प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग तेरावा : घ - जलपैगुरी

जननेंद्रियांचे गुप्‍तरोग - ज्या स्त्री अगर पुरूषांच्या जननेंद्रियांत यांपैकीं एखादा रोग असून त्या ठिकाणीं अन्य निरोगी पुरूष अगर स्त्रियेचा संभोग घडला असतां निरोगी मनुष्यासहि तो संसर्ग बाधतो, व त्या मनुष्यास उपदंश झाला अगर गरमी भरली असें सामान्यपणें लोक म्हणतात. हे रोग तीन प्रकारचे अगदीं वेगवेगळाले आहेत ते असेः-(१) पूय, प्रमेह, अगर परमा; (२) चट्टे व बदे आणि (३) उपदंश अथवा फिरोङ्गोपदंश. पूर्वी या रोग्याच्या कारणांविषयीं अज्ञान असल्यामुळें हे तिन्ही मिळून एकाच उपदंश रोगाच्या तीन निरनिराळ्या अवस्था आहेत असें मानीत. पण आतां तीन अगदीं पृथक् अशा (जंतू) कारणांमुळें हे तीन स्वतंत्र रोग असून त्यांचा एकमेकांशीं बिलकूल कार्यकारणसंबंध नाहीं, व फक्त जननेंद्रियाच्या ठिकाणींच ते सर्व रोग होतात, यापेक्षां दुसरें जननेंद्रियाच्या ठिकाणींच ते सर्व रोग होतात, यापेक्षां दुसरें साम्यहि एकमेकांत नाहीं असें ठाम सिद्ध झालें आहे. या रोगाचें आदिकारण जे तीन प्रकारचे जंतू ते (१) परमा रोगांत मूत्रमार्ग, योनिमार्ग, गर्भाशय यांसारखे व अन्य श्लेष्मावरणत्वचेचे भाग दूषित करितात; (२) चट्टे उत्पन्न करणारे जंतू श्लेष्मावरणत्वचा अगर साधी त्वचा प्रथम दूषित करून नंतर ते होतात; व (३) उपदंश रोगांत सर्व शरीर जंतूंनीं दूषित केल्यामुळें बिघडून नाना प्रकारचीं लक्षणें होतात. दूषित स्त्रीपुरूष संभोगामुळें हे रोग होतात असें वर सांगितलें आहे खरें; तथापि एखाद्या सुइणीनें अगर डॉक्टरानें गरमी भरलेल्या स्त्रीचें बाळंतपण केलें; अगर डॉक्टरनें अशा मनुष्यावर शास्त्रक्रिया केली; किंवा एखाद्या दाईनें गरमी झालेल्या आईच्या पोटीं जन्मलेलें मूल आपल्यां अंगावर पाजिलें तर या रीतीनें त्यांस नकळत विवक्षित संसर्ग होऊन उपदंश रोग होण्याचा संभव फार असतो हें उघड आहे. दुसरें असें कीं एखाद्या मनुष्यास उपदंश असला तरी त्यास त्याचवेळीं चट्टा रोग अगर परमा हाहि आणखी नसेल अशी स्थिती नसते. एकाच माणसास एकापेक्षां अधिक प्रकारचे असले रोग असूं शकतात, व म्हणून त्याशीं संभोग करणार्‍या माणसासहि एक किंवा अधिक रोग होतात. फार तर रोगबीजाच्या निद्रितावस्थेच्या मानानें ते दोन्ही रोग एकदम न होतां एक अगोदर व दुसरा नंतर अशा क्रमानें होतात इतकेंच उदाहरणार्थ, संभोगानंतर तीन चार दिवसांतच परमा व चट्टे रोगांचा या दुष्टसंभोग घडलेल्या मनुष्यास अनुभव येतो. कारण त्यांचीं रोगबीजें (जंतू) फार थोडा काल निद्रितावस्थेंत असतात. म्हणून हे रोग संभोगानंतर प्रगट होतात. पण उपदंश रोगबाजाची निद्रीतावस्था संपण्यास चार ते सहा आठवडे लागत असल्यामुळें त्यांत उपदंश रोगाचीं लक्षणें प्रगट होण्यास तितका अवधि लागतो. म्हणून संभोग घडल्यानंतर बर्‍याच दिवसांनीं लक्षणें होणें हे रोगनिदान करण्यास उत्तम साधन आहे. उपदंश हा अगदीं स्वतंत्र रोग आहे; व केवळ चट्टे असले तर त्या बीजापासून परमा होत नाहीं. आणि एकंदरींत हे तिन्ही स्वतंत्र रोग आहेत हे महत्वाचे शोध फ्रेंच शास्त्रज्ञांनीं फार प्रयासानें व परिश्रमानें लाविले, व त्यांसाठीं त्यांस कित्येक वर्षे लागलीं. त्यांस दुजोरा येण्यासाठीं जंतुशास्त्रसहाय्यानें प्रयोगहि त्याच देशांत करण्यांत येऊन मेचिन कॉफ या जंतुशास्त्रज्त्र महापंडितानें ''स्पायरोकेटा प्यालिडा'' हाच उपदंशाचा खरा जंतु आहे असें पारिसमधील पाश्चुरसंस्थेंमध्यें सिद्ध झालेलें मत जाहीरपणें ग्रहण केलें.

पूयप्रमेह अथवा परमा रोग (गनोरिया).- हा रोग विशिष्ट जंतूंमुळें होतो हे व अन्य सर्व जंतू सूक्ष्मदर्शक यंत्र सहाय्यानें पहावे लागतात, इतके ते सूक्ष्म असतात. अक्रोड चिरले असतां त्याच्या दोन फाकी व त्यांतील मगज जसा दिसतो त्या आकाराचे हे दुहेरी जंतू असून मूत्रमार्ग अगर योनिमार्ग व अन्य दूषित श्लेष्मावरणाच्या जागीं हा रोग होतो हें वर आरंभीं सांगितलें आहेच. हा फार भयंकर रोग आहे. ज्या निरोगी मनुष्याचा या रोगानें पीडित असलेल्या माणसाशीं संभोग घडतो त्यास संभोगकाळीं मूत्रमार्गे झपाट्यानें रोगबीजाचा प्रवेश होऊन तेथें, त्या सर्व मार्गात व अन्य ठिकाणीं प्रसारहि अति चपलतेनें होतो. रोगबीज अति त्वरेनें वाढत असतां त्यापासून भयंकर दाह व सूज उत्पन्न करणारें विष उत्पन्न होऊन तीन चार दिवस तें विष निद्रितावस्थेंत रहातें. नंतर मूत्रमार्गाच्या भयंकर व वेदनायुक्त दाहास आरंभ होतो. इंद्रियांतून अतिदाट पिवळा असा चिकट पू पुष्कळ स्त्रवतो; लघवी होतांना असह्य तिडिक व आग उत्पन्न होते; जरा हालचाल झाली कीं इंद्रिय फार दुखल्यामुळें रोग्याच्यानें इकडें तिकडें हिंडवत नाहीं. या स्त्रावाच्या पुवांत पूयजंतू व हे परमारोगाचे दुहेरी जंतू हवे तेवढे सूक्ष्मदर्शक यंत्रानें पहातां येतात. रोगबीज पसरण्याची बळकट प्रवृत्ति असल्यामुळें शिश्नामागें शरीरांत प्रास्टेटपिंड असतो त्याचा दाह होऊण लघवी कोंडतें. या लक्षणास मूत्रकृच्छ म्हणतात. अंडाच्या शुक्रधातुवाहक नाडींचा दाह होतो, त्याचेंहि हेंच कारण; व त्यामुळें कधीं कधीं मूत्राशयदाह तेथें संसर्ग पोंचल्यास होतो. इंद्रियाच्या ठिकाणीं या रोगामुळें गळवें होतात. रोगाचा दाह बरेच दिवस टिकल्यास उपदंशजन्य मांसग्रंथी बर्‍याच उत्पन्न होतात.

चिकित्सा - रोग नवीन झाला असतां रोग्यानें अंथरूणांत अगदीं पडून राहून मग उपचार केल्याने अधिक गुण येतो. मद्यपान अगदीं वर्ज्य करावें. तसेच जडान्न, संभोगक्रिया. व शृंगारविषयक चिंतन या गोष्टीहि वर्जाव्या. बालीं अथवा यव धान्याचा अगर जवसाचा काढा करून तो अमळ कढत प्याल्यानें लघवी पुष्कळ होऊन तींतील तिडीक व आग कमी होते. अमळ कढत पाण्यांत बसण्यानें अगर स्नान करण्यानें आराम वाटतो. शौचास साफ होईल  असें औषध रोज दिल्यावाचून राहूं नये. एक पिंट पाण्यांत एक ग्रेन पोट्याश परमॅंगनेट हें औषध घालून त्या कोमट पाण्यानें मूत्रमार्ग वरच्यावर पिचकारीनें नुसता धुवावा. नंतर झिंक (वंग) क्षार अथवा रौप्यक्षारापासून तयार केलेलीं औषधें पिचकारीनें मूत्रमार्गात घालावीं. पोटामध्यें चंदनी तेल, कोपेबा तेल यांच्या जाड गोळ्या आणि सोरा, कबाब चिनि, मिरीं, वेलदोडे वगैरे औषधांचें चूर्ण प्रशस्त आहे. नंतर रोगी फार अशक्त झाला असल्यास क्विनाईन व लोहमिश्रित औषध द्यावें. दहा किंवा पंधरा दिवसांत हे उपचार चालू ठेऊन रोगलक्षणें बरीं होतात. पण पाण्यासारखा पातळ स्त्राव मात्र फार चालू रहातो.  तो थोडा कळत न कळत जरी असला तरी त्यांत रोगबीज असतें व म्हणून अशा स्थितींत त्या रोग्यास स्त्रीसर्ग घडला असतां त्या स्त्रीला एकदम तीव्र व कडकपणाचा पूयप्रमेह सुरू होतो. त्या दाहाच्या पसरण्याच्या प्रवृत्तीमुळें गर्भाशय व स्त्रीबीजवाहक नाड्यांतहि संसर्ग पोंचवितो. या नाडींत त्यामुळें विद्रधि आहे. तो फुटून अंत्रावरणदाह होण्याची धास्तीहि असते. व त्यामुळें प्राणास अपाय होतो. हा अनर्थकारक स्त्राव, ज्यास धातुपरमा असेंहि सामान्य लोक म्हणतात, तो फार दिवस चालू रहाण्याचें कारण मूत्रमार्गात ठिकठिकाणीं बारीक व्रणारोपण झालेलें असतें व हा व्रण विद्युतदीपानें दिसतो. रौप्यक्षारादि वर सांगितलेलीं पिचकारीचीं औषधें नीटपणें उपयोगांत आणलीं म्हणजे तो स्त्राव अगदीं थांबतो. हा स्त्राव व दाह फार दिवस चालू राहिल्यानें मूत्रमार्गात तंतुमय जाल नवीन व्रणापासून निर्माण होतें. व त्याचें पुढें संकोचन झालें म्हणजे मूत्रमार्गहि संकोचित होऊन मूत्र अडणें (मूत्रकृच्छ्र) या रोगाचा पाया घातला जातो. वेळेवरच मधून मधून मोठी भरीव मूत्रमार्गशलाका घातल्यानें हा स्त्राव व मूत्रकृच्छ्र हे दोन्ही रोग बरे होतात. पण कधीं कधीं हा मूत्रकृच्छ रोग बरा होण्यास फारच जड जाऊन त्यामुळें प्राणास अपाय होईल असे मूत्रपिंड व मूत्राशयाचे विकार उत्पन्न करितात. हा रोग झाला असतां अगोदर डोळ्यांस संसर्ग बिलकुल न होण्याची खबरदारीं घेणें हे रोग्याचें व वैद्याचेंहि आद्य कर्तव्य आहे रोगाच्या दाहाची यथातथ्य कल्पना नसल्यामुळें हलगर्जीपणानें संसर्ग झालेल्या बोटाचा डोळ्यास स्पर्श झाल्यानें किंवा त्याच्या वापरण्यात आलेलीं जीं वस्त्रें असतील तीं दुसर्‍यांनीं वापरून त्या वस्त्रानें तोंड, डोळे पुसल्यास त्यांनां प्रमेहजन्य अक्षिपूटदाह हा भयंकर पू स्त्रवणारा नेत्ररोग होतो. किंवा हा रोग झालेली स्त्री प्रसूत झाली तर तिच्या मुलाच्या डोळ्यांस हा होग होतो. अशा वेळीं डोळा बचाण्यासाठीं शिकस्तीनें उपाय अंमलांत आणले पाहिजेत व एक डोळा बिघडला तर दुसर्‍या डोळ्यास संसर्ग न बाधेल अशी तजवीज राखली पाहिजे.

हें रोगबीज रक्तांतहि नंतर प्रवेश करून त्यामुळें संधिरोग होऊन शरीरांतील निरनिराळे सांधे सुजतात व ठणकतात. ही स्थिति रोगाच्या आरंभापासून तिच्या आठवड्यांत येते. त्यास इलाज न झाल्यास सांधे आखडतात. फुप्फुसावरण अगर हृदयावरण अशा ठिकाणींहि क्वचित् रोगप्रवेश होतो. स्त्रीसंभोगास पुन्हां आरंभ रोग्यानें केव्हां करण्यास हरकत नाहीं हें सांगणें सोपें नाहीं. कारण फक्त कसल्याहि प्रकारचा स्त्राव बंद झाला येवढ्यावर समाधान मानून संभोग केला असतां स्त्रीला तीव्र प्रमेह रोग होतो असें पुष्कळदां घडतें. म्हणून   मूत्रमार्गातील स्त्राव पिळून काढून तो सूक्ष्मदर्शक यंत्रात तपासून जंतुरहित आहे असें खास ठरल्यावर रोगी खरा बरा झाला असें म्हणावें. हीं तपासणी करतेवेळीं रोगी बिनपथ्यानें रहात असला पाहिजे. कारण जोपर्यंत तो पथ्यानें वागत असेल तोपर्यंत त्याच्या मूत्रमार्गात जंतू कदाचित् सांपडणार नाहींत.

चट्टे (मृदु अथवा साधे व घन अथवा उपदंशजन्य, व वद (सॉफ्टकॅन्सर्स व ब्यूबो), मृदु प्रकारचें चट्टेः- हें नांव पडण्याचें कारण पुढें वर्णन दिलेला फिरंगोपदंशाचा चट्टा हात लावून पाहिला असतां त्यांत हातास काठिण्य लागतें. पण या मृदु प्रकारच्या चट्टयांत तें बिलकूल नसतें. हा चट्टा म्हणजे सुमारें चवलीच्या आकाराचा व्रण दुष्टसंभोग घडाल्यानंतर तीन दिवसांच्या आंत जननेंद्रियावर उठतो व नंतर आकार कांहींसा वाढत जाऊन तो पुवळतो. पृष्टभाग अगदीं मऊ असतो. प्रकृति अगदीं खालावलेल्या रोग्यांत हा चट्टा अति त्वरेनें मोठा होऊन कुजतो. (सन्निपातोपदंशव्रण). ह्या व्रणाचा संसर्ग त्याच माणसास बाधक असल्यामुळें त्यास एक वेळीं दोन अगर तीनहि चट्टे होऊं शकतात. किंवा चट्यावरील पू घेऊन दुसर्‍या ठिकाणीं तो त्याच्या अंगावर टोंचल तर त्या ठिकाणीं हुबेहुब पहिल्याप्रमाणें नवीन चट्टा उठतो. चट्टयाच्या त्रासाखेरीज रोग्याच्या प्रकृतींत बदल होत नाहीं. पण उपदंशाच्या घन चट्टयाचें लक्षण वेगळें असतें. दिसण्यांत तो तसाच असतो,. पण त्यावर पू कमी असतो व तो रोग्याच्या दुसरे ठिकाणीं टोंचला तर रोग्याच्या प्रकृतींत तें विष अगोदरच भिनलें असल्यामुळें नवीन टोंचण्यानें कांहीं परिणाम-जसें नवीन चट्टा होऊं शकत नाहीं. कारण भिनलेल्या रोगविषामुळें रोगप्रतिबंधक शक्ति त्याच्या अंगी येते. ज्याप्रमाणें एकाच माणसात एके वेळीं पूयप्रमेह व उपदंश हे दोन्ही रोग होणें शक्य आहे असें मागें सांगितलें आहे, त्याप्रमाणें एखाद्या माणसास इंद्रियावर मृदु चट्टा पडणें व त्याचवेळीं उपदंश बाधा होणें हि अगदीं संभवनीय असतें. मात्र अशा वेळीं मृदु चट्टा जसा एरवीं औषधोपचारानें बरा होतो तसा तो न होतां उपदंशबाधा असल्यास त्यांत काठिण्य येऊन क्रमाक्रमानें दीड ते दोन महिन्यांत उपदंश अंगांत मुरल्याचीं लक्षणें प्रकृतींत दिसूं लागतात. व अंगावर डाग इत्यादि अनेक लक्षणें होण्यास आरंभ होतो. या दोन्हीं रोगांचे जंतू भिन्न आहेत.

उपचार - चट्टयांवरील पुवामध्यें अति दूषित जंतू असतात म्हणून त्यांस प्रथमच शुद्ध कारबालिक आसिड लावावें. म्हणजे तो व्रण शुद्ध व स्वच्छ होतो. किंवा हा तीव्र उपाय सहन न होईल तर त्या चट्टयावर कारबालीक आसिडांत भिजवलेली तागाच्या कापडाची पट्टी बांधावी. शिश्नाग्रावरील त्वचा मार्गे सारुन चट्टा स्वच्छ करतां येत नसेल तेव्हां या दुष्ट जंतुंनां चांगलेंच फावतें व रोग त्वरेनें पसरतो. म्हणून अशा वेळीं जरूर तर शिश्नाग्रत्वचाछेद करुन देखील व्रण स्वच्छ ठेवण्याची व्यवस्था राखली पाहिजे.

बद होणें - दुष्ट संभोगानंतर चट्टा पडून मग जांधाडांतील गांठी एके अगर दोन्हीं बाजूंस सुजणें अगर पिकणें यास हें नांव आहे, दुष्ट जंतू चट्यांतून अन्नरस केशवाहिन्यामार्गे जांघाडांतील अन्नरसग्रंथींत प्रवेश करतात म्हणून हें असें होतें. हालचाल न करतां विश्रांति घेतली तर त्या गांठी बसतात. पण तसें न होईल तर गांठ चिरून टाकावी व चांगली आंतून खरडून काढावी हें उत्तम. त्यांतील पू मात्र कोठें खरचटल्या जागीं लागल्यास नवीन चट्टा तयार होतो हें ध्यानांत ठेवावें.

उपदंश, फिरंगोपदंश (सिफिलिस) - मनुष्यास हा रोग आनुवंशिक असो, किंवा त्यानें दूषित संभोग करुन स्वसंपादन केलेला असो त्या रोगाचा प्राणिज जंतु (ज्याला स्पायरोकेटा प्यालिडा असें नांव आहे) त्याच्या रक्तांत व नाना इंद्रियांत विपुल प्रमाणांत सांपडतो. त्याचा आकार चक्राकार सोपानपरंपरेप्रमाणें असतो. त्यास १४.१६ वेढे असतात. त्याच्या दोन्ही शेंवटास टोकें असतात. चाबूक मारल्याप्रमाणें, स्क्रू पिळल्याप्रमाणें, व मागें जाणें पुढें येणें अशी तीन प्रकारची चेतनाशक्ति त्याच्या अंगी असते. तो सूक्ष्मदर्शकांतून पहाण्यासाठी त्यास गुलाबी रंग चढवितां येतो. रोग्यास चट्टा दिसूं लागण्याच्या अगोदरच इंद्रियाच्या त्वचेंत तो सांपडतो. त्याशिवाय चट्टा व त्याजवळील अन्नरसग्रथि प्राथमिक व द्वितीयावस्थेंत अंगावर उठणार्‍या पुळ्यांमध्यें, तोंडांमध्यें व गुह्येंद्रियावरील कीलग्रंथींत ते जंतू सांपडतात. रक्त, पाणथरी व तृतीयावस्थेंतील उपदंशार्बुदांचा पृष्ठभाग येथेंहि ते असतात. रोगजंतू पाहण्यासाठी वर सांगितलेल्या रोगठिकाणापासून एखादा लशीचा थेंब कांचपट्टीवर घेऊन त्यावर रेखाकलेंत लागणार्‍या चिनी काळ्या शाईंचा एक थेंब टाकून त्यावर ठेवण्याच्या पातळ कांचेच्या कतीच्या कडेनें तें मिश्रण तेथें पसरुन पातळ थर बसेल असें करावें; म्हणजे ते लवकर सुकतें. नंतर तीव्र शक्तीच्या यंत्रांतून पहावें म्हणजे काळ्या भूमीवर झळक रंगांत असलेले हे जंतू दिसतात.

रोगाचें स्वरुप फार चमत्कारिक असून हा दीर्घकालीन रोग असल्यामुळें त्याचा आदि व अंतहि सुलभतेनें ध्यानांत येण्यासाठी देवीच्या तोडग्याच्या लशीचें उदाहरण घेऊन त्या देवी टोंचण्यानें येणार्‍या ज्वराशीं या रोगाचें साम्य कसें कसें जुळते हें पाहूं. कारण उपदंश हाहि जंतुजन्य असा ज्वरच आहे. (१) प्रथम गोस्तन देवांची लस मुलाच्या दंडावर टोंचतात. याप्रमाणें संभोगाच्या वेळीं उपदंश बीजहि गुह्येंयाद्रियावर अगर चुंबनाच्या वेळीं ओठावर न कळत टोंचलें जातें. (२) नंतर दोन तीन दिवस मुलाच्या दंडास कांही होत नाहीं. त्याचप्रमाणें उपदंशातहि संभोगानंतर निदान दहा बारा दिसपर्यंत गुह्येंद्रियावरील चट्टा कठिण व कडक झाल्याचें चिन्ह नसतें. याप्रमाणें दोन्ही रोगांत कांही दिवस व्याधि निद्रितावस्थेंत असतो. (३) चवथ्या दिवशीं टोंचलेल्या देवी सुजूं व फुगूं लागून लाल होतात. त्याप्रमाणें दहा बारा दिवसानंतर पत्र्याची चकती आंत बसविली आहे किंवा काय अशा प्रकारचें काठिण्य अथवा कडकपणा त्या उपदंशाच्या चट्यास येतो. (४) आठव्या दिवशीं टोंचलेल्या देवीची पुळी जशी उत्तम फुगाची तशी फुगून मग ती फुटून लस वाहून  तिची खपली धरते. पण ही लस त्याच मुलाच्या दुसर्‍या जागीं टोंचली तर त्याचे अंगी आतां ती रोगप्रतिबंधक शक्ति आल्यामुळें नवी पुटकुळी येत नाही. उपदंशाच्या चट्यांतील लस त्याच माणसास दुसरे जागीं टोंचली तर नवीन चट्टा रोग्याच्या अंगी तो रोग प्रतिबंधकशक्ति आल्यामुळें उत्पन्न होत नाहीं. (५) ही प्रतिबंधकशक्ति त्या मुलाच्या अंगीं कांहीं  वर्षें कधीं तर जन्मपर्यंत टिकते. त्याचप्रमाणें उपदंश रोगप्रतिबंधकशक्ति त्या रोग्याच्या अंगीं जन्मभर असते. यावरून या दोन्ही रोगांत प्रथम एक प्रकारचें विशिष्ट रोगबीज; त्याचा शरीरांत प्रवेश; रोगाची निद्रितावस्था, रोगप्रवेशाच्या जागीं ठरीव प्रकारची पुटकुळी अगर चट्टा; प्रकृतीवर परिणाम; व नंतर शेवटीं कांही दीर्घकालपर्यंत टिकणारी रोगप्रतिबंधकशक्ति ही परंपरा असलेली उघड दिसून येते. शिवाय ज्याप्रमाणें देवी एकदां टोंचल्या असतां प्रतिबंधक शक्ति संपल्यामुळें पुन्हां देवी येणें संभवनीय असतें तसें फार क्वचित् उपदंशहि त्याच रोग्यास पुन्हां दूषितसंभोगानंतर होणें संभवनीय असतें. रोगाचा प्रकृतीवर जन्मभर परिणाम घडतो. व म्हणून त्याच्या तीन किंवा चार अवस्था सोईसाठीं ठरविल्या आहेत. त्यांपैकीं प्रथमावस्था वर वर्णिली आहेच. हींत दूषित संसर्ग होऊन

कठिन प्रकारचा चट्टा सुमारें दीड महिन्याच्या अवधींत बनणें हें लक्षण होतें. चट्यापासून अन्नरसवाहिन्यामार्गें रोगविष नजीकच्या जांघाडांतील अन्नरसग्रंथींत शिरतें; डॉक्टर अगर सुइणीच्या बोटास चट्टा झाल्यास काखेंतील ग्रंथि, ओठावर चट्टा झाल्यास गळ्याखालील गांठ ठणक होतात पण दुखत नाहींत. फार हालचार करण्यानें क्वचित काळीं त्या सुजतात पण हें अपवादात्मक जाणावें. यानंतर शरीरांतील सर्वच रसग्रंथी टणक होतात. शरीरांत विष भिनतें. व हीसच रोगाची द्वितीयावस्था म्हणतात. तींत प्रकृतींत बिघाड होऊन सर्वांगावर दोन्ही बाजूंस कधीं कोंड्यासारखे तर कोठें गुलाबी लालसर, कोठें पुळ्या तर कधीं चिघळलेल्या पुटकुळ्या अथवा वाटोळ्या गांठीच्या आकाराचे फोड उत्पन्न होतात. तोंड, ओठ गालाच्या आंतील भाग, गुद, योनि या ठिकाणीं त्वचा भंग पावून व्रणित होते. व यास कांहीं तरी क्षुल्लक निमित्त (जसें तंबाकू ओढणें किंवा खाणें) पुरें होतें. उपचार केल्यानें हे सर्व प्रकार बरे होतात. यानंतर रोगाच्या तृतीयावस्थेस आरंभ होतो. रोगी अशक्त झाला असेल किंवा औषधोपचार नीट झाले नसतील तर शरीरांत उपदंशजन्यार्वुध्दें होऊन तीं फुटून त्यांचे मोठाले व्रण होतात.  हीं अर्बुदें त्वचा, स्नायू, यकृत, मेंदु, अस्थी व इतर कोणत्याहि भागांत होतात. हें या रोगाचें अति संक्षिप्‍त वर्णन झालें. कधीं रोग्यास वाटतें कीं इंद्रियावरील चट्टा म्हणण्यासारखा मोठा नाहीं व लवकर बरा झाला आहे. यावरुन उपदंश सौम्य प्रकारचा असावा. कित्येक वेळां तर चट्टा झालेला रोग्यास कळत सुध्दां नाहीं इतका तो क्षुद्र असतो खरा पण यावरून पुढें प्राप्‍त होणारी रोगाचा द्वितीय व तृतीयावस्था सौम्य येईल ही आशा मात्र निष्फल होते. या आशेमुळें रोगी औषधोपचारांमध्यें हलगर्जीपणा करतो व जरी चट्टा सौम्य असला तरी लक्षणें उलट दुप्पट जोरानें होतात. तेव्हां हा रोग झाला असतां औषधोपचार बंद करणें ही गोष्ट रोग्यानें आपल्या मर्जीवर न ठेवतां डॉक्टर अगर वैद्य पुरे म्हणेपर्यंत औषध घेतलें पाहिजे. पोटांत पारद रसायनें द्यावीं लागतात; व द्वितीयावस्थेंतील लक्षणें नाहींशी झाल्यावरहि पुष्कळ दिवस म्हणजे एकंदरींत सुमारें दोन वर्षें औषध फक्त कधीं काळीं मध्यें थोडे दिवस सोडून घेतलें पाहिजे. वैद्याचें लक्ष रोगाचा आमूल उच्छेद करण्याकडे असतें व तो नुसत्या बाह्य लक्षणांकडे लक्ष देत नाहीं. रोगी मात्र फक्त बाह्य लक्षणें नाहींशीं झालीं म्हणजे औषध बंद ठेवून पुनरुपि रोग दुप्पट वाढल्यामुळें पश्चातापांत पडतो.

साध्यासाध्य विचार - रोगी वैद्यात नेहमीं विचारतो की हा रोग पूर्ण बरा होतो किंवा नाहीं. याचें उत्तर ''होय'' असें वैद्यानें देण्यास बिलकूल हरकत नसते. पण मोठी पंचाईत एवढीच असते कीं, या रोगास फार काळपर्यंत औषध घ्यावें लागत असल्यामुळें ''मजवर विश्वास ठेवून न कंटाळता मी पुरे म्हणेपर्यंत औषध घेशील तर रोगमुक्त होशील.'' या वैद्यानें दिलेल्या सूचनेकडें प्राय दुर्लक्ष केलें जातें. तसें न होईल तर हा रोग अगदीं साध्य आहे. शिवाय ''सालव्हरसॅन'' या नवीन टोंचून घालण्याच्या औषधाचा शोध लागल्यापासून या रोगाची दीर्घकालीन चिकित्सा पुष्कळच कमी त्रासदायक झाली आहे. कांहीं रोग्यांनां आतां रोग झाल्यामुळें सर्वांगावर खात्रीनें चट्टे, डाग, पुळ्या उठतील, केस गळतील, सांध्यांनां व हातापायांनां कळा लागतील, चेहरा बिघडेल याची मनस्वी धास्ती बसून निराशेनें कांहीं प्रयत्‍न करीत नाहींत. त्यांनां असें कळलें पाहिजे कीं, आरंभापासून औषध घेतलें तर वरील गोष्टी कळत न कळतच होतील किंवा कदाचित मुळींच होणार नाहींत. कोणी रोगी विचारतात कीं, हा रोग वायुसंचारी आहे किंवा स्पर्शसंचारी आहे; म्हणजे मी घरांत राहूं किंवा नको. याचें उत्तर असें आहे कीं, त्यानें घरांत खुशाल रहावें; पण आपली ताटवाटी, पेलाबशी, वस्त्रें व बिछाना अगदीं वेगळीं असलीं व कोणास कडेवर घेणें, कुरवाळणें, मुकें बंद ठेविलें म्हणजे पुरें आहे.

रोगनिदान - हा रोग ओळखणें अगदी आरंभी कधीं-कधीं जरा अवघड असतें; पण दीड महिन्यापासून पुढें केव्हांहि अवघड नसतें. तथापि वृद्धवस्थेंत कांही माणसांनां इंद्रियांत नाना व्याधी व क्षीणावस्था प्राप्‍त होऊन परिक्रमण कंपावायुरोग, सहपक्षाघात, चित्तभ्रम, वीक्षणमज्जाक्षय, कनीनिकांची प्रकाशसंवेदनशक्ति र्‍हास, धमनीकाठिण्यारोग, धमनीविस्तरण रक्तार्बुद रोग व आणखी कांही रोग होतात; आणि यांपैकीं सर्वांनां जरी नाहीं तरी शेंकडा ७० ते ८० जणांनां तारुण्यात उपदंश झाला होता अशी माहिती मिळते. औषधोपचारासाठीं अशी बिनचूक माहिती मिळणें अवश्य असतें. परंतु कित्येकांनां तशी नीट माहिती देतां येत नाहीं; अगर मुद्दाम देत नाहींत. कित्येक जण पूयप्रमेह अगर साधा मृदु चट्टा तरुणपणीं झाला असून आपणांस उपदंश झाला होता अशी माहिती चुकून देतात. रोगाच्या अन्य लक्षणांवरुन (अंगावरील डाग, केस गळणें, डाहें व सांधे सुजणें, स्त्रियांनां वरचेवर गर्भपात) उपदंश झाला होता असा अजमास करणें बिनचूक असलेच असें म्हणवत नाही. तृतीयावस्थेंत उपदंश हें कारण असून रोगोद्रव असावा अशी शंका असल्यास उपदंशावरील औषधोपचार केल्यानें एकदम उतार पडून तें औषध म्हणजे एक रोगनिदानाचें साधनच होतें. पण चतुर्थावस्था असल्यास तो औषधोपचार उपयोगी पडत नाहीं. अशा वेळीं या रोग्यास पूर्वी उपदंश झाला होता किंवा नाहीं ही शंका डॉक्टरास येणें साहजिक असतें. व यासाठीं या रोगनिदानाचें ''वॉसरमन प्रतिक्रिया'' नांवाचें नवीन चमत्कारिक व विश्वसनीय साधन उपलब्ध झालें आहे. त्याची उभारणी पुढील तत्त्वावर केली आहे एका प्राण्याचें रक्त (उदाहरणार्थ  बैलाचे) दुसर्‍या प्राण्याच्या शरीरांत (उदा. सशाच्या) वरचेवर टोंचून घातलें असतां सशाच्या रक्तांतील लशींत रोगप्रतिबंधक शक्ति उत्पन्न होते. व नंतर ही लस बैल जातींतील प्राण्यांनां टोंचली तर त्यांच्या रक्तांतील रक्तपेशीनाश होतो. ही लस ५६० सेंटिग्रेडपर्यंत तापविली तर तींतील ही शक्ति नष्ट होते. हें रोगनिदान फार भानगडीचें व सूक्ष्म असल्यामुळें निष्णात जंतुशास्त्रज्ञाच्या हातूनच तें व्हावें लागतें. त्याची विस्तृत माहिती देणें येथें शक्य नाहीं. लस मिळण्यासाठीं ज्या माणसाचें रोगनिदान करावयाचें त्याचें थोडें रक्त घ्यावें लागतें व मग तें ५६० सेंटिग्रेडपर्यंत तापवितात. उपदंशरहित निरोगी माणसाची लसहि तुलनेसाठीं त्याबरोबर ठेवतात. त्या लशींत निरनिराळीं द्रव्यें घालून त्यास दोन तास आंच देऊन नंतर हें प्रतिक्रायानिदान सिद्ध होतें. जर रोग्यास खरोखरी उपदंश असेल तर रक्तपेशीनाश होणार नाहीं व उलटपक्षीं रक्तपेशीनाश होतो.

या रोगावरील उपचार - भिन्न मनुष्याची भिन्न प्रकृति असल्यामुळें औषधोपचार हे अगदी कायम ठशाचे नसतात व यासाठीं ठरीव औषधें व नियम घालून देतां येत नाहींत. पण पुष्कळ वर्षांचा अनुभव पाहतां हें स्पायरोकेटा नामक रोगबीज फार चिवट व दीर्घकाळ टिकणारें असल्यामुळें त्यावर त्वरित व फार दिवस उपचार केले पाहिजेत असें सिद्ध झालें आहे. या कामीं तीन प्रकारचे इलाज व औषधें उपयुक्त आहेत - (१) पारद व पारद रसायनें; (२) पोटॅशियम आयोडाइड; (३) सोमलयुक्त रासायनिक औषधें - यांतच सालव्हरसन व निओसालव्हरसन या प्रसिद्ध व नवीन औषधांचा समावेश होतो. हीं तीनहि प्रकारचीं औषधें उत्तम गुणावह आहेत. यांपैकीं सालव्हरसन हें औषध नवीनच (१९०९ सालापासून) प्रचारांत आलें आहे व म्हणून आरंभीं त्याजविषयीं साशंक मत होतें हें ठीकच आहे. व चतुर्थावस्थेंतील रोगप्रतिकार त्यानें होतो किवा कसें हें अद्यापहि अधिक पाहिलें पाहिजे. पण येवढें मात्र खास कीं, आरंभीं होणारीं त्रासदायक लक्षणें या औषधामुळें त्वरित नाहींशी होऊन रोग्यास बरें वाटतें; चट्टा बरा होतो. तसेंच द्वितीय व तृतीयावस्थेंतहि यानें अति त्वरित गुण येतो. म्हणून उत्तम मार्ग म्हणजे या औषधाची एक दोन अंतःक्षेपगें रोग्यानें करुन घेऊन नंतर पारदोपचार बहुतक सतत दोन वर्षें चालू ठेवावे. पण ही अंतःक्षेपणक्रिया अगदीं बिनधोक आहे व सर्वांसच मानवते असें मात्र नाहीं. या औषधास ''६०६'' असें नांवहि कांहीं दिवस होतें. हें शिरांत टोंचून घालतात व तें शिराबाहेर यात्किंचितहि न पडेल याविषयीं कमालीची सावधगिरी ठेवावी लागते. तें टोंचण्याच्या कामीं अत्यंत दक्षता बाळगावी लागते. टोंचण्याचें औषध विरघळण्यासाठीं अत्यंत शुद्ध व ताज्या बाष्पजलाचा उपयोग करावयास हवा. औषध टोंचण्याच्या अगोदर सुईंतून थोडेसें (अर्धा औंस) अमृतजल शिरेंत घालतात म्हणजे सुई शिरेंत नीट गेली आहे किंवा नाही तें समजतें व ''सालव्हरसनचा'' थेंब शिरेबाहेर सांडण्याचें भय थांबतें. नंतर ''सालव्हरसन'' घातल्यावर पुन्हां सुईवाटे सुई धुवून जाण्यासाठी अर्धा औंस अमृतजल घालावें. औषधाचें मोठ्या सदृढ माणसात पूर्ण प्रमाण ६ ग्रॅम असतें. अशक्त माणसास प्रथम ३ ग्रॅम टोंचावें व दहा दिवसानंतर पुन्हां तितकेंच टोचावें. लहान मुलांचें प्रमाण १ पासून वयमानाप्रमाणें ३ ग्रॅम इतकें असावें. दोन टोंचण्यांमध्यें निदान दहा दिवसांचें अंतर असावें. टोंचण्याच्या पूर्वी रोग्यानें १२ ते १४ तास बिछान्यांत पडून रहावें व टोंचल्यानंतर तो दिवस व रात्र पडूनच असावें हें उत्तम. टोंचल्यानंतर कांहीं वेळानें डोकें दुखी, मळमळ, अगर ओकारी, थोडा ज्वर, यांपैकीं लक्षणें होण्याचा संभव असतो. निओ सालव्हरसन हें एक त्याच वर्गांतील औषध आहे. हें टोंचण्यांत एक फायदा असा आहे कीं मागाहून होणारीं त्रासदायक लक्षणें होत नाहींत व दुसरें, तें टोंचण्यापूर्वी त्यांत रासायनिक पदार्थ सालव्हरसनप्रमाणें घालावे लागत नाहींत. त्याचे मोठ्या माणसाचें प्रमाण ८ पासून १.५ ग्रॅम असतें आणि दोन टोंचण्यांमध्यें १ महिना अंतर असावें लागतें. हें टोचणें स्नायूंमध्यें उपयोग नाहीं. कारण त्यापासून इजा होते. म्हणून तें त्वचेखाली टोंचावें. वरील दोन्ही औषधें जर्मन वैद्यांचीं आहेत. तसल्याच इंग्रजी औषधास ''खारसिव्हन'' आणि ''निओ खारसिव्हन'' अशीं नांवें आहेत. फ्रेंच औषधेंहि आहेत व हीं सगळीं जर्मन औषधाइतकींच गुणकारी आहेत असें म्हणतात. हीं औषधें तृतीयावस्थेंतील गोल व पसरट उपदंश जन्यार्बुदें बरीं होण्यासाठींहि उपयुक्त आहेत व परिक्रमण कंपवायूरोग आणि सहपक्षाघातचित्तभ्रमरोगांत उपयुक्त असतातच. निदान त्यापासून रोग्याची मानसिक लक्षणें तरी पुष्कळ कमी होतात व चित्तभ्रम रोगांत पूर्वी झालेला उपदंश फार जुनाट नसेल तर उपयोग होतो. मेंदू व पृष्ठवंश रज्जू सुध्दां रोगग्रस्त झाली असल्यास टोंचणें पाठांच्या कण्यांत करावें लागतें व तें जरा धोक्याचें आहे. त्यांत पारदयुक्त अलब्युमिन हें औषध मिश्र करुन घातलें असतां फायदा झाल्याचें कांहीं रोग्यांत दिसून आलें आहे. कोणचेंहि औषध सुरू केलें तरी मधुन मधुन वॉसरमनप्रतिक्रिया निदानाच्या साहाय्यानें रोग बरा झाला आहे किंवा नाही हें पहात असावें. उदाहरणार्थ प्रथम ''सालव्हरसन'' टोंचल्यानंतर दहा ते चौदा दिवसांच्या आंत पुन्हां टोंचावें. नंतर तीन चार महिने पारदरसायनें द्यावींत. मग तीं बंद करुन वरील प्रतिक्रियानिदानानें रोग अद्याप जागृत आहे असें ठरल्यास पुन्हां पारदरसायनें सुरू करावींत. जर रोग जागृत नाही असा निकाल मिळाला तर पुन्हां ''सालव्हरसन'' टोंचून रोगास जागृत करण्याचा प्रयत्‍न करावा; व पुन्हां प्रतिक्रियानिदान करवावें. त्याचा निकाल ''अस्तिपक्षि'' आल्यास पुन्हा पारदरसायनें घेणें जरुर आहे व ''नास्ति'' असा निकाल आल्यास कांहीं काळ औषध बंद ठेवावें. याप्रमाणें सुमारें दोन वर्षें काम सुरु ठेवला पाहिजे. पारादाचीं औषधें कित्येक महिने घ्यावयाचीं असल्यामुळें ती पोटांत घेण्याचें प्रमाण असें बेतानें असावें कीं त्यानें गुण तर यावा पण हिरड्या सुजून लाळ गळून त्रास तर होऊं नये. या औषधांचे अनेक प्रकार आहेत. पण त्यांतील सौम्य प्रकारचीं औषधें गेणें उत्तम, तीं येणेंप्रमाणेः- (१) रसकापूर १ १/२ ते १/१२ ग्रेन; त्याचा द्रव, ६० ते ८० थेंब. दिवसांतून तीन अगर चार वेळां. (२) पारद कर्काद (हायड्रार्जिरम कमक्रेटा) एक ते दोन ग्रेन, तितक्याच वेळां; अगर पारदमय कर्कर १ ग्रेन व डोव्हरचूर्ण १ ग्रेन रोज दोन ते चारदां, हीं सर्व इंग्रजी औषधें आपल्या हिंदी रोग्यास निम्या प्रमाणांत द्यावींत.

पारदाचा अंमल प्रकृतीवर बसण्यासाठीं तें मलमाच्या रुपानें चोळल्यानें उत्तम उपयोग होतो यांत शंका नाहीं. पण हें चोळणें वक्तशीर व व्यवस्थितपणें त्यावर स्वतंत्र मनुष्य नेमून केलें पाहिजे. पारदाचें मलम (३० ग्रेन) घेऊन त्यांत लानोलीन हा स्निग्ध पदार्थ तितकाच घालून तें मिश्र मलम दररोज नव्या जागीं पाव ते अर्धा तास चोळावें. एके दिवशीं दंड दुसर्‍या दिवशीं बाहू, पुढें मग छाती, मांड्या, पाय वगैरे व पुन्हां दंड असा क्रम ठेवावा. या मार्गानें पारद घेणें असल्यास दीड महिना वरीलप्रमाणें रोज अंग चोळून घेणे; नंतर तीन महिने विश्रांति, नंतर पुन्हा दीड महीना अंग चोळून घेणे व तीन महिन्यांची चोळण्यास विश्रांति; नंतर वीस दिवस चोळणें व एक महिना विश्रांति असा कार्यक्रम दोन वर्षांच्या मुदतीचा बसवावा.

पारस रसायण ढुंगणाच्या स्नायूंत टोंचणें यासाठी यापुढें सांगितल्यापैकी एखादें औषध योजतात. (१) रसकापूर, १/३ ग्रेन; (२) पारदाचें रक्त आयोडाइड; (३) क्यालोमेल; (४) आलिव्ह तेलांत व लानोलीन या स्निग्ध पदार्थांत कालविलेली पारद धातु. हीं सर्व औषधें सैन्यांतील रोग्यांनां देण्यास सोइस्कर आहेत. टोंचण्यापासून दुःख मात्र जरा बरेंच असतें हा त्यांत एक विशेष तोटा आहेत. वरील प्रकारांपैकीं कोणत्याहि प्रकारानें शरीरांत पारद घेत असता पाळण्याचें पथ्य येणेंप्रमाणें आहे - रोग्याचें तमाखू खाणें व ओढणें वर्जावें. उत्तेजक गोष्टीचें सेवन करूं नये (म्हणजे मद्य, अति चहाकाफीपान संभोग इ.). मुख, दांत, दाढा व जीम या ठिकाणीं अत्यंत स्वच्छता राखावी व जितक्या प्रकारांनी शुद्ध तर्‍हेनें अनियमितपणाचा त्याग करुन रहातां येईल तितकी शुद्ध रहाणी ठेवावी. मैथुन, अति थंडी अगर उष्णता वर्जावी. कपडे ॠतुमानाप्रमाणें घालावे. जांग्रणें करूं नयेत. एकंदरींत कोणी एकानें या रोगाविषयीं विनोदानें म्हटलें आहे त्याप्रमाणें या रोग्यांनीं अगदीं ''साधुतुल्य'' वृत्ति ठेविली पाहिजे. गोंवर, देवी हे सांथीचे रोग आपोआप बरे होतात तसें या रोगाचें बिलकूल नाहीं व रोग्यानें आपली प्रकृत सर्वस्वी वैद्य डाक्टरच्या नजरेखाली ठेवावी. सबंध रोगपूर्ण बरा झारा पाहिजे. नुसताच चट्टा बरा होणें व अंगावरील फोड मावळणें म्हणजे रोग बरा झाला असें नव्हे. स्त्रियांनां रोग झाल्यावर त्यांनां गरोदरपणीं पूर्ण दिवस जात नाहींत त्यासाठीं अगर त्यांच्या पोटीं जन्मणार्‍या सुरकतलेल्या व रोड बालकास पारद दिला असतां त्याचा रोग नाहींसा होतो. असल्या बालकाच्या गुदद्वाराशीं व तोंडाशीं जे व्रण पडतात ते अत्यंत स्पर्शसंचारी असतात. त्याच्या पायांचीं व इतर हाडें जाड होतात. नाक चपटें, डोकें मोठें व साधारण चौकोनी, तोंडावर रेषेप्रमाणें वण, खुजेपणा, पुढील दांतांचा अर्धचंद्राकृति टवका निघालेला, असे याचें स्वरुप असतें. हें मूल निरोगी बाईनें पाजलें तर तिच्या स्तनावर उपदंशाचा चट्टा उठतो पण त्याच्या स्वतःच्या आईस कांहीं होत नाहीं. ही सर्व माहिती ज्यांस पारद उपयोगी आहे त्याविषयीं झाली.

पोट्याशियम आयोडाइड - या रोगाच्या उत्तरार्धांत अगर दोन वर्षानंतर लागलीच हा क्षार व रसकापूर द्रवाचें मिश्रण रोग्यास फार उपयुक्त असतें व त्यानें यकृत, अंड, मेंदु, त्वचा, हाडें इत्यादि ठिकाणी मांसार्बुद होऊन भयंकर स्थिति झाली असताहि व उपदंशजन्य इतर अनेक व्याधींत आश्चर्यकारक गुण लवकर दिसून येतो. ज्यांस लग्नापूर्वी उपदंश झाला आहे त्यानें औषधोपचार नीट दोन वर्षें करुन पुढें कांही एक लक्षणें होत नाहींत असें पाहून मग लग्नांस कदाचित् उद्युक्त व्हावें.

प्रतिबंधक उपाय - सरकारनें कायद्याचें साहाय घेऊन वेश्या वगैरे रोगप्रसार करणारांनां मनाई करणें अवघडच आहे. त्यांनां स्वतःला आपणास उपदंश आहे हें बरेच दिवस कळत नाहीं. सरकारनें वैद्यांनां सालव्हरसन औषध मोफत पुरवून हा रोग स्वल्प खर्चानें रोग्यास बरा करतां यावा अशी तजवीज करावी. वासरमन प्रतिक्रियानिदान करविण्यासाठीं साधनें व सोई ठेवाव्या. म्हणजे नवीन रोगाचा प्रसार अंशतः बराच कमी होईल कारण हा रोग म्हणजे समाजास मोठें भयच आहे.

गुह्यरोग निदान, आयुर्वेदीय विवेचन - स्त्रीसंग वर्ज करणें, एकदम अविचारानें स्त्रीसंग करणें, दोषदूषित संकीर्ण मलिन व बारीक असा जिचा योनिमार्ग आहे अशा स्त्रीशीं मैथून करणें, म्हैस गाय वगैरे अन्य जातीच्या स्त्रीव्यक्तींशीं संभोग करणें, जिची इच्छा नाहीं अशा स्त्रीशीं संग करणें, बहीण वगैरे अगम्य स्त्रीशीं गमन करणें, नुकत्याच बाळंत झालेल्या बायकोशीं संग करणें, मैथुनानंतर घाणेरड्या पाण्यानें शिस्न धुणें, किंवा मुळींच न धुणें, शिस्न वाढविण्याकरतां तीक्ष्ण औषधांचा लेप वगैरे करणें, मुष्टिमैथुन करणें, दांत किंवा नख लागणें. विषारी शुक लागणें व वीर्याचा वेग आवरुन धरणें यांनी फार वेळ घर्षण झाल्यानें किंवा अतिशय रखरखीत अथवा कठीण अशा इंद्रियाच्या घर्षणानें दोष दुष्ट होऊन गुह्येंद्रियांना जाऊन पुढें सांगितलेले उपदंशादि तेवीस रोग उत्पन्न करतात.

उपदंशरोग पांच प्रकारचा आहे. वातजन्य, पित्तजन्य, कफजन्य व सान्निपातिक, वाताच्या उपदंशांत शिस्न सुजतें. नानाप्रकारच्या वेदना होतात. शिस्न ताठतें व त्वचा फाटते. पित्तज उपदंशांत पिकलेल्या उंबराप्रमाणें सूज येते व ताप येतो. कफजन्य उपदंशांत कठिण, गुणगुळीत, जड व थंड अशी सुज येते व तीस कंड सुटते. रक्तजन्य उपदंशांत शिस्नावर काळे फोड येतात, रक्त वहातें व ताप येतो. सान्निपातिक उपदंशांत वरील सर्व लक्षणें असून शिवाय वृषणहि सुजतात. तीव्र वेदना होतात. ती लवकर पिकते, फाटते, व किडे पडतात. त्यांत रक्तोपदंश याप्य व त्रिदोषजन्य उपदंशमारक आहे.

गुह्येंद्रियांतील रक्त व मांस यांच्या आश्रयानें दोष कुपित होऊन शिस्नाच्या आंत किंवा बाहेर मोड येतात, त्यांस खाज सुटते व त्यांतून बुळबुळीत रक्त वहातें. तसेंच ते बायकांसहि होतात. त्यांचा आकार छत्रीसारखा असतो. त्या मोडांची हयगय केल्यास ते शिस्न, पुरुषत्व, योनी व आर्तव यांचा नाश करतात. कफ व रक्त यांपासून शिस्नाच्या आंत किंवा बाहेर शिरसाच्या दाण्यासारख्या व तेवढ्याच मोठ्या दाट पुळ्या येतात त्यांस सर्षपिका म्हणतात.

कफ व रक्त यांपासून शिस्नावर पुष्कळशा लांबट पुळ्या येऊन त्या मध्यें फाटतात. यांत वेदना होतात व रोमांच उभे रहातात. यास अवमंथ म्हणतात. रक्तपित्तापासून शिस्नावर जांभळाच्या बीसारखी पुळी येते तीस कुंभिका म्हणतात. एक प्रकारची लोंकर उत्पन्न होते ती उत्पन्न होतांच त्वचेचा दाह होतो. ती फार कष्टदायक असून पसरते, ती लाल किंवा काळी असते आणि तिच्या योगानें अतिशय तहान, फोड, दाह, मोह, व ज्वर हे विकार उत्पन्न होतात. हीस अण्डजी म्हणतात. रक्त व पित्त यांपासून उडीद किंवा मूग यांच्यासारखी पुळी होते, तीस उत्तमा म्हणतात. शिस्नावर कमळाच्या गर्भकोशासारखी पुळी होते व तिच्यावर आणखी दुसर्‍या पुष्कळशा पुळ्या येतात. तीस पुष्करिका म्हणतात. हातानें शिस्न अतिशय चोळल्यानें त्यावर पुळी येते तीस संव्यूढ पिटिका म्हणतात. कपड्यानें किंवा दुसर्‍या कशानें तरी घासल्यानें वायु कुपित होऊन जो विकार होतो त्यास मृदित म्हणतात. वायूनें उंच, सखल, कठिण व वांकडी अशी गांठ होते तीस अष्टीलिका म्हणतात. चोळणें वगेरेंनी वायु कुपित होऊन तो शिस्नाचें कातडें मागें उलटवितो. त्यांत ठणका व दाह होतो. आणि कधीं कधीं तें पिकतेंहि. तें चामडें जमून गांठळल्यासारखे होऊन शिस्नाच्या पुढल्या बोंडाच्या खालीं लोंबूं लागतें. त्यांत कफाचा संबंध असल्यास कंड व कठिणपणा असतो. या विकारास निवत्त असें म्हणतात. पूर्वी व्रण झालेला असून तो धडपणीं भरून न येतां त्या ठिकाणची चामडी फाटल्यासारखी झाली म्हणजे त्यास अवपाटिका म्हणतात. वायूनें चामडें दूषित होऊन शिस्नाच्या बोंडास चिकटून राहून त्यानें लघ्वीचें भोंक बंद झाल्यास मूत्र कांहीं वेदना न होतां पण सावकाश येतें आणि बोंड विकास पावत नाहीं. या रोगास निरुद्धमणी असें म्हणतात. कफानें शिस्नावर पुष्कळशीं बारीक बारीक कुसें येतात त्यास ग्रथित म्हणतात. शुक दोषानें रक्तदूषित होऊन त्यापासून शिस्नास स्पर्श कळेनासा होतो त्यास स्पर्शहानी म्हणतात. वात व रक्त यांच्या कोपानें सगळ्या शिस्नभर बारीक तोंडांवीं भोंकें पडतात त्यास शतपोनक म्हणतात. पित्त व रक्त यांच्या दोषापासून शिस्नाच्या त्वचेचा पाक होतो त्यास त्वक्पाक म्हणतात यांत ताप व दाह हे विकार होतात. त्रिदोष कोपापासून मांसाचा पाक होऊन तें सडतें. त्यास मांसपाक म्हणतात. यांत वरील सर्व प्रकारच्या वेदना होतात. सगळ्या शिस्नावर किंचित् तांबुस व काळे असे फोड व पुटकुळ्या येतात आणि त्यांत उग्र वेदना होतात. या रोगास रक्तार्बुद म्हणतात. ग्रंथ्यादि रोग विज्ञानांत मांसार्वुदाचीं लक्षणें सांगितलीं आहेत त्याचप्रमाणें शिस्नावरचें मांसार्वुद होतें. हें त्रिदोषात्मक असतें. शिस्नावरचा विद्रधिहि मागें सांगितलेल्या त्रिदोषजन्य विद्रधीप्रमाणेंच समजावा. त्रिदोष प्रकोपासासून सगळ्या शिस्नावरचें मांस काळें होऊन पिकून गळून पडतें. या रोगास तिलकालक म्हणतात. मांसार्वुद, मांसपाक, विद्रधी, व तिलकालक, हे इतर रोग असाध्य समजून त्यांवर  औषधोपचार करूं नयेत. बाकीच्या सोळा रोगांची ताबडतोब चिकित्सा करावी. दूषित अन्न खाल्यानें, वेडेवांकडे अंग ठेऊन निजल्यानें, अतिशय मैथुन केल्यानें, आर्तव दूषित झाल्यानें, वाईट पदार्थांनीं, आईबापाच्या रक्तवीर्याच्या दोषानें किंवा दुर्दैवानें स्त्रियांस वीस प्रकारचे योनिरोग होताता. योनींत वायु कुपित होऊन त्या ठिकाणी कळ, टोंचण, ताप, मेहरी, मुंग्या आल्यासारखें वाटणें, ताठणें, खरखरीतपणा, शब्द होणें, फेंसाळ, तांबुस रंगाचें, काळें, थोडें पातळ व रुक्ष असें आर्तव येणें, जांघाडे, कुशी वगैरे गळणें व ठणकणें, आणि पुढें हळू हळू रक्तगुल्म व नाना प्रकारचे वाताचे रोग हे उत्पन्न होणें, या विकारांस वातिक योनिव्यापद् (योनिरोग) म्हणतात. हींच लक्षणें पण तीं फार मैथुनामुळें झाली असून त्यांत आणखी सुज असल्यास त्या रोगास अतिचरणा म्हणतात. फार लहान वयाच्या मुलीशीं मैथुन केल्यानें तिचा वायु कुपित होऊन पाठ, पोटर्‍या, मांड्या व जांघाडे यांत पीडा उत्पन्न करुन योनीस दूषित करतो. या योनीरोगास प्राक्चरणा म्हणतात. वेगाचा अवरोध केल्यानें वायु कुपित फार पिडा करतो. त्या योगानें आर्तव उलटून तें फेंसयुक्त होऊन फार कष्टानें बाहेर येतें. या योनिरोगास उदावृत्ता म्हणतात. रुक्षतेमुळें दुष्ट झालेल्या आर्तवापासून उत्पन्न झालेल्या मुलास वायु जन्मतांक्षणींच मारतो, अशा प्रकारच्या योनीस जातघ्नी म्हणतात. फार जेऊन वेडीवांकडी निजलेल्या स्त्रीशीं मैथुन केल्यानें योनिमार्गांतील वायु अन्नानें दबला जाऊन तो योनीच्या आंतलें तोंड, हाड व मांस यांस वाकडें करतो. या योनिरोगास अंतर्मुखी म्हणतात. यांत तीव्र वेदना होतात. गर्भार बायकोनें फार वातुळ आहार केल्यास तिचा वायु कुपित होऊन तो गर्भांत मुलगी असल्याच तिच्या योनीचें द्वार बारीक करतो. अशा प्रकारच्या योनीस सूचीमुखी म्हणतात. ॠतुकाळीं वेगाचा अवरोध केल्यानें वायु दुष्ट होऊन तो मळमूत्राचा अवरोध करुन योनीस शुष्क करतो. तींत अतिशय वेदना होतात. अशा प्रकारच्या योनीस शुष्का असें म्हणतात. जिच्या गर्भांतून वायु सहा किंवा सात दिवसांनी शुक्र बाहेर टाकतो त्यावेळीं कधीं वेदना होते व कधीं होत नाहीं तीस वामिनी म्हणतात. आईची योनी वायूनें विकृत असतां गर्भांत मुलगी राहिल्यास बीजदोषानें ती मोठी बायको झाली तरी तिला स्तन येत नाहींत व पुरुषसंग आवडत नाहीं. तिला पंढयोनी म्हणतात. यावर उपाय नाहीं. दुष्ट झालेला वायु योनीच्या आंतलें तोंड व गर्भाशय यांस अवष्टंभ करतो. त्यामुळें योनी पसरते व बाहेर येते. तिचें माांस फुगतें व तींत वातिक योनीव्यापत्तीप्रमाणें पीडा होतात व अतिशय वेदना होतात. हीस महायोनी म्हणतात. पित्त आपल्या निरनिराळ्या प्रकोपक कारणांनीं कुपित होऊन योनीचा आश्रय करुन राहिलें असतां योनींत दाह, पाक, चुरचुर, कुजकट घाण हे विकार होतात.ताप येतो आणि अतिशय कढत, पुष्कळ, प्रेतासारखी घाण येत असलेलें, निळें, पिवळें किंवा काळें असें रक्त योनींतून वाहतें. या योनिरोगास पैत्तिकी योनिव्यापद् म्हणतात.योनींतून अतिशय रक्त नहातें तीस रक्तयोनी म्हणतात.

अभिष्यंदि पदार्थांनीं कफ कुपित होऊन योनींत पुढील विकार उत्पन्न करतो. तींत वेदना होत नाहींत. ती थंड, पांढरी व बुळबुळीत असून तिच्यांतून तशाच प्रकारचा स्त्राव होतो व तीस फार कंड सुटते. या योनिरोगास श्लैष्मिकी अथवा कफजन्य योनिव्यापद् म्हणतात. वात व पित्त यांच्या कोपापासून आर्तवस्त्राव कमी होतो आणि योनींत दाह, कृशता व निस्तेजपणा हीं लक्षणें होतात. अशा प्रकारच्या योनीस लोहितक्षया म्हणतात.

पित्तप्रकृतीच्या स्त्रीनें पुरुषसंभोगाच्या प्रसंगीं शिंक किंवा ढेंकर ही जिरविली असतां पित्तसहित वायु कुपित होऊन योनीस दूषित करतो. त्यायोगें ती सुजते, व तिला स्पर्श सोसत नाहीं. अतिशय ठणका लागतो. निळें व पिवळें रक्त वहातें. बस्ती व कुस हीं जड होतात. जुलाब होतात, अरुची होते, ताप येतो, आणि कंबर व जांघाडे यांत कळ व टोंचण होतें अशा योनीस परिप्लुता म्हणतात.

जीत वायु व कफ यांचे विकार होतात आणि जिच्यांतून पांढरा बुळबुळीत स्त्राव होतो तीस उपप्लुता म्हणतात. योनी स्वच्छ व धुतल्यामुळें तींत किडे पडतात, अतिशय खाज सुटते आणि खाज फार असल्याप्रकारणानें त्या स्त्रीस मैथुनाची अतिशय इच्छा होते अशा प्रकारच्या योनी विप्लुता म्हणतात.

बाळंत होतांना अवेळीं कुंथल्यानें कफ व रक्त यांच्याशीं वायु मिसळुन योनींत आर्तवमार्गाला अडथळा करणारी कर्णिका म्हणजे मांसाची वळी उत्पन्न होते त्या योनीस कर्णिका असें म्हणतात. वातादि तिन्ही दोष कुपित होऊन योनी व गर्भाशय यांच्या आश्रयानें आपापले विकार उत्पन्न करतात. या रोगास सांन्निपातिक योनिव्यापद् म्हणतात. याप्रमाणें हे योनिरोग सांगितले. यांच्यामुळें स्त्री वीर्य ग्रहण करीत नाहीं. त्यामुळें तिला गर्भ रहात नाहीं आणि रक्तप्रदर, मूळव्याध, रक्तगुल्म वगैरे दारुण रोग तसेच इतरहि वातादिकांपासून होणारे रोग उत्पन्न होतात.

उपदंश चिकित्सा आयुर्वेदीय विवेचन - उपदंश नवीन असतांच शिस्नाच्या मध्यभागीं शीर तोडावी. लेप, सेचन वैगेरे थंड उपचार करावे. शोधन करावें. त्यांत विशेषकरुन रेचक द्यावें. पिकल्यास चिरून तिळांचा कल्क, तूप व मध यांचा लेप करावा. उपदंशाची चिकित्सा दोषानुरोधानें प्रथम सुजेप्रमाणें व नंतर व्रणाप्रमाणें करावी. प्रथम उपदंशाचा पाक न होईल याबद्दल अगदीं होईल तितकी काळजी घ्यावी. कारण स्नायू, शिरा व मांस यांचा पाक झाला कीं बहुश शिस्नाचा नाश होतो. लिंगार्श कापून क्षारानें किंवा अग्नीनें भाजून मग उपदंशाप्रमाणें चिकित्सा करावी. शिस्नावरील निरनिराळ्या पीटिका (पुळ्या) व्रणाप्रमाणें पिकवून फोडून बर्‍या कराव्या.

निवृत्तात शिस्नास तूप लावून शेकून तीन किंवा पांच दिवस उपनाह स्वेद करावा. नंतर पुनः पुष्कळ स्निग्ध पदार्थांनीं शेकून चामड्यास तूप लावून शिस्नाचें बोंड हळूहळू दाबीत चामडें पुढें आणावें. बोंड चामड्यांत शिरलें म्हणजे वरचेवर पोटिसें बांधावीं; आणि रोग्यास स्निग्ध भोजन घालावें. अवपाटिकेवरहि वरच्यापैकीं स्नेह, स्वेद, व स्निग्ध भोजन हे उपचार करावे.

निरुद्ध मण्यावरहि लाखलिंपून गुळगुळीत केलेली आरपार नळी तेलांत बुडवून शिस्नांत घालावी आणि तिच्यांतून बलातेल वैगेरे वातनाशक तेलें आंत घालीत रहावें तीन तीन दिवसांनीं मोठमोठी नळी घालून भोंक मोठें करावें. या रीतीनें इष्ट सिद्धी न झाल्यास कुशल वैद्यानें शिवणीची जागा सोडून इतर ठिकाणीं मोठ्या दक्षतेनें फाडावें आणि नंतर त्यावर सगळी जखमेवरची चिकित्सा करावी.

रक्तार्बुदाची चिकित्सा रक्तविद्रघीप्रमाणें करावी. सामान्यतः सर्व प्रकारच्या शिस्न रोगांवर त्या त्या अवस्थेनुसार काढा, लेप, तूप, तेल, शोधन, रोपण वगैरे व्रणावरचे उपचार करावे. सर्व प्रकारच्या योनिरोगांवर व विशेषतः वातज योनिरोगांवर बहुधा स्नेहन, स्वेदन, बस्ती वगेरे वातनाशक चिकित्सा करावी. वातावांचून स्त्रियांची योनी दूषित होत नाहीं म्हणून प्रथम त्यास जिंकून नंतर इतर दोषांवर औषधोपचार करावे.

योनी भलतीकडे गेली असल्यास स्नेहन स्वेदन करुन योग्य जागीं सारखी बसवावी. वांकडी झाली असल्यास हातानें सरळ करावी; संकुचित झाली असल्यास विस्तृत करावी; बाहेर आली असल्यास आंत घालावी; आणि उलटी झाली असल्यास सुलटी करावी. योनी आपल्या स्थानापासून सुटली की ती शल्यासारखी होते. स्त्रीला प्रथम हलकेसें वमन, विरेचन व नस्य द्यावें आणि त्यांच्या योगानें ती सर्व प्रकारें शुद्ध झाली म्हणजे मग वस्ती, अभ्यंग, शेक, लेप व औषधांत भिजविलेले कापसाचे बोळें योनींत ठेवणें हे उपाय करावे.

पित्तजन्य योनिरोगांवर थंड व पित्तनाशक असे शेक, अभ्यंग व बोळे यांचा उपयोग करावा आणि स्नेहनार्थ घृर्ते द्यावीं. पुष्यानुग नांवाचें चूर्ण या विकारांत फार गुणावह आहे असें आत्रेय ॠषि म्हणतात. कफजन्य योनिरोगावर सर्व रुक्ष व उष्ण औषधोपचार करावे. जवांचें अन्न, अभयारिष्ट, उंसाची दारू, तेल आणि पिंपळी, लोहभस्म व हिरडे यांचे मधुयुक्त प्रयोग यांचें सतत सेवन करावें. ताठरलेल्या व खरखरीत योनींत मांसाचा खेमा, खिचडी व दुधांत शिजविलेले पदार्थ धारण करावे, म्हणजे ती मऊ होते.

योनीस घाण येत असल्यास सर्व सुगंधी औषधांचा काढा, त्यांनीं सिद्ध केलेलें तेल, त्यांचा कल्क किंवा चूर्ण हीं लावावीं म्हणजे घाण जाते. कफजन्य योनिरोगावर बहुशः तिखट औषधांचे गोमूत्रमिश्रित वस्ती द्यावे. पित्तज योनिरोगांवर जेष्ठमधाचा कल्क व दूध घातलेले आणि वातज योनिरोगावर तेल व कांजी वगैरे आंबट पदार्थ घातलेले बस्ती द्यावे. सांनिपात्तिक योनिरोगांवर त्रिदोषनाशक चिकित्सा करावी.

   

खंड १३ : घ - जलपैगुरी  

 

 

 

  घंटय्याकवि
  घटोत्कच
  घटोत्कच लेणीं
  घड्याळ
  घनी
  घनौर
  घांट
  घाटगे
  घाटाळ
  घातमपूर
  घानची
  घायपात
  घारगड किल्ला
  घारघोडा
  घारापुरी
  घाशीराम कोतवाल
  घांसदाणा
  घासी
  घिरथ
  घिसाडी
  घुगुस
  घुंड
  घुबड
  घुराम
  घेरिया
  घेवडा
  घोटकी
  घोडबंदर
  घोडा
  घोडाघांट
  घोडाबारी
  घोडासर
  घोडें
  घोडेघांस
  घोरपड
  घोरपडी
  घोरपडे
  घोरी घराणें
  घोशी
  घोसाळे
  घोसी
  घोळ
 
 
  चउमू
  चकमा
  चकला रोषनाबाद
  चकवाल
  चकिया
  चक्कियर
  चक्कीनोआरो
  चक्रपाणि
  चक्रवर्ती
  चक्राप्पा
  चंगनाचेरी
  चंगर
  चच, चचनामा
  चचान
  चटया
  चडार
  चंडी
  चतुरमहाल
  चतुर साबाजी
  चतुरसिंग
  चतुर्थ
  चत्रा
  चॅथॅम
  चंदगड
  चंद घराणे
  चंदन
  चंदभाट
  चंदरभान
  चंदावरकर, नारायण गणेश
  चंदासाहेब
  चंदीपुर
  चंदेरी
  चंदेल्ल
  चंदौली
  चंदौसी
  चंद्र
  चंद्रकोना
  चंद्रगिरी
  चंद्रगुप्त
  चंद्रगोमिन्
  चंद्रनगर
  चंद्रभागा
  चंद्रहास
  चंद्रावती अथवा चंद्रावली
  चन्नगिरी
  चन्नपट्टण
  चन्नबसव
  चन्नरायपट्टण
  चंपा
  चंपानेर
  चपारण
  चंपावत
  चंपाषष्ठी
  चंबळा नदी
  चबा संस्थान
  चमारडी
  चरक
  चरखा
  चरखारी
  चरणदासी
  चरणव्यूह
  चरबी
  चरबीचें झाड
  चरी
  चर्मण्वती
  चलत-चित्रें
  चलन
  चल्लाकेरे
  चवळी
  चहा
  चक्षुर्मंनु
  चाकण
  चाकवत
  चागई
  चांगदेव
  चांगभकार
  चांगा केशवदास
  चाघताइखान
  चांचेगिरी
  चाचो
  चांडोद
  चाणक्य
  चातुर्मास्य
  चातुर्मास्य याग
  चातुर्वर्ण्य
  चात्सु
  चादचा
  चांदपूर
  चांदबिबी
  चांदभाट
  चांदला
  चांदवड
  चांदा
  चांदूर
  चांदूर बाजार
  चांद्रायण
  चानन शानन
  चानस्मा
  चानाल
  चानोड
  चाप्रा
  चाफळ
  चाबुआ
  चांभार
  चाम
  चामखीळ
  चामन
  चामराजनगर
  चामुंड
  चामुर्शी
  चार
  चारखा
  चारण
  चारदुआरं
  चारसद
  चारा
  चारीकार
  चार्टिझम
  चार्लंमांट, अर्ल ऑफ
  चार्वाक
  चालुक्य घराणें
  चालसिस
  चावडा
  चावंद
  चास-कमान
  चॉसर
  चासा
  चाहमान उर्फ चौहान
  चाळिसगांव
  चिक
  चिकंजी
  चिकबळ्ळापूर
  चिकाकोल
  चिकोडी
  चिक्कणर्ति
  चिक्केरूर
  चिक्टीआबर
  चिक्नायकन्हळ्ळी
  चिक्मगळूर
  चिखलदरा
  चिखली
  चिंगलपट
  चिंच
  चिचगड, जमीनदारी
  चिंचलीगदड
  चिंचवड
  चिचेवाडा
  चिंचौली
  चिंच्यु
  चिटणीस
  चितलनगर जमीनदारी
  चितळ
  चितळदुर्ग
  चिताकुल
  चिंतामणी
  चिंतामणी कवि
  चिंतामणी रघुनाथाचार्य
  चितारी
  चिति
  चितोड
  चित्तगांग
  चित्तगांग डोंगराळ प्रदेश
  चित्ता
  चित्तूर
  चित्फिरोझपूर
  चित्रकला
  चित्रकाव्य
  चित्रकूट
  चित्रकोट
  चित्रगुप्त
  चित्ररथ
  चित्रसंग्रहालयें
  चित्रळ
  चित्रांगदा
  चित्रावाव
  चिदंबर दीक्षित
  चिदंबरम्
  चिंदविन
  चिंदविन नदी
  चिदानंद स्वामी
  चिनडोंगर
  चिनमुलगुंद
  चिन लोक
  चिनसुरा
  चिनाब
  चिनीमाती किंवा केओलिन
  चिन्नविरन्ना
  चिन्नूर
  चिन्योत
  चिपळूण
  चिपळूणकर, कृष्णशास्त्री
  चिपळूणकर, विष्णुशास्त्री
  चिफू
  चिमणाजीआप्पा
  चिमणाजी दामोदर
  चिमणी
  चिरक्कल
  चिराबा
  चिलखत-वेदकालांतहि
  चिलिअनवाला
  चिली
  चिल्का सरोवर
  चिस्ती
  चीझी, अॅंटोनें लिओनार्ड डि
  चीन
  चीनी
  चीपुरुपल्ले
  चीर
  चीराल
  चुका
  चुकचि
  चुटिया
  चुडा
  चुडा संस्थान
  चुडेश्वर
  चुना
  चुनार
  चुंबकजन्य विद्युद्यंत्र
  चुंबकत्व
  चुंबकीय दृकशास्त्र
  चुंबन
  चुमल्हारी
  चुरू
  चूडामण
  चेकोस्लोव्हेकिया
  चेंगीझखान
  चेचेंझे
  चेटवई
  चेट्टी
  चेदूब बेट
  चेंबर्स रॉबर्ट
  चेयूर
  चेर घराणें
  चेरात
  चेरापुंजी
  चेरिअल
  चेरुमन
  चेरो
  चेर्रा
  चेल
  चेसेलडेन, विल्यम
  चेस्टरफील्ड
  चेस्टरफील्ड फिलिफ
  चैतन्य
  चैतसिंग
  चैत्य
  चैन
  चैबासा
  चोखामेळा
  चोवो
  चोडवरम
  चोध्रा
  चोपडे
  चोपदार
  चोबारी
  चोंभा
  चोरांग्ल
  चोरासी
  चोरी
  चोल
  चोल घराणें व चोल साम्राज्य
  चोवीस परगणा जिल्हा
  चौंगू
  चौघाट
  चौथाई, चौथ
  चौधरी
  चौबे जहागीर
  चौल
  चौलमुग्रा
  च्यवन
 
  छछरौली
  छट्टू
  छतारी
  छत्तरपूर
  छत्तिसगड विभाग
  छत्रपूर तहशील
  छत्रसाल
  छत्रे, केरो लक्ष्मण
  छत्रे, विष्णु मोरेश्वर
  छत्रे, सदाशिव काशीनाथ
  छंद:शास्त्र
  छप्पन देशचे राजे
  छप्रौली
  छब्रा
  छलाल
  छात
  छापखाना
  छापिआ
  छाप्री
  छायाचित्रपेटिका
  छाल
  छालिअर
  छिंद, लल्ल
  छिंदवाडा
  छिंपा
  छिब्रामऊ तहसील
  छुईखदान
  छुटिया
  छोटा उदेपूर
  छोटानागपूर
  छोटी साद्री
 
  जकात
  जॅक्सन अॅंड्र
  जॅक्सन व्हिल्ले शहर
  जखमा
  जगजीवनदास
  जगत्याल
  जगदलपूर
  जगदीशपूर
  जगन्नाथ
  जगन्नाथपंडित
  जगन्नाथपुरी
  जगन्नाथ शंकरशेट, मुर्कुटे
  जंगम
  जगय्या पेटा
  जंगल
  जंगल महाल
  जगलूर
  जगाध्री
  जग्रांव
  जंगीपूर
  जघाशूल
  जंजिरा
  जझिया
  जटलंड
  जटामांसि
  जटायु
  जटासूर
  जठरदाह
  जठरव्रण
  जडजीवघाद
  जडद्रव्य
  जडभरत
  जडवाद
  जडान्नविषबाधा
  जडावाचें काम
  जत
  जतिंग रामेश्वर
  जंतुजन्य रोग
  जतोई
  जत्रा
  जंदिआल गुरु
  जंदिआला
  जंदोला
  जनक
  जनजसवंत
  जननेंद्रियांचे गुप्तरोग
  जनमेजय
  जनस्थान
  जनाबाई
  जनार्दनस्वामी
  जनावरें
  जनीजनार्दन
  जपान
  जपानी वार्निस
  जबलपुर
  जंबुकेश्वरस्
  जंबुद्वीप
  जबूसर
  जमखिंडी
  जमदग्नि
  जमरुड
  जमाखर्च
  जमाबंदी
  जमालखान
  जमालपुर
  जमिकुंता
  जमीन
  जमीनदार व कुळें
  जमीनमहसूल
  जमुई
  जमेका
  जमेसाबाद
  जम्नोत्री
  जम्मलमडुगु
  जम्मू
  जयगड
  जयचंद
  जयदेव
  जयद्रथ
  जयनगर
  जयपाल
  जयपूर
  जयपुर जमीनदारी
  जयपुर संस्थान
  जयमल्ल
  जयरथ शृंगार
  जयरामस्वामी
  जयरामात्मज
  जयविजय
  जयसिंह
  जर उतणें
  जरतार
  जरत्कारु
  जरदाळू
  जरा
  जरासंघ
  जरीपटका
  जर्मन सिल्व्हर
  जर्मनी
  जलंगी
  जलजन्य विद्युतशक्ति
  जलघा
  जलपैगुरी

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .