विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
जनावरें - सामान्यतः आपण ज्यांस गुरेंढोरें अथवा जनावरें म्हणतों ते प्राणी सस्तन (मॅमेलिया) वर्गांतील खुरयुक्त (अंगुलाटा) गणांतील, खुरयुक्त अंगुलीतल (अंगुलाटाव्हेरा) या शाखेंतील समांगुली (आर्थोडाक्टिला) उपगणांत मोडतात. यांचें पुन्हां (१) गाई बैल, म्हशी (बोव्हिडी), (२) मेंढ्या (ओव्हिस) व बकरे (कॅप्रस) (३) घोडे, गाढवें (ईक्वस अँसिनस) व खेंचरें, (४) डुकरें वगैरे पोटवर्ग पाडतां येतात. यांची माहिती त्या त्या स्वतंत्र लेखांत दिली आहे.