प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून

जातिभेद :- '' जाति'' या शब्दाचा मूळ अर्थ जन्म. कधीं कधीं हा शब्द ''जन्मसिद्ध स्वरूप'' दाखविण्यासाठीं संस्कृत ग्रंथांत योजला आहे. आणि त्यावरून घोडा, सिंह वगैरे प्राण्यांच्या वर्गासहि जाति हा शब्द लावण्यांत येत आहे व ज्याअर्थी जाति म्हणजे जननवैशिष्टय मूलक सादृष्य किंवा समुच्चय ही कल्पना प्रचलित झाली त्याअर्थी जाति हा शब्द सादृश्यार्थानेंहि लावण्यांत येऊं लागला. प्रस्तुत प्रसंगीं ''जाति'' हें नांव ज्या प्रकारच्या मनुष्यसमूहास लावण्यांत येतें तेच समूह फक्त विवेचनाचा विषय आहे.

जातींचें शास्त्रीय विवेचन करावयाचें म्हटलें म्हणजे त्या विवेचनाचे तीन भाग करतां येतील. एक भाग म्हटला म्हणजे अस्तित्वांत असलेल्या जातींची याद आणि वर्णन. ही याद जरी पद्धतशीर व नीट झाली नाहीं तरी तशी तयार करण्याचे  प्रयत्न अनेक प्रांतांत बरेच झाले आहेत. व प्रत्येक प्रांतानें आपलें एथ्नोग्राफिकल खातें ठेवलें आहे, त्या खात्यांतून हें काम होत आहे. जातिभेदाच्या अभ्यासाचें दुसरें अंग म्हटल म्हणजे या अनेक जाती मिळून जी पद्धति होते तिचें वर्णन, म्हणजे तदंतर्गत अन्योन्याश्रयाचें सोपानरचनेचें क्रोध, द्रोह, ईर्षा असूया इत्यादि भावनांचें वर्णन. तिसरा भाग म्हटला म्हणजे जाति हा एक प्रकारचा संघ या दृष्टीनें विचार करून त्या संघाची अंतर्घटना, व स्वयंशासन व इतर संघांशीं व एकंदर समाजाशीं संबंध या दृष्टीनें अभ्यास. या अभ्यासामध्यें जाति, वर्ग, राष्ट्रजाति इत्यादि गोष्टींची तुलना येईल. या समुच्चयांच्या अभ्यासाचें ऐतिहासिक अभ्यास हें महत्त्वाचें अंग आहेच. त्यामध्यें जातींची घटनाविघटना इत्यादि गोष्टींचा विचार करावा लागतो. हा सर्व घटनाशास्त्रीय अभ्यास झाला. हिंदु समाजाचा एकंदर इतिहास या अभ्यासाचें हें उपांग आहे. हिंदु समाजघटनेचा इतिहास द्यावयाचा म्हटला म्हणजे एक अधिकच व्यापक विवेचन करावें लागणार. यासाठीं येथें अत्यंत स्थूल गोष्टींचाच उल्लेख करून मोकळें झाले पाहिजे. अनेक जातींचीं वर्णनें ज्ञानकोषांत त्या त्या जातींच्या नांवाखाली आलींच आहेत. आतां अनेक जाती मिळून जी पद्धति होते त्या पद्धतीकडे लक्ष देउं.

अनेक निरनिराळया राष्ट्रजाती म्हणजे फिरतीं राष्ट्रें हीं एकत्र आलीं म्हणजे त्यांचा एकमेकांशीं संबंध मनुष्यास्वभावाच्या नियमानुसार उत्पन्न झालेल्या कांहीं नियमांनीं संघटित होतो. त्या नियमांचा शोध करणें म्हणजे पद्धतीचें स्वरूप वर्णन करणें होय.
    
जातिभेद हा शब्द इंग्रजी राज्यांत रूढझाला आहे. तो समाजाचे जातिमूलक भेद किंवा माणसामाणसांतील जातिमूलक भिन्नता किंवा द्वैत या अर्थानें वापरला जातो. आपल्याकडे जातिभेद आणि चातुर्वर्ण्य  या गोष्टी एकच अशी समजूत होऊन जातिभेदास धार्मिक पाठिंबा आहे अशा त-हेची समजूत झाली. चातुर्वर्ण्य आणि जातिमय समाज या गोष्टी एक आहेत असेंच लोकांस वाटत होतें व त्यास कांहीं अंशीं कारण असें होतें कीं जाती एकंदर किती आहेत, त्या किती भिन्न स्वरूपांच्या आहेत इत्यादि गोष्टींविषयीं कल्पना अशी होती कीं तात्विक चार वर्ण ते जातीच आहेत त्यांच्यांत पोटजाती पडल्या असतील आणि कांहीं जाती संकरानें उत्पन्न झाल्या असतील व कांहीं कर्मलोपानें किंवा दुस-या कांहीं कारणांनीं तुकडे पडत जाऊन वाढल्या असतील. जातिमय समाजाची स्थिति सरकारचें मानवशास्त्र खातें  व शिरोगणती खातें यांनीं पद्धतशीर पहाणी केल्यापूर्वी जातिभेदाचें खरें स्वरूप् लोकांस अवगतच नव्हतें असें म्हणता येईल; व याच खात्यांनीं जातींच्या पऋतशीर अभ्यासास प्रारंभ केला आहे; व खासगी पंडितांनीं फार तर त्यांच्या साहित्यावरून निराळे निर्णय काढणें, किंवा ऐतिहासिक अभ्यासांत भर घालणें या गोष्टी केल्या आहेत.

जाति हा एक सदृश मनुश्यांचा समुच्चय होय. या समुच्चयामध्यें आपल्या एकत्वाची व इतरांपासून भिन्नत्वाची भावना असते, व यामुळें जातीचें हिताहित हें व्यक्तीस आपलें हिताहित असें कांहीं अंशानें वाटतें. जातीची व्याख्या करण्याचे प्रयत्न अनेक झाले आहेत. त्यांमध्यें सर्वांस लागू पडणारें असे स्थूल लक्षण म्हटलें म्हणजे ''जन्मना जायते संघे प्रवेशो नान्यत: कदा । संघमर्यादितं क्षेत्रं विवाहे जातिरूच्यते ॥'' असें देतां येईल. याचा अर्थ:- ज्या विशिष्ट संघामध्यें प्रवेश जन्मानेच होतो आणि दुस-या कोणत्याहि कारणानें होत नाहीं व ज्या संघांतील लोकांस त्या संघाबाहेर लग्न करतां येत नाहीं त्या संघास जाति म्हणावें असा आहे जात व पोटजात हे शब्द वारंवार वापरले जातात व हे परस्परापेक्ष आहेत. उदाहरणार्थ कोंकणस्थ ब्राह्मण ही महाराश्टीय ब्राम्हणाची पोटजात होईल. पण महाराष्ट्रीय ब्राह्मण ही ब्राह्मजातीची पोट जात होईल. सामान्यत: ब्राह्मण, महाराष्ट्रीय ब्राह्मण व कोंकणस्थ ब्राह्मण या सर्वास जात असें म्हणतात. जेव्हां अंतर्विवाह म्हणजे संघातल्या संघांतच विवाह हा देशांत रूढ असतो म्हणजे देशामध्यें अनेक अंतर्विवाही समाज असतात तेव्हां त्या निरनिराळया संघांमध्यें उच्चनीचतेचें कारण असतो व कधीं कधीं परिणामहि असतो. म्हणजे एखाद्या जातीमध्यें कांहीं वर्गात आपण इतरांपेक्षां निराळे आहोंत किंवा उच्च आहोंत अशी भावना उत्पन्न झाली म्हणजे स्वत:स उच्च समजणारा समाज इतरांपासून आपले पृथक्त्व स्थापूं पहातो. ज्या अनेक वन्य व खेडवळजातींतील कांहीं लोक नगरवासी होतात व आचारविचार यांमध्यें सुधारले जातात तेव्हां त्यांच्यामध्यें इतरांपासून वियुक्त होण्याची प्रवृत्ति दिसूं लागते. एवंच अंतर्विवाह व उच्चनीच भाव यांचा अन्योन्याश्रय आहे. उच्चनीच भाव असला म्हणजे कोणत्यातरी तत्त्वावर त्याचें समर्थन व्हावें लागतें. यासाठीं सामाजिक पदवी, राजकीय महत्त्व किंवा आचारांतील उच्चनीचता या गोष्टींवर दोन समाजांतील पृथक्त्व रक्षिलें जातें. ''अ'' समाज ''ब'' समाजाहून उच्च कां? तर 'अ' अधिकारी समाज आहे म्हणून, किंवा जमीनदार समाज आहे म्हणून किंवा तो राजवंशांतील आहे म्हणून, किंवा तो रहाणीनें श्रेष्ठ आहे म्हणून. या त-हेच्या विचारांनीं भिन्न समाजांमध्यें उच्चनीचता स्थापन करणा-या कल्पना चोहोकडे प्रचलित आहेत. भारतीयांस किंबहुना एशियाटिक लोकांस दक्षिण आफ्रिकेंत व अमेरिकेंत कनिष्ठता याच कल्पनानुसार प्राप्त झाली आहे. हिंदुस्थानामध्यें आर्थिक, राजकीय व आनुवंशिक पदवी या कारणांचें महत्त्व आहेच; पण त्या कारणांस प्राधान्य मिळालेलें नाहीं. उच्चनीचतेचें अगदीं निराळया कारणानें स्पष्टीकरण करण्यांत आलें आहे. आणि तें कारण म्हटलें म्हणजे पावित्र्यापावित्र्य विचार होय. अमुक जात उच्च कां तर ती अधिक पवित्र आहे म्हणून; आणि अमुक जात कनिष्ठ कां तर ती कमी पवित्र किंवा अपवित्र आहे म्हणून. याचा अर्थ असा नव्हे कीं सांपत्तिक स्थिति किंवा शिक्षण यांवर जातींची उच्चनीचता हिंदुस्थानांत ठरत नाहीं. त्यांच्यावर उच्चनीचता ठरतेच; पण ती प्रत्यक्ष न ठरतां त्यांच्यावर पावित्र्यापावित्रय ठरून नंतर ठरते. या पावित्र्यापावित्र्याच्या तत्त्वास हिंदुस्थानांत प्राधान्य मिळालें. त्याचें कारण ब्राह्मणजातीचें प्रथमस्थान होय. या प्राचीन काळीं दक्षिणेवर अवलंबून असणा-या जातीचें प्रथमस्थान कोणत्याहि दुस-या तत्त्वावर सिद्ध करतां आलें नसतें. शिवाय ब्राह्मण हा ईश्वराशीं विशिष्ट संबंध सांगणारा वर्गं असल्यामुळें त्याचें प्राधान्य लोकांस मान्य असणें व त्याचें पावित्र्य अधिक वाटणें या गोष्टी स्वाभाविकच होत्या. ब्राह्मणी धर्मशास्त्राच्या इतिहासांत क्रमाक्रमानें आचारधर्मास  देखील प्राधान्य मिळालें. तें ब्राह्मणजातीच्या उच्चतेचें व दृश्य आचरणावर व्यक्तीची उच्चता असावी या तत्वाचें समर्थन करण्यासाठीं मिळालें. जर क्षत्रियवर्गानें आपलें प्राधान्य देशावर स्थापित केलें असतें तर त्याबरोबर आचारधर्माव्यतिरिक्त पण उच्च नीचतानिर्णायक निराळें तत्त्व समाजांत सुरू करावें लागलें असतें; आणि त्यामुळें येथील जातिभेद इतर देशांतील जातिभेदासारखाच दिसूं लागला असता. आणि तो मांडणें किंवा कमी करणें या क्रिया करण्यास राजसत्ता समर्थ झाली असती. पण राजाचें सामाजिक महत्त्व ब-याच अंशीं त्याच्या क्षत्रियत्वावर आणि त्याचें क्षत्रियत्व त्याच्या संस्कारावर व त्याची संस्कारार्हता ब्राह्मणांच्या इच्छेवर अशी परिस्थिति उत्पन्न झाल्यामुळें देशांतील क्षत्रियवर्ग फेरफार करण्यास पूर्णपणें दुर्बल ठरला. पावित्र्यापावित्र्यावर सामाजिक महत्त्व रचलें गेलें असल्याकारणानें आणि पावित्र्यापावित्र्यानिर्णायक आचारधर्म उत्पन्न झाल्यामुळें जगांतील एकंदर वस्तूंचे व रिवाजांचे पावित्र्याच्या तत्त्वावर वर्गीकरण करणें भाग पडलें आणि एकंदर सामाजिक विचारास जगापासून निराळें असें कांहीं वळण मिळालें.

अनेक जातींचें अस्तित्व, त्यांत ब्राह्मणजातीचें प्राधान्य व जातींची उच्चनीचता व तिचें स्पष्टीकरण करणारी पावित्र्यापावित्र्यतेची कल्पना या गोष्टी जातिभेदाच्या मुख्य घटक म्हणून धरण्यास हरकत नाहीं. ब्राहमणजातीच्या उच्चतेचा एक लांबलचक इतिहास आहे  (ब्राह्मण पहा.)   पावित्र्यापावित्र्याच्या कल्पना वेदकाळापासून पराशरस्मृतीपर्यंत एकसारख्या वाढत कशा गेल्या याचें स्पष्टीकरण अन्यत्र केलेंच आहे ('' पावित्र्य'' पहा.)  उच्चनीचतेच्या कल्पनांनां चातुर्वण्याच्या कल्पनेमुळें थोडाबहुत पाठिंवा मिळाला. परंतु समाजाच्या एकंदर इतिहासांत उच्चनीचतानिर्णायक दुस-या अनेक गोष्टी होऊन गेल्या आहेत. एका जातीनें दुस-या जातीवर विजय मिळविणें आणि त्या प्रदेशांत राहणें तसेंच एका वसलेल्या प्रदेशांत निराळी जात केवळ वस्तीसाठीं मागाहून येणें व नवागतांचे आचारविचार स्थानिकांहून भिन्न असणें यामुळें नवागतांची उच्चता किंवा नीचता निर्णित झाली आहे. जेते स्थानिकांहून श्रेष्ठ होणार व केवळ वस्तीसाठीं आलेले स्थानिकांहून हलके ठरणार असा नियम दिसतो. जातींचे कांहीं लोक परक्या प्रदेशांत जाऊन आचारभिन्नता पावले म्हणजे ते दोन वर्ग पुन: संबंध आला असतां एकमेकांस हलके समजणार. पुष्कळ प्रसंगीं एका विशिष्ट वर्गाचा ज्या जातीशीं संपर्क येतो त्या जातीच्या उच्चनीचतेवर त्यांशीं संबंध ठेवणा-या वर्गाची उच्चनीचता ठरते आणि प्रसंगीं अशा कारणानें एखाद्या जातीचे तुकडेहि पडतात. एवंच अनेक कारणांचा उच्चनीचता ठरविण्यांत परिणाम झाला आहे. हीं कारणें प्रत्येक प्रसंगीं कोणकोणतीं होतीं हें विशिष्ट जातीचें इतिहास लिहितांनाच पहावें लागेल. सामान्यत: जगांत विशिष्ट वर्गाची, राष्ट्रांची किंवा जातींची उच्चनीचता ठरण्यास ज्या गोष्टी कारण झाल्या आहेत त्याच हिंदुस्थानांत कारण झाल्या आहेत. आतां जातींच्या अनेकत्वाचा किंवहुनाअसंख्यत्वाचा विचार करूं. समाजाचे तुकडे पडत जाऊन जातिभेद वाढत गेला अशी लोकांची समजूत आहे. पण ज्या मोठया समाजाच्या आज ४००० जाती पडतील इतका मोठा समाज पूर्वी कधींच अस्तित्वांत नव्हता. अनेक समाज एकत्रित केले गेले पण त्यांचें पूर्ण एकीकरण न झाल्यामुळें हा चार हजार जातींचा समाज तयार झाला आहे. तथापि मोठया समाजाचे तुकडे पडत जाण्याची क्रियाहि झालेली आहे. ब्राह्मण म्हणविणा-या जातींची संख्या सुमारें ८०० आहे. यांतील बहुतेक जाती आद्यब्राह्मण वर्णाचे तुकडे पडत पडत झाल्या आहेत यांत संशय नाहीं.

जातींचें वर्गीकरण करण्याचे प्रयत्न अनेक झाले आहेत.  जातींचें कर्म पाहून क्षत्रियवैश्यादि वर्णांत घालणें ही वर्गीकरणाची जुनी पद्धत झाली. जातीचें, आज त्यांचा आयुष्यक्रम पाहून प्रगत, मध्यम व मागासलेले असेंहि वर्गीकरण राजकारणांत करण्यांत येतें. जातींचें वर्गीकरण त्यांच्या उत्पत्ति वैशिष्टयावरून किंवा स्वरूपवैशिष्टयावरून करण्यांत आलें आहे. या तत्त्वाप्रमाणें सेन्ससवाल्यांनीं जातींचे सात वर्ग पाडले आहेत ते येणेंप्रमाणें :-  (१)  राष्ट्रजातिस्वरूपर जाति, ( २) कर्मनिर्णित जाति,  (३)  सांप्रदायमूलक जाति,   ( ४) संकरमूलक जाति,   (५) राष्ट्रस्वरूपी जाति.  ( ६)  स्थानांतरमूलक जाति, व   (७)   भिन्नचारमूलक जाति.

यांमध्यें राष्ट्रजातिस्वरूपी जाति व राष्ट्ररूवरूपी जाति याचें वर्गीकरण आकारावर केलें आहे व तें त्या समुच्चयाच्या प्रयोजनावरहि आहे. उदाहरणार्थ वंजा-यांची जात घ्या. ही जात अनेक निरनिराळया जातींतील माणसें एकत्रित होऊन तयार झाली व ही जात भटकी असल्यामुळें हिला थोडेसें राजकीय पृथक्त्वाचें स्वरूपहि आलें होतें. पण ती जात राष्ट्र कधींच बनली नव्हती. उलटपक्षीं मराठा आणि नेवार या जातींनां राष्ट्रस्वरूपी जाती म्हटलें आहे. कां कीं, यांचें राजकीय स्वरूप् अधिक स्पष्ट होतें.

बहुतेक जातींमध्यें जातीनें नेमलेली एक सभा असते. वरिष्ठ जातीमध्यें केव्हां केव्हां अशा प्रकारची सभा आढळून येत नाहीं. वरिष्ठ जातींत किरकोळ बाबतींत, जातींचा त्या जातींतील व्यक्तिंवर फारसा अंमल नसतो, पण महत्त्वाच्या बाबतींत मात्र खालच्या जातीप्रमाणेंच कडक अंमल असतो.

जातीनें निवडून दिलेल्या पांच लोकांची मिळून जातपंचायत बनते व त्या पंचायतीकडे जातीमधील तंटेबखेडे तोडण्याचें काम असतें. कांहीं जाती या पंचायतीवर एक सरपंच निवडतात. जातीमधील उपजातीमध्येंहि स्वतंत्र पंचायती असतात. एखाद्या प्रश्नासंबंधीं ज्यावेळी वाद उप्तन्न होतो तेवढया वेळेपुरतेच हे पंच एकत्र जमून आपला निर्णय देतात. एका जातीच्या अगर उपजातीच्या निरनिराळया पंचायतीहि असलेल्या आढळतात.

ज्या गुन्हेगाराला एखाद्या प्रश्नाचा निकाल लावून घ्यावयाचा असेल तर या पंचांनां समक्ष भेटून अगर पत्राद्वारे एके ठिकाणीं जमवितो. पंच जमल्यानंतर ज्यानें ती सभा बोलावली असते तो आपलें गा-हाणें पुढें मांडतो. गा-हाणे मांडण्यापूर्वी त्यानें आपला गुन्हा कबूल केला तर पंच त्याला जी शिक्षा द्यावयाची ती देतात. पण गुन्हा कबूल केला नाहीं तर त्याच्या विरूद्ध बाजूच्या साक्षीदारांच्या जबान्या होतात. त्यानंतर वादविवाद होऊन मग पंच निर्णय देतात. नर्मदेच्या कांठच्या प्रदेशांत एखादा माणूस अपराधी अगर निरपराधी ठरविण्याच्या बाबतींत 'रामरामायणकी चिठी' चा उपाय अंमलांत आणला जातो. तो प्रकार असा :- एका चिठ्ठीवर  राम व दुस-या चिठ्ठीवर रावण अशीं अक्षरें लिहून त्या चिठ्या देवाच्या मूर्तीवर ठेवतात व गुन्हेगाराला चिठ्ठी उचलण्यास सांगतात. गुन्हेगारानें अचलेली चिठ्ठी रामाची असली तर तो निर्दोषी ठरला जातो व रावणाची असेल तर तर त्याला शिक्षा सांगण्यांत येते. कांहीं कांहीं खालच्या जातींत एखाद्या बाईवर व्यभिचाराचा आरोप आला असल्यास तिचा हात उकळत असलेल्या तेलांत घालण्यांत येतो. हात भाजल्यास ती अपराधी व न भाजल्यास तिला निरपराधी ठरविण्यांत येतें. याशिवाय अनेक प्रकारच्या शिक्षा गुन्हेगाराला देण्यांत येतात. कांहीं ठिकाणीं गुन्हेगाराकडून, दंड अगर ज्ञातिभोजन घेण्यांत येतें तर कांहीं कांहीं ठिकाणीं एक मिशी काढणें, बायकांच्या बाबतींत केंस भादरणें इत्यादि शिक्षा देण्यांत येतात. ही शिक्षा गुन्हेगारानें न पाळल्यास त्याला ज्ञातींतून बाहेर हाकलण्यांत येतें.

पूर्वी जातपंचायतीचा जातीवरील ताबा अबाधित स्वरूपाचा असे. पण हल्लीं तो ढिला होत चालला आहे. ब्रिटीश अमदानींत रेल्वे, मोटारी इत्यादि साधनांची सोय झाल्यानें एखाद्याला जातीनें वाळीत टाकलें तर तो चटकन दुसरीकडे जाऊन रहातो. तो आपल्या जातीची पर्वाच करीत नाहीं. व्यक्तिस्वातंत्र्याचें नसतें स्तोम माजल्याचा हा परिणाम होय.  पण अशा रीतीनें जातपंचायतीचा ताबा शिथिल झाला असला तरी या जातपंचायतीच्या जागीं जातसभा अस्तित्वांत येऊं लागल्या आहेत. या जातसभांचा उद्देश आपल्या जातीची उन्नति करणें हा असून जातीनिर्बंध ठरविण्याच्या बाबतींत या सभा पुष्कळ ठराव करतात, व ते ठराव पाळण्याचें सभासदांकडून वचन घेण्यांत येत असतें. उदाहरणार्थ, बहारमध्यें गोलाळ जातीच्या सभेनें बालविवाहनिशेधाचा ठराव पास केला आहे व बायकांनीं दूध अगर भाजी न विकण्याचा ठराव पसार केला आहे. दोसढ जातींमधील चोरी करणा-या इसमाला जातीबाहेर टाकण्याचा ठराव पसार झालेला आहे. जातपंचायतींनां मुख्यत: खालील स्वरूपाच्या प्रश्र्नांवर निर्णय द्यावा लागतो:-

(१) खालच्या जातीच्या माणसाबरोबर भोजन अगर धूम्रपान करणें;   (२)  गाय, घार इत्यादि पवित्र वस्तूंची हिंसा;   (३)   स्वजनवहा अगर हिंसा;   (४) एखाद्याचा कान अगर नाक कापणें;    (५)   खालच्या जातीकडून जोडा खाणें;    (६)  वडील माणसांनां शिवीगाळी देणें;   (७)   निशिद्ध धंदे करणें;    (८)  जातिनिर्बंध न पाळणें ;    (९) पुनर्विवाह करणें वगैरे.

एतद्देशीय अंमलाखालीं जातिविषयक  प्रश्नांचा निकाल लावण्याच्या कामीं राजा हा सर्वांत श्रेश्ठ गणला जात असे. राजाच्या हातांत एखाद्या जातीला श्रेष्ठ ठरविण्याची अगर कनिष्ठ ठरविण्याची मुभा असे. बंगालचा राजा बल्लाळसेन यानें कांही जातींनां मान्यता दिली होती व कांहीं जातींनां कनिष्ठ ठरविलें होतें. मुसुलमानी अंमलाखालीं संस्थानिक जमीनदार यांच्या हातांत वरील प्रकारची सत्ता केंद्रीभूत झाली होती. हल्लीं देखील एतद्देशीय संस्थानिक व जमीनदार यांच्या हातांत जातिविषयक प्रश्नांचा निर्णय करण्याची सत्ता थोडयाफार अंशानें आहे. याचें उत्तम उदाहरण नेपाळमध्यें दिसून येतें. नेपाळमध्यें एखाद्या मनुष्यानें कांहीं जातिविषयक गुन्हा केला तर संस्थानविरूद्ध तो गुन्हा समजण्यांत येऊन संस्थानच्या न्यायकोर्टाकडून त्या गुन्हयाची चौकशी केली जाते. राजपुतान्यांतील मारवाड, खुशालगड आणि बुंदी या संस्थानांमध्यें दरबाराकडून प्रत्येक जातीच्या पंचायतीचा अध्यक्ष नेमला जातो. मणिश्निापूर संस्थानांत जातिविषयक प्रश्नांचा निर्णय देण्याच्या बाबतींत राजा सर्वांत श्रेष्ठ समजला जातो. दक्षिण मलबारमधील नंबुद्री ब्राह्मणांमध्ये जातिविषयक तंटा तोडण्याचें काम कोचीनच्या राजाकडे देण्यांत आलें आहे. ओरिसा प्रांतातील संस्थानांमध्येंहि अशाच प्रकारची पद्धत अमलांत असल्याचें आढळून येत.

एकेका जातिसंबंधाची ही व्यवस्था वर्णन केली. पण पूर्वी अनेक जातीसंघाची एक परिषद असे व तिच्याकडे निरनिराळया जातींमधील तट तोडण्याचें काम असे असे प्राचीन इतिहासावरून दिसून येतें. बुद्धधर्माच्या अमदानींत अशा प्रकारच्या धर्मसभा असल्याचें आढळतें. अद्यापि गुजराथमध्यें व्यापारी जातींपैकीं कांहीं कांहीं जातींमध्यें अशा प्रकारच्या सभा आढळतात. मनुस्मृतीत अशा प्रकारच्या परिषदेचें वर्णन आलेलें आहे. ज्या प्रश्र्नावर धर्मशास्त्राचा स्पष्टपणें निर्णय झालेला नसतो असे प्रश्न या परिषदेनें सोडवावयाचे असतात असें मनूचें मत दिसतें. या परिषदेमध्यें तीनपासून दहापर्यंत लोक असतात व त्यांत चारी वर्णांच्या माणसांचा समावेश होत असे असें मनूनें दिलेल्या वर्णनावरून दिसतें. तें कांहींहि असो हल्ली कांहीं ठिकाणें सोडून हिंदुस्थानांत जातपंचायतसंस्था नामशेष झाली आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं.

दख्खनमध्यें मुसुलमानी व मराठीं साम्राज्यांत जातिविषयक तंटेभांडणें तोडण्याचें काम त्या जातीच्या जातगंगे  (जातिसंस्था)  कडे असें.   ही जातीची पंचायत आपल्या जातीच्या नियमांचें उल्लंघन करणारास जातिबहिष्कृति अथवा देहदंडन किंवा नुसता पैशाचा दंड वगैरे शिक्षा देत असे. निरनिराळया दोन जातींचें भांडण असल्यास पैठण किंवा क-हाड अशासारख्या एखाद्या प्रसिद्ध क्षेत्राच्या ठिकाणीं असलेल्या धर्ममहासभेकडे तें सोपविण्यांत येई. या धर्ममहसभेंत बहुधां वेदशास्त्रपारंगत व श्रुतिस्मृतिज्ञ असे ब्राह्मण पंडितच मुख्यत्वेंकरून असत व ते याज्ञवल्क्यादि स्मृति धर्मसिंधु, मयूख वगैरे ग्रंथांधारें व पूर्वापार चालत आलेल्या वहिवाटीप्रमाणें त्या तंटयाचा निकाल लावीत असत आणि मग त्या निकालाबरहुकुम अंमल बजावणी सरकारी अधिका-यांच्या देखरेखीखालीं होई.

जातींचा दुस-या जातीशी विवाहसंबंध असतो असें जरी विधान करण्यांत आलें आहे. तरी ज्या राष्ट्रजातिस्वरूपी जाती आहेत त्यांनां तें लक्षण लागू पडत नाहीं व त्या जातीमध्यें बाहेरच्यांचा प्रवेशहि होतों हें कैकाडी, भिल्ल, वंजारी इत्यादि अनेक जातीसंबंधानें अवलोकन करून सरकारी मानवशास्त्रवेत्त्यांनीं म्हटलें आहे. तीच गोष्ट इतर जातींसंबंधानेंहि थोडक्या अंशानें खरी आहे असें म्हणतां येईल. व याचीं अनेक उदाहरणें पहिल्या विभागांत समाजरूपांतराचे नियम आणि हिंदु समाजाचें भवितव्य या प्रकरणांत दिलीं आहेत आणि त्याच प्रकरणामध्यें जुन्या जाती मोडल्या जाऊन नवीन नवीन जाती कशा बनतात यासंबंधानें तत्त्वेंहि दिलीं आहेत  (पृष्ठ ३४५ पहा.)  जातियुक्त समाजांत दिसून येणारा उच्चनीचभाव व त्याचें समर्थन करणारी परंपरा हीं मागें वर्णिलींच आहेत. जातिमत्सर, जात चोरणें म्हणजे आपण भिन्न जातीचे आहोंत असें सांगणें यांसारख्या क्रिया अनेक भिन्न मनुष्यसमुच्चय असलेल्या प्रत्येक देशांत आढळून येतात. त्यांत भारतीय नाविन्य असें कांहीं नाहीं. उदाहरणार्थ चिनी व गो-या अशा भिन्न रक्तांची प्रजा आपणास अमेरिकेंत मेक्सिकन म्हणवून घेत. पुष्कळ ठिकाणीं यहुदी लोक आपण यहुदी आहों हें लपवूं पहातात. तर तसल्या क्रिया भिन्न देशांत होण्यास जीं कारणें असतात तींच कारणें हिंदुस्थानांत जात लपविण्यास लोकांस प्रवृत्त करतात.

हिंदुसमाजाच्या इतिहासामध्यें ज्या मोठया परिणामकारी गोष्टी झाल्या आणि ज्या जातींच्या इतिहासांतहि महत्त्वाच्या आहेत अशा गोष्टी म्हटल्या म्हणजे ब्राह्मणजातीची स्थापना, तिचे विभाग होणें, तिनें इतर सर्व समाजास संस्कारबद्ध करण्याचा प्रयत्न करणें आणि सर्व जातींची उत्पत्ति देण्याचा प्रयत्न करणें व या त-हेच्या खटपटींनीं सर्व राष्ट्रांत एकवंशसंभवत्वाची कल्पना उत्पन्न करणें या होत. ब्राह्मणजातीचें महत्त्व कमी करण्याचे जे प्रयत्न झाले तेहि सामाजिक इतिहासांत विचारार्ह होत. यांमध्यें बोद्ध, जैन,लिंगाईत, महानुभाव इत्यादि संप्रदायांची गणना करण्यांत येईल. या संप्रदायांस ब्राह्मणजातींचें महत्त्व मोडण्याच्या खटपटींत अपयश कसें काय आलें हें त्या त्या संप्रदायांच्या विवेचनांत स्पष्ट केलें आहे. अनेक जाती एकत्र करणारीं राष्टें जीं मधूनमधून जन्मास आलीं त्यांचा इतिहास अजून शोधला जावयाचा आहे. त्यामध्यें अत्यंत महत्त्वाचीं राष्टें म्हटलीं म्हणजे रजपूत व मराठें हीं होत. संप्रदायांचें या बाबतींत कार्य फारसें यशस्वी झालें नाहीं. तथापि जेव्हां संप्रदायास राजकीय स्वरूप येऊं लागतें तेव्हां तें कार्य जोरानें होऊं लागतें असाहि नियम, जर शीखांस राजकीय प्रामुख्य कांहीं दिवस जास्त मिळतें तर घालतां आला असता. सध्यांची जी राष्ट्रीय भावना सर्व देशभर जागृत झाली आहे तिचें पर्यवसान एक मोठी जात निर्माण करण्याकडे होईल किंवा नाहीं. हा प्रश्न भवितव्याच्या अंध:कारांत लपला आहे.

   

खंड १४ : जलपैगुरी - तपून  

 

 

 

  जलमस्तिष्क रोग
  जलयंत्रशास्त्र
  जलालपेठ
  जलालखंड
  जलालाबाद
  जलालाबाद, तहसील
  जलाली
  जलालुद्दीन मुहम्मद वल्खी
  जलालुद्दीन सयुती
  जलेश्वर
  जलेसर, तहसील
  जलोदर
  जलोपचार
  जव
  जवस
  जवादि डोंगर
  जवानबख्त मिर्झा
  जवासिया
  जव्हार
  जशपूर
  जसदन संस्थान
  जसपुर
  जसवंतनगर
  जसवंतसिंह, महाराणा
  जसील
  जस्टिन
  जस्टिनियन
  जस्त
  जस्सो
  जहागिराबाद
  जहागीर, जहागीरदार
  जहांगीर
  जहांगीर बादशहा
  जहाज फिरंगी
  जहाजपुर
  जहांदरशहा
  जहानआरा बेगम
  जहानाबाद
  जहनु
  जहलण
  जळगांव
  जळापूर
  जळापुर तालुका
  जळू
  जाई
  जाकोबाबाद
  जाखाऊ
  जाखन
  जांजगरि
  जाजमाउ
  जाट
  जाटपु
  जाटपोल
  जातक
  जाति
  जातिभेद
  जादम
  जादू
  जादूचा कंदील
  जाधव
  जाधवराई
  जॉन
  जानसाथ
  जॉनसन अॅंड्र
  जॉनसन, डॉय साम्युएल
  जानसार बावर
  जॉन, सेंट
  जानीबेग तुर्खन मिर्ज्ञा
  जानेफळ
  जानोजी निंबाळकर
  जाफना
  जाफरखान
  जाफराबाद
  जांब
  जांबवान
  जाबाल
  जांबु घोडा
  जाब्लोस्काव, पाल
  जांभळी जमीनदारी
  जांभूळ
  जांभेकर, बाळ गंगाधर
  जामखेड
  जामगड
  जामतारा
  जामदारखाना
  जामनगर
  जामनेर
  जामपुर
  जामराव कालवा
  जामी
  जामीनकी
  जामोद
  जाम्निया
  जायफळ, जायपत्री
  जारकर्म
  जॉर्ज टाऊन
  जॉर्ज राजे
  जॉर्जिया
  जालंदर, जिल्हा
  जालना
  जालवणकर, नारायणबोवा
  जालापहाड
  जालारी
  जालिआ
  जालोर
  जावजी दादाजी चौधरी
  जावड
  जावरा
  जावळी
  जावा
  जाविदखाना
  जासवंद
  जासी
  जासुंद
  जाहिरात
  जिऊ महाला
  जिगणी
  जिजाबाई
  जिजिराम
  जिंजी
  जितुलीया
  जिंतूर
  जिंद
  जिनकीर्ति
  जिनगर
  जिनप्रभ
  जिनीव्हा
  जिनेश्वरसुरि
  जिनोआ
  जिन्सीवाले, श्रीधर गणेश
  जिप्सी
  जिब्राल्टर
  जियागंज
  जिरंग
  जिरळ कामसोळी
  जिराफ
  जिंरार
  जिराईतखाना
  जिरें
  जिलेटिन
  जिवबादादा बाक्षी
  जीन मेरी रोलंड
  जीवकचिंतामणी
  जीवधन किल्ला
  जीवनकार्यविचार
  जीवन्मुक्त
  जुई
  जुगार
  जुगोस्लाव्हिया
  जुजुत्सु
  जुझोतिया ब्राह्मण
  जुडा
  जुडीआ
  जुतोघ
  जुनागड
  जुनापाणी
  जुनापादर
  जुनो
  जुनोना
  जुन्नर
  जुपिटर
  जुबल
  जुबो
  जुभखा
  जुव्हेनल
  जूब
  जूल, जेम्स प्रेस्कॉट
  जेऊर
  जेकब
  जेजाकभुक्ति उर्फ जिझोटी
  जेजुरी
  जेझील
  जेतपुर
  जेघे
  जेना
  जेपाळ
  जेफर्सन, थॉमस
  जेबील
  जेम्सटाऊन
  जेम्स मेरी सॅन्ड्स
  जेम्स राजे
  जेयोर
  जेरिको
  जेरिझिम
  जेरुसलेम
  जेरेसा
  जेर्हा
  जेलेपला
  जेल्डर्लंड
  जेवर
  जेव्होंन्स, विल्यम स्टॅनले
  जेष्ठमध
  जेसर
  जेसरी
  जेसलमीर
  जेसुइट लोक
  जेजोर, जिल्हा
  जेहोव्ह
  जैटिया
  जैटियापूर
  जैन, संप्रदाय
  जैनेंद्र व्याकरण
  जैमिनी
  जैस
  जैसवाय
  जोक्जाकर्त
  जोग, कृष्णाजी महादेव
  जोगापरमानंद
  जोगी
  जोगेश्वरी
  जोडिया
  जोतिबाचा डोंगर
  जोत्याजी केसरकर
  जोदिया
  जोधपुर
  जोधबाई
  जोन ऑफ आर्क
  जोनगन
  जोनपुर
  जोनराज
  जोन्स, सर विल्यम
  जोबत, संस्थान
  जोरा
  जोरिय
  जो-हाट
  जोवई
  जोशी
  जोशी, अण्णा मार्तंड
  जोशी, गणेश कृष्ण
  जोशी, गणेश वासुदेव
  जोशी, गणेश व्यंकटेश
  जोशी, चासकर
  जोशी, बारामतीकर
  जोशीमठ
  जोहानिस्बर्ग
  जोहानीझबर्ग
  जोहार
  जोही
  जोहोर
  जौगड
  जौहरीफरवी
  ज्यूटीगल्पा
  ज्योतिपंत महाभागवत
  ज्योति:शास्त्र
  ज्योतिष्टोम
  ज्योती
  ज्वर
  ज्वांग, पट्टुआ
  ज्वारी
  ज्वालामुखी
 
  झऊरी मुल्ला
  झगरपूर
  झज्जर
  झंझरपुर
  झमानशहा
  झमानिया
  झमीनदवार
  झरथुष्ट्र
  झलिदा
  झलून
  झाकाटेकस
  झांग, जिल्हा
  झांजी
  झांझमेर
  झांझीबार
  झाडीतेलंग
  झानेसव्हील
  झान्टे
  झान्थस
  झाफरखान
  झाफरवाल
  झाबिताखान
  झाबुआ
  झाबुलीस्तान
  झाबेल
  झांबेसी नदी
  झांबोअंग
  झामपोदर
  झामसिंग
  झामोरा
  झामोरीन
  झार
  झारगर जात
  झारा
  झारापाप्रा
  झा-होन
  झालकाटि
  झालरपाटण
  झालवान
  झालावाड
  झालावाड संस्थान
  झालोड
  झांशी, जिल्हा
  झांशीची राणी, लक्ष्मीबाई
  झिंगकलिंग हकमती
  झिगन
  झिंझुवाडा
  झितोमीर
  झिनत-उन-निसा बेगम
  झिंपी तौडू
  झियाउद्दीन बरनी
  झिरा
  झिरी
  झिवारत
  झीटून
  झीत्झ
  झीनवर
  झीनॉफानेझ
  झीलंड
  झुंगेरिया
  झुंझुनु
  झुबेदा खातुन
  झुब्दतुन्निसा
  झुरळ
  झुलफिकारखान
  झुलुलंड
  झूवा
  झूरिच
  झूसी
  झेंद-अवेस्ता
  झेनागा
  झेनाटा
  झेनिद
  झेनोफोन
  झेनोबिआ
  झेप्पेलिन, काऊंट फर्डिनंड
  झेब-उन्-निसा बेगम
  झेब्रा
  झेरबस्ट
  झेरिआ
  झेर्नोविट्झ
  झेलम
  झेलम कालवा
  झेलम नदी
  झेलम वसाहत
  झैदपूर
  झैनखान कोक
  झैनाबादी महाल
  झैनुल अबिदिन
  झैमुख्त
  झैसान
  झोडगे
  झोब जिल्हा
  झोला, एमिली एडवर्ड चार्लस
 
 
  टंकारी
  टक्कर देश
  टक्का
  टझी
  टनब्रिजवेल्स
  टरपेलट
  टर्गो, अॅन रॉबर्ट जॅक्स
  टनेंट
  टॅव्हर्नियर
  टॅसिटस कॉनेंलिअस
  टस्कुलम्
  टांकणखार
  टांक तहशील
  टाकळ
  टाकळ घांट
  टाकळा
  टांकळी
  टाकळी बुदुक
  टाकी
  टॉंगकिंग
  टांगानिका
  टांगानिका प्रदेश
  टागोर, देवेन्द्रनाथ
  टागोर, राजा सौरेन्द्र मोहन
  टाटा, जमशेटजी नसरवानजी
  टाटा, सर रतन
  टोंड, कर्नल
  टॉडहंटर, आयझॅक
  टान्जीर
  टापिओका(कासावा)
  टायको ब्राही
  टायग्रे
  टायबर
  टायबेरिअस
  टायर
  टाराक्विनी
  टारांटो
  टारिसेली, इव्हर्जिलिस्टा
  टारेटम्
  टॉके
  टानों
  टार्सस
  टालबॉट, विल्यम हेनरी
  टालमड
  टॉलस्टॉय, लिओ
  टॉलेमी क्लॉडिअम
  टॉलमी फिलाडेल्फस
  टालेरंड, पेरीगॉर्ड प्रिन्स
  टावी
  टासमन, अबेल जॅन्सेन
  टासी
  टिकमगड
  टिटवी
  टिटागड
  टिडोर
  टिन्डाल जॉन
  टिपगड डोंगर
  टिपरा जात
  टिप्पू सुलतान
  टिप्पेरा
  टिफ्लिस
  टिंबक्टु
  टिंबा
  टिबेस्टी
  टिम्माड
  टिरोल
  टिलोता खैरी
  टिल्सिट
  टिळक, बाळ गंगाधर
  टीजिआ
  टीरिआ
  टुलुझ
  टूर्नें
  टूलाँ
  टेकचंद मुनशी
  टेक्सस
  टेगर्नसी
  टेग्युसीगलपा
  टंट, पिटर गथ्री
  टेन, हिप्पोलाइट अडोल्फ
  टेनेस्सी
  टेंपलबार
  टेबल माउंटन
  टेंभुरणी
  टेमेश्वार
  टेराडेलफ्यूगो
  टेलर, फिलिप मेडोज
  टेसिफॉन
  टैन-शान पर्वत
  टोक, संस्थान
  टोकिओ
  टोगोलंड
  टोचीनदी
  टोन, थिओबाल्ड वूल्फ
  टोपल्या
  टोबेगो
  टोमाटो
  टोराँटो
  टोरी फत्तेपूर
  टोलेडो
  टोवला
  टोशाम
  टोळ
  टौंगी
  टौंगुप
  टौंगू
  टौंग्थ
  टौंग्यु
  ट्युनिस
  ट्युनीशिआ
  ट्यूस
  ट्रॅलिझ
  ट्रान्सवाल
  ट्राम्बे
  ट्रॉय अथवा ट्रोड
  ट्रिनिदाद
  ट्रिपोली, प्रांत
  ट्रिबिझाँड
  ट्रीएस्टे
  ट्रटिश्के, हेन्रिक व्हॉन
  ट्रेंट
  ट्विकनहॅम
  ट्विन, मार्क
 
  ठग-ठगी
  ठठ्ठा
  ठाकुर
  ठाकुरगांव
  ठाकूरदासबोवा
  ठाकूरद्वार
  ठाणभवान
  ठाणें
 
  डॅडी
  डॅन
  डॅनिएल
  डन् कर्कं
  डॅन्झिग
  डफरिन, लार्ड
  डफळे
  डंबल
  डबलबीन
  डंबार्टन
  डब्लिन
  डभई
  डमडम
  डरहॅम
  डर्बी
  डलहौसी, लॉर्ड
  डलास
  डहोमे
  डॉक
  डाका, जिल्हा
  डाकोर
  डांग
  डांगची
  डांगर
  डांगी
  डांग्या खोकला
  डाग्वेरे, एल्. जे. एम.
  डोन नदी
  डान्यूब नदी
  डाबी
  डामर
  डायमंड हारबर
  डायमंड बेट
  डायोजेनीस
  डार्टमाउथ
  डार्डानेल्स
  डार्विन, चार्लस रॉबर्ट
  डॉलफिनचें नोंज
  डाल्टन, जॉन
  डास
  डाहाणु
  डाळिंब
  डिंक
  डिकन्स, चार्लस
  डिकेमाली
  डिक्वेन्सि, थॉमस
  डिंगरी
  डिंगणकर, मोरो विश्वनाथ
  डिडीमी
  डिडेरोट डेनिस
  डिफो, ड्यानिअल
  डिवार, सर जेम्स
  डी अर्लेबर्ट
  डीग
  डीगची लढाई
  डी बॉइने
  डीसा
  डुकर
  डुकी
  डुक्करकंद
  डुंगर
  डुप्ले
  डुम जात
  डुरिअन
  डूलचेन्यो
  डूलाँग
  डेकॅपोलिस
  डेकाटें
  डेडिआगॅच
  डेन्मार्क
  डेन्व्हर
  डेमॉस्थेनीस
  डेमिएटा
  डेमोक्रिटस
  डेराइस्मायलखान
  डेरागाझीखान
  डेरागोपीपूर
  डेराजात
  डेरानानक
  डेरापूर
  डेलफाय
  डेलवेअर
  डेव्हनपोर्ट
  डेव्ही
  डेहराडून
  डोंगरगड
  डोंगरपाली
  डोंगरपुर
  डोंगराळी जमीनदारी
  डोंगरा
  डोंगरे, वासुदेव नारायण
  डोडोना
  डोनाटेलो
  डोंबगांव
  डोबरेनर
  डोंबारी
  डाब्रूजा
  डोम
  डोमल जात
  डोमिनिका
  डोरली
  डोव्हर
  डोहर
  ड्युडरनेक
  ड्युबॉपिएरी
  ड्युसेल्डॉर्फ
  ड्यूमा अलेक्झांडर
  ड्यूरर आल्ब्रेक्ट
  ड्रायडन, जॉन
  ड्रॉयमन
  ड्रेस्डेन
  ड्रोघेडा
  ड्विन्स्क
 
  ढक्की भाषा
  ढालगज
  ढालाईत
  ढीमर
  ढुंढये जैन
  ढेकूण
  ढेरा
  ढोर
 
 
  तगर
  तंगेल
  तंगौंग
  तंजावर
  तंजावरचें राजघराणें
  तडवी
  तंडागांव
  तंडो
  तंडोअडाम
  तंडोअलाहयार
  तंडोवागो
  तंडोमहमदखान
  तत्रक
  तंत्रग्रंथ
  तत्त्वज्ञान
  तनकपूर
  तनखा
  तनावल
  तनुकु तालुका
  तपकीर
  तपागच्छ
  तपून

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .