विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
जयरामस्वामी - (वडगांवकर) एक महाराष्ट्र संतकवि. हा कात्राबाज मांडवगणाच्या देशपांडे कुळांतला असून याचें उपनांव कसरे असें होतें. जन्मतीथ शके १५२१ ची गोकुळाष्टमी. कृष्णा आप्पास्वामी याचे गुरु होते. दशमस्कंध टीका, रुक्मिणीस्वयंवर, सीतास्वयंवर व अपरोक्षानुभव हे जयरामस्वामीचे मुख्य ग्रंथ होत. यांखेरीज लहान लहान वेदांतप्रकरणें, अभंग व पदें पुष्कळ आहेत. समाधिकाळ भाद्रपद व॥११ शके १५९४.