विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
जयनगर - बंगाल, चोवीस परगण्यांतील एक गांव. उ.अ. २२० ११'' व पू.रे. ८८०२५''. हा गांव कलकत्याच्या दक्षिणेस ३१ मैल असून याची लोकसंख्या इ.स. १९११ सालीं ९२५५ होती. इ.स. १८६९ सालापासून येथें म्युनिसिपालिटी आहे.
जयनगर - बंगाल दरभंगा जिल्हा मधुबनी विभागांतील एक खेडें. उ.अ. २६०३५'' व पू.रे. ८६०९''. कमळा नदीच्या पूर्वेस व नेपाळ सरहद्दीच्या दक्षिणेस थोड्या मैलांवर हें तीन चार हजार लोकवस्तीचें खेडें आहे. येथें बंगालचा नबाब अल्लाउद्दीन (इ.स. १४९२-१५१८) यानें बांदलेली एक मातीची गढी आहे. नेपाळच्या लढाईंत या गढीजवळच ब्रिटिशांनी आपली छावणीं ठेवली होती.