विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
जंदिआल गुरू - पंजाब, अमृतसर जिल्हा अमृतसर नॉर्थ वेस्टर्न रेल्वेवरील ६९५९ (१९११) लोकसंख्येचें एक ठिकाण. उत्तर अक्षांश ३१०३४' व पूर्व रेखांश ७५० २'. येथील जमीनदार जाट असून येथें जैन धर्मातील भाब्रा जातीची बरीच वस्ती आहे. ही व्यापारी जात आहे. येथें घोंगड्या व पितळेचीं भांडीं यांचा व्यापार बराच चालतो. १८६७ सालीं म्युनिसिपालिटी स्थापन झाली.