प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग तेरावा : घ - जलपैगुरी

जडद्रव्य (मॅटर) - वायूंतून होणारें विद्युद्वहन आणि रेडिअम् व तत्सद्दश धातूंच्या उत्सर्जनाची क्रिया या दोहोंकडे अलिकडे शास्त्राज्ञांनी बरेंच लक्ष्य पुरविलें; त्यांनां जी माहिती वरील प्रयत्‍नाच्या योगानें प्राप्‍त झाली. तीवरून जडद्रव्याची रचना आणि धर्म याविषयीं बरेंच ज्ञान प्राप्‍त झालें; जड द्रव्याच्या धर्माविषयीं (नेचर ऑफ मॅटर) जे कित्येक भानगडीचे प्रश्न उपस्थित झाले आहेत त्यापैकीं काहींचा समाधानकारक असा खुलासा होतो; याशिवाय जडद्रव्याच्या रचनेंसबंधाने या नवीन शोधाच्या योगानें जास्त शोध करतां येण्यासारख्या पद्धति बसविल्या गेल्या आहेत. सध्या आपणास जडद्रव्याच्या रचनेविषयीं जी माहिती उपलब्ध आहे त्यापेक्षां जास्त माहिती थोड्याच काळांत या नवीन पद्धतीनें आपणांस उपलब्ध होईल अशी पूर्ण खात्री वाटत आहे.

जडद्रव्याच्या शास्त्रीय कल्पनेच्या विषयीं कसकशी प्रगति झाली आहे याचा विचार आपण करूं. प्रथमतः अशी कल्पना होती कीं, प्रत्येक जड वस्तु अणूंच्या (मोलिक्यूल) योगानें बनली आहे; व प्रत्येक जातीच्या अणूंच्या अंगी तततत विशिष्ट द्रव्यांचे गुण आहेत. उदाहरणार्थ जलाच्या अणूचें गुणधर्म हवेच्या अणूच्या गुणधर्मापेक्षां निराळे आहेत; व दुसर्‍या सर्व द्रव्यांच्या अणूंच्या गुणधर्मापेक्षां भिन्न आहेत. नंतर डाल्टन याचा परमाणुवाद पुढें आला; त्याचें मत असें होते कीं अणू हें परमाणूंच्या समुदायानें बनले आहेत व ह्या परमाणूंच्या जाती अणूच्या जातीपेक्षां फार कमी आहेत; अणूच्या भिन्न भिन्न अशा असंख्य जाती मानण्यांत आल्या होत्या; परंतु डाल्टननें परमाणूच्या सुमारें ६० - ७० जाती आहेत असें दाखवून दिलें. यावरून असें दिसून येईल कीं, द्रव्याच्या जातींची संख्या दिवसानुदिवस कमी करण्याकडे शास्त्रीय प्रगतीचा कल आहे. अणूंच्या जाती असंख्य मानण्यांत आल्या तर परमाणूच्या फक्त ६० - ७० च जाती मानण्यांत आल्या.

सन १८१५ सालीं प्रौट या शास्त्रज्ञानें नवीनच सिद्धान्त प्रस्थापित करण्याचा प्रयत्‍न केला. त्याचें म्हणणें असें होतें कीं, रासायनिक मूलद्रव्यांपैकी जीं मूलद्रव्यें जड होतीं त्यांचे परमाणू सर्वात हलक्या अशा हायड्रोजनच्या परमाणूचे बनलेले आहेत; यावरून त्यानें असें प्रस्थापित करण्याचा प्रयत्‍न केला कीं, हें सारें जड-विश्व हायड्रोजनच्या परमाणूंपासून झालेलें आहे. या सिद्धान्तास पुष्टी देण्यासाठीं अनेक प्रयोग करण्यांत आले; परंतु हा सिद्धान्त अद्याप सिद्धा झाला नाही. असें जरी आहे तरी सर्व विश्वांतील जडद्रव्य एकाच मूलद्रव्यापासून झालें असावें असें अनुमान काढण्यात बरीच जागा आहे. मेन्डेलिफ यानें रासायनिक मूलद्रव्यासंबंधानें जो अवधि-नियम (पीरिऑडिक लॉ) बसविला आहे त्यावरून वरील अनुमान कित्येक शास्त्रज्त्र काढतात.


मेंडेलिफचा नियम असा आहे किं, निरनिराळ्या मूलद्रव्यांच्या (अँटामिक वेट) अनुरोधानें मूलद्रव्याचे पदार्थ-विज्ञान-शास्त्र-विषयक आणि रासायनिक गुणधर्म बदलतात. हेंच गणिताच्या भाषेंत सांगावयाचें म्हणजे मुलद्रव्याचे गुणधर्म हे परमाणुंभाराचें फल (फॅंक्शन) आहे. परमाणुभाराप्रमाणें मुलद्रव्याचे गुणधर्म बदलतात, तेव्हां परमाणुभार हा अति-परमाणूंच्या समुच्चयानें निर्माण झाला असावा असें कित्येक शास्त्रज्ञांचे मत आहे.

रेडियम (रद्द) आणि तत्सद्दश्य धातूंच्या किरणविसर्जन क्रियेपासून आपणांस जडद्रव्याच्या अंतिम मूलद्रव्याच्या एकत्वाविषयीं प्रत्यक्ष पुरावा मिळतो. कारण यूरोनिअम् (वरूण) या रासायनिक मूलद्रव्यापासून रेडियम नांवाचें दुसरें रासायनिक मूलद्रव्य उत्पन्न होतें; आणि सर्व रेडिअम् सदृश द्रव्यांच्या विसर्जनापासून हेलिअम् (सौर) नांवाचें दुसरें मूलद्रव्य उत्पन्न होतें; यूरेनिअम्, रेडिअम् इ.इ.मूलद्रव्यांपासून हेलिअम् नांवाचें मूलद्रव्य होत असतांना युरेनिअम्, रेडिअम् इत्यादिकांच्या परमाणूंचे त्याहिपेक्षां सूक्ष्म अशा अति-परमाणूंत रूपान्तर होऊन नंतर त्या परमाणूंपासून पुनर्घटना होऊन हेलिअम् नांवाचें मूलद्रव्य तयार होत असावें असा शास्त्रज्ञांचा तर्क आहे.

वरील विवेचनावरून असें मात्र कोणी समजूं नये की, रेडिअम्सदृश द्रव्यापासून अतिपरमाणूंसारखे सर्व जड द्रव्याचें अंतिम मूलद्रव्य तयार होतें. कारण ज्या जडद्रव्याच्या अंगी रेडिअमप्रमाणें किरणविसर्जन शक्ति नाहीं अशा द्रव्यावर कांहीं विशिष्ट परिणाम घडवून ॠणविद्युत्कण उत्पन्न करतां येतात; जडद्रव्यास शुभ्रतेजस्वी होईपर्यंत तापविणें किंवा जडद्रव्यांवर नीलकिरण-समीपस्थ अदृश्य किरण (परानीलकिरण-अल्ट्राव्होयोलेटरेज) पाडणें इ.इ.प्रकारानें ॠणविद्युत्कणांवर उत्पन्न करतां येतात. या प्रत्येक ॠणविद्युत्कणांवर सारखीच विद्युत् असते; व त्या प्रत्येक कणांत सारखाच जडांश (मास) असतो; हायड्रोजनच्या परमाणूच्या जडांशापेक्षा विद्युत्कणांतील जडांश फारच कमी असतो. या अतिसूक्ष्म कणांस इंग्रजींत इलेक्ट्रॉन (अतिपरमाणुविद्युत्कण पहा) किंवा कॉर्प्युस्कल्स अशी संज्ञा आहे; अगदीं अलिकडे या विद्युत्कणाच्या जडांशाचें जें मापन करण्यांत आलें त्यावरून विद्युत्कणांत हायड्रोजनच्या परमाणूच्या १/१७०० इतका जडांश असतो; आणि हायड्रोजनच्या परमाणूच्या त्रिज्यच्या सुमारें १/१००० एकसहस्त्रांश त्रिज्य विद्युत्कणाची असते. सर्व प्रकारच्या जडपदार्थापासुन ज्या अर्थी विद्युत्कण प्राप्‍त होऊं शकतात त्याअर्थी विद्युत्कणांपासून सर्व जडपदार्थ झाले असावेत असें अनुमान काढतां येते. रासायनिक मूलद्रव्याच्या परमाणूपासून जे विद्युत्कण प्राप्‍त होतात त्यांची संख्या सारखीच असत नाहीं; जड-मूल द्रव्याच्या परमाणूपासून जे विद्युत्कण प्राप्‍त होतात त्यांची संख्या सारखीच असत नाहीं, जड - मूल द्रव्याच्या परमाणूपासून जितके विद्युत्कण प्राप्त होतात त्यापेक्षां कमी वजनाच्या मूलद्रव्याच्या परमाणूपासून कमी प्रमाणांत विद्युत्कण प्राप्‍त होतात. यावरून व यासारख्या दुसर्‍या कित्येक गोष्टींवरून असें अनुमान काढण्यास जागा होते कीं मूलद्रव्याच्या परमाणुभाराच्या प्रमाणांत विद्युत्कणाचें प्रमाण असतें. निरनिराळ्या पद्धतीनें परमाणूंतील विद्युत्कणांची संख्या मोजण्याचा जो प्रयत्‍न करण्यांत आला आहे त्यावरून असें दिसून येते कीं, विद्युत्कणांची संख्या परमाणु-भाराच्या संख्येच्या जातीचीच असावी. प्रत्येक परमाणूंत ॠण-विद्युत्कन असतात, परंतु परमाणूंच्या ठिकाणीं विद्युतचें ॠणत्व किंवा धनत्व दिसत नाहीं; त्याअर्थी या ॠण-विद्युत्कणांच्या आसपास धनविद्युत् असली पाहिजे; या दृष्टीनें पाहिलें असतां मूलद्रव्याच्या परमाणु-भाराच्या प्रमाणांत धन-विद्युत् असली पाहिजे. या धन-विद्युतची रचना (अणुमध्यें) कोणच्या प्रकारची असेल हें समजणें अगत्याचें आहे कारण ही रचना समजल्याच्या योगानें पदार्थाच्या मूलभूतस्थितीविषयीं जास्त माहितीं प्राप्‍त होते. त्यामुळे असा प्रश्न उपस्थित होतो कीं ॠण-विद्युत्कणाप्रमाणें धनविद्युत्चे ठराविक प्रमाणांत भाग झालेले आहेत किंवा अणुमधील ॠणविद्युत्कण कमी झाल्यामुळें त्या अणूच्या अंगीं धनत्व आलें आहे; परंतु या शंकेचें योग्य प्रकारें निरसन झालें नाही. ॠण्विद्युत्कण ज्या प्रमाणांत जडांशयुक्त आहेत त्याच्याशीं तुलना करतां येईल इतक्या सूक्ष्म प्रमाणाचे धेन - विद्युत्कण सांपडले नाहीत. धनविद्युतचा सर्वात कमी जडांश असलेला जो कण अद्यापपर्यंत उपलब्ध आहे तो हायड्रोजनच्या अणूच्या इतका आहे; आणि याबरोबरच आपण हें लक्षांत ठेविलें पाहिजे कीं, कमी दाब असलेल्या कोणत्याही जातीच्या वायूंतून विद्युप्रवाह पाठविला असतां त्यायोगानें आपणांस हे धनविद्युत्कण मिळूं शकतात. या सर्व उपलब्ध ज्ञानावरून आपणांस जडद्रव्याच्या अणूच्या रचनेविषयीं विद्युदृष्ट्या अनुमान बसवितां येतें. धन-विद्युत्कण आणि ॠण-विद्युत्कण यांच्यासारख्या सारख्या संख्येच्या समुदायाच्या योगानें जड अणु तयार झाले आहेत, परंतु धनुविद्युत्कणाच्या १/१७०० अंश इतक्या प्रमाणांत ॠण विद्युत्कणाचे जडांश आहे. अणुभाराच्या प्रमाणांत प्रत्येक जातीचे विद्युत्कण आहेत; आणि विद्युत्कणांची संख्या परमाणुभाराच्या जातीची आहे. या ॠणविद्युत्कण आणि धन वित्द्युकण याखेरीज जडद्रव्याच्या अणूमध्ये आणखी एखादें द्रव्य आहे किंवा नाहीं याविषयी अद्याप कांहीच कळलें नाही. परंतु सध्या शास्त्रामध्ये मानवी प्राण्याची जेवढी प्रगति झाली आहे तेवढ्यावरून अनुमान काढावयाचें असल्यास या दोन विद्युत्कणांपेक्षा जास्त कांही असल्याचे गृहीत धरणें अयोग्य होईल. सर जे.जे.थॉमसन या प्रसिद्ध शास्त्राज्ञानें गतिमान संस्थितिविषयीं (सिस्टिम इन मोशन) विचार करून असें अनुमान काढलें आहे की सम प्रमाणांर धनविद्युतने संचारित अशा गोलकामध्यें निरनिराळ्या संख्येचे ॠणविद्युत्कण सतत सारख्या गतीनें फिरूं लागल्यास त्यांच्या निरनिराळ्या पद्धति होतात; आणि त्या पद्धतीमध्यें आणि मेन्डेलीफ याच्या अवधि-नियमामध्यें सारखेच साम्य दिसून येतें. तसेंच ज्या प्रमाणांत विद्युत्कणांची संख्या वाढवावी त्या त्या प्रमाणांत अवधि-नियमाप्रमाणें बदल होतो.

जड - द्रव्यांचा विद्युत्सिद्धा नुसार जडांशः - द्रव्यांच्या अंगी विशेष महत्त्वाचें वैशिष्ट कोणचें असेल तर तें जडांश युक्तता हें होय. या विषयीचें त्रोटक दिग्दर्शन पुढें केलें आहे. जर एक विद्युत्कण गतिमान झाला तर त्याच्या मार्गाच्या आजूबाजूस चुंबक-क्षेत्र उत्पन्न होतें; चुंबक-क्षेत्राची शक्ति विद्युत्कणाच्या वेगाच्या प्रमाणांत असते. चुंबक-क्षेत्रांत शक्ति असते; व विशिष्ट घनफळाच्या क्षेत्रांत त्या ठिकाणच्या चुंबक-क्षेत्राच्या वर्गाच्या प्रमाणांत ही शक्ती असते. जर प्रकाशाच्या वेगाच्या मानानें विद्युत्कणाचा वेग अल्प असेल तर आपणांस असें दिसून् येईल कीं त्या विद्युकत्कणाच्या सभोंवार जी शक्ति असते ती खालील सूत्रानें दर्शवितां येते;

या सूत्रांत य = चुंबकत्वाची सभोंवारच्या प्रदेशांत प्रवेशशीलता समजावी; ए ही त्या कणावरील विद्युत् समजावी; आणि अ ही त्या कणाची त्रिज्या समजावी. आतां त्या कणाचा मूळचा जंडाश 'म' असेल तर त्या कणाची गति विशिष्ट शक्ति १/२ म x व१ या सूत्रानें दर्शवितां येईल. येथें 'व' याची किंमत विद्युत्कणाचा वेग अशी समजावी. यावरून त्या कणाची एकंदरींत गतिविशिष्ट शक्ति खालील सूत्रानें दर्शवितां येईल.


वरील सूत्रावरून हें दिसून येईल कीं, विद्युल्लतेच्या योगानें त्या कणाचा जडांश   या प्रमाणांत वाढतो.  आतां  हा वाढलेला जडांश सभोंवतालच्या शक्तियुक्त प्रदेशांतून प्राप्‍त होतो; तेव्हां या प्रदेशाकडेच जडांशवर्धनाच्या कारणाकरितां लक्ष्य दिलें पाहिजे. विद्युत्संचारित कण गतिमान असल्याच्या योगानें शक्ति-नलिकांनीं (टयूब्स ऑफ फोर्स) सभोवारचा प्रवेश भरून जातो; व या शक्ति-नलिका त्या कणाबरोबर गतिमान होतात. गणितावरून असें दिसून आलें आहे कीं, शक्ति-नलिकेबरोबर कांही इथरद्रव्य (आकाशसदृश द्रव्य) नेलें जातें व या इथरच्या ठिकाणीं जडांशत्व असतें. वर जें सूत्र दिलें आहे त्यावरून हें दिसून येईल कीं, विद्युत्कणाची त्रिज्या ज्या ज्या प्रमाणांत कमी कमी होईल त्या त्या प्रमाणांत (त्या कणावर सारखीच विद्युत् असतांना) हा वाढता जडांश जास्त मोठा असतो; परंतु जर कण मोठा असेल तर हा जडांश अगदीच क्षुल्लक असतो. अणूच्या त्रिज्येइतकीं त्रिज्या असल्यास हा वाढता जडांश किंचित् असतो असें दिसून आलें आहे. परंतु ॠणविद्युत्कणाच्या (अतिपरमाणुच्या) त्रिज्येइतकी त्रिज्या असल्यास ॠणविद्युत्कणावर असणार्‍या विद्युल्लतेच्या योगानें याच्या ठिकाणीं असणार्‍या जडांशाचा बहुतेक सर्व भाग आलेला असतो. या संबंधानें काफमन, बुचरर आणि हुपका यांनीं रेडिअमपासून निघणार्‍या ब (=बी=बीटा) किरणांवर जे प्रयोग केले आहेत त्यायोगानें वरील अनुमानास चांगलीच बळकटी आली आहे.

शास्त्रज्ञांस असें दिसून आलें कीं ज्या प्रमाणांत संभाव्य शक्तींत (पोटेन्शल एनर्जी) फरक पडेल त्या प्रमाणांत द्रव्याच्या जडाशांत फरक पडेल परंतु त्याबरोबरच मूळचा जडांश गतिविशिष्टशक्ति इ.इ. गोष्टी विचारांत घेतल्या पाहिजेत. ह्या दुसर्‍या लक्ष्यांत घेऊन जर आपण पाण्याविषयीं विचार करूं लागलों तर काय प्रकार दृष्टिस पडेल ते पाहूं या. प्राण (आक्सिजन) आणि उज्ज (हायड्रोजेन) हे एकत्र केले असतां पाणी उत्पन्न होतें; परंतु त्या बरोबरच उष्णता उत्पन्न होते. वरील दोन वायूंच्या संयोग करून एक ग्राम पाणी तयार झालें असतां सुमारें १.६ x १० ११ अर्ग  (अर्ग हे शक्तिचें एक माप आहे. एक सेंटिमिटर अंतराच्या उंचीवर एक मिलिग्राम वजनाच पदार्थ एक डाईन शक्तिच्या  विरूद्ध चढविला असतां एक अर्ग या परिमाणाचें शक्ति-कार्य होतें.) या प्रमाणची शक्ति उत्पन्न होतें. परंतु गणितानें असें दिसून आले आहें की, एक ग्रामपासून इतकी शक्ति निघाली असतां, त्या एका ग्रामाच्या (वजन)   अंश इतक्या प्रमाणांत वजनांत फरक पडल्यास तो फरक सध्या उपलब्ध्अ असलेल्या यंत्रानें मोजतां येण्यासारखा नाही.

आतांपर्यत आपण जें विवेचन केले आहे त्यावरून असें दिसून यईल कीं विद्युत्कारणानें जर द्रव्यांत जास्त प्रमाणांत संभाव्य शक्ति असेल तर त्या ठिकाणी त्या संभाव्य शक्तीमुळे जास्त जडांश दिसून येतो. विद्युच्चुंबक सिद्धांतांत असें गृहित धरलें आहे कीं, प्रकाश लहरीच्या समागमांत विद्युच्छक्ति असते आणि ही शक्ति संभाव्य स्वरूपाची असते. यामुळें असें मानवें लागतें कीं प्रकाशलहरीच्या ठिकाणीं जडांश असल्याप्रमाणे गुणधर्म दिसून आले पाहिजेत. याच दृष्टिनें पुढें पाहूं लागल्यास असें दिसून येईल कीं, त्या लहरीच्या ठिकाणीं वेगसंचय (मुमेंटम्)  वेगसंचय याची व्याख्या पुढें दिली आहे. एकाद्या गतिमान

पदार्थाचा वेग आणि त्या पदार्थाचें वजन यांचा गुणाकार करून  येणारी संख्या शक्तिसंचय म्हणून पदार्थ विज्ञानशास्त्रांत गणिली आहे). आहे या वेगसंचयाची दिशा त्या लहरीच्या दिशेप्रमाणेंच असते. ज्या वेळेस अपारदर्शक पदार्थाच्या योगानें प्रकाशाचें शोषण होतें त्यावेळेस त्या पदार्थाला त्या लहरीचा वेगसंचय प्राप्‍त होत असला पाहिजे; त्यामुळें त्या पदार्थावर प्रकाशकिरणामुळें दाब पडल्यासारखी स्थिति होत असावी. म्याक्सवेल यानें असे दाखवून दिलें कीं, विद्युच्चुंबकसिद्धान्त ग्रहण केल्यामुळें प्रकाशाचा हा दाब गृहित धरणें भाग पडतें. लिबेडू, निकोलस, हल आणि पायन्टिग या शास्त्रज्ञांनीं प्रयोग द्वारां हा दाब सिद्ध केला आहे.

वजन.- वजन आणि जडांश यांत काय फरक आहे असा प्रश्न उपस्थित होतो. वजन हें गुरूत्वाकर्षणाचा परिणाम आहे; अर्थात् ज्या ठिकाणीं गुरूत्वाकर्षण नाहीं त्या ठिकाणीं वजन असूं शकणार नाहीं. परंतु जडांश तसेंच राहील; व जडांशासी निकट संबंध असणारा वेगसंचय वगैरे गुरूत्वाकर्षणाभावी राहूं शकतील. द्रव्याची रचना विद्युत्कणाच्या योगेंकरून झाली आहे अशा द्दष्टीनें आपण येथपर्यंत विचार करीत आलों आहोत. आतां द्रव्याच्या वजनाविषयीं याच द्दष्टीनें विचार करूं. जडांश आणि वजन यांचें समीकरण मांडून    पाहिलें तर तें समीकरण अगदी साधें आहे. परंतु द्रव्याचा सर्वात मूलभूत आणि अज्त्रेय असा हा एक धर्म आहे. कोणत्याहि वस्तूचें वजन त्या वस्तुच्या जडांशाच्या प्रमाणांत असतें. न्यूटननें या नियमाची सत्यता पाहण्याकरिता पुष्कळ प्रयोग केले. सन १८३० सालीं बेसेल यानें फारच विस्तृत प्रमाणावर प्रयोग केले; बेसेलनें आपल्या प्रयोगास शक्य तितकी सूक्ष्मता आणण्याचा प्रयत्‍न केला, त्यावरून असें दिसून आलें कीं, वजन हें जडांशाच्या प्रमाणांत असतें. यांत जर फरक पडला तर तो वजनाच्या किंवा जडांशाच्या एकसाठ हजारांशांपेक्षां कमी प्रमाणांत पडेल. जडांश आणि वजन यांत जें प्रमाणाचें सातत्य दिसून येतें त्याकडे वस्तूंची जी विद्युन्मय रचना झालेली दिसते त्या द्दष्टीनें या प्रमाणसातत्याकडे पाहिलें असतां या प्रश्नावर जास्त उजेड पडतो. हायड्रोजनच्या परमाणूच्या एका-सतराशें हा अंश जडांश विद्युत्कणाच्या ठिकाणीं असतो. त्यावर ठराविक प्रमाणाची ॠणविद्युत् असते. त्या कणाच्या ठिकाणीं जो जडांश दिसतो तो विद्युत्संचाराचा परिणाम आहे, व विद्युत्संचारित कणासभोंवारच्या शक्ति-नलिकांच्या योगानें कांहीं इथर पकडला गेल्या कारणानें हा जडांश उत्पन्न होतो. यावर अनेक प्रश्न उत्पन्न होतात. हा जडांश तौलनीय (पाँडरेबल) आहे काय? याच्या योगानें पदार्थाच्या वजनांत भर पडूं शकते काय? व असें असेल तर साधारण वस्तूसंबंधानें जडांश आणि वजन यांच्यांमध्यें जें एक नियमबद्ध असें सातत्य दिसून येतें त्याच प्रकारचें सातत्य वरील कणांच्या जडाशांत आहे काय? आता आपण क्षणभर असें गृहित धरूं कीं विद्युतकणसंबंधीं जडांश तौलनीय नाहीं; त्यामुळें विद्युत्कणाच्या योगानें अणूचें जडांशत्व वाढतें परंतु अणूचें वजन वाढत नाहीं. तेव्हां ज्या अर्थी हायड्रोजनच्या अणूच्या १/१७०० विद्युत्कणाचा जडांश आहे. त्या अर्थी क्ष परमाणुभार असलेल्या एकाद्या परमाणूंतून एक अतिपरमाणु काढल्यास किंवा एखादा परमाणु यांत मिळविल्यास त्या अणूचा जडांश १७०० क्ष या प्रमाणांत बदलेल, परंतु त्यायोगानें त्याचें वजन बदलणार नाहीं; असें असल्यास त्या योगानें वजन आणि जडांश यांत ज्या प्रमाणांत फरक पडेल त्याच प्रमाणांत फरक पडणारीं दुसरें कार्ये होऊं लागतील व यावरून ज्या रासायनिक मुलद्रव्यांचें अणुभार फार कमी आहेत अशांच्या बाबतींत या रीतीनें पडणारा फरक 'बेसेल' याच्या पद्धतीनें प्रत्यक्ष प्रयोगानें मापतां येण्यासारखे आहे. आतां परमाणूमध्यें असणारे अतिपरमाणु परमाणु-भाराच्या प्रमाणांत असतात; व त्याप्रमाणें अतिपरमाणू परमाणुभाराच्या प्रमाणांत असल्यामुळें विद्युच्छक्तीनें उत्पन्न होणारा जडांश तौलनीय आहे किंवा नाहीं या प्रश्नाचा निर्णय होऊं शकत नाहीं.

रेडिअम् आणि तत्सद्दश धातूंवर प्रयोग करूण वरील प्रश्नाचा निर्णय करतां येईल अशी आशा वाटूं लागली आहे. जे.जे. थॉमसन यानें या दिशेनें कांहीं प्रयोग केले परंतु या प्रयोगांनां जितकी सूक्ष्मता यावी तितकी न आल्यामुळें कांहीं निर्णय करतां आला नाहीं. सदर्नस या शास्त्रवेत्त्यानें क्याव्हेन्डिश येथील प्रयोगशाळेंत बराच दीर्घकालापर्यंत सतत प्रयोग केले; ते प्रयोग नुकतेच (सन १९१० त) पुरे झाले आहेत; त्यावरून असें सिद्ध झालें आहे कीं, रेडिअमप्रमाणें उत्सर्जक वस्तू असोत किंवा सामान्य वस्तू असोत त्यांमधील विद्युदुत्पन्न जडांश परमाणुभाराच्या प्रमाणांत असतो.

याप्रमाणें जडांश आणि वजन यांमधील प्रमाणासंबंधानें थोडेसेच प्रयोग झाले आहेत; परंतु वस्तूच्या बाबतींत रासायनिक किंवा पदार्थविज्ञानशास्त्रविषयक फेरफार केल्यास त्या वस्तूच्या वजनांत कांहीं फरक होतो किंवा काय याविषयीं बरेच महत्वाचे प्रयोग करण्यांत आले आहेत. त्यावरून असें दिसून आलें कीं, सध्यां आपणांस उपलब्ध असणार्‍या साधनांच्या सहाय्यानें त्यांत पडणारा (पडत असल्यास) फरक न समजून येण्याइतका सूक्ष्म असावा. याविषयीं लंडोल्ट, पायटिंग, फिलिप्स आणि सदर्नस यांनीं फार परिश्रम केले आहेत.

गुरूत्वाकर्षण - जडद्रव्य आणि तत्संबंधीं जडांश, वजन इत्यादिकांविषयीं विवेचन करीत असतांनाच त्याबरोबर गुरूत्वाकर्षणासंबंधानें थोडेसें विवेचन करणें अवश्य आहे. गुरूत्वाकर्षणाशीं समवायसंबंधानें वजन हें निगडित झालें आहे. गुरूत्वाकर्षणासंबंधानें शास्त्रज्ञांनीं उपपत्त्या (किंवा कल्पना) बसविल्या आहेत. त्यांच्याकडे लक्ष्य देणें आवश्यक आहे. परंतु सर्वच प्रकारच्या उपपत्त्यांचा विस्तारपूर्वक विचार करणें शक्य नाहीं, म्हणून दोनच कल्पनांचा विचार केला आहे.

यांपैकीं एक कल्पना याप्रमाणें आहेः- विद्युत् हें एक प्रवाही द्रव्य आहे. समान जातीच्या विजेमध्यें जे प्रतिसारण घडतें त्यापेक्षां किंचित् जास्त प्रमाणावर विजातीय विद्युल्लतेमध्यें आकर्षण घडतें. या प्रमाणें गृहित धरल्यावर गणिताच्या सहाय्यानें पुढें दिल्याप्रमाणें विचार करतां येतो. दोन वस्तू आहेत; त्यांपैकीं एकीत 'क' धनकण आहेत व तितक्याच 'क' संख्येचे ॠणकण आहेत; व दुसरींत 'ड' संख्येचे ॠणकण आणि धनकण आहेत. अशी स्थिति असतांना त्या दोन वस्तूंमध्यें अंतराच्या वर्गाच्या व्युत्क्रम प्रमाणांत आकर्षण असेल व क x ड याच्या समप्रमाणांत तें असेल. याप्रमाणें गृहित धरलें असतां गुरूत्वाकर्षणाचा उलगडा होऊं शकतो. प्रयोग करून या कल्पनेला प्रत्यक्ष दुजोरा मिळूं शकेल किंवा कसें या द्दष्टीनें विचार करून शास्त्रज्ञांनीं असें ठरविलें आहे कीं सध्यां उपलब्ध असलेल्या साधनांपेक्षां किंचित् जास्त सूक्ष्मता देणार्‍या प्रयोगसाधनांनीं याचा निर्णय करतां येईल.

सन १८१८ मध्यें लसागे (जिनिव्हाचा रहिवाशी) यानें गुरूत्वाकर्षणाचा आपला सिद्धान्त प्रसिद्ध केला. त्यानें असें गृहित धरलें कीं सर्व विश्वभर अत्यंत सूक्ष्म असे कण पसरलेले आहेत व हे कण अत्यंत मोठ्या वेगानें फिरत आहेत; हे कण सूर्यमंडलबाह्य (अल्ट्रामन्डेन) आहेत. तसेंच हे कण इतके भेदक (पेनिट्रेटिंग) किंवा प्रवेशशील आहेत कीं ते सूर्य, पृथ्वी, इत्यादिकांसारख्या मोठमोठ्या घनपदार्थातून कांही एक अडथळा झाल्याशिवाय जाऊं शकतात; व या ग्रहादिकांतून हे कण जात असतांना या ग्रहांकडून अत्यंत अल्प प्रमाणावर त्याचें अपशोषण होतें. ज्या परमाणूंच्या योगानें जड वस्तू झाल्या आहेत त्या परमाणूंच्या आकारमानानें त्यांमधील अंतर बरेंच मोठें असल्यास वस्तूंतील जडांशांच्या मानानें त्या वस्तूकडून सूर्यमंडलबाह्य सूक्ष्म कणांचे अपशोषण होते.  याप्रमाणे हे सूर्यमंडलबाह्य कण एखाद्या वस्तूंतून जात असतांना त्यापैकीं कांहीं कणांचे त्या वस्तूच्या जडांशाच्या मानानें अपशोषण होतें व त्यामुळें त्या वस्तुला त्यामानानें त्या कणांकडून वेगसंचय दिला जातो. वस्तूंतून हें सूर्यमंडलबाह्य कण जात असतांना त्यांची दिशा चोहोंबाजूंला सारखीच असेल तर ती वस्तू त्या कणांकडून प्राप्‍त होणार्‍या वेगसंचयामुळें कोणत्याहि एका विशिष्ट दिशेनें हलणार नाहीं; समजा कीं, जगांत 'अ' ही एकच वस्तु आहे व तिला याप्रमाणें सूर्यमंडलबाह्य कणांकडून वेगसंचय प्राप्‍त झाला तरी 'अ' कोणत्याहि एका विशिष्ट दिशेनें चलन पावणार नाहीं. आतां या 'अ' शेजारीं कांहीं अंतरावर 'ब' ही वस्तु आहे; त्यामुळें 'ब' ही वस्तु 'बअ' या दिशेनें जाणार्‍या कांहीं कणापासून अचें ढालीप्रमाणें रक्षण करील; त्यामुळें 'अ' ला 'अब' या दिशेनें कांहीं वेगसंचय प्राप्‍त होईल; व या प्रमाणेंच 'ब' बद्दल विचार केल्यास बला 'बअ' या दिशेनें वेगसंचय प्राप्‍त होईल. यामुळें अ ही वस्तु बचें आकर्षण करील आणि ब ही वस्तु अचें आकर्षण करील लप्तागे यानें असें सिद्ध करून दाखविलें आहे कीं, अ आणि ब यांनां जो वेगसंचय प्राप्‍त होतो तो अ आणि ब यांच्या गुणाकराइतका असतो व अ आणि ब मधील अंतर त्या दोन वस्तूंच्या आकारमानाच्या प्रमाणानें बरेंच मोठें असल्यास त्यांच्यामधील आकर्षण अंतराच्या वर्गाच्या व्युत्क्रम प्रमाणांत असतें.

क्लार्क म्याक्सवेल यानें असें दाखवून दिलें कीं, सूर्यमंडलबाह्य कणांतील वेगसंचयाचे स्थानान्तर होऊं लागलें तर त्या योगानें वस्तूंमधील उष्णता वाढूं लागले व सर्व वस्तू तापून पांढर्‍या शुभ्र दिसूं लागतील. परंतु आपणांस असेंच होईल असें समजण्याचें कारण नाही. विरलवायूंतून विद्युत्प्रवाह पाठविला असतां रॉटजनचे किरण उत्पन्न होऊन व हे रॉटजन किरण जास्त प्रवेशशील असतात त्यामुळें ते पदार्थातून जातांना विद्युल्लतेच्या मानानें फारच अल्प प्रकाणावर उष्णता उत्पन्न करितात. सूर्यमंडलबाह्य कण वस्तूंतून जातांना त्यांनां जो अत्यल्प प्रमाणावर अडथळा होतो त्याच्या योगानें उष्णता उत्पन्न न होतां वरील दाखल्याप्रमाणें विद्युप्रवाहोत्पन्न रॉंटजन किरणाप्रमाणें एखादि अत्यंत सूक्ष्म अशी शक्ति उत्पन्न होत असावी व ती शक्ति अति सुक्ष्म असल्याकारणानें आपल्या नजरेस येत नसावी. अलिकडे जे शोध लागत आहेत त्यांच्या योगानें लसागें याच्या कल्पनामय सिद्धांतास पुष्टि प्राप्‍त होत आहे. लसागे यानें असें गृहीत धरलें आहे कीं, सूक्ष्म कण अतिशय वेगानें फिरतात; त्यांच्या अंगीं प्रवेशशीलता आहे; त्यामुळें ते घनपदार्थतून जाऊं शकतात; त्यांच्या ठिकाणवा वेग-संचय दुसर्‍यास दिला जातो व त्यामुळें गुरूत्वाकर्षण घडूं लागतें. आतां आपण विद्युल्लता किंवा चुंबकत्व यांच्या लहरीकडे पाहूं या; या प्रकारच्या लहरी प्रकाशाच्या किंवा रॉटजन किरणाच्या ठिकाणीं दिसून येतात; यामुळें लसागे याच्या सूर्यमंडलबाह्य कणांच्या ऐवजीं रॉंटजन किरणापासून गुरूत्वाकर्षणाचे परिणाम होतात असें मानण्याकडे प्रवृत्ति होते; परंतु रॉटजन किरणाचें अपशोषण झालें असतां त्यापासून कमी प्रमाणांत असलेले प्रवेशशील किरण उत्पन्न होतात; किंवा त्या किरणासारखेच किरण उत्पन्न होतात; या कारणानें लसागे याच्या सूर्यमंडलबाह्य कणांच्या ऐवजीं रांटजन किरणांची स्थापना करतां येणें सध्यां तरी शक्य दिसत नाहीं.

वरील लेखांत विद्युत्कणापासून (म्हणेज पर्यायानें विद्युल्लतेपासून) जडद्रव्यमय वस्तूंची रचना झाली आहे असें प्रतिपादन केलें आहे; कारण या प्रकारच्या प्रतिपादनास शास्त्रीय प्रयोगानें प्रत्यक्ष जितका दुजोरा मिळला आहे तितका दुजोरा एतद्विषयक दुसर्‍या कोणत्याही कल्पनेस प्राप्‍त झाला नाही. या सिद्धान्ताप्रमाणें जे अत्यंत सूक्ष्म असे अतिपरमाणू गृहित धरले आहेत ते अतिपरमाणू प्रयोगशाळेंत इतर वस्तूपासून निराळे करून त्यांचे काही प्रमाणवर मोजमाप करण्यांत आलें आहे; व शास्त्रज्ञांस अशी खात्री वाटूं लागली आहे कीं थोड्याच कालांत या अतिपरमाणूविषयीं म्हणेजच पदार्थाच्या आद्यघटकाविषयीं पुष्कळ माहिती उपलब्ध होऊं शकेल; व त्यामुळें वरील सर्व विवेचनांतील सर्व भागांत प्रत्यक्ष प्रयोगाची कसोटी लावतां येईल.

टीपः - वरील लेखांत विद्युत्कण आणि अतिपरमाणु हे दोन्ही शब्द जवळ जवळ समानार्थी वापरले आहेत. 

   

खंड १३ : घ - जलपैगुरी  

 

 

 

  घंटय्याकवि
  घटोत्कच
  घटोत्कच लेणीं
  घड्याळ
  घनी
  घनौर
  घांट
  घाटगे
  घाटाळ
  घातमपूर
  घानची
  घायपात
  घारगड किल्ला
  घारघोडा
  घारापुरी
  घाशीराम कोतवाल
  घांसदाणा
  घासी
  घिरथ
  घिसाडी
  घुगुस
  घुंड
  घुबड
  घुराम
  घेरिया
  घेवडा
  घोटकी
  घोडबंदर
  घोडा
  घोडाघांट
  घोडाबारी
  घोडासर
  घोडें
  घोडेघांस
  घोरपड
  घोरपडी
  घोरपडे
  घोरी घराणें
  घोशी
  घोसाळे
  घोसी
  घोळ
 
 
  चउमू
  चकमा
  चकला रोषनाबाद
  चकवाल
  चकिया
  चक्कियर
  चक्कीनोआरो
  चक्रपाणि
  चक्रवर्ती
  चक्राप्पा
  चंगनाचेरी
  चंगर
  चच, चचनामा
  चचान
  चटया
  चडार
  चंडी
  चतुरमहाल
  चतुर साबाजी
  चतुरसिंग
  चतुर्थ
  चत्रा
  चॅथॅम
  चंदगड
  चंद घराणे
  चंदन
  चंदभाट
  चंदरभान
  चंदावरकर, नारायण गणेश
  चंदासाहेब
  चंदीपुर
  चंदेरी
  चंदेल्ल
  चंदौली
  चंदौसी
  चंद्र
  चंद्रकोना
  चंद्रगिरी
  चंद्रगुप्त
  चंद्रगोमिन्
  चंद्रनगर
  चंद्रभागा
  चंद्रहास
  चंद्रावती अथवा चंद्रावली
  चन्नगिरी
  चन्नपट्टण
  चन्नबसव
  चन्नरायपट्टण
  चंपा
  चंपानेर
  चपारण
  चंपावत
  चंपाषष्ठी
  चंबळा नदी
  चबा संस्थान
  चमारडी
  चरक
  चरखा
  चरखारी
  चरणदासी
  चरणव्यूह
  चरबी
  चरबीचें झाड
  चरी
  चर्मण्वती
  चलत-चित्रें
  चलन
  चल्लाकेरे
  चवळी
  चहा
  चक्षुर्मंनु
  चाकण
  चाकवत
  चागई
  चांगदेव
  चांगभकार
  चांगा केशवदास
  चाघताइखान
  चांचेगिरी
  चाचो
  चांडोद
  चाणक्य
  चातुर्मास्य
  चातुर्मास्य याग
  चातुर्वर्ण्य
  चात्सु
  चादचा
  चांदपूर
  चांदबिबी
  चांदभाट
  चांदला
  चांदवड
  चांदा
  चांदूर
  चांदूर बाजार
  चांद्रायण
  चानन शानन
  चानस्मा
  चानाल
  चानोड
  चाप्रा
  चाफळ
  चाबुआ
  चांभार
  चाम
  चामखीळ
  चामन
  चामराजनगर
  चामुंड
  चामुर्शी
  चार
  चारखा
  चारण
  चारदुआरं
  चारसद
  चारा
  चारीकार
  चार्टिझम
  चार्लंमांट, अर्ल ऑफ
  चार्वाक
  चालुक्य घराणें
  चालसिस
  चावडा
  चावंद
  चास-कमान
  चॉसर
  चासा
  चाहमान उर्फ चौहान
  चाळिसगांव
  चिक
  चिकंजी
  चिकबळ्ळापूर
  चिकाकोल
  चिकोडी
  चिक्कणर्ति
  चिक्केरूर
  चिक्टीआबर
  चिक्नायकन्हळ्ळी
  चिक्मगळूर
  चिखलदरा
  चिखली
  चिंगलपट
  चिंच
  चिचगड, जमीनदारी
  चिंचलीगदड
  चिंचवड
  चिचेवाडा
  चिंचौली
  चिंच्यु
  चिटणीस
  चितलनगर जमीनदारी
  चितळ
  चितळदुर्ग
  चिताकुल
  चिंतामणी
  चिंतामणी कवि
  चिंतामणी रघुनाथाचार्य
  चितारी
  चिति
  चितोड
  चित्तगांग
  चित्तगांग डोंगराळ प्रदेश
  चित्ता
  चित्तूर
  चित्फिरोझपूर
  चित्रकला
  चित्रकाव्य
  चित्रकूट
  चित्रकोट
  चित्रगुप्त
  चित्ररथ
  चित्रसंग्रहालयें
  चित्रळ
  चित्रांगदा
  चित्रावाव
  चिदंबर दीक्षित
  चिदंबरम्
  चिंदविन
  चिंदविन नदी
  चिदानंद स्वामी
  चिनडोंगर
  चिनमुलगुंद
  चिन लोक
  चिनसुरा
  चिनाब
  चिनीमाती किंवा केओलिन
  चिन्नविरन्ना
  चिन्नूर
  चिन्योत
  चिपळूण
  चिपळूणकर, कृष्णशास्त्री
  चिपळूणकर, विष्णुशास्त्री
  चिफू
  चिमणाजीआप्पा
  चिमणाजी दामोदर
  चिमणी
  चिरक्कल
  चिराबा
  चिलखत-वेदकालांतहि
  चिलिअनवाला
  चिली
  चिल्का सरोवर
  चिस्ती
  चीझी, अॅंटोनें लिओनार्ड डि
  चीन
  चीनी
  चीपुरुपल्ले
  चीर
  चीराल
  चुका
  चुकचि
  चुटिया
  चुडा
  चुडा संस्थान
  चुडेश्वर
  चुना
  चुनार
  चुंबकजन्य विद्युद्यंत्र
  चुंबकत्व
  चुंबकीय दृकशास्त्र
  चुंबन
  चुमल्हारी
  चुरू
  चूडामण
  चेकोस्लोव्हेकिया
  चेंगीझखान
  चेचेंझे
  चेटवई
  चेट्टी
  चेदूब बेट
  चेंबर्स रॉबर्ट
  चेयूर
  चेर घराणें
  चेरात
  चेरापुंजी
  चेरिअल
  चेरुमन
  चेरो
  चेर्रा
  चेल
  चेसेलडेन, विल्यम
  चेस्टरफील्ड
  चेस्टरफील्ड फिलिफ
  चैतन्य
  चैतसिंग
  चैत्य
  चैन
  चैबासा
  चोखामेळा
  चोवो
  चोडवरम
  चोध्रा
  चोपडे
  चोपदार
  चोबारी
  चोंभा
  चोरांग्ल
  चोरासी
  चोरी
  चोल
  चोल घराणें व चोल साम्राज्य
  चोवीस परगणा जिल्हा
  चौंगू
  चौघाट
  चौथाई, चौथ
  चौधरी
  चौबे जहागीर
  चौल
  चौलमुग्रा
  च्यवन
 
  छछरौली
  छट्टू
  छतारी
  छत्तरपूर
  छत्तिसगड विभाग
  छत्रपूर तहशील
  छत्रसाल
  छत्रे, केरो लक्ष्मण
  छत्रे, विष्णु मोरेश्वर
  छत्रे, सदाशिव काशीनाथ
  छंद:शास्त्र
  छप्पन देशचे राजे
  छप्रौली
  छब्रा
  छलाल
  छात
  छापखाना
  छापिआ
  छाप्री
  छायाचित्रपेटिका
  छाल
  छालिअर
  छिंद, लल्ल
  छिंदवाडा
  छिंपा
  छिब्रामऊ तहसील
  छुईखदान
  छुटिया
  छोटा उदेपूर
  छोटानागपूर
  छोटी साद्री
 
  जकात
  जॅक्सन अॅंड्र
  जॅक्सन व्हिल्ले शहर
  जखमा
  जगजीवनदास
  जगत्याल
  जगदलपूर
  जगदीशपूर
  जगन्नाथ
  जगन्नाथपंडित
  जगन्नाथपुरी
  जगन्नाथ शंकरशेट, मुर्कुटे
  जंगम
  जगय्या पेटा
  जंगल
  जंगल महाल
  जगलूर
  जगाध्री
  जग्रांव
  जंगीपूर
  जघाशूल
  जंजिरा
  जझिया
  जटलंड
  जटामांसि
  जटायु
  जटासूर
  जठरदाह
  जठरव्रण
  जडजीवघाद
  जडद्रव्य
  जडभरत
  जडवाद
  जडान्नविषबाधा
  जडावाचें काम
  जत
  जतिंग रामेश्वर
  जंतुजन्य रोग
  जतोई
  जत्रा
  जंदिआल गुरु
  जंदिआला
  जंदोला
  जनक
  जनजसवंत
  जननेंद्रियांचे गुप्तरोग
  जनमेजय
  जनस्थान
  जनाबाई
  जनार्दनस्वामी
  जनावरें
  जनीजनार्दन
  जपान
  जपानी वार्निस
  जबलपुर
  जंबुकेश्वरस्
  जंबुद्वीप
  जबूसर
  जमखिंडी
  जमदग्नि
  जमरुड
  जमाखर्च
  जमाबंदी
  जमालखान
  जमालपुर
  जमिकुंता
  जमीन
  जमीनदार व कुळें
  जमीनमहसूल
  जमुई
  जमेका
  जमेसाबाद
  जम्नोत्री
  जम्मलमडुगु
  जम्मू
  जयगड
  जयचंद
  जयदेव
  जयद्रथ
  जयनगर
  जयपाल
  जयपूर
  जयपुर जमीनदारी
  जयपुर संस्थान
  जयमल्ल
  जयरथ शृंगार
  जयरामस्वामी
  जयरामात्मज
  जयविजय
  जयसिंह
  जर उतणें
  जरतार
  जरत्कारु
  जरदाळू
  जरा
  जरासंघ
  जरीपटका
  जर्मन सिल्व्हर
  जर्मनी
  जलंगी
  जलजन्य विद्युतशक्ति
  जलघा
  जलपैगुरी

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .