प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून

जलोदर (उदर) :- शरीरांतील कोणत्याहि भागांत रोगामुळें पाणी सांचून सूज येते तेव्हां त्यास उदर किंवा जलोदर झालें आहे असें म्हणतात. व या लेखांत जलोदर  (पोटांतील) व शरीरातील सूज यांचें वर्णन मुख्यत: येईल. हे दोन्ही रोग बहुतकरून एकाच वेळीं झालेले असतात. ज्या हातापायावर अगर चेह-यावर सूज आलेली असते तेथें बोटानें दाबलें असतां खळगा पडतो व ब-याच वेळानें तो आपोआप बुजून येऊन पुन्हां सूज दिसते. रोग्यास उताणा निजवून त्याच्या पोटावर आडवीं बोटें ठेवून बोटांनीं ठोकून पाहिलें असतां निरोगी मनुष्याच्या पोटाप्रमाणें नगा-यासारखा अगर पोकळ आवाज न येतां, आंत पाणी असल्यामुळें बद्द आवाज येतो व एखाद्या वेळीं हें पाणी फारच असून पोट फार मोठें झालेलें असतें. या रोगांत अंत्रावरणाचे पडद्यांत पाणी सांचतें. हयास स्वतंत्र रोग मानीत नाहींत; तर हदय, यकृत अथवा मूत्रपिंड या रोगांचें पर्यवसान या भयंकर लक्षणांत होतें. याचीं इतर कारणे बरींच आहेत; पण मुख्यत: तीन प्रकारचीं वर सांगितलेलीं आहेत त्यांपासून बहुतकरून हा होत असतो.

यकृतविकारामुळें होणारें जलोदर :- यकृतामध्यें पोर्टलव्हेन नांवाची मोठी शीर, जठर व आंतडीं यांतील रक्त यकृतांत पोंचविणारी असते. या शिरेवर यकृताच्या नाना त-हेच्या रोगामुळें दाब पडतो. उदाहरणार्थ अटटल दारूबाज लोकांत या यकृताचें संकोचन होतें अथवा जुनाट हिंवतापांत ही शीर व तिच्या सर्व शाखा दबल्या जातात व भराभर जलोदर होऊं लागतें. अगर यकृताजवळील भागांत ग्रंथिरोग नांवाचा असाध्य रोग होऊन त्याचा दाब या शिरेवर पडूनहि हें जलोदर होतें. पोट घागरीएवढें होतें. एखाद्या वेळीं कावीळहि होते. उलटया होतात, मलावरोध असतोच, पोटावर निळसर शिरा फुगलेल्या दिसतात. पाणी फार वाढल्यावर श्‍वास घेणें, निजणें, बसणे, हलणें, हें सर्व कष्टानेंच होतें. ब्रँडीसारखी कडक दारू अति पिणारांनां हा रोग विशेष  होतो. व तो उपचार करूनहि कष्टसाध्य अगर शेवटीं असाध्यच असतो.

रक्ताशय विकृतीमुळें होणारें जलोदर :- यामध्यें पोटांत पाणी होण्याचे अगोदर पावलांवर व पायांवर सूज येते. रोग्यास खोकला, दम व छाती घडधडणें, हीं लक्षणें अगोदरपासून असतात. खोकल्याबरोबर क्वचित् रक्त येतें. रोगी धांपा टाकतो. चांगली झोप येत नाहीं. स्वप्नें पडतात. खोकल्यामुळें वरचेवर उठावें लागतें. धास्ती वाटते. अन्न पचत नाहीं. पायाचे घोटे व डोळयांचीं पोटें यांवर सुजेची टापशी दिसूं लागते. व नंतर पोटाचें जलोदर झालेंच तर तें शेवटी होतें व तें ओषधोपचारानें बरें होतें.

मूत्रपिंडाच्या व्याधीमुळें होणारें जलोदर :- या रोगांत रोगी सकाळीं जागा झाल्यवर सूज प्रथम डोळयांच्या भोंवतीं व तोंडावरच प्रथम दिसतो. यामुळें बहुधां ती रोग्यास प्रथम न कळतां त्याच्या आप्तांसच प्रथम समजते. नंतर सर्व शरीरहि हळुहळू सुजूं लागतें. लघवी थोडी होऊं लागून तींत रक्त व आलब्यूमिन नांवाचा पदार्थ जाऊन शरीर अशक्त होतें. जुनाट रोग असल्यास रक्त जात नाहीं. एखाद्या वेळीं पापण्या सुजेनें इतक्या जाड होतात कीं त्यांमुळें डोळेहि झांकून जातात. हात, पाय, शिष्न व वृषण हे अवयवहि अतिजाड होऊन त्यांवरील सूज फुटून पाणी पाझरूं लागतें. हीं लक्षणें नवीन विकारांत विशेष  होतात व यांतच पोटांतहि जलोदर होतें. हें जलोदर औषधोपचारांनीं बरें होण्याचा पुष्कळ संभव असतो. याशिवाय लहान मुलाच्या पोटांत डबारोग होऊन, अथवा म्हाता-या माणसांत ग्रंथि रोगामुळें अगर पंडुरोगामुळें रक्तनाश फारच होऊन अंत्रावरणाचा दीर्घकालीन दाह सुरू होऊनहि जलोदर होते. पण हीं कारणें क्वचितच घडतात व फारशीं नजरेस येत नाहींत. व जीं येतात तीं असाध्य असतात.


उपाय :- हा स्वतंत्र रोग नसल्यामुळें मूळ ज्या रोगामुळें तें झालेलें असतें तो रोगच बरा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नुसतें पोटांतील पाणी काढून टाकण्यानें उपयोग होत नाहीं. कारण तें पुन्हां लवकरच भरतें. वरील सर्व कारणांस एकच उपाय लागू पडणार नाहीं. हें उघड आहे. यासाठीं अनुभविक माणसाकडून औषध घ्यावें. शरीरांतील विकृत पाणी बाहेर निघून गेलें पाहिजे हें सर्व उपायांत मुख्य तत्त्व आहे. यकृताच्या विकारांत तें पाणी विशिष्ट रेचक औषधें देऊन कोठयाच्या मार्गानें पडून जाईलसें करतात. हदयामुळें होणा-या जलोदरांत मूत्रमार्गानें पाण्याचा निकाल व्हावा असा उद्देश असतो व मूत्रपिंडाच्या व्याधीमुळें होणा-या जलोदरांत विशिष्ट रेचक, औषधें, घाम आणणारीं औषधें व मूत्र वाढविणारीं औषधें देऊन या सर्व मार्गांनीं म्हणजे कोठा, त्वचा, व मूत्रपिंड यांच्या वाटें सांचलेलें पाणी निघून जातें. कित्येक वेळां मूळरोगच इतका तीव्र असतो कीं, त्यांत रोग्याचा अंत झाल्यावांचून रहात नाहीं. अशा वेळीं जलोदराचें पाणी शस्त्र टोंचून त्याच्या नळीच्या मार्गें बाहेर काढतात. त्यामुळें रोग्यास कांहींसा आराम वाटतो व श्र्वासास अडचण पडणें कमी होतें. पण पुढें अशक्तता येते व पुन्हां पोट पाण्यानें भरून जातें. अन्न व पाणी याच्या ऐवजीं दुधावर राहिल्यानें उदररोगांत पुष्कळ फायदा होतो. सर्व प्रकारच्या जलोदरांत हें पथ्य चांगलेंच आहे पण विशेष त: मूत्रपिंड विकृतिजन्य जलोदरांत या पथ्याचा विशेष  गुण दिसतो. गोमूत्रप्राशन, वाफारा, व जुलाब हे उपाय देशी वैद्यकांत सांगितलेले आहेत. गोमूत्र नुसतें, अगर इतर औषध अगर काढे यांबरोबर देतात. घाम निघाल्यानें रोग्यास फार बरें वाटतें. जितका घाम निघेल तितकें पाणी त्वचेच्या द्वारें निघून जातें. अति घाम काढल्यानेंहि कधीं कधीं शक्ति कमी होते. कोरडा वाफारा घेऊन घाम काढण्याचा एक प्रकार आहे. वाफारा गरोदर स्त्रियांस, मेंदूचे विकार असतांना, हदय फार अशक्त झालें असल्यास अगर जेवणानंतर लागलीच देऊं नये. तसेंच रोगी अत्यावस्थ स्थितींत असल्यास हा उपचार करणें तहकूब ठेवावें.

आयुर्वेदीय विवेचन :- पोटाच्या कुशी मोठया होणें यास सामान्यत: उदर म्हणतात. दोषांनीं शरीरांतील खालचीं व वरचीं जलवाही स्त्रोतसें बंद झाली आणि त्यामुळेंच प्राण व अपान वायू आणि अग्नि हे दुष्ट झाले म्हणजे दोष, त्वचा व मांस यांच्या मध्यभागीं गेलें असतां पोटाच्या कुशी मोठया होतात.

हा रोग अतिशय ऊष्ण, खारट, क्षारयुक्त, विदाही, अंबट, रूक्ष, मलिन, अशा खाण्यानें तसेंच ओकारीचीं व रेचक औषधें घेतल्यानंतर योग्य पथ्य न केल्यानें, मलमूत्रादिकांचे वेग धारण केल्यानें, पानथरी, मूळव्याध, संग्रहणी, यांनी कृशता आल्यानें, पंचकर्मांचा अनुक्रम चुकल्यानें, आंतडें फुटलें किंवा फाटल्यानें, मलसंचयानें गुदद्वारांतील वळींत मळ अडकल्यानें व अजीर्णानें होतो. प्राय: या रोगास अग्निमांद्य हेंच कारण आहे.

हा रोग आठ प्रकारचा आहे.  (१)  वातोदर,  ( २ )  पित्तोदर,  ( ३ )  कफोदर,  ( ४ )  सन्निपातोदर,  ( ५ )  प्लीहोदर,  ( ६ )  बध्दोदर, (  ७ )  क्षतोदर, व  ( ८ )  जलोदर असे ते आठ प्रकार आहेत.

या रोगानें पीडिलेला मनुश्य तालु व ओंठ सुकून गेलेला, हात, पाय, व पोट सुजलेला, बारीक, कुशी फुगलेला, आहार व शक्ति कमी झालेला, हिंडण्याफिरण्यास असमर्थ असून जणूं काय प्रेतच असा दिसतो. उदर होण्याच्या पूर्वी खालीं लिहिल्याप्रमाणें पूर्वचिन्हें होतात :-

भूक लागत नाहीं. खाल्लेलें अन्न लवकर पचत नाहीं. पुष्कळ वेळानें पचतें व तें पचतांना अंगाची व घशाची आग होते. थोडेसें जरी जास्त अन्न खालें तरी पोटाला तडस लागते. अन्न जिरलें किंवा न जिरलें हें समजत नाहीं. एकदम शक्ति कमी वाटते थोडेसें चाललें तरी दम लागतो, अंड मोठा होतो, शौचाला होत नाहीं, थोडी पायाला सूज येते, हलकें व थोडें अन्न खाल्लें किंवा मुळींच अन्न न खातांहि ओटीपोटांत दुखतें व ताण बसतो. पोटावर शिरा दिसूं लागतात. पोटाच्या वळया मोडतात.

उदराची लक्षणें :- डोळयांवर झांपड, अंग गळणें, मळाचा अवरोध, अग्निमांद्य, दाह, सूज, पोट फुगणें व शेवटीं पाणी होणें. उदरांत पाणी होण्यापूर्वी पोटाचा रंग अरूण असतो, त्यास सुज नसते, तें फार जड वाटत नाहीं, शिरांनीं गुंडाळलेलें दिसतें, आणि त्यांत नेहेमी गुडगुड आवाज होत असतो. बेंबी व आंतडीं यांस फुगवून त्यांतून वायु जोरानें फिरतो, व नाहींसा होतो. त्यानें हदय, कंबर, बेंबी, गुदद्वार आडसंघी, हीं दुखतात. अपानवायू सरतांना आवाज होतो. शौचास होत नाहीं, लघ्वीस थोडें होत, अग्नि फारसा मंद नसतो, खाण्यावर फार असक्ति असते, व तोंड बेचव नसतें.

वातोदर :- वातोदरांत हात, पाय, वृषण व कुशी सुजतात. कुशी, बरगडया, पोट, कंबर, व पाठ, यांत शूळ होतो. हाडांचे सांधे फुटतात.  कोरडी ढांस येते, अंग दुखतें, कंबरेच्या खालचा भाग जड वाटतो. मळाचा अवरोध त्वचा, डोळे, नखें, हात, पाय, हीं काळसर अरक्त होतात. पोट एकाएकीं वाढतें व लहान होतें, पोटांत टोंचण व फाटल्यासारखी वेदना होते. बारीक व काळया रंगाच्या शिरा पोटावर दिसतात. पोटावर टिचकी मारली असतां फुगलेल्या पखालीसारखा आवाज निघतो. आणि वायु शूळ व शब्द करीत पोटांत चोहोंकडे फिरतो.

पित्तोदर :- यांत ताप, मूर्छा, दाह, तहान, तोंड तिखट होणें, भ्रम, जुलाब, त्वचा, डोळे, नखें हीं पिवळीं होणें, पोट हिरव्या रंगाचें होणें, पिंवळया व तांबूस रंगाच्या शिरांनीं पोट आच्छादित होणें, पोटास घाम येणें, तें कढत लागणें, त्यांत दाह होणें, त्यांतून धूर निघाल्यासारखें वाटणें, पोट हातास मऊ लागणें, लौकर पाणी होणें व दुखणें हीं लक्षणें असतात.

कफोदर :- कफोदरांत अंग गळाल्यासारखें वाटतें, स्पर्श समजत नाहीं, सूज येते, अंग जड वाटतें, झोंप जास्त येते, मळमळतें, अरूचि, श्र्वास व खोकला असतो, त्वचा, डोळे व नखें हीं पांढरीं होतात. हातास पोट गुळगुळीत लागतें, निश्चल असतें, पोटावर पांढ-या शिरा दिसतात, तें मोठें होतें, हातास कठिण लागतें, सावकाश वाढतें, गार लागतें, व जड वाटतें हीं लक्षणें असतात.

सन्निपातोदर :- त्रिदोषांचा प्रकोप करणा-या कारणांनीं, बायकांनीं वश करण्याकरितां दिलेलें रज, किंवा नाक, कान, इत्यादिकांतील मळ पोटांत गेल्यानें, सर्पादिकांचें विष किंवा दुषी विष (  कृत्रिम विष )   पोटांत गेल्यानें, वात, पित्त, कफ, व रक्त हे संचित होऊन कोठयांत येतात; तेथें विकृत होऊन सान्निपातिक  ( त्रिदोशजन्य )   उदर उत्पन्न करतात. यांत तीन्ही दोषांच्या उदरांची लक्षणें असून शिवाय शोश, मूर्छा व भ्रम हे विकार उप्तन्न होतात. हें उदर भयंकर आहे. यांत पाणी फार लवकर होतें. थंडी पडली, जोराचा वारा सुटला किंवा आभाळ आलें असतां फार त्रासदायक होऊन हें विकोपास जातें.

प्लीहोदर :- फार जेवून लगेच घोडा, गाडी, इत्यादि वाहन किंवा अशाच दुस-या व्याधीनें क्षीण झाल्यानें, डाव्या कुशींतील पाणथरी आपल्या स्थानापासून सुटून वाढते. किंवा रसादि धातूंनीं वाढलेलें रक्त तिला वाढवतें. ती आरंभीं अठळीसारखी कठिण असून नंतर कांसवाच्या पाठीसारखी हळूहळू कुशींत वाढून उदररोग उत्पन्न करते.

प्लीहोदराचीं लक्षणें :- दमा, खोकला, तहान, तोंड बेचव होणें, पोट फुगणें व दुखणें, ताप, पांढुरकेपणा, ओकारी, बेशुद्धी, वेदना, दाह व मोह हे विकार उप्तन्न होतात. पोटाचा रंग बदलतो, बहुतकरून पोट आरक्त होतें. आणखी त्यावर निळया व पिवळया रेघा उठवतात. प्लीहोदरांत उदावर्त, पोटशूळ व पोटफुगी हीं लक्षणें असतां वायु; मोह, तहान, दाह व ताप हीं असतां पित्त व जडत्व, अरूची व कठिणपणा हीं असल्यास कफ यांचें आधिक्य आहे असें समजावें.

यकृदुदर :-पाणथरीप्रमाणेंच उजव्या कुशींतील यकृतहि आपल्या स्थानापासून सुटून उदर उत्पन्न करतें. त्याचीं लक्षणें वर लिहिलेल्या प्लीहोदराप्रमाणेंच आहेत.

बद्धगुदोदर :- अन्नाबरोबर केंस पोटांत गेल्यानें, मुळव्याधीच्या मोडांनीं, उदावर्तानें किंवा दुस-या कोणत्याहि आंतडयास चिकटून रहाणा-या पदार्थांनीं गुदद्वार बंद झालें असतां कुपित झालेला अपानवायु, मळ, पित्त, कफ यांचा अवरोध करून उदर (बध्दोदर)   उत्पन्न करतो. यांत दाह, तृषा, ताप, शिंका, खोकला, दमा, मांडया गळणें, डोकें, हदय, बेंबी व गुद यांत शूळ, मलावरोध, अरूचि, वांती व वायू कोंडणें हीं लक्षणें होतात व पोट ताठतें. पोटावर निळया तांबूस शिरा उठतात किंवा मुळींच उठत नाहींत व बेंबीच्या वर पोट गाईच्या षेंपटासारखें होतें.

छिद्रोदर :- हाड, कांटा, खडा वगैरे शल्यें अन्नाबरोबर पोटांत गेल्यानें किंवा फार खाण्यानें आंतडें फाटतें किंवा पिकतें, त्यामुळें त्या आंतडयास भोकें पडतात. त्या भोंकांतून अपक्व अन्नरस मळाबरोबर बाहेर येतो. तो बुळबुळीत, पिंवळा व लाल असून त्यात प्रेतासारखी घाण येते. त्यांतून थोडाथोडा रस गुदांतून बाहेर पडतो व बाकीचा सर्व पोटांत भरून भयंकर उदर उत्पन्न करतो. यांत बेंबींच्या खालीं पोट वाढतें. व पाणी फार लवकर होतें. यांत कुपित झालेल्या तीनहि दोषांचीं लक्षणें असतात. दमा, तहान व भ्रम हे विकार होतात. यास छिद्रोदर व कांहीं आचार्य परिस्त्रावी उदर असें म्हणतात.

जलोदर :- स्नेहन व स्बेदन वगैरे क्रिया करीत असतां मध्येंच एकाएकीं थंड पाणी प्याल्यानें किंवा अग्नि मंद असून शक्तिक्षीण असून अथवा शरीर अतिशय क्षीण असून अतिशय पाणी प्याल्यानें त्या पाण्यांत मिसळलेले कफ व वायू जलवाहक स्त्रोतसें बंद करून पोटांत राहून तें सांचलेलें पाणी उदकस्थानांतून म्हणजे क्लोमांतून वाढवितात. त्यामुळें उदर होतें. यांत तहान, गुदस्त्राव, गुदशूळ, खोकला, दमा व अरूचि हे विकार होतात. पोटावर नाना रंगाच्या शिरा उठतात. पोट पाण्यानें भरलेल्या पखालीप्रमाणें हातात लागतें. टिचकी मारली असतां तसाच आवाज होतो. दाबल्यानें पखालीप्रमाणेंच आंत पाणी भरल्यासारखें दिसतें व पखालीसारखेंच तें डुचमळतें. पोट मोठें, गुळगुळीत, ताठ असतें व बेंबी वर येऊन भोंवतांलून गरगरीत वाटोळी होते. हें जलोदर होय.

कोणत्याहि उदराची हयगय केली असतां आपल्या स्थानापासून सुटलेले व पक्व होऊन पातळ झालेले वातादि दोष संधी व स्त्रोतसें यांच्या तोंडासहि पातळ करतात. बाहेरचीं स्त्रोतसें बंद झाल्यामुळें घामाची बाह्य गति बंद होऊन तो पुन: पोटांत कुशींत सांचतो. अगोदरच पोटांत सांचलेल्या पाण्यांत आणखी भर घालून त्याची पिच्छा  ( बुळबुळीत मळ )   उत्पन्न करतो. या योगानें पोट जड, ताठ, वाटोळें व मऊ होतें. बोटानें ठोकलें असतां वाजत नाहीं. त्याच्या वरच्या शिरा नाहींशा होतात, बेंबीवर दाबलें असतां सगळें पोट एकदम हलल्यासारखें भासतें. नंतर यांत पाणी होऊन पूर्वी पेक्षां पोट मोठें होतें. शिरा दिसेनाशा होतात. व जलोदराचीं सर्व लक्षणें होतात.

वातोदर, पित्तोदर, कफोदर, प्लीहोदर, सान्निपातोदर व जलोदर हीं अनुक्रमें एकाहून एक अधिक कष्टसाध्य आहेत. बध्दोदर व छिद्रोदर हें झालें असतां बहुतकरून पंधरा दिवसांनीं रोगी मरतो.

उदर आरंभापासूनच कष्टसाध्य असतें. त्यांतून रोगी बलवान असतां पाणी  ( अजतांबु )  न झालेलें उदर नवें असतां यत्नानें बरें होतें. डोळयास सूज, शिस्न वांकडें, त्वचेवर पांढरे पापुद्रे येऊन त्यांतून पाणी येणें, शक्ति, रक्त, मांस व अग्नि यांचा अतिशय नाश, अन्नद्वेश, सूज, अतिसार हीं लक्षणें तीव्र असतां उदररोग बरा होत नाहीं. रेचक औषधांनीं हलकें झालेलें पोट पुन: भरलें तर तेंहि असाध्य जाणावें.

चिकित्सा :- उदर हा रोग रेचक औषधांनीं बरा होतो. दोष अतिशय वाढल्यानें स्त्रोतांचीं तोंडें बंद होऊन उदररोग उत्पन्न होतो. म्हणून यांत रोग्यास नेहेमीं रेचक द्यावें. एक किंवा दोन महिनेपर्यंत गोमुत्र किंवा दूध घालून एरंडेल तेल पाजावें. अन्न न खातां गाईच्या किंवा उंटिणीच्या दुधावर रहावें. दाह, पोटफुगी, अतिशय तहान व मूर्छा हे विकार असतील त्यानें विशेषेंकरून याप्रमाणें वागावें. ज्याच्या अंगी रूक्षता आहे, वात फार वाढला आहे व दोषांची शुध्दि व्हवी अशी इच्छा आहे त्यांच्यासाठीं स्निग्घता आणून उदराचा नाश करतील अशा घृतांची योजना करावी. घृतांनीं स्निग्ध झालेल्या रोग्यास शक्ति आली, वायू दबला आणि दोषाशय शिथिल झाला म्हणजे त्यास रेचकें द्यावीं.

जुलाब झाल्यावर हळूहळू हलकेसें अन्न सुरू करून क्रमानें साळीचा भात बेंतानें खाऊं लागावें. उदररोग्यानें शिल्लक राहिलेला दोष निखालस काढून टाकण्याकरितां पुढील औषधें द्यावीं. गोमुत्राच्या पुष्कळशा भावना दिलेले हजार हिरडे रोज एक किंवा दोन याप्रमाणें खाऊन वर दूध प्यावें. वर्धमान पिंपळी सेवन करावी. शिलाजित खाऊन नुसत्या दुधावर रहावें. गुग्गुळ घ्यावा.

रेच होऊन पोट उतरलें व नरम झालें म्हणजे त्यास साल्वणादि शेक करून कपडयाचा पटटा बांधावा. या योगानें पुन्हां पोटांत वारा भरून तें फुगणार नाहीं.

चांगलें जुलाब होऊनहि पुन्हां ज्याचें पोट फुगते त्यांस बरेच स्निग्ध, आंबट व खारट असे निरूहबस्ती द्यावे. जो रेचन देण्यास योग्य नसेल अशा उदर रोग्यास बस्ती, दूध व घृतें हे शामक उपाय करावें. वातोदरांत विशेषेंकरून वातन्घ औषधांचे बस्ती द्यावें. शक्ति येण्याकरितां दूध द्यावें. पित्त्तोदरांत रोगी सशक्त असल्यास रेचकें व पित्तघ्न औषधांचे बस्ती द्यावे. रोगी अशक्त असेल तर अनुवासन बस्ती देऊन रेच होण्याकरितां दुधाचे बस्ती द्यावे. दुध, बस्ती आणि रेचकें वरचेवर घेऊन बेतानें वागलें म्हणजे पित्तोदर खात्रीनें बरें होतें.

कफोदरझालेल्या सशक्त रोग्यानें रेचकें घेऊन तिखट, क्षारयुक्त व कफनाशक अशा अन्नाचा उपयोग करावा. स्तैमित्य, अरूचि, मळमळ, अग्निमांद्य हे विकार असून कफानें पोट घटट व स्थिर झाल्यास व रोगी मद्य पिणारा असल्यास अरिष्टें व क्षार द्यावे. अशक्त मनुष्याचें कफोदर आरिष्ट, गोमुत्र, चूर्ण, क्षारयुक्त तेलें यांनीं बरें करावें.

त्रिदोषात्मक उदरावर रोगी बरा होण्याची आशा सोडून बचनाग वगैरे स्थावर विष किंवा ज्याच्यावर रागावलेल्या सर्पानें विष टाकलें आहे असें फळ खाण्याच्या पदार्थांतून द्यावें. तें विष तीव्र प्रमाथी म्हणजे शरीरांतील सर्व स्त्रोतांत घुसून दोषांस बलात्कारानें ओढून काढणारें असल्यामुळें निश्चल व धात्वादिकांस चिकटून बसलेल्या दोषसमूहास बाहेर काढल्या. दोष निघून गेल्यावर त्यास थंड पाण्यानें स्नान घालून थंड दूध किंवा कण्हेरी पाजावी. पालेभाज्या, आंबट, खारट किंवा तेलतूप न घालतां अर्धवट शिजवून खाव्या. एक महिन्यापर्यंत अन्न न खातां या भाज्यावरच रहावे. तहान लागल्यास याचाच स्वरस घ्यावा. एक महिन्यानंतर उंटिणीचें दूध प्यावें.

प्लीहोदरांत दोषानुसार स्नेहन, स्वेदन करून दहींभात खाऊ घालून डाव्या हाताची शीर तोडावी. रेचकें व रोहितक घृत  (  वा. चि. स्था. )  द्यावी. या उपायांनीं बरें न वाटल्यास व तींत पाणी झालें नसल्यास गुल्मावर सांगितलेल्या पद्धतीनें डाग द्यावा.

यकृतावर पानथरीसारखीच चिकित्सा करावी. मात्र शीर तोडणें झाल्यास उजव्या हाताची तोडावी.

बध्दोदर झालेल्या रोग्यास घाम काढून अनुवास व बस्ती देऊन गोमुत्र, तीक्ष्ण औषधें तेल व सैंधव यांसह निरूह बस्ती द्यावा. व पुन्हां अनुवासन बस्ती द्यावा. त्यास सारक अन्न व तीव्र रेचक  द्यावें तसेंच उदावर्त नाशक असून वातशामक असणारे सर्व उपाय करावें.

छिद्रोदराची चिकित्सा स्वेद खेरीजकरून बाकी सर्व कफोदराप्रमाणेंच करावी. पाणी जमलें कीं लगेच काढून टाकावें. याप्रमाणें वरचेवर करून तें बरें करावें.

जलोदरांत प्रथम जलमिश्रित दोष काढून टाकणारीं तीक्ष्ण औषधें गोमुत्र व अनेक प्रकारचे क्षार घालून योजावीं आणि रोग्यास अग्निदीपक व कफनाशक आहार द्यावे.

बध्दोदर, छिद्रोदर व जलोदर हीं बरीं न झाल्यास शस्त्रप्रयोग करावा.

बध्दोदर व छिद्रोदर या दोहोंत रोग्याचें शरीर स्निग्ध व स्विन्न करून बेंबीच्याखालीं डाव्या बाजूस चार बोटें जागा सोडून चारच बोटें पोट फाडावें. त्या छिद्रांतून आंतडीं बोर काढून बध्दोदरांत त्यांस केंस, मळ, कांहीं असेल तें काढून टाकावें. व छिद्रोदरांत शल्य असेल तें काढून आंतडयांत जो स्त्राव झाला असेल तो पुसून काढावा. नंतर त्या छिद्रांस डोंगळे डसवावे. ते डसले म्हणजे त्यांचीं डोकीं राखून धडें ओढून काढावीं आणि आंतडयांस मध व तूप लावून तीं जागच्या जागीं बसवावीं. बाहेचा व्रण शिवून त्यावर जेष्ठमधाचें चूर्ण व काळी माती हीं मिसळून त्यांचा लेप करून पटटा बांधावा. नंतर त्यास निवांत जागेंत स्नेहानें भरलेल्या पिपांत बसवून नुस्त्या दुधावर ठेवावें.

जलोदरांत वातनाशक तेलें चोळून ऊन पाण्यानें पोट शेकून काखेपर्यंत पोटास वस्त्र गुंडाळावें. नंतर बध्दोदर व छिद्रोदर यांवर सांगितलेल्या जागीं एक छेद करावा व त्या छिद्रांत नळी घालून पोटांतील अर्धे पाणी काढून टाकावें. नंतर नळी काढून त्या व्रणावर सैंधवमिश्रित तेल चोळून पटटा बांधून पोटास वस्त्र गुंडाळावें. पुढें तिस-या चवथ्या दिवसापासून सोळा दिवसांपर्यंत थांबून थांबून शिल्लक राहिलेलें अर्धें पाणी थोडें थोडें करून काढावें. आणि जसजसें पोट सैल होईल तसतसें तें कपडयानें घटट गुंडाळून बांधावें याप्रमाणें सर्व पाणी निघून गेल्यावर रोग्यास उपास घालून किंचित् तूप व सैंधव घातलेली कण्हेरी पाजावी. पुढें सहा महिने नुस्त्या दुधावर रहावें. यापुढें दुधांत शिजलेली कण्हेरी प्यावी; आणि शेवटीं जुने सांवे किंवा हरीक यांचा थोडथोडा भात दुधाबरोबर खावा. याप्रमाणें एक वर्षभर पथ्य केलें असतां जलोदर बरें होतें. सर्व प्रयोगाच्या मागून दूध पाजावें. कारण तें रसादि सर्व धातूंस स्थिर करणारें शक्ति देणारें व शिल्लक दोषांस काढणारें आहे. तसेंच औषधें घेऊन ज्यांचें शरीर कृश झालें आहे, अशा मनुश्यांस दूध हेंच अमृतप्रमाणें गुणकारी आहे. उदरांत ताकहि प्रशस्त आहे. जडत्व, अरूचि, पोटफुगी, अग्निमांद्य व अतिसार हे विकार असतां तें द्यावें. अतिशय उष्ण, आंबट, खारट, जड, गूळ, तेलाची फोडणी दिलेले पदार्थ, पाणी पिणें, श्रम, मार्ग चालणें, दिवसा निजणें व गाडींतून किंवा घोडयावरून फिरणें या गोष्टी वर्ज कराव्या.

   

खंड १४ : जलपैगुरी - तपून  

 

 

 

  जलमस्तिष्क रोग
  जलयंत्रशास्त्र
  जलालपेठ
  जलालखंड
  जलालाबाद
  जलालाबाद, तहसील
  जलाली
  जलालुद्दीन मुहम्मद वल्खी
  जलालुद्दीन सयुती
  जलेश्वर
  जलेसर, तहसील
  जलोदर
  जलोपचार
  जव
  जवस
  जवादि डोंगर
  जवानबख्त मिर्झा
  जवासिया
  जव्हार
  जशपूर
  जसदन संस्थान
  जसपुर
  जसवंतनगर
  जसवंतसिंह, महाराणा
  जसील
  जस्टिन
  जस्टिनियन
  जस्त
  जस्सो
  जहागिराबाद
  जहागीर, जहागीरदार
  जहांगीर
  जहांगीर बादशहा
  जहाज फिरंगी
  जहाजपुर
  जहांदरशहा
  जहानआरा बेगम
  जहानाबाद
  जहनु
  जहलण
  जळगांव
  जळापूर
  जळापुर तालुका
  जळू
  जाई
  जाकोबाबाद
  जाखाऊ
  जाखन
  जांजगरि
  जाजमाउ
  जाट
  जाटपु
  जाटपोल
  जातक
  जाति
  जातिभेद
  जादम
  जादू
  जादूचा कंदील
  जाधव
  जाधवराई
  जॉन
  जानसाथ
  जॉनसन अॅंड्र
  जॉनसन, डॉय साम्युएल
  जानसार बावर
  जॉन, सेंट
  जानीबेग तुर्खन मिर्ज्ञा
  जानेफळ
  जानोजी निंबाळकर
  जाफना
  जाफरखान
  जाफराबाद
  जांब
  जांबवान
  जाबाल
  जांबु घोडा
  जाब्लोस्काव, पाल
  जांभळी जमीनदारी
  जांभूळ
  जांभेकर, बाळ गंगाधर
  जामखेड
  जामगड
  जामतारा
  जामदारखाना
  जामनगर
  जामनेर
  जामपुर
  जामराव कालवा
  जामी
  जामीनकी
  जामोद
  जाम्निया
  जायफळ, जायपत्री
  जारकर्म
  जॉर्ज टाऊन
  जॉर्ज राजे
  जॉर्जिया
  जालंदर, जिल्हा
  जालना
  जालवणकर, नारायणबोवा
  जालापहाड
  जालारी
  जालिआ
  जालोर
  जावजी दादाजी चौधरी
  जावड
  जावरा
  जावळी
  जावा
  जाविदखाना
  जासवंद
  जासी
  जासुंद
  जाहिरात
  जिऊ महाला
  जिगणी
  जिजाबाई
  जिजिराम
  जिंजी
  जितुलीया
  जिंतूर
  जिंद
  जिनकीर्ति
  जिनगर
  जिनप्रभ
  जिनीव्हा
  जिनेश्वरसुरि
  जिनोआ
  जिन्सीवाले, श्रीधर गणेश
  जिप्सी
  जिब्राल्टर
  जियागंज
  जिरंग
  जिरळ कामसोळी
  जिराफ
  जिंरार
  जिराईतखाना
  जिरें
  जिलेटिन
  जिवबादादा बाक्षी
  जीन मेरी रोलंड
  जीवकचिंतामणी
  जीवधन किल्ला
  जीवनकार्यविचार
  जीवन्मुक्त
  जुई
  जुगार
  जुगोस्लाव्हिया
  जुजुत्सु
  जुझोतिया ब्राह्मण
  जुडा
  जुडीआ
  जुतोघ
  जुनागड
  जुनापाणी
  जुनापादर
  जुनो
  जुनोना
  जुन्नर
  जुपिटर
  जुबल
  जुबो
  जुभखा
  जुव्हेनल
  जूब
  जूल, जेम्स प्रेस्कॉट
  जेऊर
  जेकब
  जेजाकभुक्ति उर्फ जिझोटी
  जेजुरी
  जेझील
  जेतपुर
  जेघे
  जेना
  जेपाळ
  जेफर्सन, थॉमस
  जेबील
  जेम्सटाऊन
  जेम्स मेरी सॅन्ड्स
  जेम्स राजे
  जेयोर
  जेरिको
  जेरिझिम
  जेरुसलेम
  जेरेसा
  जेर्हा
  जेलेपला
  जेल्डर्लंड
  जेवर
  जेव्होंन्स, विल्यम स्टॅनले
  जेष्ठमध
  जेसर
  जेसरी
  जेसलमीर
  जेसुइट लोक
  जेजोर, जिल्हा
  जेहोव्ह
  जैटिया
  जैटियापूर
  जैन, संप्रदाय
  जैनेंद्र व्याकरण
  जैमिनी
  जैस
  जैसवाय
  जोक्जाकर्त
  जोग, कृष्णाजी महादेव
  जोगापरमानंद
  जोगी
  जोगेश्वरी
  जोडिया
  जोतिबाचा डोंगर
  जोत्याजी केसरकर
  जोदिया
  जोधपुर
  जोधबाई
  जोन ऑफ आर्क
  जोनगन
  जोनपुर
  जोनराज
  जोन्स, सर विल्यम
  जोबत, संस्थान
  जोरा
  जोरिय
  जो-हाट
  जोवई
  जोशी
  जोशी, अण्णा मार्तंड
  जोशी, गणेश कृष्ण
  जोशी, गणेश वासुदेव
  जोशी, गणेश व्यंकटेश
  जोशी, चासकर
  जोशी, बारामतीकर
  जोशीमठ
  जोहानिस्बर्ग
  जोहानीझबर्ग
  जोहार
  जोही
  जोहोर
  जौगड
  जौहरीफरवी
  ज्यूटीगल्पा
  ज्योतिपंत महाभागवत
  ज्योति:शास्त्र
  ज्योतिष्टोम
  ज्योती
  ज्वर
  ज्वांग, पट्टुआ
  ज्वारी
  ज्वालामुखी
 
  झऊरी मुल्ला
  झगरपूर
  झज्जर
  झंझरपुर
  झमानशहा
  झमानिया
  झमीनदवार
  झरथुष्ट्र
  झलिदा
  झलून
  झाकाटेकस
  झांग, जिल्हा
  झांजी
  झांझमेर
  झांझीबार
  झाडीतेलंग
  झानेसव्हील
  झान्टे
  झान्थस
  झाफरखान
  झाफरवाल
  झाबिताखान
  झाबुआ
  झाबुलीस्तान
  झाबेल
  झांबेसी नदी
  झांबोअंग
  झामपोदर
  झामसिंग
  झामोरा
  झामोरीन
  झार
  झारगर जात
  झारा
  झारापाप्रा
  झा-होन
  झालकाटि
  झालरपाटण
  झालवान
  झालावाड
  झालावाड संस्थान
  झालोड
  झांशी, जिल्हा
  झांशीची राणी, लक्ष्मीबाई
  झिंगकलिंग हकमती
  झिगन
  झिंझुवाडा
  झितोमीर
  झिनत-उन-निसा बेगम
  झिंपी तौडू
  झियाउद्दीन बरनी
  झिरा
  झिरी
  झिवारत
  झीटून
  झीत्झ
  झीनवर
  झीनॉफानेझ
  झीलंड
  झुंगेरिया
  झुंझुनु
  झुबेदा खातुन
  झुब्दतुन्निसा
  झुरळ
  झुलफिकारखान
  झुलुलंड
  झूवा
  झूरिच
  झूसी
  झेंद-अवेस्ता
  झेनागा
  झेनाटा
  झेनिद
  झेनोफोन
  झेनोबिआ
  झेप्पेलिन, काऊंट फर्डिनंड
  झेब-उन्-निसा बेगम
  झेब्रा
  झेरबस्ट
  झेरिआ
  झेर्नोविट्झ
  झेलम
  झेलम कालवा
  झेलम नदी
  झेलम वसाहत
  झैदपूर
  झैनखान कोक
  झैनाबादी महाल
  झैनुल अबिदिन
  झैमुख्त
  झैसान
  झोडगे
  झोब जिल्हा
  झोला, एमिली एडवर्ड चार्लस
 
 
  टंकारी
  टक्कर देश
  टक्का
  टझी
  टनब्रिजवेल्स
  टरपेलट
  टर्गो, अॅन रॉबर्ट जॅक्स
  टनेंट
  टॅव्हर्नियर
  टॅसिटस कॉनेंलिअस
  टस्कुलम्
  टांकणखार
  टांक तहशील
  टाकळ
  टाकळ घांट
  टाकळा
  टांकळी
  टाकळी बुदुक
  टाकी
  टॉंगकिंग
  टांगानिका
  टांगानिका प्रदेश
  टागोर, देवेन्द्रनाथ
  टागोर, राजा सौरेन्द्र मोहन
  टाटा, जमशेटजी नसरवानजी
  टाटा, सर रतन
  टोंड, कर्नल
  टॉडहंटर, आयझॅक
  टान्जीर
  टापिओका(कासावा)
  टायको ब्राही
  टायग्रे
  टायबर
  टायबेरिअस
  टायर
  टाराक्विनी
  टारांटो
  टारिसेली, इव्हर्जिलिस्टा
  टारेटम्
  टॉके
  टानों
  टार्सस
  टालबॉट, विल्यम हेनरी
  टालमड
  टॉलस्टॉय, लिओ
  टॉलेमी क्लॉडिअम
  टॉलमी फिलाडेल्फस
  टालेरंड, पेरीगॉर्ड प्रिन्स
  टावी
  टासमन, अबेल जॅन्सेन
  टासी
  टिकमगड
  टिटवी
  टिटागड
  टिडोर
  टिन्डाल जॉन
  टिपगड डोंगर
  टिपरा जात
  टिप्पू सुलतान
  टिप्पेरा
  टिफ्लिस
  टिंबक्टु
  टिंबा
  टिबेस्टी
  टिम्माड
  टिरोल
  टिलोता खैरी
  टिल्सिट
  टिळक, बाळ गंगाधर
  टीजिआ
  टीरिआ
  टुलुझ
  टूर्नें
  टूलाँ
  टेकचंद मुनशी
  टेक्सस
  टेगर्नसी
  टेग्युसीगलपा
  टंट, पिटर गथ्री
  टेन, हिप्पोलाइट अडोल्फ
  टेनेस्सी
  टेंपलबार
  टेबल माउंटन
  टेंभुरणी
  टेमेश्वार
  टेराडेलफ्यूगो
  टेलर, फिलिप मेडोज
  टेसिफॉन
  टैन-शान पर्वत
  टोक, संस्थान
  टोकिओ
  टोगोलंड
  टोचीनदी
  टोन, थिओबाल्ड वूल्फ
  टोपल्या
  टोबेगो
  टोमाटो
  टोराँटो
  टोरी फत्तेपूर
  टोलेडो
  टोवला
  टोशाम
  टोळ
  टौंगी
  टौंगुप
  टौंगू
  टौंग्थ
  टौंग्यु
  ट्युनिस
  ट्युनीशिआ
  ट्यूस
  ट्रॅलिझ
  ट्रान्सवाल
  ट्राम्बे
  ट्रॉय अथवा ट्रोड
  ट्रिनिदाद
  ट्रिपोली, प्रांत
  ट्रिबिझाँड
  ट्रीएस्टे
  ट्रटिश्के, हेन्रिक व्हॉन
  ट्रेंट
  ट्विकनहॅम
  ट्विन, मार्क
 
  ठग-ठगी
  ठठ्ठा
  ठाकुर
  ठाकुरगांव
  ठाकूरदासबोवा
  ठाकूरद्वार
  ठाणभवान
  ठाणें
 
  डॅडी
  डॅन
  डॅनिएल
  डन् कर्कं
  डॅन्झिग
  डफरिन, लार्ड
  डफळे
  डंबल
  डबलबीन
  डंबार्टन
  डब्लिन
  डभई
  डमडम
  डरहॅम
  डर्बी
  डलहौसी, लॉर्ड
  डलास
  डहोमे
  डॉक
  डाका, जिल्हा
  डाकोर
  डांग
  डांगची
  डांगर
  डांगी
  डांग्या खोकला
  डाग्वेरे, एल्. जे. एम.
  डोन नदी
  डान्यूब नदी
  डाबी
  डामर
  डायमंड हारबर
  डायमंड बेट
  डायोजेनीस
  डार्टमाउथ
  डार्डानेल्स
  डार्विन, चार्लस रॉबर्ट
  डॉलफिनचें नोंज
  डाल्टन, जॉन
  डास
  डाहाणु
  डाळिंब
  डिंक
  डिकन्स, चार्लस
  डिकेमाली
  डिक्वेन्सि, थॉमस
  डिंगरी
  डिंगणकर, मोरो विश्वनाथ
  डिडीमी
  डिडेरोट डेनिस
  डिफो, ड्यानिअल
  डिवार, सर जेम्स
  डी अर्लेबर्ट
  डीग
  डीगची लढाई
  डी बॉइने
  डीसा
  डुकर
  डुकी
  डुक्करकंद
  डुंगर
  डुप्ले
  डुम जात
  डुरिअन
  डूलचेन्यो
  डूलाँग
  डेकॅपोलिस
  डेकाटें
  डेडिआगॅच
  डेन्मार्क
  डेन्व्हर
  डेमॉस्थेनीस
  डेमिएटा
  डेमोक्रिटस
  डेराइस्मायलखान
  डेरागाझीखान
  डेरागोपीपूर
  डेराजात
  डेरानानक
  डेरापूर
  डेलफाय
  डेलवेअर
  डेव्हनपोर्ट
  डेव्ही
  डेहराडून
  डोंगरगड
  डोंगरपाली
  डोंगरपुर
  डोंगराळी जमीनदारी
  डोंगरा
  डोंगरे, वासुदेव नारायण
  डोडोना
  डोनाटेलो
  डोंबगांव
  डोबरेनर
  डोंबारी
  डाब्रूजा
  डोम
  डोमल जात
  डोमिनिका
  डोरली
  डोव्हर
  डोहर
  ड्युडरनेक
  ड्युबॉपिएरी
  ड्युसेल्डॉर्फ
  ड्यूमा अलेक्झांडर
  ड्यूरर आल्ब्रेक्ट
  ड्रायडन, जॉन
  ड्रॉयमन
  ड्रेस्डेन
  ड्रोघेडा
  ड्विन्स्क
 
  ढक्की भाषा
  ढालगज
  ढालाईत
  ढीमर
  ढुंढये जैन
  ढेकूण
  ढेरा
  ढोर
 
 
  तगर
  तंगेल
  तंगौंग
  तंजावर
  तंजावरचें राजघराणें
  तडवी
  तंडागांव
  तंडो
  तंडोअडाम
  तंडोअलाहयार
  तंडोवागो
  तंडोमहमदखान
  तत्रक
  तंत्रग्रंथ
  तत्त्वज्ञान
  तनकपूर
  तनखा
  तनावल
  तनुकु तालुका
  तपकीर
  तपागच्छ
  तपून

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .