विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
जंदोला - वायव्येकडील प्रांत. दक्षिण वझीरिस्तान पोलिटिकल एजन्सींतील महसूद प्रदेशाच्या सरहद्दीवरील टाकझाम नदीच्या दक्षिण तीरावर असलेलें एक भित्तानी खेडें. उत्तर अक्षांश ३२० २०' व पूर्व रेखांश ७९० ९' येथेंच जवळ एक तटबंदी ठिकाण असून तेथें दोन लष्करी तुकड्या असतात.