विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
जमालपुर - (१) बंगाल, मैमनसिंग जिल्हा. हें जमालपुर विभागाचें मुख्य ठिकाण असून जुन्या ब्रह्मपुत्रा नदीच्या पश्चिम तीरावर बसलेलें आहे. उ.अ. २४०५६'' व पू.रे.८९०५६'', लो.सं. (१९११) २११०९. ईस्टर्न बंगाल स्टेट रेल्वेचें हें स्टेशन असून इ.स. १८६९ मध्यें म्युनसिपालिटीची स्थापना झाली. बंडापूर्वी जमालपुर हें लष्करी ठाणें होतें.
(२) बिहार ओरिसा, मोंघीर जिल्हा. जमालपूर विभागाचें मुख्य ठिकाण. उ.अक्षांश २५०१९'' व पू.रे. ८६०३०'' हें गांव ईस्ट इंडियन रेल्वेवर कलकत्यापासून २९९ मैल आहे. लोकसंख्या (१९११) २०५२६. येथें रेल्वेचे कारखाने आहेत; त्यांनीं बरीच एकर जागा व्यापलेली आहे व त्यांतच काम करणारांचा भरणा मोठा आहे. म्युनिसिपालिटी १८८३ सालीं स्थापन झाली. येथें एक रेल्वे हॉस्पिटल व शाळा आहे.