प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग तेरावा : घ - जलपैगुरी

जमखिंडी संस्थान - मुंबई इलाख्यांतील दक्षिण महाराष्ट्रांत कोल्हापुरच्या पोलिटिकल एजंटाच्या हाताखालीं असलेलें एक संस्थान. हें. उ. अ. १६२६'' ते १६४६'' व पू.रे. ७५ ७'' आणि ७५ ३७'' यांच्या दरम्यान असून याचें क्षेत्रफळ ५२४ चौरस मैल आहे. संस्थानांत जमखिंडी, बिद्री व कुंदगोळ हे तीन तालुके व वाठार, पाटखळ व ढवळपुरी हीं तीन ठाणीं आहेत.

इ.स. १९२१ सालीं १०११९४ लोकसंख्या होती. या संस्थांनात ८७।८८ गांवें आहेत. गहूं व कापूस हें संस्थानाचें मुख्य पीक आहे. दक्षिण महाराष्ट्रांतील पहिल्या प्रतीचे सरदार म्हणून येथील संस्थानिकास मान असून त्यांना दत्तकाची परवानगी आहे. ब्रिटिश सरकारास २०५१५ रुपये खंडणी द्यावी लागते. संस्थानचें उत्पन्न (इनामी रक्कम सोडून) ७१९४५७ रुपये आहे.

संस्थानिक व त्याचा परिवार यांच्या खासगी खर्चास पृथक तनखा ठरवून दिला असल्यानें संस्थानच्या बजेटांत घोटाळा होत नाहीं. शिक्षणखात्याकडे सढळ हातानें खर्च होतो. एकंदर ७७०२९ रु. म्हणजे एकंदर उत्पन्नच्या एक बारांश रक्कम खर्च होते. गरीब विद्यार्थ्यांनां संस्थानांतून मधुकरी मिळते व शिक्षण मोफत मिळतें. सार्वत्रिक शिक्षण (मराठी प्राथमिक) मोफत व सक्कींचे असून सरकारी इंग्रजी हायस्कुलांत फी अगदी थोडी घेतात. संस्थानचा जुना पुस्तकसंग्रह व अजबखाना अमोलिक आहे. येथील वाचनालयासहि सरकारी मदत आहे. शेतकीच्या उत्कर्षासाठीं दरसाल जनावरांचें प्रदर्शन भरविलें जातें. पाण्याच्या सोईसाठीं आतांपर्यंत लक्षावधी रु. खर्च संस्थाननें केला आहे; पण त्याबद्दल प्रजेकडून कांहींहि रक्कम घेतली नाहीं. संस्थानांत सर्वत्र दवाखाने आहेत. उच्च शिक्षणाकरितां शिष्यवृत्या आहेत. इतक्या सुधारणा माजी संस्थानाधिपती भाऊसाहेब यांच्या वेळीं होत्या. शिवाय, त्यांनीं आपल्या प्रजेचीं गर्‍हाणीं दरबार भरवून ऐकण्याचा परिपाठ ठेविला होता. जमखिंडीस लोकसभेची स्थापनहि त्यांनीं केली व संस्थानच्या कारभारावर टीका करण्याचा अधिकार प्रजेस दिला.

संस्थानांत ६ म्युनिसिपालिट्या आहेत. इंग्रज सरकार संस्थानास अबकारी हक्काबद्दल सालिना ४६६०० रु. देतें. हातमागांचा प्रसार संस्थानांत बराच आहे. ज्वारी, कापूस, गहूं, गळिताचीं धान्यें व पढे यांची निर्गत संस्थानांतून होते, ती सरासरी ९।१० लाखांची होते. एक हायस्कूल, तीन अँग्लोव्हर्न्याक्युलर स्कूल्स, एक संस्कृत पाठशाळा, एक रात्रीची शाळा, सुमारें ७४ प्राथमिक शाळा (मुलींच्या व अस्पृश्यांच्या धरुन) असून शिक्षितांचें प्रमाण लो.सं.शीं. शेंकडा ६६ आहे. जमखंडीस एक सरकारी बॅकहि आहे. संस्थानांत सॅनिटरी कमीट्या बर्‍याच आहेत.

इतिहास - येथील पटवर्धन घराण्याचें मूळ ठिकाण रत्‍नागिरीजवळील कोतवडें गांव होय. तेथील हरभट पटवर्धन हा या घराण्याचा मूळ पुरुष. त्याची स्त्री लक्ष्मीबाई ही शेंडे घराण्यांतील होती. दारिद्रयामुळें हरभटानें शेजारील पुळ्यांच्या गणपतीपाशी १२ वर्षें दुर्वारस पिऊन पुनश्चरण केलें. पुढें देशावर येत असतां वाटेंत इचलकरंजीकरांचा मूळ पुरुष नारोपंत जोशाची गांठ पडली. दोघेहि संताजी घोरपडे सेनापतीच्या पदरीं राहिले. पुढे नारोपंत हे घोरपड्यांच्या हाताखाली मोठे सरदार झाले व हरभटजीस नारोपंताजी उपाध्येगिरी मिळाली.

हरभटजीस सात पुत्र होते. रामचंद्र, महादेव, भास्कर, गोविंद, कृष्ण, त्रिंबक आणि बाळकृष्ण; यांपैकीं त्रिंबक, गोविंद व रामचंद्र हे पुढें नांवलौकिकास चढले. रामचंद्राचा मुलगा परशुरामभाऊ हा तर सर्व पटवर्धन सरदारांत प्रख्यात होऊन गेला. या भाऊच्याच जहागिरीपैकीं जमखिंडी संस्थान हा एक अवशिष्ट भाग आहे.

पेशवे व इचलकरंजीकर घोरपडे यांचा शरीरसंबंध झाला त्यावेळीं हरभटाच्या पुत्रांनां पेशव्यांच्या दरबारीं शिरकाव मिळाला. रामचंद्र व गोविंद या बंधूंस प्रथम इंदोजी कदम या एका पथक्याच्या पागेच्या फडणिशीचें काम मिळालें. इंद्रोजीस संसती नसल्यानें त्यांच्या पश्चात त्याची पागा, त्याच्या इच्छेनुसार गोविंदरावास मिळाली. तसेंच रामचंद्रपंतास चिमाजीआप्पा पेशवे यांनीं आपल्या खाजगीपथकांत दाखल केलें; तेथें त्यांनी पराक्रम गाजविल्यानें शेवटी आप्पांनीं आपले सारें खासगी पथक (२४०० स्वारांचें) त्याच्याच नांवानें केलें. रामचंद्रपंत इ.स. १७४९ च्या अबदालीच्या स्वार्‍यांत त्याच्याशीं पेशव्यांच्या सैन्यातर्फे लढत होता. त्याच्याकडे अंतर्वेदच्या रक्षणाचें काम होतें. इकडे असतां उदराच्या व्यथेनें तो स. १७४९ च्या नोव्हेंबरांत वारला. त्यावेळीं परशुरामभाऊ हा १० वर्षांचा होता. हरभटाचा कृष्णभट म्हणून एक पुत्र होता. त्याचा मुलगा पुरुषोत्तम हा लहानपणापासून रामचंद्रपंताजवळ असे. त्यानें रामचंद्राच्या नांवाची पथकाची सरदारी परशुरामाच्या नांवें करुन घेतली.

परशुरामभाऊस पुरुषोत्तमदाजीनें चांगलें शिक्षण दिलें. भाऊनें बहुतेक मोहिमा कर्नाटक व हैदर-टिपूवर केल्या. लॉर्ड कॉर्नवालीस याला भाऊनें अनेक वेळां मदत केली होती. नाना फडणविसाचा भाऊ हा पुष्कळ दिवस उजवा हात होता. महादजी शिद्यानें नानांचें वर्चस्व कमी करण्याचा घाट घातला तेव्हां भाऊनें नानांची पाठ सोडिली नाहीं. खडर्याच्या लढाईंत मुख्य सेनापती भाऊच होता. पुढें सवाई माधरावसाहेबांच्या पश्चात  नानांच्या विरूध्द जाऊन भाऊनें चिमणाजी माधवराव यांस पेशवे करुन आपण स्वतःकारभारी झाला. परंतु थोड्याच दिवसांत नानानीं कारस्थान करुन रावबाजीस गादीवर बसविलें; तेव्हां भाऊ चिमणाजी माधवरावासह पळून जात असतां पकडले जाऊन कैदेंत पडला. पुढें कांही दिवसांनीं सातारकर व कोल्हापुरकर छत्रपतींच्या दंग्यांचा मोड करण्याकरितां भाऊस सोडिलें; त्यांनीं ते दंगे मोडले. परंतु करवीरकरांनीं भाऊच्या गैरहजेरीत त्याचा तासगांव येथील रहाण्याचा चंदनी वाडा जाळून टाकला होता. त्याचा राग येऊन व पेशव्यांचाहि हुकूम झाला म्हणून, भाऊ कोल्हापुरकरावर चालून गेला. त्यावेळी त्याचें वय ६५ वर्षांचें होतें. त्यानें आपली सर्व जहागीर व प्रांत कोल्हापुरकराच्या हातून सोडविला. शेवटीं पट्टणकुडीच्या लढाईंत भाऊ जखमी होऊन पाडाव झाला असतां, कोल्हापुरकरांनीं निर्दयपणे त्याला ठार मारिलें.

भाऊचा पुत्र रामचंद्रपंत आप्पा यासहि वरील लढाईंत जखमा झाल्या होत्या. याला हरि, माधव व गणेश असे तीन भाऊ होते. रामचंद्रपंत हाच जमखिंडीचा पहिला अधिपती होता. हा जमखिंडीस येऊन राहिला व तासगांवीं गणेशपंत राहिला. ही वांटणी स. १८११ च्या सुमारास झाली. यावेळीं जमखिंडी जहागिरीचें उत्पन्न ४५४१६० रु. होतें व त्याबद्दल पदरीं १७२८ स्वार बाळगावे लागत. तासगांवचें उत्पन्न २०८७७६ रु. असून, त्याबद्दल ६४० स्वार ठेवावे लागत.
 
पेशवाई गेल्यावर तासगांवीं गणेशपंत व त्याचे पुत्र गोपाळ व गोविंद हे होते. गणेशपंताचा वडील भाऊ हरि हा निपुत्रिक वारला. जमखिंडीकर रामचंद्रआप्पा या वेळी वारला असून त्याचा पुत्र गोपाळराव हयात होता. रामचंद्र आप्पाचा दुसरा पुत्र माधव वारला होता व त्याचा पुत्र गोविंद जिवंत होता. माधवरावानें आपला स्वतंत्र वाटा घेतला नाहीं तो जमखिंडी संस्थानांतच राहिला.

जमखिंडीस रामचंद्रआप्पानंतर गोपाळराव अधिपती झाला. याच्याशीं इंग्रजांनीं तह करुन त्याला तीन हजारठची जाततैनात देऊन त्याबद्दल ३००० स्वार ठेवण्यास सांगितले. चिंचणीसंस्थान जमखिंडीतून फुटून निघाल्यानंतर (१८२१) जमखिंडीचें उत्पन्न २४३४७६ रु. राहिलें व चिंचणीचें २२५१५३ रु. उत्पन्न झालें. यावेळीं तैनाती फौज न ठेवितां रोख रुपयेच खंडणीदाखल देण्याचें ठरलें. त्याप्रमाणें १५० स्वारांबद्दल जमखिंडीसंस्थानानें २०५१५ रु. खंडणी दरसाल द्यावी असें ठरलें त्याप्रमाणें आजतागाईत इतकी रकम खंडणीदाखल दरसाल इंग्रजसरकारास मिळते.

गोपाळराव हा निपुत्रिक वारला (१९ नोव्हेंबर १८४०). त्यानें एक मुलगा दत्तक घेतला; त्याचें नांव रामचंद्रराव आप्पासाहेब. हा दत्तकाच्या वेळीं ७ वर्षांचा होता. दत्तक प्रसंगी इंग्रजसरकारनें १ लक्ष ७० हजार रु. नजराणा घेतला. आप्पासाहेबाच्या लहापणांत त्यांची दत्तक आई कारभार पाहत असे; परंतु अशामुळें बखेडा होऊं लागल्यानें इग्रजांनीं कारभार नेमला. आप्पासाहेबास योग्य शिक्षण देऊन ता. १० जानेवारी १८५३ त संस्थानचा अखत्यार दिला. यांच्या कारकीर्दीत संस्थानांत पुष्कळ (विशेषतः शिक्षणाच्या बाबतींत) सुधारणा झाल्या. मध्यंतरीं बंडाच्या वेळीं (१८५७) आप्पासाहेबांच्या वर्तनाविरुद्ध इंग्रज सरकारास संशय येऊन त्यांनीं त्यांस २२ मार्च १८५८ रोजीं प्रतिबंधांत (प्रथम बेळगांव व पुढें वेंगुर्ले येथें) ठेविलें; पुढें चौकशी करुन त्यांना मुक्त करण्यांत आलें (७ जानेवारी १८५९). त्यापुढें त्यांनी पुष्कळ दिवस राज्य करुन व सर्व तर्‍हेनें संस्थानजी सुधारणा करुन ता. १२ जानेवारी स. १८९७ रोजीं देह ठेविला.

आप्पासाहेब यांनीं (पुत्र न झाल्यामुळें) चिंचणी घराण्यातील गोविंदराव यांचा नातु व कृष्णरावाचा वडील पुत्र दाजीसाहेब यास ता. १५ दिसेंबर १८९६ रोजी दत्तक घेऊन त्याचें नांव परशुरामपंत भाऊसाहेब ठेविलें यांचा जन्म १८८३ च्या मे महिन्यांत झाला. त्यांना वयाच्या विसाव्या वर्षी ता. ४ जून स. १९०३ सालीं मुखत्यारी मिळाली. शिक्षण राजकुमार कॉलेजांत झालें होतें. त्यांना के.सी.आय.ई. व सर या पदव्या होत्या. यांना शंकरराव आप्पासाहेब व ताराबाई ऊर्फ शकुंतलाबाई अशीं दोन अपत्यें आहेत. श्रीमंत भाऊसाहेब यांचें प्रथम कुटूंब पुण्याच्या थोरल्या रास्त्यांच्या घराण्यांतील होतें. त्यांचेच पुत्र शंकरराव होत. हें कुंटुंब स. १९०७ त वारल्यानें श्रीमंतांनी दुसरा विवाह (पुण्याचे दामले घराण्यांतील मुलीशीं) केला. यांचें नांव श्री. रमाबाईसाहेब आहे.

चित्रकलेंत यांची बरीच प्रगति असून स्त्रीशिक्षणाबद्दल त्यांनीं खटपट केली आहे. त्यांनीं स्त्रियांसाठीं होमक्लासेस काढले आहेत. महायुध्दांत श्री. भाऊसाहेब हे फ्रान्समध्यें लढाईवर गेले होते त्यावेळीं त्यांना कॅप्टनचा हुद्दा मिळाला होता व नऊ तोफांची सलामी होती. यांनीं शिक्षणाच्या बाबतींत व इतर अनेक बाबतींत संस्थानांत पुष्कळ सुधारणा केल्या. यांनां मर्दानी खेळांचा फार शोक होता. संस्थानांतील एका हत्तीस काम शिकवीत असतां तो चिडून त्यानें श्रीमंतांचा वध केला (ता. २५ फेब्रुवारीं १९२४). ते करारी, शिस्त पाळणारे, जिज्ञासु, धाडशी व पूर्वजाविषयीं अभिमान बाळगणारे होते. ते बहुधा रामतीर्थावरच रहात असत.

हल्ली संस्थानची मालीक श्री शंकरराव आप्पासाहेब यांच्याकडे आली आहे. यांचा जन्म स. १९०६ च्या सुमारास झाला. यांचें शिक्षण श्री भाऊसाहेबांच्या देखरेखीखालीं राजाराम कॉलेजांत झालें. यांचें लग्न नुकतेच कै. भाऊसाहेबांच्या इच्छेप्रमाणें बावडेकर अमात्य घराण्यांतील मुलीशीं झालें व यांनीं आपली बहिणहि त्याच घराण्यांत दिली. यांच्या पत्‍नीचें नांव श्री.सौ. लीलावतीबाईसाहेब असें आहे. हल्ली हे अज्ञान असल्यानें जमखिंडी संस्थानचा कारभार श्री.मा.राणीसाहेब रीजन्सीच्या मदतीनें पाहत असतात (१९२५). (इंपे प्याझे पृ. १४; केसरी त. ४।३।१९२४; जमखिंडी संस्थानाकडून आलेली माहिती).

गांव - जमखिंडी हें गांव या संस्थानची राजधानी असून तें कोल्हापूरच्या पूर्वेस ६८ मैलांवर आहे. गांवची लो.सं. १३०२९ आहे. येथें म्युनिसिपालिटी आहे. उमा रामेश्वरची जत्रा येथें दरसाल भरते. येथें कापूस दाबण्याचा व सरकी काढण्याचा (सरकारी) कारखाना आहे. हातानें काढलेल्या सुताचा व कापसाचा येथें बराच व्यापार चालतो.

   

खंड १३ : घ - जलपैगुरी  

 

 

 

  घंटय्याकवि
  घटोत्कच
  घटोत्कच लेणीं
  घड्याळ
  घनी
  घनौर
  घांट
  घाटगे
  घाटाळ
  घातमपूर
  घानची
  घायपात
  घारगड किल्ला
  घारघोडा
  घारापुरी
  घाशीराम कोतवाल
  घांसदाणा
  घासी
  घिरथ
  घिसाडी
  घुगुस
  घुंड
  घुबड
  घुराम
  घेरिया
  घेवडा
  घोटकी
  घोडबंदर
  घोडा
  घोडाघांट
  घोडाबारी
  घोडासर
  घोडें
  घोडेघांस
  घोरपड
  घोरपडी
  घोरपडे
  घोरी घराणें
  घोशी
  घोसाळे
  घोसी
  घोळ
 
 
  चउमू
  चकमा
  चकला रोषनाबाद
  चकवाल
  चकिया
  चक्कियर
  चक्कीनोआरो
  चक्रपाणि
  चक्रवर्ती
  चक्राप्पा
  चंगनाचेरी
  चंगर
  चच, चचनामा
  चचान
  चटया
  चडार
  चंडी
  चतुरमहाल
  चतुर साबाजी
  चतुरसिंग
  चतुर्थ
  चत्रा
  चॅथॅम
  चंदगड
  चंद घराणे
  चंदन
  चंदभाट
  चंदरभान
  चंदावरकर, नारायण गणेश
  चंदासाहेब
  चंदीपुर
  चंदेरी
  चंदेल्ल
  चंदौली
  चंदौसी
  चंद्र
  चंद्रकोना
  चंद्रगिरी
  चंद्रगुप्त
  चंद्रगोमिन्
  चंद्रनगर
  चंद्रभागा
  चंद्रहास
  चंद्रावती अथवा चंद्रावली
  चन्नगिरी
  चन्नपट्टण
  चन्नबसव
  चन्नरायपट्टण
  चंपा
  चंपानेर
  चपारण
  चंपावत
  चंपाषष्ठी
  चंबळा नदी
  चबा संस्थान
  चमारडी
  चरक
  चरखा
  चरखारी
  चरणदासी
  चरणव्यूह
  चरबी
  चरबीचें झाड
  चरी
  चर्मण्वती
  चलत-चित्रें
  चलन
  चल्लाकेरे
  चवळी
  चहा
  चक्षुर्मंनु
  चाकण
  चाकवत
  चागई
  चांगदेव
  चांगभकार
  चांगा केशवदास
  चाघताइखान
  चांचेगिरी
  चाचो
  चांडोद
  चाणक्य
  चातुर्मास्य
  चातुर्मास्य याग
  चातुर्वर्ण्य
  चात्सु
  चादचा
  चांदपूर
  चांदबिबी
  चांदभाट
  चांदला
  चांदवड
  चांदा
  चांदूर
  चांदूर बाजार
  चांद्रायण
  चानन शानन
  चानस्मा
  चानाल
  चानोड
  चाप्रा
  चाफळ
  चाबुआ
  चांभार
  चाम
  चामखीळ
  चामन
  चामराजनगर
  चामुंड
  चामुर्शी
  चार
  चारखा
  चारण
  चारदुआरं
  चारसद
  चारा
  चारीकार
  चार्टिझम
  चार्लंमांट, अर्ल ऑफ
  चार्वाक
  चालुक्य घराणें
  चालसिस
  चावडा
  चावंद
  चास-कमान
  चॉसर
  चासा
  चाहमान उर्फ चौहान
  चाळिसगांव
  चिक
  चिकंजी
  चिकबळ्ळापूर
  चिकाकोल
  चिकोडी
  चिक्कणर्ति
  चिक्केरूर
  चिक्टीआबर
  चिक्नायकन्हळ्ळी
  चिक्मगळूर
  चिखलदरा
  चिखली
  चिंगलपट
  चिंच
  चिचगड, जमीनदारी
  चिंचलीगदड
  चिंचवड
  चिचेवाडा
  चिंचौली
  चिंच्यु
  चिटणीस
  चितलनगर जमीनदारी
  चितळ
  चितळदुर्ग
  चिताकुल
  चिंतामणी
  चिंतामणी कवि
  चिंतामणी रघुनाथाचार्य
  चितारी
  चिति
  चितोड
  चित्तगांग
  चित्तगांग डोंगराळ प्रदेश
  चित्ता
  चित्तूर
  चित्फिरोझपूर
  चित्रकला
  चित्रकाव्य
  चित्रकूट
  चित्रकोट
  चित्रगुप्त
  चित्ररथ
  चित्रसंग्रहालयें
  चित्रळ
  चित्रांगदा
  चित्रावाव
  चिदंबर दीक्षित
  चिदंबरम्
  चिंदविन
  चिंदविन नदी
  चिदानंद स्वामी
  चिनडोंगर
  चिनमुलगुंद
  चिन लोक
  चिनसुरा
  चिनाब
  चिनीमाती किंवा केओलिन
  चिन्नविरन्ना
  चिन्नूर
  चिन्योत
  चिपळूण
  चिपळूणकर, कृष्णशास्त्री
  चिपळूणकर, विष्णुशास्त्री
  चिफू
  चिमणाजीआप्पा
  चिमणाजी दामोदर
  चिमणी
  चिरक्कल
  चिराबा
  चिलखत-वेदकालांतहि
  चिलिअनवाला
  चिली
  चिल्का सरोवर
  चिस्ती
  चीझी, अॅंटोनें लिओनार्ड डि
  चीन
  चीनी
  चीपुरुपल्ले
  चीर
  चीराल
  चुका
  चुकचि
  चुटिया
  चुडा
  चुडा संस्थान
  चुडेश्वर
  चुना
  चुनार
  चुंबकजन्य विद्युद्यंत्र
  चुंबकत्व
  चुंबकीय दृकशास्त्र
  चुंबन
  चुमल्हारी
  चुरू
  चूडामण
  चेकोस्लोव्हेकिया
  चेंगीझखान
  चेचेंझे
  चेटवई
  चेट्टी
  चेदूब बेट
  चेंबर्स रॉबर्ट
  चेयूर
  चेर घराणें
  चेरात
  चेरापुंजी
  चेरिअल
  चेरुमन
  चेरो
  चेर्रा
  चेल
  चेसेलडेन, विल्यम
  चेस्टरफील्ड
  चेस्टरफील्ड फिलिफ
  चैतन्य
  चैतसिंग
  चैत्य
  चैन
  चैबासा
  चोखामेळा
  चोवो
  चोडवरम
  चोध्रा
  चोपडे
  चोपदार
  चोबारी
  चोंभा
  चोरांग्ल
  चोरासी
  चोरी
  चोल
  चोल घराणें व चोल साम्राज्य
  चोवीस परगणा जिल्हा
  चौंगू
  चौघाट
  चौथाई, चौथ
  चौधरी
  चौबे जहागीर
  चौल
  चौलमुग्रा
  च्यवन
 
  छछरौली
  छट्टू
  छतारी
  छत्तरपूर
  छत्तिसगड विभाग
  छत्रपूर तहशील
  छत्रसाल
  छत्रे, केरो लक्ष्मण
  छत्रे, विष्णु मोरेश्वर
  छत्रे, सदाशिव काशीनाथ
  छंद:शास्त्र
  छप्पन देशचे राजे
  छप्रौली
  छब्रा
  छलाल
  छात
  छापखाना
  छापिआ
  छाप्री
  छायाचित्रपेटिका
  छाल
  छालिअर
  छिंद, लल्ल
  छिंदवाडा
  छिंपा
  छिब्रामऊ तहसील
  छुईखदान
  छुटिया
  छोटा उदेपूर
  छोटानागपूर
  छोटी साद्री
 
  जकात
  जॅक्सन अॅंड्र
  जॅक्सन व्हिल्ले शहर
  जखमा
  जगजीवनदास
  जगत्याल
  जगदलपूर
  जगदीशपूर
  जगन्नाथ
  जगन्नाथपंडित
  जगन्नाथपुरी
  जगन्नाथ शंकरशेट, मुर्कुटे
  जंगम
  जगय्या पेटा
  जंगल
  जंगल महाल
  जगलूर
  जगाध्री
  जग्रांव
  जंगीपूर
  जघाशूल
  जंजिरा
  जझिया
  जटलंड
  जटामांसि
  जटायु
  जटासूर
  जठरदाह
  जठरव्रण
  जडजीवघाद
  जडद्रव्य
  जडभरत
  जडवाद
  जडान्नविषबाधा
  जडावाचें काम
  जत
  जतिंग रामेश्वर
  जंतुजन्य रोग
  जतोई
  जत्रा
  जंदिआल गुरु
  जंदिआला
  जंदोला
  जनक
  जनजसवंत
  जननेंद्रियांचे गुप्तरोग
  जनमेजय
  जनस्थान
  जनाबाई
  जनार्दनस्वामी
  जनावरें
  जनीजनार्दन
  जपान
  जपानी वार्निस
  जबलपुर
  जंबुकेश्वरस्
  जंबुद्वीप
  जबूसर
  जमखिंडी
  जमदग्नि
  जमरुड
  जमाखर्च
  जमाबंदी
  जमालखान
  जमालपुर
  जमिकुंता
  जमीन
  जमीनदार व कुळें
  जमीनमहसूल
  जमुई
  जमेका
  जमेसाबाद
  जम्नोत्री
  जम्मलमडुगु
  जम्मू
  जयगड
  जयचंद
  जयदेव
  जयद्रथ
  जयनगर
  जयपाल
  जयपूर
  जयपुर जमीनदारी
  जयपुर संस्थान
  जयमल्ल
  जयरथ शृंगार
  जयरामस्वामी
  जयरामात्मज
  जयविजय
  जयसिंह
  जर उतणें
  जरतार
  जरत्कारु
  जरदाळू
  जरा
  जरासंघ
  जरीपटका
  जर्मन सिल्व्हर
  जर्मनी
  जलंगी
  जलजन्य विद्युतशक्ति
  जलघा
  जलपैगुरी

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .