विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
जनमेजय - या नांवाच्या अनेक प्राचीन व्यक्ती आढळतात (प्राचीन कोश पहा.) वैदिक माहिती तिसर्या विभागांत (पृ. २७०) आली आहे. पौराणिक कालांत अर्जुनाचा पुत्र परीक्षित राजाचा हा पुत्र म्हणून प्रसिद्ध आहे. यानें हस्तिनापूर येथें बापाच्या मागे ८४ वर्षें केले. त्या वेळेस कलियुगाचा १७८ वर्षे झालीं होतीं. याच्या मागें याचा पुत्र शतानीक राजा झाला. याच्याच कारकीर्दीत सर्पसत्र झालें. त्यांत तक्षकाचा बचाव आस्तिकानें केला.
सर्पसत्राच्या वेळीं जनमेजयानें वैशंपायनास कौरव पांडवांचा इतिहास सांगण्यास विनंति केली व त्याप्रमाणें वैशंपायनानें महाभारत वाचिलें. ही जनमेजय-वैशंपायनाची जोडी पुराणश्रेत्यांनां फार परिचयाची आहे. पुष्कळदां वैशंपायनाला वक्ता व जनमेत्तयाला श्रोता करून नवीन कथांनां पुराणाचें स्वरुप दिलेलें दिसतें. जनमेजयाला शतानिक व शंकुकर्ण असे दोन पुत्र होते. (भारत, आदिपर्व; मत्स्यपुराण; वेदिक इंडेक्स).