विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
जतोई - पंजाब. मुझपूरनगर जिल्ह्याच्या अलीपूर तहसिलींतील एक खेडें. उत्तर अक्षांश २१० ३१' व पूर्व रेखांश ७०० ५१'.इ.स. १९०१ मध्यें लोकसंख्या ४७४८ होती. बाबर बादशहाच्या बेळीं मीर बजारखान यानें हा गांव बसविली अशी स्थानिक दंतकथा आहे. अठराव्या शतकाच्या अखेरीस सिंधु नदीच्या पुरानें गांव वाहून गेला होता. नंतर थोड्या दिवसानीं हल्लींच्या जागेवर गांव वसला. कांहीं काल भावलपूरच्या ताब्यांत हा गांव होता. मूलराजाबरोबर झालेल्या लढाईत जतोई शीख लोकांनीं राजाचा अधिकार झुगारून ब्रिटीश सरकारास चांगली मदत केली.