प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग तेरावा : घ - जलपैगुरी

जलजन्य विद्युतशक्ति – जलजन्य विद्युतशक्तीचा प्रसार करण्यासंबंधाने जगातील ज्या ज्या देशात आजपर्यंत यशस्वी रीतीने प्रयत्‍न झाले अशा देशामध्ये हिंदुस्थानास लौकरच प्रमुख स्थान मिळेल असा अंदाज दिसतो.  हिंदुस्थानात ह्या शक्तीचे आणखी कारखाने सहज निघू शकतील इतकेच नव्हे, तर तसल्या कारखान्यांची किंवा योजनांची देशात सध्या फार जरुर आहे.  दगडी कोळसा व रॉकेल तेल यांच्या खाणी हिंदुस्थानात फारच थोड्या ठिकाणी असल्यामुळे रेल्वे भाड्याखालीच फार खर्च होऊन किफायतशीर रीतीने गिरण्या व इतर लहानसान कारखाने चालविणे अशक्य होते.  ह्यामुळे जलशक्ति व तिचे विद्युतशक्तीने स्थलांतर जितक्या ठिकाणी होऊ शकेल त्यामानाने देशातील सर्व भागात उद्योगधंद्याना कायमचे उत्तेजन मिळेल.  हिंदुस्थानांतील पावसाळा अनिश्चित असून वर्षातून तीन किंवा चार महिनेच पाऊस पडत असल्यामुळे निवळ जलशक्तीने काम करणारी योजना चालविणे बहुतकरुन फार कठिण जाते.  सर्व वर्षभर पाण्याने भरलेल्या नद्या हिंदुस्थानात बहुतेक नाहीतच असे म्हटले तरी चालेल.  ह्या कारणामुळे उष्ण काळात उपयोगात आणता येतील असे जलसंचय कृत्रिम रीतीने तयार करणे जरुर पडते.  ह्या कार्याकरिता सोईची कित्येक स्थळे डोंगराळ प्रदेशात निरनिराळ्या इलाख्यात आहेत व कित्येक डोंगरावर अतिवृष्टि होत असल्याने आजपर्यंत निघालेल्या जलजन्य विद्युतशक्तीच्या योजनांप्रमाणे आणखी कितीतरी नवीन योजना तयार करुन देशात नवीन उद्योगधंद्याची वाढ करण्याकडे त्यांचा उपयोग करुन घेता येईल.  ह्या तर्‍हेच्या योजनांपासून कारखाने चालण्यास भरपूर शक्तीचा पुरवठा मिळेल इतकेच, नव्हे तर आजूबाजूच्या प्रदेशातील शेतीलाहि त्या पाण्याचा उपयोग होईल.  सर टॉमस हॉलंड यांच्या अध्यक्षतेखाली सन १९१६ पासून स. १९१८ पर्यंत बसलेल्या औद्योगिक कमिशनने ह्या विषयासंबंधाने सर्व हिंदुस्थानात पहाणी करावी अशी शिफारस सरकारास केली होती.  त्या शिफारशीप्रमाणे हिंदुस्थान सरकारने कित्येक तज्ज्त्र लोकांची नेमणूक केली.  त्यापैकी जे. डब्ल्यू. मिअरस यांनी स. १९२२ मध्ये प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टात फार महत्वाची माहिती दिली आहे.  हिंदुस्थानात चालू असलेल्या जलजन्य विद्युतशक्तीचे अंदाजपत्रक : -

 प्रांताचे नाव  शक्तीचे परिमाण. ( अश्वशक्ति )
 आसाम  २२५५०
 बंगाल ( कलकत्याचे क्षेत्रफळ सोडून )  २५३१८
 कलकत्ता ( शहराशिवाय )    १७६२००
 बिहार ( कोलिरीज इत्यादिशिवाय )  २३२५
 मुंबई इलाखा  ३२८७२
 मुंबई शहर  ७५००००
 ब्रह्मदेश ( तांदुळाच्या गिरण्या वगैरे सोडून )    १७७५०
 मध्यप्रांत  ३२७७३
 मद्रास    ६००००
 वायव्येकडील सरहद्दीवरचा प्रांत   ....
 पंजाब  ९००००
 संयुक्तप्रांत  ३७५४८
 एकूण  १२४८३३६

ह्याखेरीज यत्‍न केल्यास हिंदुस्थानात खालील कोष्टकात दाखविलेल्या आंकड्याइतकी शक्ति मिळण्याचा वाव आहे. म्हणून तेहि आकडे दिले आहेत.

 प्रांताचे अगर संस्थानाचे नाव  कमीत कमी शक्ति.
 आसाम  ६२१०००
 बंगाल  १००००००
 बिहार व ओरिसा   ९५०००
 मुंबई  ७७३०००
 ब्रह्मदेश  १३२७०००
 मध्यप्रांत  १६५०००
 जम्मू आणि काश्मिर  ४५८०००
 मद्रास  १३८०००
 वायव्य सरहद्दीचा प्रांत  १००००००
 पंजाब  ११९००००
 संयुक्तप्रांत   ६०५०००
 इतर ठिकाणी  १६००००
 एकूण  ७५३२०००

वरील आकडे किलोवॅटमध्ये दिले आहेत.  १.४/९ किलोवॅट म्हणजे १ अश्वशक्ती असे ठोकळ प्रमाण आहे.  स. १९२२ सालपर्यंत निरनिराळ्या प्रांतात मुख्य तयार झालेल्या योजनांची माहिती येणेप्रमाणे आहे : -

बंगाल : - ह्या प्रांतातील मुख्य कारखाना दार्जिलिंग येथे आहे व रंगीत आणि तिस्ता या दोन नद्या अडवून ही योजना तयार झाली आहे.

मुंबई इलाखा : - भाटघर धरण, आंध्रा खोर्‍यांतील धरण व गोकाक कंपणीचे धरण ही तीन धरणे मुख्य आहेत.  टाटा कंपनीने काढलेल्या योजनांसारख्या वाडत्या प्रमाणावर आहेत व त्यापासून मुंबईतील पुष्कळ गिरण्यांना सध्या विद्युतशक्तीचा पुरवठा होत आहे व ह्या योजनांची जगातील अतिशय प्रमुख योजनात गणना होते.  कित्येक तज्ज्त्र लोकांच्या मताप्रमाणे पाण्याच्या सहाय्याने विद्युतशक्ती उत्पन्न करण्याकरिता मुंबई इलाख्यात निसर्गजन्य जितक्या सोयी आहेत, तितक्या हिंदुस्थानातील कोणत्याहि प्रांतात नाहीत.  मुंबईजवळील घाटामध्ये ही शक्ति मोठ्या प्रमाणावर उत्पन्न करता येईल, ही कल्पना प्रथम डेव्हिड गॉसलिंग या नावाच्या गृहस्थाने काढली.  समुद्राच्या पृष्ठभागापासून दोन हजार फूट उंच असलेल्या सह्याद्रि पर्वतांच्या रांगावर पावसाळ्यात भरपूर पाऊस पडून जे पाण्याचे लोंढे समुद्रास जाऊन मिळतात ते अडविल्यास त्यापासून प्रचंड विद्युतशक्ति उत्पन्न करता येईल अशी प. वा. जमशेटजी टाटा यांची मि. गॉसलिंग यानी खात्री केली.  ह्यासंबंधाने पाहणी करुन जास्त माहिती मिळविण्याकरिता इंग्लंडहून काही तज्ज्त्र लोक आणविले व त्यानंतर कंपनी काढण्यासंबंधाने दीर्घ प्रयत्‍न करुन सरकारची सम्मति मिळविली.  त्या वेळेस मुंबईचे गव्हर्नर सर जार्ज क्लार्क यांच्या प्रयत्‍नाने पुष्कळ देशी संस्थानिकांनी कंपनीस भांडवल देण्याच्या कामी फार महत्वाची कदत केली व त्या मदतीमुळे १॥। कोटि रुपयांचे भांडवल देशातच तयार झाले.  ह्या योजनेसंबंधाने टाटा कंपनीची एंजिनिअरिंग कामे बोरघाटावर लोणावळाच्या  आजुबाजूस आहेत.  लोणावळा, वलवण व शिरोटा ह्या तीन ठिकाणी पाणी साठविण्याकरिता धरणे बाधण्यात आली आहेत.  कंपणीचे मुख्य शत्तिच्गृह घाटाच्या पायथ्याशी खोपवली येथे आहे.  तेथे नळांच्या सहाय्याने १७२५ फूट उंचीवरचे पाणी नेले जाते.  इतक्या उंचीवरुन खाली येताना या पाण्यापासून एका चौरस इंचावर ७५० पौंड दाब पडणारी शक्ति उत्पन्न होते.  हीच शक्ति विद्युत उत्पन्न करण्यास उपयोगी पडते.  आरंभी ३०००० पर्यंत अश्वशक्ती उत्पन्न व्हावी एवढ्याच हेतूने कंपनी काढली गेली.  परंतु मुंबईतील गिरण्यांची मागणी वाढत गेली.  त्या वाढत्या मागणीप्रमाणे शक्तीचा पुरवठा करता यावा म्हणून कंपनीने आपले भांडवल तीन कोट रुपयांपर्यंत वाढवून चाळिस हजारपर्यंत अश्वशक्ति पुरविण्याची व्यवस्था केली आहे.  सध्या मुंबईच्या ४४ वर गिरण्या या शक्तीचा उपयोग करीत आहेत.  मुंबईची ट्रॅमवेकंपनी सुद्ध आपल्या पांच स्टेशनाकरिता या शक्तीचा उपयोग करीत आहे.  मावळात निळा आणि मुळा या दोन नद्या अडवून तेथेहि विद्युतशक्ति उत्पन्न करण्याचा टाटा कंपनीचा हेतू आहे व त्याप्रमाणे लोकांच्या सत्याग्रही मोहिमेला न जुमानता कंपनीने कामाला मोठ्या अडचणीत सुरुवात करुन काम संपवीत आणले आहे.  काम पुरे झाल्यास अदमासे ५०००० कोलोवॅट शक्ति उत्पन्न होईल असा अंदाज आहे.  ह्याच ठिकाणापासून दक्षिणेस सुमारे शंभर मैलांवर कोयना नदीच्या दरीत दोन धरणे बांधण्याचा टाटा कंपनीचा विचार आहे.  आंध्रा दरीमध्ये ठोकरवाडीजवळ एक १९२ फूट उंचीचे धरण बांधून त्या पाण्याच्या साहाय्याने सुमारे १ लक्ष अश्वशक्ति उत्पन्न करण्याकरिता दुसरी एक नवीन कंपनी स्थापन झाली आहे.  या कंपनीचे बांधकाम पुरे होऊन वांद्रा व कुर्ला येथील म्युनिसिपालिट्यांस व मुंबई बेटांतील कापडाच्या गिरण्यास शक्ति पुरविण्याची व्यवस्था लौकरच अमलांत येईल असे वाटते.

म्हैसूर :- म्हैसूर संस्थानातील कावेरी नदी अडवून शिवसमुद्रम येथे १९०२ साली विद्युतशक्ति उत्पन्न करण्याचा केलेला यत्‍न हिंदुस्थानामधील पहिलाच आहे.  कावेरी नदीचा उगम ब्रिटिश हद्दीत असून म्हैसूर संस्थानातून ती वहात गेली आहे.  ही योजना काढते वेळेस कोलार येथील सोन्याच्या खाणीस विद्युतशक्ति पुरविण्याचा मूळ हेतु होता.  शत्तिच्गृहापासून खाणी ९२ मैलांच्या अंतरावर असल्यामुळे सर्व जगात हे अंतर अतिशय मोठे असे मानले जात होते, ह्या शक्तीपैकी एक प्रवाह ५९ मैल अंतरावर असलेल्या बंगलोर शहरापर्यंत नेला आहे.  तेथे औद्योगिक कामाकडे व दिवाबत्तीसाठी ( रोषनाईकडे ) त्याचा उपयोग होतो.  ह्या योजनेचा आरंभ ६ हजार अश्वशक्तीपासून झाला.  तो आता सुमारे २५ हजार अश्वशक्तीपर्यंत वाढला आहे.  जास्त शक्तीची आजुबाजूला मागणी असल्यामुळे शिवसमुद्रमपासून जवळच शिमशा नदी म्हणून कावेरी नदीचा हो फाटा आहे.  त्याच्या उपयोग करावा लागेल व दुसरा बंधारा शिवसमुद्रमपासून पंचवीस मैल अंतरावर तयार करण्याचा विचार आहे.  शिवसमुद्रम येथे ४०० फूट खोलीचा व शिमशाम येथे ६१९ फूट खोलीचा धबधबा होऊ शकेल, व त्यापासून ३९५००० अश्वशक्ति उत्पन्न होईल अशा अंदाज आहे.  तसेच मेकदातू ह्या गावाजवळ कावेरीचा एक मोठा धबधबा आहे.  त्याचाहि विद्युतशक्ति उत्पन्न करण्याकडे उपयोग होईल.

काश्मीर : - काश्मीर संस्थानामध्येहि या बाबतीसंबंधाने बरीच खटपट चालू आहे.  बारामुळा गावाजवळ झेलम नदी आडवून त्या धरणापासून विद्युतशक्ति उत्पन्न करण्याचा यत्‍न सिद्धीस गेला आहे.  श्रीनगर शहराच्या ईशान्येस सुमारे ३४ मैल अंतरावर बारामुळे हे गाव आहे.  शत्तिच्गृहापासून सुमारे ६॥ मैल अंतरावर मुख्य कारखाना आहे.  ह्या योजनेपासून सुमार वीस हजार अश्वशक्ति उत्पन्न होते.  हा प्रवाह श्रीनगर जवळील रेशमाच्या गिरणीपर्यंत आणलेला आहे.  श्रीनगर शहरापैकी बहुतेक भागात दिव्याची व्यवस्था ( रोषनाई ) याच कारखान्यामुळे झाली आहे.  शहरातील रहिवाशांना विद्युतशक्तीचे उपयोग माहीत होऊन उद्योगधद्यास उत्तेजन मिळावे म्हणून सुमारे शंभर किलोवॅट इतकी शक्ती शहरच्या लोकांकरिता वाटून दिली आहे.

मद्रास : - मद्रास इलाख्यात तीन ठिकाणी विद्युतशक्तीच्या योजना आहेत व तीन्ही कारखाने मिळून सुमारे ७४० किलोनवॅट इतकी शक्ति उत्पन्न होते.

वायव्यसरहद्द : - मलकांड येथील बोगद्याजवळ एक योजना तयार केली आहे.  तिजपासून सुमारे २५० किलोवॅट शक्ति उत्पन्न होते.

पतियाळ संस्थान : - सरहिंद कालव्याच्या निदामपूर येथील घागरशाखेवर असलेल्या धबधब्याचा उपयोग करुन सुमारे ३०० किलोवॅट शक्ति उत्पन्न करण्याची योजना झाली आहे.

पंजाब : - अमृतसर, धारीवाल व सिमला या तीन ठिकाणी विद्युतशक्तीच्या योजना चालू आहेत.  त्यापासून म्युनिसीपालिट्या व काही लोकरीच्या गिरण्यास या शक्तीचा पुरवठा होतो.

त्रावणकोर : - या संस्थानात मुन्नर गावाजवळ एक योजना तयार करण्यात आली आहे.  तिजपासून सुमारे ४५० किलोवॅट शक्ति उत्पन्न होते.

संयुक्तप्रांत : - बहादुराबाद गावाजवळ हरिद्वार येथील गंगेच्या नवीन कालव्याकरिता ह्या लहान योजनेचा उपयोग करण्यात येतो.  ह्या प्रांतातील दुसरी योजना मसुरीपासून तीन मैलांच्या अंतरावर आहे.

बांधकाम चालू असलेल्या योजना, ग्वाल्हेर संस्थान : - ह्या संस्थानातील रेव्हिन्यूखात्यातील मेंबर व कालव्याचे एंजिनिअर मिस्टर एस. के. गुर्तु यांच्या देखरेखीखाली पर्वती-विद्युतशक्ति-योजना या नावाचे काम सध्या सुरु आहे.  या योजनेचा हेतु लष्कर शहरास व शेतकी करिता पाण्याचा पुरवठा करणे हा आहे व ह्या सर्व योजनेस एक कोट एकोणतीस लाख रुपये खर्च होतील असा अजमास आहे.  सध्या बांधले जात असलेले धरण सुमारे १२५ फूट उंच होईल.  धरणापासून सुमारे एक हजार किलो वॅट शक्ति उत्पन्न होईल असा अंदाज आहे.

म्हैसूर संस्थान : - कृष्णराज गावाजवळ कावेरी नदीच्या बंधार्‍यास लागूनच दुसरा एक बंधारा बांधण्याचे काम सरकार करीत आहे.  हे काम पुरे झाल्यावर सुमारे ४५०० किलोवॅट इतकी शक्ति तयार होईल असे म्हणतात.

पंजाब : - बाबा हरदयाळसिंग यानी काढलेल्या कंपनीशी पंजाबसरकाराबरोबर नुकताच करार झाला आहे.  त्याप्रमाणे रसूल गावाजवळ उत्तर झेलम कालव्यानजीक एक सत्तर फुटांचा धबधबा आहे.  तसेच त्याच कालव्याचे आणखी दोन धबधबे आहेत, त्या सर्वांचा उपयोग केल्यास बरीच विद्यतशक्ति उत्पन्न होण्यासारखी आहे.

संयुक्तप्रांत : - नैनितात येथील सरोवर व त्याच्या भोवतालचे ओढे यांचा विद्युतशक्ति उत्पन्न करण्याकडे उपयोग करावा अशाबद्दल आज वीस वर्षे वाटाघाट सुरु आहे.  हा पाण्याचा संचय फार लहान आहे.  म्हणून नैनिताल शहराला दिवाबत्तीची ( रोषनाई ) सोय होण्यापुरतीच विद्युतशक्ति उत्पन्न होईल असा अजमास आहे.

मुंबई : - निळा-मुळा स्कीम सुरु आहे.

जलजन्य विद्युतशक्तीचा उपयोग. – कापसाच्या गरिण्यांची यंत्रे चालविण्याकडे, शहरात रोषनाई किंवा दिवाबत्ती करण्यास, तसेच पीठ दळण्याच्या गिरण्या वगैरे लहानसहान धंद्याकडे या शक्तीचा उपयोग करता येतो हे बहुतेक सर्वांना माहीत आहे.  परंतु ह्याखेरीज कित्येक महत्वाच्या कामाकरिता ही शक्ति उपयोगी पडते.  उदाहरणार्थ, पोलाद व त्याची मिश्रणे तयार करणे, अशुद्ध लोखंडाच्या दगडाचे पाणी करणे, भांड्यांच्या किंवा यंत्राच्या निरनिराळ्या भागांचे सांधे जोडून त्यांचा एकजीव करणे, मातीपासून अँल्युमिनीयम धातु काढणे, कॅलशियम कारबाईड व तज्जन्य अनेक पदार्थ तयार करणे, फॉस्फरस आणि क्लोराईन गॅस तयार करणे, अल्कली तयार करणे, वगैरे शेकडो कारखाने ह्या विद्युतशक्तीने जगातील सर्व प्रगत राष्ट्रांत चालू आहेत.  विद्युतशक्तीपासून अमेरिकेत व इतर देशात घरगुती कामेहि करुन घेतात.  तसेच हवेतील नायट्रोजनपासून नायट्रिक अँसिड व शेतीला उपयोगी पडतील अशी निरनिराळी खतेहि तयार होतात.  [ मीयर्स - हायड्रो एलेक्ट्रिक सर्व्हे ऑफ इंडिया, पु. ३; इंडियन इंडस्ट्रियल कमिशन ( १९१६-१८ ) चा रिपोर्ट; इंडियन ईयर बुक, १९२२ ]

   

खंड १३ : घ - जलपैगुरी  

 

 

 

  घंटय्याकवि
  घटोत्कच
  घटोत्कच लेणीं
  घड्याळ
  घनी
  घनौर
  घांट
  घाटगे
  घाटाळ
  घातमपूर
  घानची
  घायपात
  घारगड किल्ला
  घारघोडा
  घारापुरी
  घाशीराम कोतवाल
  घांसदाणा
  घासी
  घिरथ
  घिसाडी
  घुगुस
  घुंड
  घुबड
  घुराम
  घेरिया
  घेवडा
  घोटकी
  घोडबंदर
  घोडा
  घोडाघांट
  घोडाबारी
  घोडासर
  घोडें
  घोडेघांस
  घोरपड
  घोरपडी
  घोरपडे
  घोरी घराणें
  घोशी
  घोसाळे
  घोसी
  घोळ
 
 
  चउमू
  चकमा
  चकला रोषनाबाद
  चकवाल
  चकिया
  चक्कियर
  चक्कीनोआरो
  चक्रपाणि
  चक्रवर्ती
  चक्राप्पा
  चंगनाचेरी
  चंगर
  चच, चचनामा
  चचान
  चटया
  चडार
  चंडी
  चतुरमहाल
  चतुर साबाजी
  चतुरसिंग
  चतुर्थ
  चत्रा
  चॅथॅम
  चंदगड
  चंद घराणे
  चंदन
  चंदभाट
  चंदरभान
  चंदावरकर, नारायण गणेश
  चंदासाहेब
  चंदीपुर
  चंदेरी
  चंदेल्ल
  चंदौली
  चंदौसी
  चंद्र
  चंद्रकोना
  चंद्रगिरी
  चंद्रगुप्त
  चंद्रगोमिन्
  चंद्रनगर
  चंद्रभागा
  चंद्रहास
  चंद्रावती अथवा चंद्रावली
  चन्नगिरी
  चन्नपट्टण
  चन्नबसव
  चन्नरायपट्टण
  चंपा
  चंपानेर
  चपारण
  चंपावत
  चंपाषष्ठी
  चंबळा नदी
  चबा संस्थान
  चमारडी
  चरक
  चरखा
  चरखारी
  चरणदासी
  चरणव्यूह
  चरबी
  चरबीचें झाड
  चरी
  चर्मण्वती
  चलत-चित्रें
  चलन
  चल्लाकेरे
  चवळी
  चहा
  चक्षुर्मंनु
  चाकण
  चाकवत
  चागई
  चांगदेव
  चांगभकार
  चांगा केशवदास
  चाघताइखान
  चांचेगिरी
  चाचो
  चांडोद
  चाणक्य
  चातुर्मास्य
  चातुर्मास्य याग
  चातुर्वर्ण्य
  चात्सु
  चादचा
  चांदपूर
  चांदबिबी
  चांदभाट
  चांदला
  चांदवड
  चांदा
  चांदूर
  चांदूर बाजार
  चांद्रायण
  चानन शानन
  चानस्मा
  चानाल
  चानोड
  चाप्रा
  चाफळ
  चाबुआ
  चांभार
  चाम
  चामखीळ
  चामन
  चामराजनगर
  चामुंड
  चामुर्शी
  चार
  चारखा
  चारण
  चारदुआरं
  चारसद
  चारा
  चारीकार
  चार्टिझम
  चार्लंमांट, अर्ल ऑफ
  चार्वाक
  चालुक्य घराणें
  चालसिस
  चावडा
  चावंद
  चास-कमान
  चॉसर
  चासा
  चाहमान उर्फ चौहान
  चाळिसगांव
  चिक
  चिकंजी
  चिकबळ्ळापूर
  चिकाकोल
  चिकोडी
  चिक्कणर्ति
  चिक्केरूर
  चिक्टीआबर
  चिक्नायकन्हळ्ळी
  चिक्मगळूर
  चिखलदरा
  चिखली
  चिंगलपट
  चिंच
  चिचगड, जमीनदारी
  चिंचलीगदड
  चिंचवड
  चिचेवाडा
  चिंचौली
  चिंच्यु
  चिटणीस
  चितलनगर जमीनदारी
  चितळ
  चितळदुर्ग
  चिताकुल
  चिंतामणी
  चिंतामणी कवि
  चिंतामणी रघुनाथाचार्य
  चितारी
  चिति
  चितोड
  चित्तगांग
  चित्तगांग डोंगराळ प्रदेश
  चित्ता
  चित्तूर
  चित्फिरोझपूर
  चित्रकला
  चित्रकाव्य
  चित्रकूट
  चित्रकोट
  चित्रगुप्त
  चित्ररथ
  चित्रसंग्रहालयें
  चित्रळ
  चित्रांगदा
  चित्रावाव
  चिदंबर दीक्षित
  चिदंबरम्
  चिंदविन
  चिंदविन नदी
  चिदानंद स्वामी
  चिनडोंगर
  चिनमुलगुंद
  चिन लोक
  चिनसुरा
  चिनाब
  चिनीमाती किंवा केओलिन
  चिन्नविरन्ना
  चिन्नूर
  चिन्योत
  चिपळूण
  चिपळूणकर, कृष्णशास्त्री
  चिपळूणकर, विष्णुशास्त्री
  चिफू
  चिमणाजीआप्पा
  चिमणाजी दामोदर
  चिमणी
  चिरक्कल
  चिराबा
  चिलखत-वेदकालांतहि
  चिलिअनवाला
  चिली
  चिल्का सरोवर
  चिस्ती
  चीझी, अॅंटोनें लिओनार्ड डि
  चीन
  चीनी
  चीपुरुपल्ले
  चीर
  चीराल
  चुका
  चुकचि
  चुटिया
  चुडा
  चुडा संस्थान
  चुडेश्वर
  चुना
  चुनार
  चुंबकजन्य विद्युद्यंत्र
  चुंबकत्व
  चुंबकीय दृकशास्त्र
  चुंबन
  चुमल्हारी
  चुरू
  चूडामण
  चेकोस्लोव्हेकिया
  चेंगीझखान
  चेचेंझे
  चेटवई
  चेट्टी
  चेदूब बेट
  चेंबर्स रॉबर्ट
  चेयूर
  चेर घराणें
  चेरात
  चेरापुंजी
  चेरिअल
  चेरुमन
  चेरो
  चेर्रा
  चेल
  चेसेलडेन, विल्यम
  चेस्टरफील्ड
  चेस्टरफील्ड फिलिफ
  चैतन्य
  चैतसिंग
  चैत्य
  चैन
  चैबासा
  चोखामेळा
  चोवो
  चोडवरम
  चोध्रा
  चोपडे
  चोपदार
  चोबारी
  चोंभा
  चोरांग्ल
  चोरासी
  चोरी
  चोल
  चोल घराणें व चोल साम्राज्य
  चोवीस परगणा जिल्हा
  चौंगू
  चौघाट
  चौथाई, चौथ
  चौधरी
  चौबे जहागीर
  चौल
  चौलमुग्रा
  च्यवन
 
  छछरौली
  छट्टू
  छतारी
  छत्तरपूर
  छत्तिसगड विभाग
  छत्रपूर तहशील
  छत्रसाल
  छत्रे, केरो लक्ष्मण
  छत्रे, विष्णु मोरेश्वर
  छत्रे, सदाशिव काशीनाथ
  छंद:शास्त्र
  छप्पन देशचे राजे
  छप्रौली
  छब्रा
  छलाल
  छात
  छापखाना
  छापिआ
  छाप्री
  छायाचित्रपेटिका
  छाल
  छालिअर
  छिंद, लल्ल
  छिंदवाडा
  छिंपा
  छिब्रामऊ तहसील
  छुईखदान
  छुटिया
  छोटा उदेपूर
  छोटानागपूर
  छोटी साद्री
 
  जकात
  जॅक्सन अॅंड्र
  जॅक्सन व्हिल्ले शहर
  जखमा
  जगजीवनदास
  जगत्याल
  जगदलपूर
  जगदीशपूर
  जगन्नाथ
  जगन्नाथपंडित
  जगन्नाथपुरी
  जगन्नाथ शंकरशेट, मुर्कुटे
  जंगम
  जगय्या पेटा
  जंगल
  जंगल महाल
  जगलूर
  जगाध्री
  जग्रांव
  जंगीपूर
  जघाशूल
  जंजिरा
  जझिया
  जटलंड
  जटामांसि
  जटायु
  जटासूर
  जठरदाह
  जठरव्रण
  जडजीवघाद
  जडद्रव्य
  जडभरत
  जडवाद
  जडान्नविषबाधा
  जडावाचें काम
  जत
  जतिंग रामेश्वर
  जंतुजन्य रोग
  जतोई
  जत्रा
  जंदिआल गुरु
  जंदिआला
  जंदोला
  जनक
  जनजसवंत
  जननेंद्रियांचे गुप्तरोग
  जनमेजय
  जनस्थान
  जनाबाई
  जनार्दनस्वामी
  जनावरें
  जनीजनार्दन
  जपान
  जपानी वार्निस
  जबलपुर
  जंबुकेश्वरस्
  जंबुद्वीप
  जबूसर
  जमखिंडी
  जमदग्नि
  जमरुड
  जमाखर्च
  जमाबंदी
  जमालखान
  जमालपुर
  जमिकुंता
  जमीन
  जमीनदार व कुळें
  जमीनमहसूल
  जमुई
  जमेका
  जमेसाबाद
  जम्नोत्री
  जम्मलमडुगु
  जम्मू
  जयगड
  जयचंद
  जयदेव
  जयद्रथ
  जयनगर
  जयपाल
  जयपूर
  जयपुर जमीनदारी
  जयपुर संस्थान
  जयमल्ल
  जयरथ शृंगार
  जयरामस्वामी
  जयरामात्मज
  जयविजय
  जयसिंह
  जर उतणें
  जरतार
  जरत्कारु
  जरदाळू
  जरा
  जरासंघ
  जरीपटका
  जर्मन सिल्व्हर
  जर्मनी
  जलंगी
  जलजन्य विद्युतशक्ति
  जलघा
  जलपैगुरी

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .