प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग तेरावा : घ - जलपैगुरी

जयपुर संस्थान - हें संस्थान राजपुतान्यांत (शेखावती धरून) उ.अ. २५४०'' ते २७४०'' व पू.रे. ७५८'' ते ७७२०'' यांच्याप्रमाणें आहे. याच्या उत्तरेस बिकानेर व हिसार, पूर्वेस अलवार व भरतपुर, दक्षिणेस केरोली, ग्वाल्हेर, नुन्दी, मेवाड, अजमेर, पश्चिमेस किशनगड, बिकानेर हीं संस्थानें आहेत. या संस्थानचें क्षेत्रफळ १५५७९ चौ.मै. व लोकसंख्या २३३८८०२ आहे. खुद्द जयपुर शहारची लो.सं. (स. १९२१) १,२०२०७ आहे. आणि एकंदर उत्पन्न ६५ लक्ष असून संस्थानांत दहा जिल्हे व ३८ शहरें आहेत. प्रजेंत शेंकडा ९० वैष्णवपंथी आहेत. खर्च ५९ लाख आहे.

संस्थानचा सपाट मध्यभाग समुद्रसपाटीपासून १४०० ते १६०० फूट उंचीवर आहे. हा भाग व सांबर सरोवर यांच्यामध्यें तूरवती व खेत्री नांवाचे डोंगर आहेत. ह्यांची जास्तींत जास्त उंची २ हजार फूट आहे. रघुनाथगड हें शिखर सर्वांत उंच (३४५० फूट) आहे. डोंगराजवळ पाणी नजीक लागतें. डोंगरापासून दूरच्या भागांत पाणी खोलखोल लागतें. डोंगरामधील वाळूचीं मैदानें तापतात तेव्हां व वारे सुटून वाळू उडते, तेव्हां शेजारच्या वस्तीस व प्रवाश्यांनां फार त्रास सोसावा लागतो. संस्थानांत जयपुरी, बाग्री व डांगीया भाषा आहेत. बनास नदी ही या राज्यांतील मोठी नदी असून ती पुढें चंबळनदीस मिळते. हिच्या कांठीं रणथंबोर व कंदाहार हे किल्ले आहेत. हे पूर्वी अजिंक्य समजले जात. बाणगंगा म्हणून दुसरी एक नदी असून बाकी लहान लहान ओढे आहेत. सांबर तळें हें प्रख्यात तळें आहे. संस्थानचा पूर्वेकडील प्रदेश सखल असून हवा उत्तम आहे. दलदल नसल्यामुळें मलेरियासारखे रोग होत नाहींत. थंडी कडक पडते व पाऊस सालिना २२ ते २८ इंचांपर्यंत पडतो. कापूस तंबाखू, अफू, गहूं वगैरे पिकें मुख्य आहेत. संस्थानांत जाती पुष्कळ असून त्यांतील ब्राह्मण, जाट व मीना हे शेतकी व नोकरी करतात.

शेखावती व जयपुर प्रांतांत मका, कापूस, तीळ, बाजरी, ज्वारी, मठ, मूग पिकतो. इकडे एक प्रकारचीं झाडें आहेत, त्याचीं फुलें माणसें खातात व पानें वगैरे उंट खातात. इकडील नांगरटी उंटाकडून करवितात. फळांपैकीं कलिंगडें बरींच होतात. या प्रांतांत रामगड, लक्ष्मणगड, फत्तेपुर हीं मोठी गांवें आहेत. रेताड जमीनींत सातु व गहूं होतो. सांबर सरोवरांतील मिठाचें उत्पन्न बरेंच होतें. दरसाल जवळ जवळ ३४ हजार टन मीठ निघून त्याची किंमत ४ लक्ष रु. पर्यंत होते. शिवाय कोबाल्ट, निकल, तांबें, लोखंड यांच्याहि खाणी संस्थानांत आहेत. राजमहालजवळ चुनडी नांवाचें रत्‍न सांपडतें. संस्थानांतील कांहीं लोक लढाऊ असल्यानें लष्करांतील घोडदळांत त्यांची बरीच भरती होते. मीना जातीचे लोक लुटारुपणा करतात.

संस्थानांत लहान लहान जहागिरदार, सरदार व जमीनदार बरेच आहेत. त्या सर्वांचें उत्पन्न धरून एकंदर जयपुरसंस्थानच्या जमाबंदीचा आंकडा १ कोटी ७ लक्ष आहे. संस्थानची तीन पंचमांश जमीन अशा लोकांनां इनाम असून दोन पंचमांश तेवढी संस्थानच्या खास मालकीची आहे.

जहागिरदार लोक फक्त खंडणी देतात. संस्थानची चाकरी करीत नाहींत. यांनां मिळालेलें इनाम दिल्लीच्या बादशहाच्या वेळचें आहे. सीकूर (लो.सं. ४ लक्ष), खेत्री (लो.सं. २॥ लक्ष), ऊनिअरा (लो.सं. १॥ लाख) वगैरे जहागिरदार हे फार प्राचीन आहेत. जयपुरचें राज्य स्थापन होण्यापूर्वीची कांहीं संस्थानें अशा प्रकारचीं आहेत. हे सर्व जहागिरदार मिळून संस्थानास ३॥ लाख खंडणी भरतात. यांचें उत्पन्न १५ लक्षांचें आहे. संस्थानची नौकरी करणारे जे जहागिरदार आहेत, त्यांनां शेतसारा माफ असतो. असल्या जहागिरदारांचें उत्पन्न २८ लाख आहे. देवस्थान व धर्मिक इनामहि जवळ जवळ २८ लाखांचें आहे.

शिपाईखातें नांवाचें एक उत्पन्नाचें खातें आहे. चोरांनां झालेला दंड, चोरीचा बिनवारसी माल विकून त्यापासून मिळणारें उत्पन्न वगैरे बाबींचा यांत समावेश होतो. सरळ वारसदारास जमीनीच्या ताब्याबद्दल नजर द्यावी लागत नाहीं. मात्र तेवढ्या वारसदारास (उत्पन्नच्या) शेंकडा ८ टक्के रक्कम नजराणा म्हणून द्यावी लागते. संस्थानांत लोकरी कपडा, बारीक सूत, कापड, चिटें, संगमरवरी दगडी जिन्नस, कांचेचीं मिना केलेलीं भांडीं तयार होतात. सोन्यावर मिना काम करण्यांत जयपूर प्रसिद्ध आहे. संस्थानांत राजपुताना माळवा ही रेल्वे मुख्य आहे. संस्थानचें मुख्य दोन भाग केले आहेत. त्यांस पूर्व व पश्चिम दिवाणी म्हणतात. त्यांचा मुख्य दिवाण असतो. दिवाणीचे दहा भाग निझामत नांवाचे असून त्यांवर नाझीम हा अधिकारी असतो. प्रत्येक नीझामचे एकतीस तहशील आहेत. त्यावर तहशीलदार असतो. त्यास मुनसफाचेहि अधिकार असतात. अखेरचें अपील संस्थानच्या मुख्य (दहा मंत्र्यांच्या) कौन्सिलाकडे असतें. कौन्सिलचे अध्यक्ष महाराज असतात. शेतसारा उत्पन्नाच्या (धान्य वगैरे) अगर नक्तरुपांत भरतां येतो.

शिक्षण, चार भाषांचें (हिंदी, ऊर्दु, फारशी व इंग्रजी) मिळतें व त्यावर बराच खर्च होतो. स. १८६८ पूर्वी संस्थानांत (संस्थानचें व जहागिरदारांचें मिळून) घोडदळ पायदळ व किल्यांवरील शिबंद्दी मिळून एकंदर १६॥ हजार सैन्य होतें. सैन्यांत नाग नांवाचे लोक बरेंच असत. हे विश्वासू असतात. त्यांनां त्यावेळीं दरमहा २ रु. पगार मिळे. सत्तावनसालच्या बंडांत ते राजाशी इमानानें वागले. थोड्या खर्चांत पुष्कळ उपयोगी पडणारे हे लोक आहेत. जहागिरदार, ठाकूर वगैरे लोक त्यांच्या जयपुर संस्थानाशीं असलेल्या कराराप्रमाणें जयपुरकरास फौज पुरवितात. साधारण ५०० ते ७०० रु. उत्पन्नावर एक घोडेस्वार असें हें प्रमाण पडतें. संस्थानांत तीन कॉलेजें व इतर शिक्षणसंस्था ८०० पर्यंत असून शिक्षितांचें प्रमाण शेंकडा ३ पडतें. मात्र शिक्षण मोफत आहे.

जयपुरच्या घराण्यास धुंदरचे घराणेंहि म्हणतात. हल्लीच्या जयपुरशहराच्या दक्षिणेकडील भागास पूर्वी धूंदर हें नांव होतें. जयपुरघराण्यास दत्तक घेणें झाल्यास झेल्ली, चंदेलज्, सिंघोटो धोलिओ या घराण्यांतील दत्तक घ्यावा लागतो. रजपुत लकांत असा एक प्रघात आहे कीं, घराण्यांतील कनिष्ट शाखेकडे जर गादी चालू असेल, तर वडील शाखेचा वारसा गादीवर पुढें सुरु होत नाहीं. एवढेंच नव्हे तर वडील शाखेतील मूल दत्तक म्हणूनहि (धाकट्या शाखेंत) घेतां येत नाहीं. असलें उदाहरण जयपुरच्या राजघराण्यांत घडलेलें आहे. या घराण्यांतील मूळ पुरुषानें प्रथम शोणनदीच्या कांठच्या रोहटस गांवीं गादी स्थापिली व मग पुढें तिसर्‍या शतकांत ग्वाल्हेर नखरकडे हें घराणें आलें. येथें हें घराणें ८०० वर्षें राज्य करीत होतें; व बहुधां तें कनोजचे मांडलिक असे. वज्रदमन नावाचा राजा स्वतंत्र झाला व त्यानें ग्वाल्हेर शहर घेतलें पुढें एका दुल्हारायनें ग्वाल्हेर राजधानी मोडून दवोसा ही (आपल्या सासर्‍याची) राजधानी कायम केली. तेव्हांपासून हें घराणें राजपुतान्यांत आलें. दवोसा ज्या प्रांतांत होतें त्यास धुंदर प्रांत म्हणत.

इतिहास - जयपुरला अंबरचें अथवा धुंदरचें राज्य असें रजपुर लोक म्हणतात. हें सं. ९५७ त धोल राजानें स्थापिलें. श्रीरामपुत्र कुश, त्याचा वंशज नलराजा (यानें नरवाड-नरवर शहर स्थापिलें), त्याच्यापासून धोलराय हा ३४ वा वंशज होता असें सांगतात. जयपुरकरांनां (कुशवह) कच्छवाह कुळीचें म्हणतात. धोलरायाबद्दल पुष्कळ दंतकथा आहेत. त्यानें अजमेरराजकन्येशीं लग्न लावून दिल्लीच्या हिंदुराजाच्या साम्राज्याखालीं जयपुराकडील मीना लोक जिंकून तेथें राज्य स्थापिलें (९६७); पुढें धोल हा रणांत मेला. त्याचा पुत्र कुंकल; त्याचा मैदुल (१०३७); त्याचा हूण; त्याचा कुंतल ऊर्फ जनदेव, यानें पुष्कळसे मीना लोक जिंकून राज्य वाढविलें. कंकल व मैदुल यांनींहि मीना लोकांनां पुष्कळ सवलती दिल्या होत्या.

कुंतलामागून पुजून राजा झाला; हा फार शूर होता; याची राणी दिल्लीच्या पृथ्वीराज चव्हाणाची बहिण होय. पृथ्वीराजास याचें सहाय्य असें. संयोगिताहरणांत हा प्रमुख होता. मुसुलमानांवर यानें दोनदां जय मिळवून शिवाय उद्दीनला पिटाळून लाविलें. चंदेल्लांचें महोबा यानें काबीज केलें होतें. हा ठाणेश्वरच्या युध्दांत (पृथ्वीराजाबरोबर) ठार झाला. त्याच्यानंतर मालेसी, विजूल, राजदेव, कितुला, कोंतुल, जुन्सी, उदयकर्ण, नरसिंग (यानें अमृतसर प्रांत व शहर काबीज केलें), बनवीर ऊर्फ शेखजी (यानें सर्व शेखावत रजपुतांचें एकीकरण केलें. याच्या वंशाच्या ५ शाखा झाल्या) उद्धरण, चंद्रसेन व पृथ्वीराज हे राजे झाले.

पृथ्वीराजापर्यंत विशेष कांहीं घडल्याचें आढळत नाहीं. त्याला १७ मुलें होतीं. पैकीं १२ जणांनां १२ महाल वांटून दिले. तेव्हांपासून कच्छवाहांच्या १२ कोठड्या (घराणी) झाल्या. तो यात्रेस जात असतां त्याच्या भीमजी नांवाच्या मुलानें त्याचा खून केला. नंतर बहारमल्ल राजा झाला. यानेंच प्रथम मुसुलमानांची (बाबरची) अधिसत्ता कबूल केली. याला अंबरचा राजा ही पदवी व पंचहजारी हुमायूननें दिली. याचा पुत्र भगवानदास याची बहिण अकबरास व मुलगी जहांगिरास दिली होती. तिच्याच पोटीं खुश्रू झाला. रजप्रुत राजांनीं आपल्या कन्या मुसुलमानांस दिल्याचें प्रथम उदाहरण याच घराण्यानें (बहारमल्ल व भगवान) घालून दिलें. भगवान निपुत्रिक असल्यानें त्याचा पुतण्या मानसिंग हा राजा झाला. भगवान हा अकबराचा मित्र होता. मानसिंग हा मोंगली दरबारांत प्रख्यातीस आला; अकबर त्याला फार मान देई. हा त्याचा सेनापति असून यानेंच त्याच्या राज्याचा (खोतान, काबूल, आसाम, ओरिसा, बंगाल, बहार वगैरे देश जिंकून) विस्तार केला. बंगाल, बहार, दख्खन व काबूल येथील सुभेदार्‍या यानें केल्या. पुढें यानं खुश्रु यास गादी मिळावी म्हणून मसलती केल्या त्यामुळें तो संकटांत सांपडला; परंतु त्याला उघड शिक्षा करतां येईना; कारण तो फार बलाढ्य होता पुढें बंगालच्या सुभेदारांवर असतांनां तो वारला (१६१५). त्याच्या मागून त्याचा पुत्र भावसिंग उर्फ जगत्सिंग व नातु महासिंग हे राजे झाले (१६२०). त्यानंतर मानसिंगाचा पुतण्या जयसिंग याला गादी देण्याबद्दल, जहांगिराजवळ जयपुरराजकन्या जोधाबाई हिनें रदबदली केली व तो राजा झाला. हा पहिल्यानें दाराच्या बाजूचा होता पुढें आयत्यावेळीं त्याला फसवून तो औरंगझेबास मिळाला. याला मिर्झा राजा म्हणत (मिर्झा हा किताब फक्त राजपुत्रास लावीत असत). औरंगझेबासाठीं त्यानें पुष्कळ मेहनत घेऊन त्याचें राज्य वाढविलें व औरंगझेबानेंहि त्याला बरीच बढती (सहा हजारी मनसब) दिली. शिवछत्रपतीचा पराभव करण्यासाठीं इतर सर्व सरदार थकल्यानें यालाच पाठविण्यांत आलें होतें. आग्रह्याहून निसटण्याच्या शिवाजींच्या मसलतींत याचें अंग असावें, असा औरंगझेबास संशय आल्यानें त्याची याच्यावर गैरमर्जी झाली व त्यानें याला विषारी पोषाख पाठवून ( व कोणाच्या मतें याचा धाकटा मुलगा करितसिंग याला राज्याची आशा दाखवून त्याच्याकडून विषप्रयोग करवून) याचा प्राण बग्हाणपूर येथें घेतला. कीरतींसगास (वरी कामगिरीबद्दल) औरंगझेबानें फक्त एकच महाल दिला. शिवाजीनें जयसिंगहास औरंगझेबाविरुद्ध सर्व राजपुतांनां उठवून हिंदूधर्म राखण्याबद्दल परोपरीनें सांगितलें होतें; परंतु त्याचा कांहीं उपयोग झाला नाहीं. याच्यानंतर त्याचा पुत्र रामसिंग व त्याच्यामागून बिशनसिंग राजा झाला. यांच्या वेळीं कांहीं विशेष घडलें नाहीं.

सवाई जयसिंग हा फार विद्वान, शूर व हिंदूधर्माभिमानी होता. हा १६९९ त राजा झाला. त्यानें प्रथम दख्खनमध्यें औरंगझेबाची चाकरी केली. औरंगझेबानंतर बेदरबख्तास हा मिळाला. बेदरबख्त हा धोलपुरास १९०७ मध्यें लढाईंत मेल्यावर बहादुरशहा गादीवर आला त्यानें याचें राज्य जप्‍त करून त्यावर एक सुभेदार नेमला. परंतु यानें त्याचा पराभव करून राज्य सोडविलें आणि उदेपूर व जोधपूर यांच्याशीं मुसुलमानांविरुद्ध मैत्रीचा तह केला. हा कलाकौशल्य व शास्त्रें यांत (विशेषतः गणित व ज्योतिषांत) निष्णात होता. त्यानें स्वतः ग्रहांचीं कोष्टकें तयार केलीं. त्यावरून हल्ली पंचांगें तयार होतात. युक्किडचीं मूलतत्त्वें व नेपीयरचें लागर्तम यांचीं त्यानें संस्कृतांत भाषांतरें केलीं. त्यानें अंबरहून राजधानी हलवून जयपूर वसवून तेथें नेली (१७२८). हें शहर सार्‍या हिंदुस्थानांत पहिल्या प्रतीचें, एकाच नमुन्यावर सोंगटीच्या पटाप्रमाणें बांधलेलें असें आहे. तो शिल्पशास्त्राहि होता. त्यानें दिल्ली, जयपूर, काशी, मथुरा, उज्जनी वगैरे ठिकाणीं वेधशाळा बांधून स्वकल्पनेनें यंत्रें तयार करुन तीं तेथें ठेवलीं व वेध घेतले. हे वेध त्यावेळीं अगदीं बरोबर उतरत. या सर्व वेधांची माहिती एकत्र करून त्यानें १७२८ त ग्रहांच्या सारण्या (झैज महंमदशाही नांवाच्या ग्रंथांत) तयार केल्या. लोकोपयोगी कृत्यें त्यानें पुष्कळ केलीं (धर्मशाला वगैरे). महंमदशहानेंच साम्राज्यांतील सर्व पंचांगांचें शुद्धिकरण त्याच्याकडे सरकारीरीत्या सोंपावलें होतें. वेधशाळेंतील धातूंचीं यंत्रें झिजतात म्हणून त्यानें पाषाणाचीं व चुन्याचीं केलीं. जयप्रकाश, यंत्रसम्राट, भित्तांयंत्र, वृत्तषष्ठांश इ.इ. नवीं यंत्रें त्यानें स्वतः तयार केलीं. सिध्दांतसम्राट नांवाचा एक संस्कृत ग्रंथ तयार केला. यावेळीं (१७३१) यूरोपांत ग्रहगतीचे जे सूक्ष्म वेध घेत असत त्याहिपेक्षां यानें जास्त सूक्ष्म वेध घेतले होते. सिध्दांत समुद्रांत वर्षभान सायन आहे. नयनसुखोपाध्याय याच्याकडून यानें कटर नांवाचा एक ग्रंथ (मूळच्या यूनानी भाषेंतून)  भाषांतरीत करविला. सर्वत्र लढायावा धुमाकूळ चालू असतां त्यानें आपलें राज्य वाढवून व जतन करुन शेजारच्या सर्व राज्यांत उच्चतेस चढविलें. औरंगजेबाच्यानंतर दुर्बल राजे याला बराच मान देत असत. महंमदशहानें याला आग्रा व नंतर माळवा येथील सुभेदार्‍या दिल्या (१७२०-२२). औरंगझेबानें बसविलेला जझिया यानें यावेळीं उठवून जाटांचा बंदोबस्त केला. हा माळव्यावर पुनः (१७३२) सुभेदार नेमून आला. तेव्हां मोंगली राज्यांत सारी अव्यवस्था झाली होती; ती पाहून व सर्व हिंदूंनीं मुसुलमानांविरुद्ध एकवटून हिंदूपदपातशाही स्थापन करावी या अंतस्थ हेतूनें त्यानें (बाह्यतः मराठ्यांविरुद्ध लढून निभावणूक होणार नाहीं. म्हणून महंमदशहाची समजूत घालून त्याच्या अनुज्त्रेनें) थोरल्या बाजीरावाशीं तह करुन मराठ्यांच्या साम्राज्याकांक्षेस वाव करुन दिला. त्यानेंच १७३४ त माळवा मराठ्यांच्या हवालीं (पातशहाकडून) करविला. तो असें न करतां तर मराठ्यांची धाड खुद्द दिल्लीवर जाती. याप्रमाणें धोरणानें व शहाणपणानें यानें ४० वर्षें राज्य करुन तो १७३४ त वारला. टॉड म्हणतो कीं जयसिंगाबरोबर शास्त्रांचा लय झाला.

नंतर याच्या इसरीसिंग व माधवसिंग या दोन पुत्रांत तंटे लागून माधवसिंग यानें होळकरांच्या साह्यानें (होळकरांस रामपुरा, भानपुरा व टोंकरामपुरा हें प्रांत आणि ८४ लक्ष रुपये खंडणी देऊन) गादी मिळविली. तो उदेपुर राजकन्येचा पुत्र असल्यानें उदेपुरकरानेंहि त्यास मदत दिली होती. त्यानें जाटांवर स्वार्‍या करुन त्यांचा पराभव केला. मात्र या लढायांत त्याचे कर्ते सरदार मारले गेले. शेवटीं तोहि थोड्याच दिवसांत वारला. बापाच्या खालोखाल हाहि विद्वान व विद्वानांचा आश्रयदाता होता; यानेंहि कांहीं नवीन शहरें वसविलीं; त्यांत रणथंबोर जवळील मधुपुर हें प्रमुख होय; यानें १७ वर्षे राज्य केलें. त्याच्यामागून दुसरा पृथ्वीसिंग गादीवर आला; परंतु हा अज्ञान असल्यामुळें त्याची सावत्र आई कारभार पाहत होती. ती फार वाईट चालीची असून तिचा एक उपपति (टॉड; पु. २ पृ. ४१२) फिरोझ नांवाचा माहुत होता; त्याच्या तंत्रानें ती वागे; तिनें नऊ वर्षें बदफैलीपणा केला. शेवटीं पृथ्वीसिंग हा वारला (कोणी म्हणतात तिनें विषप्रयोग केला). त्याला मानसिंग म्हणून पुत्र होता. त्याला त्याच्या आत्यांनीं पळवून शिंद्यांच्या आश्रयास ठेविलें.

पृथ्वीनंतर त्याचा सावत्र भाऊ प्रताप हा राजा झाला. त्यानें १५ वर्षें राज्य केलें. याच्या वेळीं याची जारिणी आई व तो माहुत यांनां कोणी विषप्रयोग करुन त्यांच्या त्रासांतून रयतेस सोडविलें. इतक्यांत मराठ्यांचें हल्ले सुरू झाले. तेव्हां यानें जोधपुरच्या विजयसिंगाच्या मदतीनें मराठ्यांशीं तोंड देऊन त्यांनां कांहीं काळ थोपविलें. (१८८७-९१); पण पुढें मराठ्यांनी १७९१ त त्याचा पाटण व मैर्त्य येथें पराभव केला व तिकडे याचें व जोधपुरकरांचेंहि बिनसलें. तेव्हां होळकरानें त्याच्यावर जबर खंडणी बसवून कांहीं दिवसांनीं ती वसूल करण्याचें काम अमीरखान पठाणावर सोंपविलें. तेव्हांपासून १८०३ पर्यंत केव्हां शिंदें तर केव्हां दुसरा कोणी येऊन याचा प्रांत लुटून फस्त करीत. हा शूर व शहाणाहि होता. परंतु त्याचा या धामधुमीच्या काळीं कांहीं इलाज चालला नाहीं. तो १८०३ त वारला.

याच्यापागून त्याचा पुत्र जगात्सिंग गादीवर आला. याच्या सारखा दुर्व्यसनी राजा या कुळांत कोणी झाला नाहीं. हा भित्रा, व्याभिचारी व उधळ्या होता. उदेपुरच्या कृष्णाकुमारीला मिळविण्याकरितां यानें अमीरखानाची योजना करुन सर्व राजपुतान्यांत धुमाकूळ उडवून दिला होता. इंग्रजांचा संबंध जयपूर राज्याशीं याच्याच वेळीं आला; परस्परांनीं परस्परांस सहाय्या करावें अशा स्वरुपाचा एक तह यावेळी झाला (१८०३). पुढें कॉर्नवालीस यानें हा तह केला व इंग्रजांचें वर्तन हवें तसें न दिसल्यानें जगत्सिंगानेंहि तह मोडला. परंतु कंपनीच्या डायरेक्टरांस कॉर्नवालीसचें हें करणें पसंत न पडून पूर्ववत् तह करण्याचा त्यांनीं हुकूम सोडला. तेव्हां पेंढार्‍यांच्या पारिपायासाठीं सर्व राजेरजवाड्यांशी तहाचे प्रकरण सुरू झाले त्यावेळी (१८१७) जयपुरवाल्यांशी बोलणें लागलें; परंतु राजानें तें नाकारलें. शेवटीं शेजारच्या राजांनीं इंग्रजांशीं स्वतंत्र तह केले, राज्यास निरनिराळ्या अडचणी येऊं लागल्या व अमीरखानाचा उपसर्ग जास्त वाढूं लागला. स्वतःच्या जहागिरदारांनींहि परभारें इंग्रजांशीं संधान बांधलें हें पाहून, जगतनें कंपनीशीं तह केला (२।४।१८१८). त्यांत असें ठरलें कीं, इंग्रजानें राज्याचें रक्षण करावें, त्याबद्दल राजानें कंपनीच्या मदतीस फौज द्यावी. राज्याचा वसूल ४० लक्ष होईपर्यत दरसाल ८ लाख खंडणी द्यावी, व ४० लाखांवर वसूल आला, म्हणजे एकंदर उत्पन्नपैकीं पांच आणे (सदर खंडणीशिवाय) वर्षास द्यावे. या सुमारास जयपुरच्या कांहीं सरदार जहागिरदारांनीं राज्यांतील बराचसा मुलूख बळकाविला होता. तो ऑक्टरलोनी यानें त्यांची समजूत करुन सोडविला; व त्यांच्या जहागिरी वशंपरंपरा चालण्याबद्दल कंपनी जबाबदार राहिली. यानंतर जगात्सिंग हा लवकरच (डिसेंबर १८१८) वारला. त्याला त्यावेळीं संतती नव्हती. प्रेताला अग्निसंस्कार एका मोहनसिंग नांवाच्या भाऊबंदानें दिला. पुढें त्यालाच दत्तक घेण्याचें ठरत होतें; पण त्यामुळें गृहकलह माजला. इतक्यांत एक राणी गरोदर असल्याचें समजलें व त्यामुळें दत्तकाची भानगड मिटली. जगात्सिंगाची ही राणी २५।४।१८१९ रोजीं प्रसूत होऊन मुलगा झाला; याचें नांव जयसिंग होय.

जयसिंग (तिसरा) लहान असतां, त्याची आई कारभार पाहूं लागली; परंतु त्यामुळें अव्यवस्था माजली. तेव्हां आपली खंडणी वेळेवर यावी व नुकसान होऊं नये म्हणून कंपनीनें आपला एक अधिकारी जयपुरास नेमून त्यानें राज्यकारभार ताब्यांत घ्यावा असें ठरविलें. पुढें (१८३४-३५) शेखावती प्रांताची व्यवस्था लावण्याच्या निमित्तानें इंग्रजांनीं आपली फौज तेथें ठेविली व तिच्या खर्चाचा पैसा म्हणून सांबरसरोवराच्या उत्पन्नांतील जयपुरचा हिस्सा तारण लावून घेतला. या गडबडींत जयसिंग वारला (१८३५). राजाचा कोणी जीव घेतला असावा असें म्हणतात. जोध (जूठा) राम नांवाचा दिवाण व राजमाता यांचें सूत्र जमून, तिच्या कृपेनें तो इतका अधिकार चालवूं लागला की, ब्रिटिश सरकारनें नेमलेल्या कारभार्‍यास दूर करून आपण त्या पदावर बसला. तेव्हां कंपनीनें एक अधिकारी चौकशीस पाठविला. जयसिंग वारला तेव्हां त्याला दीड वर्षाचा एक मुलगा होता. तो कंपनीच्या अधिकार्‍यानें ताब्यांत घेतला. यावेळीं एजंट (अधिकारी) याचा खून करण्याचा कट जोधरामानें केला; तेव्हां त्याला जन्मभर कैदेंत टाकण्यांत आलें. राज्यांतील पांच प्रमुख लोक निवडून त्यांचें कौन्सिल  (व त्यांचा मुख्य इंग्रजांचा एजंट) नेमून राज्यकारभार चालविला. याचवेळीं संस्थानांतील लष्कर कमी करुन, गुलामगिरी, सती, बालहत्या वगैरे बंद केल्या. इंग्रजसरकारास जी खंडणी द्यावी लागे, ती संस्थानच्या जमाबंदीच्या मानानें जबर असल्यानें व मागील बाकी तुंबली म्हणून ४६ लाखांची सूट घालून दरसाल चार लक्षांची खंडणी ठरविली (१८४२).

जयसिंगाच्या मागून सवाई रामसिंग हा गादीवर बसला. यानें १८५७ सालीं इंग्रजांस सात हजार सैन्यानिशीं मदत केल्यामुळें त्यांनीं त्यास कोट कासिम प्रांत इनाम दिला. हा विद्वान होता. यानें सडका व आगगाड्या सुरु करुन संस्थानांत सर्वत्र शाळा स्थापिल्या. एकदां (१८६८) राजपुतान्यांत दुष्काळ पडला असतां यानें आयात धान्यावरील जकात उठविली व दुष्काळनिवारणाचे पुष्कळ प्रयत्‍न केले. हा सन १८६९-१८७५ पर्यंत हिंदुस्थान सरकारच्या कायदेकौन्सिलचा सभासद होता.

याच्यानंतर सवाई माधवसिंग हे राजे झाले (१८८०). यांचा जन्म १८६१ त झाला. यांच्या लहानपणीं कौन्सिलतर्फें राज्यकारभार चालत होता. यानां १८८२ त मुखत्यारी दिली. यानां २१ तोफांच्या सलामीचा मान व जी.सी.एस.आय.जी.सी.व्ही.ओ; एल.एल.डी. वगैरे पदव्या असून, हे १९२१ सालीं ब्रिटिश सैन्यांतल्या जनरलच्या अधिकारावर नेमले गेले. यांनीं राज्यकारभारासाठीं १० जणांचें एक कौन्सिल नेमलेलें आहे. हल्ली ६ हजारांपर्यंत सैन्य संस्थानांत आहे. येथील सैन्यानें चित्रळ (१८९५), टिरा (१८९७) व गेलें यूरोपांतील महायुद्ध, यावेळीं इंग्रजसरकारांस पुष्कळ सहाय्य केलें. महाराजानीं दुष्काळफंड २५ लाख व इतर धार्मिकफंड ४८ लाख व महायुध्दांत इंग्रजसरकारास मदत म्हणून ३३ लाख इतकी रक्कम वांटली आहे. (शिवाय २५ लाखांचे कर्जरोखे घेतले होते.) या महाराजांनी स. १९२१ मध्यें कुमार मानसिंह यास दत्तक घेतलें. महाराजानीं आपल्या राज्यांत सडका, पाटबंधारे, आगगाड्या, दवाखाने, दुष्काळ कामें वगैरे कामांवर १ कोटी ७२ लाख रु. खर्च केले. व स. १९११ त प्रजेला ५० लक्ष रु. ची (सार्‍याची) सूट दिली. (टॉड-राज्सथान, पु. २; एतद्देशीय राजांचा इतिहास, गोडबोलेकृत; इंडिया गव्हर्मेंट सिलेक्शन रिपार्ट्स पु. ५५; इंडियन इथरबुक १९२२.

शहर - हें शहर जयपुर संस्थानाची राजधानी असून मुंबईपासून ६९९ मैल दूर आहे. हें सर्वराजपुतान्यांत मोठें व सुंदर आहे. ह्या शहराला हें नांव सवाई जयसिंगाच्या नांवावरून १७२८ सालीं मिळालें. हें शहर एका लहान मैदानावर आहे व भोंवताली (दक्षिण दिशेखेरीज) पर्वत असून महत्त्वाच्या मार्‍यांच्या ठिकाणीं किल्ले बांधलेले आहेत. ह्या सर्व किल्ल्यांत ताहरगड नांवाचा किल्ला महत्त्वाचा आहे व तो वायव्य दिशेस आहे शहराभोंवतीं मोठा तट असून त्याला सात वेशी आहेत व ठिकठिकाणीं तोफाकरितां बुरुज बेंधलेलें आहेत. हें शहर सुंदर रस्ते व इमारती यांबद्दल फार प्रसिद्ध आहे. येथील रस्ते सारख्या आकाराचें असून ठिकठिकाणी चौक आहेत. शहराच्या मध्यभागीं महाराजांचा राजवाडा आहे व वाड्याभोंवतालीं सुंदर बागबगीचे आहेत. राजवाड्याच्या उत्तरेस ताल काबोरा नांवाचा तलाव व ह्या तलावाच्या पलीकडे राजा मालका नांवाचा दुसरा तलाव आहे. ह्या शहरांत विशेष पहाण्यासारखी इमारत म्हटली म्हणजे सवाई-जयसिंगानें बांधलेली वेधशाळा व येथील वेधयंत्रे होत. शहरास पाण्याचा पुरवठा चांगला आहे. शहरास म्युनिसिपालिटी आहे. ह्या शहरांतल्या कला व उद्योगधंदे म्हटले म्हणजे कपड्यांस रंग देणें, संगमरवरी दगडावर काम करणें, सोन्याच्या मुलाम्याचें काम करणें, चित्रें काढणें वगैरे, ह्या शहराची व्यापारी पेढ्यांबद्दल ख्याती आहे. शहरांत शिक्षणसंस्था पुष्कळ आहेत. महाराजा कॉलेज, ओरिएन्टल कॉलेज व संस्कृत कॉलेज हीं तीन कॉलेजें आहेत. शहरांत दवाखाने व इस्पितळें पुष्कळ आहेत. रामनिवास नांवाच्या सार्वजनिक उद्यानामध्यें हाल नांवाची इमारत आहे; व तीमध्यें औद्योगिक वस्तूंचें व शिक्षणविषयक नमुन्याचें पदार्थसंग्रहालय आहे.

   

खंड १३ : घ - जलपैगुरी  

 

 

 

  घंटय्याकवि
  घटोत्कच
  घटोत्कच लेणीं
  घड्याळ
  घनी
  घनौर
  घांट
  घाटगे
  घाटाळ
  घातमपूर
  घानची
  घायपात
  घारगड किल्ला
  घारघोडा
  घारापुरी
  घाशीराम कोतवाल
  घांसदाणा
  घासी
  घिरथ
  घिसाडी
  घुगुस
  घुंड
  घुबड
  घुराम
  घेरिया
  घेवडा
  घोटकी
  घोडबंदर
  घोडा
  घोडाघांट
  घोडाबारी
  घोडासर
  घोडें
  घोडेघांस
  घोरपड
  घोरपडी
  घोरपडे
  घोरी घराणें
  घोशी
  घोसाळे
  घोसी
  घोळ
 
 
  चउमू
  चकमा
  चकला रोषनाबाद
  चकवाल
  चकिया
  चक्कियर
  चक्कीनोआरो
  चक्रपाणि
  चक्रवर्ती
  चक्राप्पा
  चंगनाचेरी
  चंगर
  चच, चचनामा
  चचान
  चटया
  चडार
  चंडी
  चतुरमहाल
  चतुर साबाजी
  चतुरसिंग
  चतुर्थ
  चत्रा
  चॅथॅम
  चंदगड
  चंद घराणे
  चंदन
  चंदभाट
  चंदरभान
  चंदावरकर, नारायण गणेश
  चंदासाहेब
  चंदीपुर
  चंदेरी
  चंदेल्ल
  चंदौली
  चंदौसी
  चंद्र
  चंद्रकोना
  चंद्रगिरी
  चंद्रगुप्त
  चंद्रगोमिन्
  चंद्रनगर
  चंद्रभागा
  चंद्रहास
  चंद्रावती अथवा चंद्रावली
  चन्नगिरी
  चन्नपट्टण
  चन्नबसव
  चन्नरायपट्टण
  चंपा
  चंपानेर
  चपारण
  चंपावत
  चंपाषष्ठी
  चंबळा नदी
  चबा संस्थान
  चमारडी
  चरक
  चरखा
  चरखारी
  चरणदासी
  चरणव्यूह
  चरबी
  चरबीचें झाड
  चरी
  चर्मण्वती
  चलत-चित्रें
  चलन
  चल्लाकेरे
  चवळी
  चहा
  चक्षुर्मंनु
  चाकण
  चाकवत
  चागई
  चांगदेव
  चांगभकार
  चांगा केशवदास
  चाघताइखान
  चांचेगिरी
  चाचो
  चांडोद
  चाणक्य
  चातुर्मास्य
  चातुर्मास्य याग
  चातुर्वर्ण्य
  चात्सु
  चादचा
  चांदपूर
  चांदबिबी
  चांदभाट
  चांदला
  चांदवड
  चांदा
  चांदूर
  चांदूर बाजार
  चांद्रायण
  चानन शानन
  चानस्मा
  चानाल
  चानोड
  चाप्रा
  चाफळ
  चाबुआ
  चांभार
  चाम
  चामखीळ
  चामन
  चामराजनगर
  चामुंड
  चामुर्शी
  चार
  चारखा
  चारण
  चारदुआरं
  चारसद
  चारा
  चारीकार
  चार्टिझम
  चार्लंमांट, अर्ल ऑफ
  चार्वाक
  चालुक्य घराणें
  चालसिस
  चावडा
  चावंद
  चास-कमान
  चॉसर
  चासा
  चाहमान उर्फ चौहान
  चाळिसगांव
  चिक
  चिकंजी
  चिकबळ्ळापूर
  चिकाकोल
  चिकोडी
  चिक्कणर्ति
  चिक्केरूर
  चिक्टीआबर
  चिक्नायकन्हळ्ळी
  चिक्मगळूर
  चिखलदरा
  चिखली
  चिंगलपट
  चिंच
  चिचगड, जमीनदारी
  चिंचलीगदड
  चिंचवड
  चिचेवाडा
  चिंचौली
  चिंच्यु
  चिटणीस
  चितलनगर जमीनदारी
  चितळ
  चितळदुर्ग
  चिताकुल
  चिंतामणी
  चिंतामणी कवि
  चिंतामणी रघुनाथाचार्य
  चितारी
  चिति
  चितोड
  चित्तगांग
  चित्तगांग डोंगराळ प्रदेश
  चित्ता
  चित्तूर
  चित्फिरोझपूर
  चित्रकला
  चित्रकाव्य
  चित्रकूट
  चित्रकोट
  चित्रगुप्त
  चित्ररथ
  चित्रसंग्रहालयें
  चित्रळ
  चित्रांगदा
  चित्रावाव
  चिदंबर दीक्षित
  चिदंबरम्
  चिंदविन
  चिंदविन नदी
  चिदानंद स्वामी
  चिनडोंगर
  चिनमुलगुंद
  चिन लोक
  चिनसुरा
  चिनाब
  चिनीमाती किंवा केओलिन
  चिन्नविरन्ना
  चिन्नूर
  चिन्योत
  चिपळूण
  चिपळूणकर, कृष्णशास्त्री
  चिपळूणकर, विष्णुशास्त्री
  चिफू
  चिमणाजीआप्पा
  चिमणाजी दामोदर
  चिमणी
  चिरक्कल
  चिराबा
  चिलखत-वेदकालांतहि
  चिलिअनवाला
  चिली
  चिल्का सरोवर
  चिस्ती
  चीझी, अॅंटोनें लिओनार्ड डि
  चीन
  चीनी
  चीपुरुपल्ले
  चीर
  चीराल
  चुका
  चुकचि
  चुटिया
  चुडा
  चुडा संस्थान
  चुडेश्वर
  चुना
  चुनार
  चुंबकजन्य विद्युद्यंत्र
  चुंबकत्व
  चुंबकीय दृकशास्त्र
  चुंबन
  चुमल्हारी
  चुरू
  चूडामण
  चेकोस्लोव्हेकिया
  चेंगीझखान
  चेचेंझे
  चेटवई
  चेट्टी
  चेदूब बेट
  चेंबर्स रॉबर्ट
  चेयूर
  चेर घराणें
  चेरात
  चेरापुंजी
  चेरिअल
  चेरुमन
  चेरो
  चेर्रा
  चेल
  चेसेलडेन, विल्यम
  चेस्टरफील्ड
  चेस्टरफील्ड फिलिफ
  चैतन्य
  चैतसिंग
  चैत्य
  चैन
  चैबासा
  चोखामेळा
  चोवो
  चोडवरम
  चोध्रा
  चोपडे
  चोपदार
  चोबारी
  चोंभा
  चोरांग्ल
  चोरासी
  चोरी
  चोल
  चोल घराणें व चोल साम्राज्य
  चोवीस परगणा जिल्हा
  चौंगू
  चौघाट
  चौथाई, चौथ
  चौधरी
  चौबे जहागीर
  चौल
  चौलमुग्रा
  च्यवन
 
  छछरौली
  छट्टू
  छतारी
  छत्तरपूर
  छत्तिसगड विभाग
  छत्रपूर तहशील
  छत्रसाल
  छत्रे, केरो लक्ष्मण
  छत्रे, विष्णु मोरेश्वर
  छत्रे, सदाशिव काशीनाथ
  छंद:शास्त्र
  छप्पन देशचे राजे
  छप्रौली
  छब्रा
  छलाल
  छात
  छापखाना
  छापिआ
  छाप्री
  छायाचित्रपेटिका
  छाल
  छालिअर
  छिंद, लल्ल
  छिंदवाडा
  छिंपा
  छिब्रामऊ तहसील
  छुईखदान
  छुटिया
  छोटा उदेपूर
  छोटानागपूर
  छोटी साद्री
 
  जकात
  जॅक्सन अॅंड्र
  जॅक्सन व्हिल्ले शहर
  जखमा
  जगजीवनदास
  जगत्याल
  जगदलपूर
  जगदीशपूर
  जगन्नाथ
  जगन्नाथपंडित
  जगन्नाथपुरी
  जगन्नाथ शंकरशेट, मुर्कुटे
  जंगम
  जगय्या पेटा
  जंगल
  जंगल महाल
  जगलूर
  जगाध्री
  जग्रांव
  जंगीपूर
  जघाशूल
  जंजिरा
  जझिया
  जटलंड
  जटामांसि
  जटायु
  जटासूर
  जठरदाह
  जठरव्रण
  जडजीवघाद
  जडद्रव्य
  जडभरत
  जडवाद
  जडान्नविषबाधा
  जडावाचें काम
  जत
  जतिंग रामेश्वर
  जंतुजन्य रोग
  जतोई
  जत्रा
  जंदिआल गुरु
  जंदिआला
  जंदोला
  जनक
  जनजसवंत
  जननेंद्रियांचे गुप्तरोग
  जनमेजय
  जनस्थान
  जनाबाई
  जनार्दनस्वामी
  जनावरें
  जनीजनार्दन
  जपान
  जपानी वार्निस
  जबलपुर
  जंबुकेश्वरस्
  जंबुद्वीप
  जबूसर
  जमखिंडी
  जमदग्नि
  जमरुड
  जमाखर्च
  जमाबंदी
  जमालखान
  जमालपुर
  जमिकुंता
  जमीन
  जमीनदार व कुळें
  जमीनमहसूल
  जमुई
  जमेका
  जमेसाबाद
  जम्नोत्री
  जम्मलमडुगु
  जम्मू
  जयगड
  जयचंद
  जयदेव
  जयद्रथ
  जयनगर
  जयपाल
  जयपूर
  जयपुर जमीनदारी
  जयपुर संस्थान
  जयमल्ल
  जयरथ शृंगार
  जयरामस्वामी
  जयरामात्मज
  जयविजय
  जयसिंह
  जर उतणें
  जरतार
  जरत्कारु
  जरदाळू
  जरा
  जरासंघ
  जरीपटका
  जर्मन सिल्व्हर
  जर्मनी
  जलंगी
  जलजन्य विद्युतशक्ति
  जलघा
  जलपैगुरी

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .