुमानकवच इत्यादि लहान स्तोत्रें कागदावर लिहून ते कागद ताईतांत घालून दंडांत बांधण्याची वहिवाट पेशवाईंतहि असल्याचे़ आढळते. सर्प वगैरेवरील मंत्र, मूठ मारणें इत्यादि प्रकार जे आज आपणांस ऐकूं येतात ते जादूचेच अवशेष आहेत. सठीची पूजा, देवक बसविणें, मातृकापूजा, चौसष्ट योगीनी अथवा बावनबीर यांची पूजा हे सर्व पिशाच्चपूजेचे अथवा जादूचेच अवशेष आज आपणांत उरले आहेत. ज्याच्या अंगीं हें मंत्रसामर्थ्य आहे त्यास फार कडक निर्बंध पाळावे लागतात अशी समजूत आहे. उदाहरणार्थ, सर्पाचा मंत्र जाणणारानें पडवळीची भाजी खातां कामा नये; रजस्वला स्त्रीचा शब्द विशेषत: जेवतांना - ऐकूं नये; इ. लहान मुलाच्या अगर बाळंतपणात मृत झालेल्या स्त्रीच्या कवटीच्या ठिकाणीं अद्भुत सामर्थ्य असतें अशा त-हेच्या अनेक भ्रामक समजुती आज आपणांत प्रचलित दिसतात. जादूचा मंत्र बहुधां ग्रहणांत पाठ करतात. जादूचा प्रयोग करण्यास काळोखी रात्र, विशेषत: अमावस्या फार योग्य समजतात. जादूचा प्रयोग मंतरलेलें पाणी किंवा उडदासारखें धान्य फेंकून, किंवा कांहीं विशिष्ट आकृति ओलांडल्यामुळें लागू होतो अशी समजूत आहे. कानफाटे, अघोरी व इतर बैरागी तसेंच वांझ अथवा मुलें न जागणा-या स्त्रिया चेटुक करतात अशी सार्वत्रिक समजूत दिसते.    (वेदग्रंथ; ज्ञानकोष विभाग २ ; हिलेब्रांट-रिचुअल लिटरेचर; मॅक्डोनेल्ड- वेदिक  मायथॉलॉजी; ए.रि.ए. मधील 'मॅजिक' वरचा लेख; थर्स्टन-कास्ट्स अँड टाईब्स ऑफ सदर्न इंडिया; सेक्रेड बुकक्स ऑफ दि ईस्ट, पु. ४२; इं. अँ. , पु. २८; एथ्रॉग्राफिकल सर्व्हे ऑफ बॉंबे; सेन्सस रिपोर्ट)

असुरी - बाबिलोनी जादू :- जादूवरील बाबिलोनी ग्रंथांचा मुख्य उद्देश म्हटला म्हणजे धर्माधिका-यांनां भुता खेतांवर ताबा राखितां यावा व त्यांच्या दुष्ट शक्तीस बळी पडलेल्या प्राण्याला वांचवितां यावें. ज्या आजा-याला भूतानें पछाडलें असेल त्या भुताचा नामनिर्देश करावा लागतो. असल्या प्रसंगीं जादुगार पुष्कळ भुतांचीं राक्षसांचीं नांवें घेऊन त्यांनां आव्हान करतो. अशा प्रसंगीं आव्हान करतो. अशा प्रसंगीं आव्हान करावयाच्या बाबिलांनी भुताखेतांची यादी उपलब्ध झालेली आहे.


जादूविषयक बाबिलोनी ग्रंथांतून सांगितलेले संस्कार प्रार्थनेंतून वर्णन केलेल्या विषशयांशीं संलग्नं असतात. कांहीं ग्रंथांतून जादूची कृति व पाठ सांगितले आहेत. जादूगार जादूच्या क्रियेसाठीं केव्हां केव्हां प्रतिमांचा उपयोग करीत. या प्रतिमा जाळून रोगनाश होतो अशी भावना असते.

जादूच्या प्रसंगीं वापरल्या जाणा-या वस्तू पुष्कळ असत. कांहीं प्रसंगीं जादुगार पाण्यानें भरलेलें मडकें वापरीत असत. तसेंच कांहीं प्रसंगी मातीची प्रतिमा पछाडलेल्या माणसाच्या शरीरावर चिकटवून नंतर ती काढून घ्यावयाची असे. म्हणजे रोग्याचा रोग प्रत्यक्ष वस्तूच्या रूपानें बाहेर काढला जातो अशी त्यांची समजूत झालेली असे. बाबिलोनी जादूचे  अवशेष फारसे उरलेले दिसत नाहींत.   (थॉम्पसन-सेमिटिक मॅजिक; किंग-बाबिलोनियन मॅजिक ऍंड सॉर्सेसि; माँटगॉमेरी- अरेमाईक इनकॅन्टेशन टेक्स्ट फ्रॉम निप्पुर.)

ईजिप्शियन जादू :- जेव्हां निर्जीव वस्तू अवज्ञा करतात, आणि सजीव प्राणी विनंतीचा अनादर करतात अशा प्रसंगीं इजिप्शियन लोक आपले हेतू साध्य करून घेण्यासाठीं जादूचे प्रयोग करीत. यासच ते हीके म्हणत. धर्म म्हणून कांहीं निराळी भावना ईजिप्शियनांत नसून जें कांहीं आहे तें हीके आहे अशी त्यांची कल्पना असे. बहुश: देव आणि मृत पितर उग्र स्वरूपाचे असतात अशी त्यांची समजूत असे. तेव्हां त्यांच्याशीं करावयाचे व्यवहार थोडयाफार प्रमाणांत हीकेच्या स्वरूपाचे असत.

ईजिप्शियन लोकांची हीकेची कल्पना हीच मुख्य कसोटी मानून चालल्यास धर्मविषयक कल्पनेला जागाच उरत नाहीं, कारण जें कांहीं धर्मविषयक म्हणून मानावयाचें त्यांचा अंतर्भाव बहुतेक हीकेंत व होतो.

ईजिप्ती जादूचें कार्यक्षेत्र माणसांच्या इच्छाक्षेत्राइतकें मोठें होतें व ज्या इच्छा सहजासहजीं साध्य करून घेतां येत नाहींत, त्या जादूच्या साहाययानें हस्तगत करतां येतात, अशी इजिप्शियन लोकांची समजूत असे. संरक्षक, रोगनिवारक, इच्छापूरक वगैरे प्रकार या जादूंत असत.

ईजिप्शियन लोकांत चांगली जादू व दुष्ट जादू असले भेद आढळत नाहींत; तरी पण जादूचा दुष्ट उपयोग करणा-यास कायद्याच्या कात्रींत पकडलें जाई. याचें पुन्हां दोन प्रकार आहेत. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. प्रत्यक्ष जादूक्रियेसाठीं उपयोगांत आणिल्या जाणा-या वस्तूंत रोपें, दगड, धातू, रंग इत्यादि येतात; तसेंच मेण, चिकणमाती यांचाहि उपयोग केला जात असे. अप्रत्यक्ष जादू म्हणजे जादूगाराला कांहीं विशिष्ट नियमांचें बंधन पाळावें लागे; पुष्कळ जादूचे मंत्र फार उपयुक्त वाटल्यानें, ईजिप्शियन लोकांनीं या जादू मंत्रांचा वैद्यकाकडे उपयोग करण्याचा परिपाठ पाडला.

थॉथ हा ईजिप्तमधील फार प्रसिद्ध जादूगार मानला गेला आहे. थॉथच्या जादूगारींतील कसबाबरोबरच चित्रलिपिशास्त्र, खगोलशास्त्र व गणितशास्त्रांचा शोधक असें त्याचें वर्णन आढळतें. इसिस ही प्रसिद्ध जादूगारीण असल्याचा उल्लेख आहे. तसेंच होरस हा इसिसचा मुलगा व एक प्रसिद्ध इजिप्शियन जादूगार मानला आहे. ( बज –ईजिप्शियन मॅजिक; साईस -दि रिलिजन्स ऑफ एन्शट ईजिप्त ॲड बाबिलोनिया.)

ग्रीक व रोमन जादू :- ग्रीस व रोममध्यें इतर ठिकाणांप्रमाणें, जादूगर सामान्य माणसाचा देखील विश्वास असे. जादूच्या सिद्धांतास आणि क्रियाविषयक वाड्:मयास प्रारंभ होमरच्या वेळेपासून झाला.

ग्रीस व रोममधील देवतापूजन शिष्टसंमत ठरलें असल्यानें तो धर्म व जें पाखांडी देवतापूजन ती जादू असा निर्णय दिला जात असे. म्हणजे ग्रीको-रोमन धर्माव्यतिरिक्त धर्म जादूच्या स्वरूपाचे ठरतात. सर्व कालांत जादूला समाजांत जें वाईट स्थान प्राप्त झालें, त्याचें कारण वर केलेली ग्रीक-रोमन कसोटीच कारण झाली. जादू गैरकायदेशीर अविश्र्वसनीय व अनीतिमान ठरली जात असे. जेव्हां ख्रिस्ती धर्माचा प्रसार ग्रीस व रोममध्यें झाला, तेव्हां तर हें स्पष्टच ठरलें कीं ख्रिस्ती धर्म तेवढा शिष्टसंमत व इतर धर्म पाखंडी म्हणजे जादूच्या स्वरूपाचे. जादूच्या उत्पत्तीविषयीं प्लीनीचें असें मत आहे कीं वैद्यकाच्या कालाबरोबरच जादूस सुरुवात झाली, व जादूच्या वाढीचें कारण तिशीं झालेलें धर्म व ज्योतिष यांचें मिश्रण होय. अशाच त-हेनें किमयाशास्त्र व भविष्यकथन यांच्या मिश्रणानें जादूची प्रगति झाली.

ग्रीक दंतकथेंतील जादूगारांत, तेलचिनीस, दक्तिली, कुरेटेस आणि कॉरिबँतेस प्रमुख गणले आहेत. पहिले तीन जादूगार ग्रीसचे रहिवाशी असून त्यांचें अस्तित्व हेलेनिक कालापूर्वींचें असल्याचा दाखला आहे. हे जादूगार देवांचे सेवक मानले जात, इतकेंच नव्हे तर त्यांची पूजा देखील केली जाई. इतकें असून देखील त्यांनां जादूगार ठरविलें आहे. ग्रीक पुराणांतील प्रसिद्ध जादूगार प्रोमेथ्यिअस, अगामेदय, मेलांपस, ओनोने, पॅसिफी, सरसी, आणि मीडिआ होत. या सर्वांत सरसी आणि मीडिआ या प्रमुख मानल्या आहेत.

ग्रीक जादूच्या पद्धतीचा वैद्यकाशीं फार निकट संबंध आहे. सरसीनें आपले बळी मनुष्यरूप करण्यासाठीं लेपांचा उपयोग केला होता. कांहीं विशिष्ट पेय देण्याचाहि प्रघात दिसतो. पेय पाजून प्रेम उत्पन्न करणें ही पद्धत फार प्राचीन कालापासून माहीत असल्याचें दिसतें. जादूची कांडीं हें एक प्रसिद्ध साधन सर्वश्रुत आहेच. व्रणविरोपणकला हें एक जादूचें अंग समजलें जातें. मृतांनां बोलाविणें, वशीकरण मंत्र, इत्यादि गोष्टी जादूच्या पद्धतींत सामील करतां येतील.

ग्रीस व रोम यांतील जादूवर कोलचिस, ईजिप्त, थेसली आणि आयसलंड या देशांतील जादुविद्येचा परिणाम झाल्याचें दिसतें. या सर्वांत थेसलीची छाया ग्रीको-रोमन जादूवर जास्त पडली. अरिस्टोफेनीस काळांत थेसलीची भूमि जादू व जादूगार या संबंधीं फार प्रसिद्ध होती.

इटालियन जादु :- रोममधील 'टेल्व्ह टेबल्स'चा कायदा हाच जादूच्या अस्तित्वाचा मुख्य पुरावा समजला जातो. या कायद्यानें एखाद्याच्या शेतांतील पीक जादूनें आपल्या शेतांत नेण्याची बंदी केली आहे. त्या काळांत अशी समजूत होती कीं चेटकिणींचा एक संघ शेतांतील सर्व पीक काढून आकाशयानांत भरून 'मगोनिया' म्हणून नांव असलेल्या प्रदेशांत नेत असे. असल्या कृत्यास बंदी करणें कायद्यानें भाग पाडलें.

ज्याप्रमाणें ग्रीस देश जादूच्या बाबतींत थेसलीवर अवलंबून होता, त्याचप्रमाणें इटलीनें इटरियाकडे आपलें गुरूत्व दिलें होतें रोमची जादू बराच कालपर्यत विदेशी धर्मांनीं विचलित झाली खरी, पण ती स्थिति दुस-या प्यूनिक युध्दानें निवळली. पण रोमच्या जादूचे मुख्य पुरस्कर्ते कवी होते, व हे कवी विशेषेंकरून  ग्रीक दंतकथांचा अनुवाद करीत; याचा परिणाम असा  झाला कीं केटोच्या काळानंतर नुसती ग्रीक जादू, अगर नुसतीच रोमन जादू आपणास आढळत नसून ग्रीको-रोमनसंबंधीं उल्लेखच अधिक आढळतात. इटलींत जादूवरील ग्रंथांची वाढ, विशेषेंकरून तत्त्ववेत्यांकडून झाली. आगस्टसच्या काळांत रोम शहरीं बारा निरनिराळया मतांच्या जादूगारांनीं वस्ती केली होती; त्यांत अति हीन दर्जाच्या सागापासून उच्च दर्जाचे खाल्डिअन जादूगार असत. आगस्टसच्या काळापूर्वी तीन शतकापासून धार्मिक चळवळीची लाट सारखी चढतच होती. याच काळांत इटलींत व सर्व यूरोपभर जादूची फार झपाटयानें वाढझाली.

यूरोपमध्यें मध्ययुगांत जादू व चेटकावरील विश्वास बराच वाढलेला दिसतो. एखाद्या खेडयांत जी सर्वांत वृद्ध स्त्री असेल ती चेटकी असावयाचीच अशी समजूत असे. समुद्रावरील वादळें, लढाया वगैरे चेटकी स्त्रियाच उत्पन्न करतात अशी समजूत असे व त्यामूळें अशा सार्वजनिक आपत्तींच्या प्रसंगीं वृद्ध स्त्रियांचें जीवित विशेष धोक्यांत असे; कारण त्यांस चेटकी समजून ताबडतोब जीवंत जाळण्यांत येत असे. जोन ऑफ आर्क या शूर स्त्रीला इंग्रजांनीं चेटकी म्हणून  जाळल्याचें उदाहरण इतिहासप्रसिद्धच आहे. (एन्सायल्को. ए.रि. ए. मधील किबीं फलॉवर स्मिथचा 'मॅजिक'  (ग्रीक ऍंड रोमन)  हा लेख विस्तृत असून त्यांत या विभागावरील संदर्भग्रंथ आढळतील.)

इराणी जादू :- धर्म व जादू यांच्या मिश्रणाचें प्रमाण मझ्दाच्या धर्मांत विशेष  दृष्टोत्पत्तीस येतें. गाथांतून फक्त आहुरमझ्दालाच ईश्वर मानिलें आहे; आणि तत्कालीन अस्तित्वांत असलेंलीं हीन दर्जाचीं धार्मिक मतें, व जादूचे संस्कार यांच्याशीं स्पष्ट विरोध दाखविला आहे. गाथानंतरच्या अवेस्तांतील धर्मग्रंथांतून जादूगर व चेटकिणी यांनां जरी शाप दिले असले तरी, झोरोआस्टरनें जादूगर व चेटकिणीसंबंधीं जे संस्कार उल्लेखिले होते, त्यांचा समावेश वरील ग्रंथांतून केलेला आढळतो. या मिलाफाचा परिणाम म्हणजेच झोरोआस्टरच्या धर्मांतील द्वैतवाद होय.

सद्गुण विरूद्ध दुर्गुण यांच्या लढाईत ज्या क्रिया घडत, त्या क्रिया आणि जादू यांच्यांतील फरक लक्षांत घेतां असें दिसून येईल कीं जादूच्या योगानें प्रात्प होणारीं ऐहिक सुखें बंद पडावयाचीं; कारण मझदाचीं बहुतेक धार्मिक कृत्यें उच्च व पवित्र स्वरूपाचीं असल्यानें त्यांपासून निष्पन्न होणारी प्राप्ति जास्त शाश्वत असूं शकेल आणि दुर्गुणाचीं फळें अशुद्ध असणार आणि त्यांचा नाश व्हावयाचाच. अशा त-हेचें या संप्रदायाचें मत आहे.

चिनीजादू :-  चिनी वाड्:मयांत जादूची मींमांसा व विधि यांचें वर्णन विस्तारानें आढळतें. कन्क्यूशियसच्या काळापूर्वी जादूगारांचा दर्जा समाजांत मोठा होता. राजदरबारांत त्यांकडे कांहीं धार्मिक कृत्यें करण्याचे अधिकार दिले होते आणि सार्वजनिक उत्सवप्रसंगीं शुभकथन व अशुभ निवारण्याचें काम सोपविलें होतें.

जादूच्या कल्पना पुढें ताओ संप्रदायाच्या लोकांनीं आपल्यांत सामील करून घेतल्या. चीन देशांत स्वतंत्र वृत्तीचे जादूगरहि पुष्कळ आहेत. हया स्वतंत्र वर्गास चिनी समाजांत कोठेंच स्थान नव्हतें व हयांचा धंदा तर बिनहरकत चाले, म्हणून जादूविरूद्ध कडक कायदे अस्तित्वांत आले असावेत.

प्राचीन काळीं अवर्षणाच्या काळांत एक कुरूप मनुष्य व एक चेटकीण जिवंत जाळण्याची पद्धत होती. या कृत्यानें स्वर्गीय देवतांनां साहजिक दु:ख होणारच. व हया देवता त्या दुर्दैवी प्राण्यावर दया दाखविणार म्हणजेच वर्षाव करून त्या दुर्भागी प्राण्यांच्या दु:खाचें परिमार्जन करणार; तोच फलदायी परिणाम चेटकिणीच्या जीवंत जाळण्यानें अगर उन्हांत उघडें बसविण्यानें होणार असें मानण्यांत येई.

चीनमधील सार्वत्रिक उत्सवाचे हेतु नि:संशय जादूच्या स्वरूपाचे आढळतील. म्हणजे उत्सव करण्यानें अवर्षण, रोगराई आणि दुर्दैव यांचें निराकरण, उत्तम पीकपाण्याची सोय आणि सुदैवप्राप्ति लाभणार ही कल्पना होती. चिनी कुटुंबातील रोजच्या आचरणांत देखील जादूच्या कल्पना वावरत असल्याचें दिसून येईल. दारावर विवक्षित दिवशीं विवक्षित रोपें लटकविलेलीं आढळतील; लहान मुलांच्या शेंडयांतून लाल दोरा बांधलेला दिसेल; या गोष्टींचें मूळ जादुविषयक कल्पनांत आहे.

चीन देशांतील जादूगारांचें गि-हाईक गरीब जनता नसून थोर लोक असत. यावरून पाहतां जादूवरील श्रध्दा निव्वळ गरीब लोकांतच होती असें दिसत नाहीं. दुष्ट जादूसंबंधीं मांचु राजांनीं केलेले कडक कायदे सर्वश्रुत आहेत. तथापि चिनांतील जादूविषयक कडक कायद्याखालीं एकहि जादूगार जिवंत मारला गेला नाहीं. सतराव्या शतकांतील सुधारलेले यूरोप व अमेरिका यांत  देखिल चेटकिणी जाळण्याची सांथ असल्याचें इतिहासांत नमूद आहे. (ग्रँट- रिलिजिअस सिस्टिम ऑफ चायना; लेग्गे-चायनीज क्लासिक्स; डेन्नीस-फोकलोअर ऑफ चायना.)

जपानी जादू :- जपानी लोकांतील जादूचें शास्त्र व त्यावरील वाङ्मय इतकें विस्तृत आहे कीं, त्या संबंधानें विस्तृतपणें विचार करणें देखील अशक्य आहे. या शास्त्राचें भाग आणि विभाग पाडून याला इतकी सूक्ष्मता आणली आहे की, त्यासंबंधानें नुसती सूचि देण्यास एक लहानसा ग्रंथ लिहावा लागेल.

एंजिशिकी पुस्तकांत जो जादूचा पहिला विधि दिला आहे त्याचें नांव '' तोशी नोही नो मुत्सरी'' असें आहे; या विधींत जादूमय देवतांचा उल्लेख आला आहे. हा विधि पेरणीच्या सुमारास करतात. त्यायोगानें चांगलें पीक येतें असा समज आहे.

या विधींत अर्पण करण्याच्या वस्तूंत शुभ्र अश्व, श्र्वेत वराह आणि पांढरा कोंबडा हीं आहेत. आणखी एका विधीचें नांव ''इडझुमो नो कुनी नो मियाको नो कामू योगोटा'' असें आहे, व त्याचा अर्थ :- 'इडझुमो देशांतील प्रमुखास उत्तम दैव  (नशीब) प्राप्त होण्याचे शब्द'  (मंत्र)  असा आहे.

या सर्व विधींना एकेकाळीं कांहीं अर्थ असेल. परंतु हे विधी सहानुभुतिकपद्धति अथवा समचिकित्सा या तत्वापासून उत्पन्न झालें असेंच अनुमान काढणें भाग पडतें  (व हेंच तत्त्व अगदीं पुराण स्थितींतील मनुष्यांनीं अमलांत आणलें होतें.)   यावरून असें दिसून येतें कीं, प्राचीन शिंतो धर्मां (जपानी धर्मा )  त जादूचा बराच अंश होता व असें अनुमान काढण्यास जुन्या ग्रंथांचा उत्तम आधार आहे.

या धर्मांतील विधीचें मूलस्वरूप् जादूमय आहे, ज्या देवतांस उद्देशून हे विधी आचरिले जात असत, त्या देवता जादूच्या आहेत व त्या विधीचे संस्कर्ते जादूचे  पुरोहित आहेत. जपानच्या राष्ट्रीय धर्माच्या संस्कृतीच्या मुळाशीं जादू आहे. धर्माचा तुलनात्मक दृष्टीनें अभ्यास करणारास वरील तत्त्व त्या धर्मांत ग्रथित झालेलें दिसेल.

आरबी व मुसुलमानी :- कुराणांत जादूसंबंधी पुष्कळ माहिती आली आहे. 'सिहर' (जादू)  प्रथमत: हारूत व मारूत या दोन देवदूतांनां कळले, व त्यांनीं तें मानवी प्राण्यांना शिकविलें. सिहरचा परिणाम अंतर्बाहय होत असावा असें कुराणांत स्पष्ट नमूद केलेलें दिसत नाहीं. तरी दोन्ही त-हेचें परिणाम होत असावेत असा टीकाकारांचा समज आहे.

मुसुलमानांच्या दंतकथांचा जो संग्रह केरो येथें केला आहे त्यावरून जो पुरावा निघतो, तो असा :- मुसुलमानांनीं दृष्टीवर, सर्पाच्या विषावर आणि सामान्य रोगावर मंत्र अथवा जादूचा इलाज कबूल केला आहे. कुराणांतील असल्या मंत्रांचा प्रयोग करणारा रोग्यांकडून द्रव्य घेतो व त्या द्रव्याचा कांहीं अंश धर्मसंस्थापकाला द्यावा लागतो. रूक्या हे ते मंत्र होत. (कुराण;  अरेबियन नाईट्स; लेन-मॅनर्स अँड कस्टम्स ऑफ दि मॉडर्न ईजिप्शियन)

   

खंड १४ : जलपैगुरी - तपून  

 

 

 

  जलमस्तिष्क रोग
  जलयंत्रशास्त्र
  जलालपेठ
  जलालखंड
  जलालाबाद
  जलालाबाद, तहसील
  जलाली
  जलालुद्दीन मुहम्मद वल्खी
  जलालुद्दीन सयुती
  जलेश्वर
  जलेसर, तहसील
  जलोदर
  जलोपचार
  जव
  जवस
  जवादि डोंगर
  जवानबख्त मिर्झा
  जवासिया
  जव्हार
  जशपूर
  जसदन संस्थान
  जसपुर
  जसवंतनगर
  जसवंतसिंह, महाराणा
  जसील
  जस्टिन
  जस्टिनियन
  जस्त
  जस्सो
  जहागिराबाद
  जहागीर, जहागीरदार
  जहांगीर
  जहांगीर बादशहा
  जहाज फिरंगी
  जहाजपुर
  जहांदरशहा
  जहानआरा बेगम
  जहानाबाद
  जहनु
  जहलण
  जळगांव
  जळापूर
  जळापुर तालुका
  जळू
  जाई
  जाकोबाबाद
  जाखाऊ
  जाखन
  जांजगरि
  जाजमाउ
  जाट
  जाटपु
  जाटपोल
  जातक
  जाति
  जातिभेद
  जादम
  जादू
  जादूचा कंदील
  जाधव
  जाधवराई
  जॉन
  जानसाथ
  जॉनसन अॅंड्र
  जॉनसन, डॉय साम्युएल
  जानसार बावर
  जॉन, सेंट
  जानीबेग तुर्खन मिर्ज्ञा
  जानेफळ
  जानोजी निंबाळकर
  जाफना
  जाफरखान
  जाफराबाद
  जांब
  जांबवान
  जाबाल
  जांबु घोडा
  जाब्लोस्काव, पाल
  जांभळी जमीनदारी
  जांभूळ
  जांभेकर, बाळ गंगाधर
  जामखेड
  जामगड
  जामतारा
  जामदारखाना
  जामनगर
  जामनेर
  जामपुर
  जामराव कालवा
  जामी
  जामीनकी
  जामोद
  जाम्निया
  जायफळ, जायपत्री
  जारकर्म
  जॉर्ज टाऊन
  जॉर्ज राजे
  जॉर्जिया
  जालंदर, जिल्हा
  जालना
  जालवणकर, नारायणबोवा
  जालापहाड
  जालारी
  जालिआ
  जालोर
  जावजी दादाजी चौधरी
  जावड
  जावरा
  जावळी
  जावा
  जाविदखाना
  जासवंद
  जासी
  जासुंद
  जाहिरात
  जिऊ महाला
  जिगणी
  जिजाबाई
  जिजिराम
  जिंजी
  जितुलीया
  जिंतूर
  जिंद
  जिनकीर्ति
  जिनगर
  जिनप्रभ
  जिनीव्हा
  जिनेश्वरसुरि
  जिनोआ
  जिन्सीवाले, श्रीधर गणेश
  जिप्सी
  जिब्राल्टर
  जियागंज
  जिरंग
  जिरळ कामसोळी
  जिराफ
  जिंरार
  जिराईतखाना
  जिरें
  जिलेटिन
  जिवबादादा बाक्षी
  जीन मेरी रोलंड
  जीवकचिंतामणी
  जीवधन किल्ला
  जीवनकार्यविचार
  जीवन्मुक्त
  जुई
  जुगार
  जुगोस्लाव्हिया
  जुजुत्सु
  जुझोतिया ब्राह्मण
  जुडा
  जुडीआ
  जुतोघ
  जुनागड
  जुनापाणी
  जुनापादर
  जुनो
  जुनोना
  जुन्नर
  जुपिटर
  जुबल
  जुबो
  जुभखा
  जुव्हेनल
  जूब
  जूल, जेम्स प्रेस्कॉट
  जेऊर
  जेकब
  जेजाकभुक्ति उर्फ जिझोटी
  जेजुरी
  जेझील
  जेतपुर
  जेघे
  जेना
  जेपाळ
  जेफर्सन, थॉमस
  जेबील
  जेम्सटाऊन
  जेम्स मेरी सॅन्ड्स
  जेम्स राजे
  जेयोर
  जेरिको
  जेरिझिम
  जेरुसलेम
  जेरेसा
  जेर्हा
  जेलेपला
  जेल्डर्लंड
  जेवर
  जेव्होंन्स, विल्यम स्टॅनले
  जेष्ठमध
  जेसर
  जेसरी
  जेसलमीर
  जेसुइट लोक
  जेजोर, जिल्हा
  जेहोव्ह
  जैटिया
  जैटियापूर
  जैन, संप्रदाय
  जैनेंद्र व्याकरण
  जैमिनी
  जैस
  जैसवाय
  जोक्जाकर्त
  जोग, कृष्णाजी महादेव
  जोगापरमानंद
  जोगी
  जोगेश्वरी
  जोडिया
  जोतिबाचा डोंगर
  जोत्याजी केसरकर
  जोदिया
  जोधपुर
  जोधबाई
  जोन ऑफ आर्क
  जोनगन
  जोनपुर
  जोनराज
  जोन्स, सर विल्यम
  जोबत, संस्थान
  जोरा
  जोरिय
  जो-हाट
  जोवई
  जोशी
  जोशी, अण्णा मार्तंड
  जोशी, गणेश कृष्ण
  जोशी, गणेश वासुदेव
  जोशी, गणेश व्यंकटेश
  जोशी, चासकर
  जोशी, बारामतीकर
  जोशीमठ
  जोहानिस्बर्ग
  जोहानीझबर्ग
  जोहार
  जोही
  जोहोर
  जौगड
  जौहरीफरवी
  ज्यूटीगल्पा
  ज्योतिपंत महाभागवत
  ज्योति:शास्त्र
  ज्योतिष्टोम
  ज्योती
  ज्वर
  ज्वांग, पट्टुआ
  ज्वारी
  ज्वालामुखी
 
  झऊरी मुल्ला
  झगरपूर
  झज्जर
  झंझरपुर
  झमानशहा
  झमानिया
  झमीनदवार
  झरथुष्ट्र
  झलिदा
  झलून
  झाकाटेकस
  झांग, जिल्हा
  झांजी
  झांझमेर
  झांझीबार
  झाडीतेलंग
  झानेसव्हील
  झान्टे
  झान्थस
  झाफरखान
  झाफरवाल
  झाबिताखान
  झाबुआ
  झाबुलीस्तान
  झाबेल
  झांबेसी नदी
  झांबोअंग
  झामपोदर
  झामसिंग
  झामोरा
  झामोरीन
  झार
  झारगर जात
  झारा
  झारापाप्रा
  झा-होन
  झालकाटि
  झालरपाटण
  झालवान
  झालावाड
  झालावाड संस्थान
  झालोड
  झांशी, जिल्हा
  झांशीची राणी, लक्ष्मीबाई
  झिंगकलिंग हकमती
  झिगन
  झिंझुवाडा
  झितोमीर
  झिनत-उन-निसा बेगम
  झिंपी तौडू
  झियाउद्दीन बरनी
  झिरा
  झिरी
  झिवारत
  झीटून
  झीत्झ
  झीनवर
  झीनॉफानेझ
  झीलंड
  झुंगेरिया
  झुंझुनु
  झुबेदा खातुन
  झुब्दतुन्निसा
  झुरळ
  झुलफिकारखान
  झुलुलंड
  झूवा
  झूरिच
  झूसी
  झेंद-अवेस्ता
  झेनागा
  झेनाटा
  झेनिद
  झेनोफोन
  झेनोबिआ
  झेप्पेलिन, काऊंट फर्डिनंड
  झेब-उन्-निसा बेगम
  झेब्रा
  झेरबस्ट
  झेरिआ
  झेर्नोविट्झ
  झेलम
  झेलम कालवा
  झेलम नदी
  झेलम वसाहत
  झैदपूर
  झैनखान कोक
  झैनाबादी महाल
  झैनुल अबिदिन
  झैमुख्त
  झैसान
  झोडगे
  झोब जिल्हा
  झोला, एमिली एडवर्ड चार्लस
 
 
  टंकारी
  टक्कर देश
  टक्का
  टझी
  टनब्रिजवेल्स
  टरपेलट
  टर्गो, अॅन रॉबर्ट जॅक्स
  टनेंट
  टॅव्हर्नियर
  टॅसिटस कॉनेंलिअस
  टस्कुलम्
  टांकणखार
  टांक तहशील
  टाकळ
  टाकळ घांट
  टाकळा
  टांकळी
  टाकळी बुदुक
  टाकी
  टॉंगकिंग
  टांगानिका
  टांगानिका प्रदेश
  टागोर, देवेन्द्रनाथ
  टागोर, राजा सौरेन्द्र मोहन
  टाटा, जमशेटजी नसरवानजी
  टाटा, सर रतन
  टोंड, कर्नल
  टॉडहंटर, आयझॅक
  टान्जीर
  टापिओका(कासावा)
  टायको ब्राही
  टायग्रे
  टायबर
  टायबेरिअस
  टायर
  टाराक्विनी
  टारांटो
  टारिसेली, इव्हर्जिलिस्टा
  टारेटम्
  टॉके
  टानों
  टार्सस
  टालबॉट, विल्यम हेनरी
  टालमड
  टॉलस्टॉय, लिओ
  टॉलेमी क्लॉडिअम
  टॉलमी फिलाडेल्फस
  टालेरंड, पेरीगॉर्ड प्रिन्स
  टावी
  टासमन, अबेल जॅन्सेन
  टासी
  टिकमगड
  टिटवी
  टिटागड
  टिडोर
  टिन्डाल जॉन
  टिपगड डोंगर
  टिपरा जात
  टिप्पू सुलतान
  टिप्पेरा
  टिफ्लिस
  टिंबक्टु
  टिंबा
  टिबेस्टी
  टिम्माड
  टिरोल
  टिलोता खैरी
  टिल्सिट
  टिळक, बाळ गंगाधर
  टीजिआ
  टीरिआ
  टुलुझ
  टूर्नें
  टूलाँ
  टेकचंद मुनशी
  टेक्सस
  टेगर्नसी
  टेग्युसीगलपा
  टंट, पिटर गथ्री
  टेन, हिप्पोलाइट अडोल्फ
  टेनेस्सी
  टेंपलबार
  टेबल माउंटन
  टेंभुरणी
  टेमेश्वार
  टेराडेलफ्यूगो
  टेलर, फिलिप मेडोज
  टेसिफॉन
  टैन-शान पर्वत
  टोक, संस्थान
  टोकिओ
  टोगोलंड
  टोचीनदी
  टोन, थिओबाल्ड वूल्फ
  टोपल्या
  टोबेगो
  टोमाटो
  टोराँटो
  टोरी फत्तेपूर
  टोलेडो
  टोवला
  टोशाम
  टोळ
  टौंगी
  टौंगुप
  टौंगू
  टौंग्थ
  टौंग्यु
  ट्युनिस
  ट्युनीशिआ
  ट्यूस
  ट्रॅलिझ
  ट्रान्सवाल
  ट्राम्बे
  ट्रॉय अथवा ट्रोड
  ट्रिनिदाद
  ट्रिपोली, प्रांत
  ट्रिबिझाँड
  ट्रीएस्टे
  ट्रटिश्के, हेन्रिक व्हॉन
  ट्रेंट
  ट्विकनहॅम
  ट्विन, मार्क
 
  ठग-ठगी
  ठठ्ठा
  ठाकुर
  ठाकुरगांव
  ठाकूरदासबोवा
  ठाकूरद्वार
  ठाणभवान
  ठाणें
 
  डॅडी
  डॅन
  डॅनिएल
  डन् कर्कं
  डॅन्झिग
  डफरिन, लार्ड
  डफळे
  डंबल
  डबलबीन
  डंबार्टन
  डब्लिन
  डभई
  डमडम
  डरहॅम
  डर्बी
  डलहौसी, लॉर्ड
  डलास
  डहोमे
  डॉक
  डाका, जिल्हा
  डाकोर
  डांग
  डांगची
  डांगर
  डांगी
  डांग्या खोकला
  डाग्वेरे, एल्. जे. एम.
  डोन नदी
  डान्यूब नदी
  डाबी
  डामर
  डायमंड हारबर
  डायमंड बेट
  डायोजेनीस
  डार्टमाउथ
  डार्डानेल्स
  डार्विन, चार्लस रॉबर्ट
  डॉलफिनचें नोंज
  डाल्टन, जॉन
  डास
  डाहाणु
  डाळिंब
  डिंक
  डिकन्स, चार्लस
  डिकेमाली
  डिक्वेन्सि, थॉमस
  डिंगरी
  डिंगणकर, मोरो विश्वनाथ
  डिडीमी
  डिडेरोट डेनिस
  डिफो, ड्यानिअल
  डिवार, सर जेम्स
  डी अर्लेबर्ट
  डीग
  डीगची लढाई
  डी बॉइने
  डीसा
  डुकर
  डुकी
  डुक्करकंद
  डुंगर
  डुप्ले
  डुम जात
  डुरिअन
  डूलचेन्यो
  डूलाँग
  डेकॅपोलिस
  डेकाटें
  डेडिआगॅच
  डेन्मार्क
  डेन्व्हर
  डेमॉस्थेनीस
  डेमिएटा
  डेमोक्रिटस
  डेराइस्मायलखान
  डेरागाझीखान
  डेरागोपीपूर
  डेराजात
  डेरानानक
  डेरापूर
  डेलफाय
  डेलवेअर
  डेव्हनपोर्ट
  डेव्ही
  डेहराडून
  डोंगरगड
  डोंगरपाली
  डोंगरपुर
  डोंगराळी जमीनदारी
  डोंगरा
  डोंगरे, वासुदेव नारायण
  डोडोना
  डोनाटेलो
  डोंबगांव
  डोबरेनर
  डोंबारी
  डाब्रूजा
  डोम
  डोमल जात
  डोमिनिका
  डोरली
  डोव्हर
  डोहर
  ड्युडरनेक
  ड्युबॉपिएरी
  ड्युसेल्डॉर्फ
  ड्यूमा अलेक्झांडर
  ड्यूरर आल्ब्रेक्ट
  ड्रायडन, जॉन
  ड्रॉयमन
  ड्रेस्डेन
  ड्रोघेडा
  ड्विन्स्क
 
  ढक्की भाषा
  ढालगज
  ढालाईत
  ढीमर
  ढुंढये जैन
  ढेकूण
  ढेरा
  ढोर
 
 
  तगर
  तंगेल
  तंगौंग
  तंजावर
  तंजावरचें राजघराणें
  तडवी
  तंडागांव
  तंडो
  तंडोअडाम
  तंडोअलाहयार
  तंडोवागो
  तंडोमहमदखान
  तत्रक
  तंत्रग्रंथ
  तत्त्वज्ञान
  तनकपूर
  तनखा
  तनावल
  तनुकु तालुका
  तपकीर
  तपागच्छ
  तपून

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .