प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून

जव्हार, संस्थान  :- मुबई इलाख्यांत, ठाणें जिल्हयांत हें लहानसें संस्थान उ.अ. १९४३' ते २०५' व पू. रे. ७२'५५' ते ७३'२०' यांच्या दरम्यान असून त्याचें क्षेत्रफळ ५०० चौ. मै. लोकसंख्या ( १९२१ )  ४९६९३ व उत्पन्न ३॥। लाख आहे. याच्या उत्तरेस डहाणू, मोखाडे, पूर्वेस मोखाडे, दक्षिणेस वाडें व पश्र्चिमेस डहाणू व माहीम हे ठाणें जिल्हयांतील तालुके आहेत. पूर्वी या प्रदेशासच कोळवन म्हणत. संस्थानचा बहुतेक प्रदेश  म्हणजे एक हजार फूट उंचीवरील सहयाद्रीचें पठार असून तो सर्वत्र टेकडया व डोंगर आणि बारीकसारीक नाले व नद्या यांनीं व अरण्यानें व्याप्त आहे. सूर्य, पिंजळी, वाघ व देहजीं या नद्या मुख्य आहेत. संस्थानांत मलमाड  ( १५० चौ. मै. ),   कर्यात हवेली  ( ३६० चौ.मै. )  व गंजाड ३० ( चौ. मै. ) या नांवाचे तीन महाल आहेत. खुद्द जव्हार येथें पाण्याचा तुटवडा पडे, त्यामुळें माजी राजानें सूर्यनदीच्या पाण्याचा पुरवठा शहरास केला आहे. संस्थानची हवा मलेरियाची व तापसराईची आहे. येथे सालिना १२० इंचांपर्यंत पाऊस पडतो. पर्वताच्या पायथ्याशीं उन्हाळा जास्त कडक असतो.  बांधकामास लागणारा दगड विपुल आढळतो. साग, शिसू, पळस तिवस वगैरें झाडें फार आहेत. सागाचा व्यापार फार असून तो नोव्हेंबर ते जूनपर्यंत चालू असतो. झाड तोडण्यापूर्वी शेंकडा २५ टक्के  ( किंमतीच्या )  रक्कम सरकारांत भरावी लागते, म्हणजे तोड करण्यास परवाना मिळतो. तोडीची तपासणी महालकरी करितो व मग लांकूड बाहेर जाऊं देतात. दरेक गाडीमागें ३८८ ते ३८१२ पर्यंत दस्तुरी घेतात. संस्थानाला सर्वांत जास्त उत्पन्न याच  ( जंगल)   खात्याचें आहे. एकंदर उत्पन्नांपैकीं हें उत्पन्न जवळ जवळ ८१ ते ८२ हजारांचें आहे. जंगलांत वाघ, चित्ते, अस्वलें, तरस, खोकडें, सांबरें व कोळसुंदे वगैरे जनावरें आढळतात. लोकसंख्येपैकीं शेंकडा ८४.६३ वन्यजातींचे लोक  ( वारली, ठाकूर, काथोडी )   असून बाकीचे कोळी कुणबी व  इतर लोक आहेत. वारली, ठाकूर वगैरे लोक गरीब असून शेती व मजुरी यावर त्यांचा निर्वाह होतो. हे लोक दारू फार पितात. कोळयांत चार पोटजाती आहेत. (  राजकोळी, महादेव, मल्हार व ढोर ).   संस्थानिक हा महादेव कोळी जातीचा असल्यानें महादेव हेच आपल्यास राजकोळी म्हणवितात. जनावरें खावयास लागल्यानें व कातक-यांशीं सोयरिक केल्यानें ढोर कोळी ही पोटजात निर्माण झाली. ठाकूर कोळी हे राजकोळयांच्या दर्जाचे असून त्यांचे मठाकूर व कठाकूर असे दोन भेद आहेत. पहिले लोक बोलतांना नेहमीं म हें अक्षर व दुसरे लोक क हें अक्षर (  कार्यकारण नसतांना  )  उपयोगांत आणितात.  तसेंच मठाकूर आपलीं लग्नें लावण्यास ब्राह्मण आणतात तर कठाकूर आणीत नाहींत. कातकरी गोमांस लोक खातात असें म्हणतात.

पूर्वी या संस्थानांत (  व्यभिचारी  ) जारस प्रजेस गुलामाप्रमाणें राबविण्याची शिक्षा देत व त्यांचा भरणा जव्हारच्या राजाच्या पदरीं दास व दासी या जागांवर करीत. मलवाड व गंजाड भागांशिवाय इतरत्र जमीन नापीक आहे. मुख्य पीक भात, नाचणी व ताग असून सरकार आपल्या हुकमती खालीं तंबाखूचा पेरा करवितें, व पुढें ठराविक भावानें तंबाखू विकत घेतें.

प्रदेश  डोंगराळ व सडका कमी त्यामुळें व्यापार फारसा नाहीं. डहाणू रेल्वेस्टेशनपासून जव्हार येथें जाण्यास मात्र एक सरकारी सडक चांगली बांधलेली आहे. याशिवाय चिंचउतार, गोंडे, धोंडमारे, शीर, तळसरी, कासतवाडी व डेंग या घाटांतून बारीकसारीक गाडीरस्ते आहेत. निर्गत मालावरील जकातीचें बरेंचसें उत्पन्न संस्थानला मिळतें; तें व जंगलखात्याचें उत्पन्न मिळवूच बहुधा संस्थानची जमाबंदीची रक्कम होय.

इतिहास :- मुसुलमानी अंमल  ( दक्षिणेंत )  होण्यापूर्वी उत्तरकोंकणचा बराचसा भाग कोळी व वारली जहागिरदारांच्या ताब्यांत होता. जव्हार येथें पूर्वी वारली राजा होता. कोळी लोक पुढील दंतकथा सांगतात. पापेरा अथवा जयबा नांवाचा एक कोळी थळघाटाजवळ मुकणें या गांवीं एक गढीबंद जमीनदार होता. या घराण्याला तेव्हांपासून मुकणें हें आडनांव मिळालेलें आहे तो एकदां पिंप्री येथें देवीच्या दर्शनास गेला असतां तेथील पांच कोळी साधूंनीं त्याला राजा होण्याबद्दल आशीर्वाद दिला. त्यावर जयाबनें कोळी लोक जमवून पेंढ, धरमपूर हीं गांवें काबीज करून काठेवाडांत घुसून तो तिकडे सात वर्षे राहिला. नंतर परत येऊन जव्हार येथें गेला व तेथील वारली राजाय त्यानें बैलांच्या कातडयानें व्यापली जाईल इतकी जमीन मागितली; ती राजानें कबूल केल्यावर त्यानें कातडयाच्या अगदीं बारीक तांती काढून त्यांच्या मोजणींत राजाचें सारें राज्य घेतलें   ( बहुधां जयबानें बारल्यापासून धूर्ततेनें प्रदेश  लुबाडला. असावा असा या गोष्टीचा संदर्भ निघतो )   व त्याला जव्हारपासून ६ कोसांवरील गंभीरगड व त्याच्या भोंवतालचा थोडासा प्रदेश  जहागिरीदाखल दिला.

जयबाला दोन मुलें नेमशहा व होळकरराव या नांवाचीं होतीं. पैकीं नेमशहा हा जयबाच्या मागें राजा झाला. दिल्लीच्या मुसुलमान पातशहांस या डोंगराळ प्रदेशांत स्वारी करून तो हस्तगत करतां येईना म्हणून त्यांनीं या नेमशहास ५ जून स. १३४३ रोजीं शहा हा किताब देऊन त्याच्या ताब्यांतील २२ किल्ले असलेला व ९ लाख उत्पन्नाचा मुलूख त्यास स्वतंत्र तोडून दिला. तेव्हां नेमशहानें या दिवसापासून आपला एक स्वतंत्र शक सुरू केला व तो आजसुद्धां संस्थानांत सरकारी कागदपत्रीं वापरीत असतात. गुजराथच्या नवाबांच्या ताब्यांत घेऊन नागोठाण्यापर्यंतचा प्रदेश  आला असतांहि  त्यांनीं जव्हारकरांस मुळींच उपसर्ग दिला नाहीं. सतराव्या शतकाच्या मध्यांत फिरंगी लोकांनीं मात्र यांच्या प्रदेशास बराच त्रास देऊन, अशेरी किल्ला व कांहीं महत्त्वाचीं ठाणीं काबीज केलीं होतीं. मात्र त्यांनां जव्हारकरांबरोबर सतत भांडावें लागलें व नेहमी चकमकी कराव्या लागल्या त्यांत ''हे कोळी लोक आमचें नुकसान करून भराभर या झाडावरून त्या झाडावर वानरासारखे असे चटकन पसार होत'' अशी माहिती फिरंग्यांनीं दिली आहे. )  या वेळीं जव्हारकरांकडे माहुली ( किल्ला त्यांच्याच ताब्यांत होता  ) पासून भिवंडीपर्यंतचा प्रांत होता. त्याशिवाय तवर  (  दमण जवळील), वझें  ( वासिंद )  व दरिळें  ( उंबरगांवजवळील )  हीं तीन शहरें त्यांच्या हातीं होतीं. फिरंग्यांच्या ऊतरत्या काळांत कोळयांनीं आपली सत्ता पुन्हां वाढविली ( १६५०.)  औरंगझेबानें जव्हारकरांस त्रास दिला नाहीं.

मराठयांच्या कारकीर्दीत प्रथम मोरोपंत पिंगळे यानीं जव्हारच्या राज्यावर स्वारी केली होती. तेव्हां ( १६७२ ) विक्रमशहा हा पळून मोंगलाईंत गेला. पुढेंहि मराठयांनीं जव्हारवर तीन चार वेळां स्वा-या केल्या. जव्हारकरानेंहि फिरंग्यांवर स्वारी करून त्यांचा प्रदेश  लुटला (१६९०). अठराव्या शतकाच्या प्रारंभी फक्त समुद्रकिना-याशिवाय बाकींचें सर्व उत्तरकोंकण ( वसई ते दमण व भिवंडीपर्यंत)   जव्हारच्या हातीं होतें व त्यांत १० किल्ले असून त्याचा वसूल ३॥ लाखांचा होता. पुढें जव्हारकर हा मराठयांचा मांडलिक बनला व त्याच्या हातीं थोडासाच प्रांत उरला. पेशव्यांनी त्याच्यावर सरदेशमुखी व बाबती हे कर बसविले. एकदां तर कोळयांचें बंड त्याला मोडतां येईना म्हणून त्याला दरसाल १ हजारांचा नजराणा पेशव्यास द्यावा लागे. विक्रम्रशहास १७४२ त वारल्यावर त्याच्या वडील राणीनें घेतलेला दत्तक धाकटया राणीनें ठार मारविला. तेव्हां संस्थानची सर्व सत्ता पेशव्यांनीं आपल्या हातीं घेतली. या प्रमाणेंच स. १७५८ व १७६१ मध्यें जव्हार पेशव्यांच्या ताब्यांत होतें. पुढें त्यांनीं १८८२ त जव्हारकरास १५ ते २० हजारांचा मुलुख तोडून दिला. पतंगशहा दुसरा हा स. १७९८ त वारल्यावर त्याचा मुलगा विक्रमशहा तिसरा हा पेशव्यांच्या अनुज्ञेनें गादीवर आला व त्याबद्दल त्यानें ३ हजार रू. नजराणा पेशव्यांनां देऊन त्र्यंबकच्या मामलेदाराच्या साहयानें राज्यकारभार चालविण्याचें कबूल केलें. पुढें स. १८०५ त राजगडाकडे भिल्लांचा दंगा झाल्यानें पेशव्यांनीं राजाला आपल्या लष्करी अधिका-याचे देखरेखीखालीं ठेविलें. तिसरा विक्रमशहा हा स. १८२१ त वारल्यानंतर थोडयाच दिवसांत त्याला मुलगा  (पतंगशहा ) झाला; परंतु गादीबद्दल विक्रमच्या दोन भावांत तंटा लागला. तेव्हां इंग्रजांनीं तिस-या पतंगशहासच गादीवर बसविलें. हा स. १८६५ त निपुत्रिक वारल्यानंतर त्याचा चुलत पुतण्या नारायण यास दत्तक घेऊन त्याचें नांव चवथा विक्रमशहा ठेऊन त्याला गादीवर बसविले. तो एक महिन्यानेंच वारला. तेव्हां कृष्णशहाच्या शाखेंतील मल्हारराव नांवाच्या मुलास दत्तक घेऊन त्याचें नांव चवथा पंतगशहा ठेविलें. हे पतंगशहा त्यावेळीं १० वर्षांचे होते. दत्तकाबद्दल इंग्रजसरकारनें २० हजार रू. नजराणा घेतला. हे राजे २८ मार्च स. १८६७ त गादीवर बसले. त्यांना पूर्ण अखत्यार जानेवारी स. १८७७ त मिळाला.. यांना पुणें हायस्कुलांत इंग्रजी शिक्षण मिळालेलें होतें. कै. मंडलीक व कै. बापुसाहेब आठल्ये यांची सल्लामसलत हे नेहमीं घेत असत. हे विद्वानांचे चहाते होतें. गरीब प्रजेस धान्याची मदत करणें, रस्ते, विहिरी बांधणें वगैरे लोकोपयोगी कामें त्यांनीं बरींच केलीं. यांची राणी ही नाशिक जिल्हयांतील कळुस्ते गांवच्या कोळी पाटलाची मुलगी होय. हे पक्षघातानें सन १९०५ मध्यें वारले. त्यांच्यामागें त्यांचे वडील पुत्र श्री. राजे कृष्णशहा ऊर्फ बाळासाहेब हे गादीवर बसले. हेच हल्लीं संस्थानाधिपति आहेत. यांचा जन्म सन १८७९ च्या सुमारास झाला. यांचें इंग्रजी शिक्षण मुंबईस एल्फिस्टन हायस्कुलांत होऊन वडिलांच्या हाताखालीं त्यांनीं राज्यकारभाराचें शिक्षण घेतलें. यानां एक बंधु, एक बहीण आणि दोन मुलें आहेत. संस्थानला न्यायमनसूब्याचे, दिवाणी व फौजदारी सर्व हक्क आहेत. गादीवर बसतांना फक्त इंग्रजसरकारास नजराणा द्यावा लागतो. त्याखेरीज खंडणी द्यावी लागत नाहीं. दत्तक घेण्यास इंग्रजांची परवानगी लागते. शेतजमीन ही सर्व संस्थानची मालकीची गणिली जाते. पूर्वी जमीनमोजणी नांगरावर होत असे. बैलाची एक जोडी जितकी जमीन नांगरील तितकी एक नांगर जमीन होय. एका नांगरावर ५ ते ८ रू. पर्यंत सरकारसारा असे. शिक्षणावर ३ ते ३॥ हजार रू. खर्च होतो.

गांव :- ही संस्थानची राजधानी असून येथें पांचशें घरांची वस्ती आहे. गांव समुद्रसपाटीपासून १ हजार फूट उंचीच्या पठारावर असल्यानें हवा थंड व निरोगी आहे. हल्लीच्या संस्थानिकांनीं गांवची पुष्कळ सुधारणा केली. लोकांनां नवीन व व्यवस्थितपणें घरें बांधण्यास लांकूड फुकट पुरविलें. हल्लीच्या राजवाडयाजवळच पूर्वीचा राजवाडा व नगारखाना पडक्या स्थितींत उभा आहे. तो १७५० त कृष्णशहानें बांधला होता. तो इ.स. १८२२ त जळाला. व या नवीन गांवाजवळ प्राचीन जव्हार गांव होतें. येथून ५ कोसांवर एक भोपटगड नांवाचा पडका किल्ला आहे.

या राजघराण्याचा वंशवेल असा :- १ पापेरा ऊर्फ जयबा २ नेमशहा पहिला  ( धुळबाराव )  -३ भीमशहा-४ महंमदशहा-५ कृष्णशहा पहिला (दत्तक) -६ नेमशहा दुसरा -७ विक्रमशहा पहिला-८ पतंगशहा पहिला- ९ कृष्णशहा दुसरा  ( दत्तक ) -१०   विक्रमशहा दुसरा-११   कृष्णशहा तिसरा- १२ पतंगशहा दुसरा  ( दत्तक )-१३ विक्रमशहा तिसरा-१४ पतंगशहा तिसरा-१५ विक्रमशहा चवथा   ( दत्तक )-१६ पतंगशहा चवथा ( दत्तक )- १७ श्री. कृष्णशहा चवथे (  विद्यमान). (  नेर्न-कोंकण; बॉम्बे गव्हर्नमेंट सिलेक्शन्स, पु २६; पेशवाज् स्टेट् डायरीज् -एथरीज कृत; मॅकेन्झी म्यानिस्क्रिप्टस्; ठाणे ग्याझेटियर)

   

खंड १४ : जलपैगुरी - तपून  

 

 

 

  जलमस्तिष्क रोग
  जलयंत्रशास्त्र
  जलालपेठ
  जलालखंड
  जलालाबाद
  जलालाबाद, तहसील
  जलाली
  जलालुद्दीन मुहम्मद वल्खी
  जलालुद्दीन सयुती
  जलेश्वर
  जलेसर, तहसील
  जलोदर
  जलोपचार
  जव
  जवस
  जवादि डोंगर
  जवानबख्त मिर्झा
  जवासिया
  जव्हार
  जशपूर
  जसदन संस्थान
  जसपुर
  जसवंतनगर
  जसवंतसिंह, महाराणा
  जसील
  जस्टिन
  जस्टिनियन
  जस्त
  जस्सो
  जहागिराबाद
  जहागीर, जहागीरदार
  जहांगीर
  जहांगीर बादशहा
  जहाज फिरंगी
  जहाजपुर
  जहांदरशहा
  जहानआरा बेगम
  जहानाबाद
  जहनु
  जहलण
  जळगांव
  जळापूर
  जळापुर तालुका
  जळू
  जाई
  जाकोबाबाद
  जाखाऊ
  जाखन
  जांजगरि
  जाजमाउ
  जाट
  जाटपु
  जाटपोल
  जातक
  जाति
  जातिभेद
  जादम
  जादू
  जादूचा कंदील
  जाधव
  जाधवराई
  जॉन
  जानसाथ
  जॉनसन अॅंड्र
  जॉनसन, डॉय साम्युएल
  जानसार बावर
  जॉन, सेंट
  जानीबेग तुर्खन मिर्ज्ञा
  जानेफळ
  जानोजी निंबाळकर
  जाफना
  जाफरखान
  जाफराबाद
  जांब
  जांबवान
  जाबाल
  जांबु घोडा
  जाब्लोस्काव, पाल
  जांभळी जमीनदारी
  जांभूळ
  जांभेकर, बाळ गंगाधर
  जामखेड
  जामगड
  जामतारा
  जामदारखाना
  जामनगर
  जामनेर
  जामपुर
  जामराव कालवा
  जामी
  जामीनकी
  जामोद
  जाम्निया
  जायफळ, जायपत्री
  जारकर्म
  जॉर्ज टाऊन
  जॉर्ज राजे
  जॉर्जिया
  जालंदर, जिल्हा
  जालना
  जालवणकर, नारायणबोवा
  जालापहाड
  जालारी
  जालिआ
  जालोर
  जावजी दादाजी चौधरी
  जावड
  जावरा
  जावळी
  जावा
  जाविदखाना
  जासवंद
  जासी
  जासुंद
  जाहिरात
  जिऊ महाला
  जिगणी
  जिजाबाई
  जिजिराम
  जिंजी
  जितुलीया
  जिंतूर
  जिंद
  जिनकीर्ति
  जिनगर
  जिनप्रभ
  जिनीव्हा
  जिनेश्वरसुरि
  जिनोआ
  जिन्सीवाले, श्रीधर गणेश
  जिप्सी
  जिब्राल्टर
  जियागंज
  जिरंग
  जिरळ कामसोळी
  जिराफ
  जिंरार
  जिराईतखाना
  जिरें
  जिलेटिन
  जिवबादादा बाक्षी
  जीन मेरी रोलंड
  जीवकचिंतामणी
  जीवधन किल्ला
  जीवनकार्यविचार
  जीवन्मुक्त
  जुई
  जुगार
  जुगोस्लाव्हिया
  जुजुत्सु
  जुझोतिया ब्राह्मण
  जुडा
  जुडीआ
  जुतोघ
  जुनागड
  जुनापाणी
  जुनापादर
  जुनो
  जुनोना
  जुन्नर
  जुपिटर
  जुबल
  जुबो
  जुभखा
  जुव्हेनल
  जूब
  जूल, जेम्स प्रेस्कॉट
  जेऊर
  जेकब
  जेजाकभुक्ति उर्फ जिझोटी
  जेजुरी
  जेझील
  जेतपुर
  जेघे
  जेना
  जेपाळ
  जेफर्सन, थॉमस
  जेबील
  जेम्सटाऊन
  जेम्स मेरी सॅन्ड्स
  जेम्स राजे
  जेयोर
  जेरिको
  जेरिझिम
  जेरुसलेम
  जेरेसा
  जेर्हा
  जेलेपला
  जेल्डर्लंड
  जेवर
  जेव्होंन्स, विल्यम स्टॅनले
  जेष्ठमध
  जेसर
  जेसरी
  जेसलमीर
  जेसुइट लोक
  जेजोर, जिल्हा
  जेहोव्ह
  जैटिया
  जैटियापूर
  जैन, संप्रदाय
  जैनेंद्र व्याकरण
  जैमिनी
  जैस
  जैसवाय
  जोक्जाकर्त
  जोग, कृष्णाजी महादेव
  जोगापरमानंद
  जोगी
  जोगेश्वरी
  जोडिया
  जोतिबाचा डोंगर
  जोत्याजी केसरकर
  जोदिया
  जोधपुर
  जोधबाई
  जोन ऑफ आर्क
  जोनगन
  जोनपुर
  जोनराज
  जोन्स, सर विल्यम
  जोबत, संस्थान
  जोरा
  जोरिय
  जो-हाट
  जोवई
  जोशी
  जोशी, अण्णा मार्तंड
  जोशी, गणेश कृष्ण
  जोशी, गणेश वासुदेव
  जोशी, गणेश व्यंकटेश
  जोशी, चासकर
  जोशी, बारामतीकर
  जोशीमठ
  जोहानिस्बर्ग
  जोहानीझबर्ग
  जोहार
  जोही
  जोहोर
  जौगड
  जौहरीफरवी
  ज्यूटीगल्पा
  ज्योतिपंत महाभागवत
  ज्योति:शास्त्र
  ज्योतिष्टोम
  ज्योती
  ज्वर
  ज्वांग, पट्टुआ
  ज्वारी
  ज्वालामुखी
 
  झऊरी मुल्ला
  झगरपूर
  झज्जर
  झंझरपुर
  झमानशहा
  झमानिया
  झमीनदवार
  झरथुष्ट्र
  झलिदा
  झलून
  झाकाटेकस
  झांग, जिल्हा
  झांजी
  झांझमेर
  झांझीबार
  झाडीतेलंग
  झानेसव्हील
  झान्टे
  झान्थस
  झाफरखान
  झाफरवाल
  झाबिताखान
  झाबुआ
  झाबुलीस्तान
  झाबेल
  झांबेसी नदी
  झांबोअंग
  झामपोदर
  झामसिंग
  झामोरा
  झामोरीन
  झार
  झारगर जात
  झारा
  झारापाप्रा
  झा-होन
  झालकाटि
  झालरपाटण
  झालवान
  झालावाड
  झालावाड संस्थान
  झालोड
  झांशी, जिल्हा
  झांशीची राणी, लक्ष्मीबाई
  झिंगकलिंग हकमती
  झिगन
  झिंझुवाडा
  झितोमीर
  झिनत-उन-निसा बेगम
  झिंपी तौडू
  झियाउद्दीन बरनी
  झिरा
  झिरी
  झिवारत
  झीटून
  झीत्झ
  झीनवर
  झीनॉफानेझ
  झीलंड
  झुंगेरिया
  झुंझुनु
  झुबेदा खातुन
  झुब्दतुन्निसा
  झुरळ
  झुलफिकारखान
  झुलुलंड
  झूवा
  झूरिच
  झूसी
  झेंद-अवेस्ता
  झेनागा
  झेनाटा
  झेनिद
  झेनोफोन
  झेनोबिआ
  झेप्पेलिन, काऊंट फर्डिनंड
  झेब-उन्-निसा बेगम
  झेब्रा
  झेरबस्ट
  झेरिआ
  झेर्नोविट्झ
  झेलम
  झेलम कालवा
  झेलम नदी
  झेलम वसाहत
  झैदपूर
  झैनखान कोक
  झैनाबादी महाल
  झैनुल अबिदिन
  झैमुख्त
  झैसान
  झोडगे
  झोब जिल्हा
  झोला, एमिली एडवर्ड चार्लस
 
 
  टंकारी
  टक्कर देश
  टक्का
  टझी
  टनब्रिजवेल्स
  टरपेलट
  टर्गो, अॅन रॉबर्ट जॅक्स
  टनेंट
  टॅव्हर्नियर
  टॅसिटस कॉनेंलिअस
  टस्कुलम्
  टांकणखार
  टांक तहशील
  टाकळ
  टाकळ घांट
  टाकळा
  टांकळी
  टाकळी बुदुक
  टाकी
  टॉंगकिंग
  टांगानिका
  टांगानिका प्रदेश
  टागोर, देवेन्द्रनाथ
  टागोर, राजा सौरेन्द्र मोहन
  टाटा, जमशेटजी नसरवानजी
  टाटा, सर रतन
  टोंड, कर्नल
  टॉडहंटर, आयझॅक
  टान्जीर
  टापिओका(कासावा)
  टायको ब्राही
  टायग्रे
  टायबर
  टायबेरिअस
  टायर
  टाराक्विनी
  टारांटो
  टारिसेली, इव्हर्जिलिस्टा
  टारेटम्
  टॉके
  टानों
  टार्सस
  टालबॉट, विल्यम हेनरी
  टालमड
  टॉलस्टॉय, लिओ
  टॉलेमी क्लॉडिअम
  टॉलमी फिलाडेल्फस
  टालेरंड, पेरीगॉर्ड प्रिन्स
  टावी
  टासमन, अबेल जॅन्सेन
  टासी
  टिकमगड
  टिटवी
  टिटागड
  टिडोर
  टिन्डाल जॉन
  टिपगड डोंगर
  टिपरा जात
  टिप्पू सुलतान
  टिप्पेरा
  टिफ्लिस
  टिंबक्टु
  टिंबा
  टिबेस्टी
  टिम्माड
  टिरोल
  टिलोता खैरी
  टिल्सिट
  टिळक, बाळ गंगाधर
  टीजिआ
  टीरिआ
  टुलुझ
  टूर्नें
  टूलाँ
  टेकचंद मुनशी
  टेक्सस
  टेगर्नसी
  टेग्युसीगलपा
  टंट, पिटर गथ्री
  टेन, हिप्पोलाइट अडोल्फ
  टेनेस्सी
  टेंपलबार
  टेबल माउंटन
  टेंभुरणी
  टेमेश्वार
  टेराडेलफ्यूगो
  टेलर, फिलिप मेडोज
  टेसिफॉन
  टैन-शान पर्वत
  टोक, संस्थान
  टोकिओ
  टोगोलंड
  टोचीनदी
  टोन, थिओबाल्ड वूल्फ
  टोपल्या
  टोबेगो
  टोमाटो
  टोराँटो
  टोरी फत्तेपूर
  टोलेडो
  टोवला
  टोशाम
  टोळ
  टौंगी
  टौंगुप
  टौंगू
  टौंग्थ
  टौंग्यु
  ट्युनिस
  ट्युनीशिआ
  ट्यूस
  ट्रॅलिझ
  ट्रान्सवाल
  ट्राम्बे
  ट्रॉय अथवा ट्रोड
  ट्रिनिदाद
  ट्रिपोली, प्रांत
  ट्रिबिझाँड
  ट्रीएस्टे
  ट्रटिश्के, हेन्रिक व्हॉन
  ट्रेंट
  ट्विकनहॅम
  ट्विन, मार्क
 
  ठग-ठगी
  ठठ्ठा
  ठाकुर
  ठाकुरगांव
  ठाकूरदासबोवा
  ठाकूरद्वार
  ठाणभवान
  ठाणें
 
  डॅडी
  डॅन
  डॅनिएल
  डन् कर्कं
  डॅन्झिग
  डफरिन, लार्ड
  डफळे
  डंबल
  डबलबीन
  डंबार्टन
  डब्लिन
  डभई
  डमडम
  डरहॅम
  डर्बी
  डलहौसी, लॉर्ड
  डलास
  डहोमे
  डॉक
  डाका, जिल्हा
  डाकोर
  डांग
  डांगची
  डांगर
  डांगी
  डांग्या खोकला
  डाग्वेरे, एल्. जे. एम.
  डोन नदी
  डान्यूब नदी
  डाबी
  डामर
  डायमंड हारबर
  डायमंड बेट
  डायोजेनीस
  डार्टमाउथ
  डार्डानेल्स
  डार्विन, चार्लस रॉबर्ट
  डॉलफिनचें नोंज
  डाल्टन, जॉन
  डास
  डाहाणु
  डाळिंब
  डिंक
  डिकन्स, चार्लस
  डिकेमाली
  डिक्वेन्सि, थॉमस
  डिंगरी
  डिंगणकर, मोरो विश्वनाथ
  डिडीमी
  डिडेरोट डेनिस
  डिफो, ड्यानिअल
  डिवार, सर जेम्स
  डी अर्लेबर्ट
  डीग
  डीगची लढाई
  डी बॉइने
  डीसा
  डुकर
  डुकी
  डुक्करकंद
  डुंगर
  डुप्ले
  डुम जात
  डुरिअन
  डूलचेन्यो
  डूलाँग
  डेकॅपोलिस
  डेकाटें
  डेडिआगॅच
  डेन्मार्क
  डेन्व्हर
  डेमॉस्थेनीस
  डेमिएटा
  डेमोक्रिटस
  डेराइस्मायलखान
  डेरागाझीखान
  डेरागोपीपूर
  डेराजात
  डेरानानक
  डेरापूर
  डेलफाय
  डेलवेअर
  डेव्हनपोर्ट
  डेव्ही
  डेहराडून
  डोंगरगड
  डोंगरपाली
  डोंगरपुर
  डोंगराळी जमीनदारी
  डोंगरा
  डोंगरे, वासुदेव नारायण
  डोडोना
  डोनाटेलो
  डोंबगांव
  डोबरेनर
  डोंबारी
  डाब्रूजा
  डोम
  डोमल जात
  डोमिनिका
  डोरली
  डोव्हर
  डोहर
  ड्युडरनेक
  ड्युबॉपिएरी
  ड्युसेल्डॉर्फ
  ड्यूमा अलेक्झांडर
  ड्यूरर आल्ब्रेक्ट
  ड्रायडन, जॉन
  ड्रॉयमन
  ड्रेस्डेन
  ड्रोघेडा
  ड्विन्स्क
 
  ढक्की भाषा
  ढालगज
  ढालाईत
  ढीमर
  ढुंढये जैन
  ढेकूण
  ढेरा
  ढोर
 
 
  तगर
  तंगेल
  तंगौंग
  तंजावर
  तंजावरचें राजघराणें
  तडवी
  तंडागांव
  तंडो
  तंडोअडाम
  तंडोअलाहयार
  तंडोवागो
  तंडोमहमदखान
  तत्रक
  तंत्रग्रंथ
  तत्त्वज्ञान
  तनकपूर
  तनखा
  तनावल
  तनुकु तालुका
  तपकीर
  तपागच्छ
  तपून

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .