विभाग तेरावा : घ - जलपैगुरी

जमेसाबाद - मुंबई इलाखा, सिंध प्रांत. थर आणि पारकर जिल्ह्यांपैकीं एक तालुका. उ.अ. २४५०'' ते २५२८'' व पूर्व रेखांश. ६९१४'' ते ६९३५'' क्षेत्र फळ ५०६ चौरस मैल. लो.सं. सन (१९०१) २४०३८ या तालुक्यांत १७१ खेडीं असून जमेसाबाद हें मुख्य ठिकाण आहे. जामराव कालव्याचें पाणी या तालुक्याला मिळतें. ज्वारी, गहूं हीं मुख्य पिकें आहेत.