प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून

जहांगीर बादशहा  (१६०५-१६२७) :- अकबर मरण पावल्यावर त्याचा वडील पुत्र सलीम हा नुरूद्दीन महंमद जहांगीर पातशहा गाझी हें नांव धारण करून तख्तावर बसला  (ता. २४ आक्टोबर  स. १६०५).   जहांगीर (जगज्जेता) च्या अंगांत अकबराच्या सदु्णांचा लेशहि नव्हता. तो विषयासक्त, निष्ठूर, स्वच्छंदी, स्वार्थसाधु व बालिश होता. अकबराच्या वेळच्या अनुभविक कामदारांस मात्र त्यानें कायम ठेविलें होतें. जकातीच्या नियमांत उपयुक्त फेरफार करून सर्व अर्जदारांची दाद लागावी म्हणून साठ सोन्याच्या घंटा जिला अडकविलल्या होत्या अशी एक सांखळी राजवाडयाच्या बाहेर सोडली होती. खुस्त्रू, पर्वीझ, खुर्रम् (शहाजहान)  व शहर्यार असे जहांगीरला चार मुलगे होते. हे सर्व सावत्र भाऊ होते. वडील पुत्र खुस्त्रू याचें व जहांगांरचें कधींहि पटलें नाहीं. पर्वीझ हा केवळ मद्यपी असून दुर्बुद्ध व गर्विष्ठ होता. खुर्रम् हा धूर्त, महत्त्वाकांक्षी, कावेबाज व तीव्र बुध्दीचा होता, तोच पुढें शहाजहान या नांवानें प्रसिद्ध झाला. शहर्यारचे नांव विशेष  महत्वाचें नाहीं. कारकीर्दीच्या अखेरीस झालेल्या उलाढालींत त्याचें विशेष  अंग होतें. जहांगीरची पहिली बायको जोधपुरच्या राजाची मुलगी जोधाबाई हिचें लग्न स. १५८८ त होऊन तिला खुस्त्रू व एक मुलगी झाली. दुसरी बायको बिकानेरच्या रामसिंग राजाची मुलगी तिसरी राजा मालदेवचा मुलगा उदयसिंग याची; हिचाच मुलगा शहाजहान. ही. स. १६१९ त मेली. चौथी पर्विझची आई; ही १५९८ त मेली. पांचवी केशवदास राठोडची मुलगी. सहावी जहांदरची व सातवी शहार्यारची आई. आठवी राजा अतिरायची मुलगी. नववी राजा मानसिंगाची नात. दहावी नूरजहान; हिला मूलझालें नाहीं. याशिवाय ब्लॉकमननें आणीक दहा बायकांची (त्यांत २ रजपूत)  नावें दिलीं आहेत.

जहांगीर गादीवर बसल्यावर लवकरच त्याचा वडील पुत्र खुस्त्रू यानें त्याच्याविरूद्ध बंड केलें  रजपूत लोकांनीं त्याचा पक्ष घेऊन जहांगीर यास पदच्युत करण्याची खटपट चालविली. परंतु जहांगीरनें त्याला पकडून कैदेंत ठेविलें; व त्याच्या साथीदारांस क्रूर शिक्षा दिल्या. नूरजहान  ( मिहरून्निसाखानम् ) व तिचा भाऊ आसफखान यांच्या मनांतून जहांगीरच्या पश्र्चात खुर्रम् यास बादशाही तख्त मिळावें असें असल्यामुळें, खुस्त्रूला जगांतून नाहींसें करण्याची त्यानीं खटपट चालविली. परंतु त्यांत त्यांस यश आलें नाहीं. आसफखानाची मुलगी मुम्ताजमहाल ही खुर्रम् यास दिली होती. खुर्रमने खानखानाननामक सरदाराच्या नातीशीं दुसरें लग्न लाविल्यामुळें नूरजहानची खूर्रमवर इतराजी झाली. आपली (  पहिल्या नव-यापासून झालेली )    मुलगी खुस्त्रूस देऊन त्याच्याशीं सख्य करावें असा तिनें विचार केला; परंतु खुस्त्रूनें ही गोष्ट कबूल केली नाहीं, यामुळें त्याचें तिच्याशीं वांकडें आलें. पुढें आपली मूलगी शहयीर यास देण्याचें ठरवून त्यास राज्य मिळवून देण्याची खटपट नूरजहान करूं लागली. खुर्रम् दक्षिणेंत गेला असतां त्यानें खुस्त्रू यास आपल्याबरोबर नेलें. त्या ठिकाणींखुर्रमच्या अनुमतीनें खानखानाच्या लोकांनीं खुस्त्रूचा खून केला. हें वर्तमान जहांगीर यास कळतांच, खुस्त्रूचा मुलगा बुलकी यानें आपल्या पश्चात् गादीवर बसावें असें त्यानें ठरविलें. जयपूर व मारवाड येथील  राजाचें जहांगीरशीं सख्य होतें; उदेपूरच्या राजाशीं मात्र त्याला युद्ध करावें लागलें. उदेपूरच्या घराण्यानें मोगलांचें स्वामित्व कबूल केले नव्हतें; जहांगीरनें आपली फौज उदेपुरावर पाठविली. परंतु रजपुतांनीं तिचा अनेकदां पराभव केला. पुढें जहांगीरनें खुर्रम यास रजपुतांवर पाठविलें; त्यानें रजपुतांचा पराभव करून त्यांस तह करण्यास लाविलें. उदेपूरचा राजपुत्र कर्ण बादशहास शरण गेला; अशा प्रकारें या युध्दाचा शेवट झाला.  (१६०८-१४).

नूरजहानचा आजा, ख्वाजा महंमद शरीफ हा खुरासानच्या सुलतानाचा वजीर होता. इराणचा शहातहमास्प यानें त्यास यज्द प्रांताचा कारभार दिला. त्याचा मुलगा ध्यासबेग यास कष्टदशा प्राप्त झाल्यामुळें तो इराणांतून पळून गेला. हयाची मुलगी नूरजहान स. १५७६ त कंदाहार येथें जन्मली. नंतर ध्यासबेग आपल्या कुटुंबासह हिंदुस्थानांत येऊन अकबरास भेटला. अकबरानें त्यास आपल्या दरबारीं नोकरी दिली. नूरजहानवर जहांगीरचें मन बसलें; परंतु अकबरास ही गोष्ट न आवडून त्यानें शेर अफगाणखाननामक पठाणाशीं नूरजहानचें लग्न करून त्याला बंगालप्रांतीं पाठविलें परंतु जहांगीर तख्तनशीनझाल्यावर त्यानें शेरखानाचा खून करून नूरजहानजा आग्-यास आणविलें. परंतु लग्नाची गोष्ट तिला पसंत पडली नाहीं. सुमारें चार वर्षे तिनें मोठया हालांत दिवस काढिलें. तिच्या खाण्यापिण्याचीहि नीट व्यवस्था नव्हती. कपडे शिवून व कशिदा काढून ती आपला निर्वाह करी. अखेरीस तिनें बादशहाचें म्हणणें कबूल केलें. तेव्हां जहांगीरनें तिच्याशीं लग्न करून तिला आपली पट्टराणी केली ( १५१०).  तिचा बाप ध्यासबेग यास मुख्य वजीराचें काम मिळालें. ध्यासबेग उदार, धार्मिक व राज्यव्यवहारांत कुशल होता. त्याचा पुत्र आसफखान ( पहा)  पुढें फार प्रसिद्ध झाला. आसफखानाची मुलगी मुमताजमहाल ही शहाजहानची बायको. यूसफ्खानाचा मुलगा शाएस्तेखान हा औरंगाझेबाच्या कारकिर्दीत प्रसिध्दीस आला. नूरजहानवर जहांगीरची फार मर्जी होती. तो प्रत्येक बाबतींत तिच्या तंत्रानें वागूं लागला. तिनें आपल्या नातलगांस मोठमोठीं कामें दिलीं. राज्याचा सर्व कारभार नूरजहान पाहूं लागली. बादशहानें तिचेंहि नांव नाण्यांवर खोदविलें. नूरजहाननें अनेक अनाथ मुलींचा सांभाळ केला. जहांगीराच्या लहरी व जुलमी वर्तमानवर तिनें चांगला दाब ठेवून उत्तम बंदोबस्त केला. तिनें सर्व राज्यास एक विशेष  प्रकारची शिस्त लाविल्यामुळें राज्याची भरभराट झाली. स्त्रीवर्गाची स्थिति सुधारण्याचे तिनें अनेक प्रयत्न केले. राज्यकर्त्यास लागणारे बहुतेक गुण तिच्या अंगीं होते. तथापि तिच्या महत्त्वाकांक्षेमुळें (  जहांगीरच्या पाठीमागें तख्तावर कोणास बसवावें याबद्दल तिनें अनेक भानगडी व उलाढाली उपस्थित केल्यामुळें )  सर्वत्र बंडाळी उत्पन्न झाली. दक्षिणच्या सुभ्यावर खानखानान याची नेमणूक झाली होती. परंतु त्याच्या हातून दक्षिणचा बंदोबस्त नीट झाला नाहीं. मलिकंबर यानें खानखानानचा पराभव करून अहमदनगर परत घेतलें. तेव्हां स. १६१६ त बादशहानें खुर्रम यास तिकडे पाठविलें. त्यानें मलिकंबरचा पराभव करून अहमदनगर काबीज केलें. या कामगिरीबद्दल जहांगीरनें खुर्रम यास शहाजहान असें नांव दिलें.

इ.स. १६०८ त कॅप्टन हॉकिन्स नांवाचा एक इंग्रज इंग्लंडच्या राजाचें पत्र घेऊन जहांगीरच्या भेटीस आला होता. जहांगीरनें त्याला सुरतेस वखार घालण्याची परवानगी दिली. पुढें इंग्रजांच्या व्यापाराची वृध्दि करण्यासाठीं हॉकिन्सनें बरीच खटपट केली. परंतु कित्येक लोकांनीं इंग्रजांविरूद्ध ओरड केल्यामुळें बादशहानें त्यांस व्यापार करण्याची बंदी केली; यामुळें हॉकिन्स निराश होऊन परत गेला (१६११). मोंगल बादशहाच्या वैभवाविषयीं हॉकिन्सनें कित्येक गोष्टी विलायतेस कळविल्यावर तेथील लोक अगदीं थक्क झाले. जहांगीरच्या राज्याचा वसूल ५० कोटी रूपये होता. त्यावेळीं इंग्लंड व स्कॉटलंडचा वसूल फक्त एक कोटी होता. पुढें कांहीं दिवसांनी सर टॉमस रो नांवाचा एक गृहस्थ इंग्लंडचा वकील म्हणून जहांगीरकडे आला. दोघांचें व्यापाराबद्दल बोलणें झालें व जमिनीवर इंग्रज व्यापा-यांपासून जकात घेऊं नये असें जहांगीरनें फर्माविलें. रोनें जहांगीरास कायमच्या तहाबद्दल विनंती केली; परंतु तह घडूं द्यावयाचा नाहीं असा दरबाराच्या मंडळीचा निश्र्चय होता इंग्रजांस वाटेल तेथें व्यापार करण्याची मोकळीक देण्याविषयाहि रोनें बोलणें लाविलें; परंतु खुर्रम् व आसफखान यांनीं हरकत केलीं; यामुळें त्याचें  ( तह करण्याचें )  काम सिध्दीस गेलें नाहीं. हळूहळू रो लोकांस अप्रिय होऊं लागला. यापुढें त्याच्या हातून महत्त्वाचें कांहीं एक काम न झाल्यामुळें त्याचा निरूपाय होऊन स. १६१८ त विलायतेस निघून गेला जहांगीरचे शेवटचे दिवस फारच कष्टप्रद गेले. बादशहाचे चार मुलगे व नूरजहान यांनीं राज्यव्यवस्थेबद्दल फार उलाढाली केल्या. शिवाय महाबतखान, खानखनान, आसफखान वगैरे बलाढय सरदारहि आपआपल्या मर्जीप्रमाणें वागत असत. शहाजहान यास बादशाही मिळावी अशी आरंभीं नूरजहानची इच्छा होती. परंतु तो आपल्या तंत्रानें वागणार नाहीं असें पाहून तिनें शेरखानापासून झालेली आपली मुलगी शहर्यार यास देऊन त्यास राज्यपद देण्याची खटपट केली. व इतर तिन्ही शहाजाद्यांचा नाश करण्याचा तिनें घाट घातला. आसफखानानें शहाजहानाचा पक्ष उचलिला. अशा प्रकारें बहिणभावांचें वितुष्ट पडलें. खानखानानहि शहाजहानास मिळाला. मात्र महाबतखानानें जहांगीराचा पक्ष सोडिला नाहीं. शहाजहाननें सरकारी खजिना आपल्या ताब्यांत घेण्याचा प्रयत्न चालविला. परंतु तो उघडकीस आल्यामुळें त्यानें जहांगीराची माफी मागितली. तथापि पुन: लवकरच त्यानें बंड केलें; तेव्हां महाबतखान व पर्वीझ यांनीं त्याचा पराभव केल्यामुळें तो दक्षिणेंत गेला. इ. स. १६२६ त पर्वीझ मद्यातिरेकानें मरण पावला. पुढें लवकरच जहांगीरहि आजारी पडला व ता. २८ ऑक्टोबर रोजीं दम्याच्या विकारानें मरण पावला. जहांगीरच्या मृत्यूनें जिकडे तिकडे गडबड चालू झाली. नूरजहानची सर्व सत्ता नष्ट झाली व तिचे बेतहि ढासळले. आसफखानानें तूर्त बुलकीस तख्तावर बसवून शहर्यार यास कैद केलें; व एक भरंवशाचा मनुष्य दक्षिणेंत शहाजहानाकडे पाठवून त्यास ताबडतोबीनें आग्-यास बोलाविलें. ता. २४ जानेवारी १६२८ रोजीं शहाजहान आग्‍यास येऊन पोंचला; बहुतेक सर्व सरदार त्यास मिळाले. शहाजहान यानें खुस्त्रूचे मुलगे बुलकीदावरबक्ष व गर्सास्प; दानियालचे मुलगे तह्मुरास व होशंग; व शहर्यार या सर्वांचा खून करविला. ता. ५ फेब्रुवारी स. १६२८ रोजीं त्याचा राज्यारोहणविधि होऊन त्याच्या नांवानें खुत्बा वाचण्यांत आला.

अकबराची राज्यव्यवस्था जहांगीरनें कायम ठेविल्यामुळें त्याची कारकीर्द सुखावह झाली. त्याच्या अंगीं कांहीं सद्गुण होते. शिकारींत व युद्धकलेंत तो प्रविण होता. त्याचें वजन १६२ पौंड होतें. त्याला खुशामत व डामडौल प्रिय होता. आरंभीं त्याचा स्वभाव क्रूर होता, पंरतु पुढें तो बराच सौम्य बनला. तो मद्यपी असून अफूचें सेवन करी. तथापि इतर लोकांनीं मद्यपान करूं नये असा त्यानें नियम केला होता. तो नियम मोडणारास कडक शिक्षा देई. त्यानें सर्व प्रकारच्या विद्येस उत्तेजन दिलें. त्यानें केलेल्या राज्यकारभाराच्या नियमांनां दस्तुरूल अंमल म्हणतात. शिल्पकला व सृष्टिसौंदर्य यांची त्याला आवड होती. गादीवर येण्यापूर्वी त्यानें अनेक क्रूर कृत्यें केलीं होतीं. क्रूर स्वभावामुळें कित्येक वेळां क्षुल्लक अपराधासाठीं त्यानें कडक शिक्षा दिल्या होत्या. त्याचें आत्मचरित्र अगदी साध्या भाषेंत लिहिलेलें असून त्यांत त्यानें आपले दुर्गुण व व्यंगें स्पष्टपणें कबूल केलीं आहेत. या चरित्रांत १२ वर्षांची हकीकत आहे; त्यापुढील हकीकत मुतामदखानानें लिहिली असून त्या ग्रंथाचें नांव इकबलनामा असें आहे. जहांगिराच्या आत्मचरित्रास तुझुकई जहांगिरी हें नांव आहे. तो बेफिकीर होता. लहर लागेल त्याप्रमाणें क्षणांत हिंदु, क्षणांत पारशी, क्षणांत मुसुलमान तर क्षणांत ख्रिस्ती अशी त्याची धरसोड चाले. फलज्योतिषावर त्याची विश्वास होता. अकबरानें चालू केलेले हिंदु आचारविचार त्यानेंहि पुढें चालविलें; तथापि अनेक प्रसंगीं देवळें व मुर्ती फोडणें इत्यादि कृत्यें केलीं. त्याचा वाढदिवस मोठया समारंभानें साजरा करण्यांत येई. सोनें, चांदी, मोतीं, रेशमीकापड, धान्य व लोणी या सहा पदार्थांनीं त्याची तुला होई. जहांगीरला तुर्की भाषा चांगली येत होती. मुसुलमान लोक नाण्यांवर सुद्धां कधीं प्रतिमा कढावयाचे नाहींत, मद्य तर त्यांच्या धर्मांत वर्ज्य आहे, असें असून जहांगीरनें स. १६२१ त जी मोहोर पाडिली, तिच्या एका बाजूस ओठास दारूचा प्याला लाविलेल्या स्वत:चें चित्र असून दुस-या बाजूस सूर्य काढिलेला आहे. याच्या वेळींच हिंदुस्थानांत तंबाखूचा प्रसार झाला असें म्हणतात.

महंमद हादी यानें जहांगिराच्या कारकीर्दीचा एक इतिहास लिहिला आहे. तसेंच कामगार हुसेनी यानें मसिर इ-जहानगिरी ही बखर लिहिली असून तींत त्याच्या जन्मापासून राज्यारोहणापर्यतची हकीकत आहे. ( इतिहाससंग्रह-ऐति. गोष्टी, भा. १; स्मिथ-ऑक्सफोर्ड हिस्टरी; इलियट, पु.  ६; ग्लाडविन-रेन ऑफ जहांगीर; फॉस्टर-रोज एम्बसी; टॉड-राजस्थान; पिटरमुंडी-ट्रस्व्हल्स: मुसुलमानी रियासत.)

   

खंड १४ : जलपैगुरी - तपून  

 

 

 

  जलमस्तिष्क रोग
  जलयंत्रशास्त्र
  जलालपेठ
  जलालखंड
  जलालाबाद
  जलालाबाद, तहसील
  जलाली
  जलालुद्दीन मुहम्मद वल्खी
  जलालुद्दीन सयुती
  जलेश्वर
  जलेसर, तहसील
  जलोदर
  जलोपचार
  जव
  जवस
  जवादि डोंगर
  जवानबख्त मिर्झा
  जवासिया
  जव्हार
  जशपूर
  जसदन संस्थान
  जसपुर
  जसवंतनगर
  जसवंतसिंह, महाराणा
  जसील
  जस्टिन
  जस्टिनियन
  जस्त
  जस्सो
  जहागिराबाद
  जहागीर, जहागीरदार
  जहांगीर
  जहांगीर बादशहा
  जहाज फिरंगी
  जहाजपुर
  जहांदरशहा
  जहानआरा बेगम
  जहानाबाद
  जहनु
  जहलण
  जळगांव
  जळापूर
  जळापुर तालुका
  जळू
  जाई
  जाकोबाबाद
  जाखाऊ
  जाखन
  जांजगरि
  जाजमाउ
  जाट
  जाटपु
  जाटपोल
  जातक
  जाति
  जातिभेद
  जादम
  जादू
  जादूचा कंदील
  जाधव
  जाधवराई
  जॉन
  जानसाथ
  जॉनसन अॅंड्र
  जॉनसन, डॉय साम्युएल
  जानसार बावर
  जॉन, सेंट
  जानीबेग तुर्खन मिर्ज्ञा
  जानेफळ
  जानोजी निंबाळकर
  जाफना
  जाफरखान
  जाफराबाद
  जांब
  जांबवान
  जाबाल
  जांबु घोडा
  जाब्लोस्काव, पाल
  जांभळी जमीनदारी
  जांभूळ
  जांभेकर, बाळ गंगाधर
  जामखेड
  जामगड
  जामतारा
  जामदारखाना
  जामनगर
  जामनेर
  जामपुर
  जामराव कालवा
  जामी
  जामीनकी
  जामोद
  जाम्निया
  जायफळ, जायपत्री
  जारकर्म
  जॉर्ज टाऊन
  जॉर्ज राजे
  जॉर्जिया
  जालंदर, जिल्हा
  जालना
  जालवणकर, नारायणबोवा
  जालापहाड
  जालारी
  जालिआ
  जालोर
  जावजी दादाजी चौधरी
  जावड
  जावरा
  जावळी
  जावा
  जाविदखाना
  जासवंद
  जासी
  जासुंद
  जाहिरात
  जिऊ महाला
  जिगणी
  जिजाबाई
  जिजिराम
  जिंजी
  जितुलीया
  जिंतूर
  जिंद
  जिनकीर्ति
  जिनगर
  जिनप्रभ
  जिनीव्हा
  जिनेश्वरसुरि
  जिनोआ
  जिन्सीवाले, श्रीधर गणेश
  जिप्सी
  जिब्राल्टर
  जियागंज
  जिरंग
  जिरळ कामसोळी
  जिराफ
  जिंरार
  जिराईतखाना
  जिरें
  जिलेटिन
  जिवबादादा बाक्षी
  जीन मेरी रोलंड
  जीवकचिंतामणी
  जीवधन किल्ला
  जीवनकार्यविचार
  जीवन्मुक्त
  जुई
  जुगार
  जुगोस्लाव्हिया
  जुजुत्सु
  जुझोतिया ब्राह्मण
  जुडा
  जुडीआ
  जुतोघ
  जुनागड
  जुनापाणी
  जुनापादर
  जुनो
  जुनोना
  जुन्नर
  जुपिटर
  जुबल
  जुबो
  जुभखा
  जुव्हेनल
  जूब
  जूल, जेम्स प्रेस्कॉट
  जेऊर
  जेकब
  जेजाकभुक्ति उर्फ जिझोटी
  जेजुरी
  जेझील
  जेतपुर
  जेघे
  जेना
  जेपाळ
  जेफर्सन, थॉमस
  जेबील
  जेम्सटाऊन
  जेम्स मेरी सॅन्ड्स
  जेम्स राजे
  जेयोर
  जेरिको
  जेरिझिम
  जेरुसलेम
  जेरेसा
  जेर्हा
  जेलेपला
  जेल्डर्लंड
  जेवर
  जेव्होंन्स, विल्यम स्टॅनले
  जेष्ठमध
  जेसर
  जेसरी
  जेसलमीर
  जेसुइट लोक
  जेजोर, जिल्हा
  जेहोव्ह
  जैटिया
  जैटियापूर
  जैन, संप्रदाय
  जैनेंद्र व्याकरण
  जैमिनी
  जैस
  जैसवाय
  जोक्जाकर्त
  जोग, कृष्णाजी महादेव
  जोगापरमानंद
  जोगी
  जोगेश्वरी
  जोडिया
  जोतिबाचा डोंगर
  जोत्याजी केसरकर
  जोदिया
  जोधपुर
  जोधबाई
  जोन ऑफ आर्क
  जोनगन
  जोनपुर
  जोनराज
  जोन्स, सर विल्यम
  जोबत, संस्थान
  जोरा
  जोरिय
  जो-हाट
  जोवई
  जोशी
  जोशी, अण्णा मार्तंड
  जोशी, गणेश कृष्ण
  जोशी, गणेश वासुदेव
  जोशी, गणेश व्यंकटेश
  जोशी, चासकर
  जोशी, बारामतीकर
  जोशीमठ
  जोहानिस्बर्ग
  जोहानीझबर्ग
  जोहार
  जोही
  जोहोर
  जौगड
  जौहरीफरवी
  ज्यूटीगल्पा
  ज्योतिपंत महाभागवत
  ज्योति:शास्त्र
  ज्योतिष्टोम
  ज्योती
  ज्वर
  ज्वांग, पट्टुआ
  ज्वारी
  ज्वालामुखी
 
  झऊरी मुल्ला
  झगरपूर
  झज्जर
  झंझरपुर
  झमानशहा
  झमानिया
  झमीनदवार
  झरथुष्ट्र
  झलिदा
  झलून
  झाकाटेकस
  झांग, जिल्हा
  झांजी
  झांझमेर
  झांझीबार
  झाडीतेलंग
  झानेसव्हील
  झान्टे
  झान्थस
  झाफरखान
  झाफरवाल
  झाबिताखान
  झाबुआ
  झाबुलीस्तान
  झाबेल
  झांबेसी नदी
  झांबोअंग
  झामपोदर
  झामसिंग
  झामोरा
  झामोरीन
  झार
  झारगर जात
  झारा
  झारापाप्रा
  झा-होन
  झालकाटि
  झालरपाटण
  झालवान
  झालावाड
  झालावाड संस्थान
  झालोड
  झांशी, जिल्हा
  झांशीची राणी, लक्ष्मीबाई
  झिंगकलिंग हकमती
  झिगन
  झिंझुवाडा
  झितोमीर
  झिनत-उन-निसा बेगम
  झिंपी तौडू
  झियाउद्दीन बरनी
  झिरा
  झिरी
  झिवारत
  झीटून
  झीत्झ
  झीनवर
  झीनॉफानेझ
  झीलंड
  झुंगेरिया
  झुंझुनु
  झुबेदा खातुन
  झुब्दतुन्निसा
  झुरळ
  झुलफिकारखान
  झुलुलंड
  झूवा
  झूरिच
  झूसी
  झेंद-अवेस्ता
  झेनागा
  झेनाटा
  झेनिद
  झेनोफोन
  झेनोबिआ
  झेप्पेलिन, काऊंट फर्डिनंड
  झेब-उन्-निसा बेगम
  झेब्रा
  झेरबस्ट
  झेरिआ
  झेर्नोविट्झ
  झेलम
  झेलम कालवा
  झेलम नदी
  झेलम वसाहत
  झैदपूर
  झैनखान कोक
  झैनाबादी महाल
  झैनुल अबिदिन
  झैमुख्त
  झैसान
  झोडगे
  झोब जिल्हा
  झोला, एमिली एडवर्ड चार्लस
 
 
  टंकारी
  टक्कर देश
  टक्का
  टझी
  टनब्रिजवेल्स
  टरपेलट
  टर्गो, अॅन रॉबर्ट जॅक्स
  टनेंट
  टॅव्हर्नियर
  टॅसिटस कॉनेंलिअस
  टस्कुलम्
  टांकणखार
  टांक तहशील
  टाकळ
  टाकळ घांट
  टाकळा
  टांकळी
  टाकळी बुदुक
  टाकी
  टॉंगकिंग
  टांगानिका
  टांगानिका प्रदेश
  टागोर, देवेन्द्रनाथ
  टागोर, राजा सौरेन्द्र मोहन
  टाटा, जमशेटजी नसरवानजी
  टाटा, सर रतन
  टोंड, कर्नल
  टॉडहंटर, आयझॅक
  टान्जीर
  टापिओका(कासावा)
  टायको ब्राही
  टायग्रे
  टायबर
  टायबेरिअस
  टायर
  टाराक्विनी
  टारांटो
  टारिसेली, इव्हर्जिलिस्टा
  टारेटम्
  टॉके
  टानों
  टार्सस
  टालबॉट, विल्यम हेनरी
  टालमड
  टॉलस्टॉय, लिओ
  टॉलेमी क्लॉडिअम
  टॉलमी फिलाडेल्फस
  टालेरंड, पेरीगॉर्ड प्रिन्स
  टावी
  टासमन, अबेल जॅन्सेन
  टासी
  टिकमगड
  टिटवी
  टिटागड
  टिडोर
  टिन्डाल जॉन
  टिपगड डोंगर
  टिपरा जात
  टिप्पू सुलतान
  टिप्पेरा
  टिफ्लिस
  टिंबक्टु
  टिंबा
  टिबेस्टी
  टिम्माड
  टिरोल
  टिलोता खैरी
  टिल्सिट
  टिळक, बाळ गंगाधर
  टीजिआ
  टीरिआ
  टुलुझ
  टूर्नें
  टूलाँ
  टेकचंद मुनशी
  टेक्सस
  टेगर्नसी
  टेग्युसीगलपा
  टंट, पिटर गथ्री
  टेन, हिप्पोलाइट अडोल्फ
  टेनेस्सी
  टेंपलबार
  टेबल माउंटन
  टेंभुरणी
  टेमेश्वार
  टेराडेलफ्यूगो
  टेलर, फिलिप मेडोज
  टेसिफॉन
  टैन-शान पर्वत
  टोक, संस्थान
  टोकिओ
  टोगोलंड
  टोचीनदी
  टोन, थिओबाल्ड वूल्फ
  टोपल्या
  टोबेगो
  टोमाटो
  टोराँटो
  टोरी फत्तेपूर
  टोलेडो
  टोवला
  टोशाम
  टोळ
  टौंगी
  टौंगुप
  टौंगू
  टौंग्थ
  टौंग्यु
  ट्युनिस
  ट्युनीशिआ
  ट्यूस
  ट्रॅलिझ
  ट्रान्सवाल
  ट्राम्बे
  ट्रॉय अथवा ट्रोड
  ट्रिनिदाद
  ट्रिपोली, प्रांत
  ट्रिबिझाँड
  ट्रीएस्टे
  ट्रटिश्के, हेन्रिक व्हॉन
  ट्रेंट
  ट्विकनहॅम
  ट्विन, मार्क
 
  ठग-ठगी
  ठठ्ठा
  ठाकुर
  ठाकुरगांव
  ठाकूरदासबोवा
  ठाकूरद्वार
  ठाणभवान
  ठाणें
 
  डॅडी
  डॅन
  डॅनिएल
  डन् कर्कं
  डॅन्झिग
  डफरिन, लार्ड
  डफळे
  डंबल
  डबलबीन
  डंबार्टन
  डब्लिन
  डभई
  डमडम
  डरहॅम
  डर्बी
  डलहौसी, लॉर्ड
  डलास
  डहोमे
  डॉक
  डाका, जिल्हा
  डाकोर
  डांग
  डांगची
  डांगर
  डांगी
  डांग्या खोकला
  डाग्वेरे, एल्. जे. एम.
  डोन नदी
  डान्यूब नदी
  डाबी
  डामर
  डायमंड हारबर
  डायमंड बेट
  डायोजेनीस
  डार्टमाउथ
  डार्डानेल्स
  डार्विन, चार्लस रॉबर्ट
  डॉलफिनचें नोंज
  डाल्टन, जॉन
  डास
  डाहाणु
  डाळिंब
  डिंक
  डिकन्स, चार्लस
  डिकेमाली
  डिक्वेन्सि, थॉमस
  डिंगरी
  डिंगणकर, मोरो विश्वनाथ
  डिडीमी
  डिडेरोट डेनिस
  डिफो, ड्यानिअल
  डिवार, सर जेम्स
  डी अर्लेबर्ट
  डीग
  डीगची लढाई
  डी बॉइने
  डीसा
  डुकर
  डुकी
  डुक्करकंद
  डुंगर
  डुप्ले
  डुम जात
  डुरिअन
  डूलचेन्यो
  डूलाँग
  डेकॅपोलिस
  डेकाटें
  डेडिआगॅच
  डेन्मार्क
  डेन्व्हर
  डेमॉस्थेनीस
  डेमिएटा
  डेमोक्रिटस
  डेराइस्मायलखान
  डेरागाझीखान
  डेरागोपीपूर
  डेराजात
  डेरानानक
  डेरापूर
  डेलफाय
  डेलवेअर
  डेव्हनपोर्ट
  डेव्ही
  डेहराडून
  डोंगरगड
  डोंगरपाली
  डोंगरपुर
  डोंगराळी जमीनदारी
  डोंगरा
  डोंगरे, वासुदेव नारायण
  डोडोना
  डोनाटेलो
  डोंबगांव
  डोबरेनर
  डोंबारी
  डाब्रूजा
  डोम
  डोमल जात
  डोमिनिका
  डोरली
  डोव्हर
  डोहर
  ड्युडरनेक
  ड्युबॉपिएरी
  ड्युसेल्डॉर्फ
  ड्यूमा अलेक्झांडर
  ड्यूरर आल्ब्रेक्ट
  ड्रायडन, जॉन
  ड्रॉयमन
  ड्रेस्डेन
  ड्रोघेडा
  ड्विन्स्क
 
  ढक्की भाषा
  ढालगज
  ढालाईत
  ढीमर
  ढुंढये जैन
  ढेकूण
  ढेरा
  ढोर
 
 
  तगर
  तंगेल
  तंगौंग
  तंजावर
  तंजावरचें राजघराणें
  तडवी
  तंडागांव
  तंडो
  तंडोअडाम
  तंडोअलाहयार
  तंडोवागो
  तंडोमहमदखान
  तत्रक
  तंत्रग्रंथ
  तत्त्वज्ञान
  तनकपूर
  तनखा
  तनावल
  तनुकु तालुका
  तपकीर
  तपागच्छ
  तपून

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .