प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग तेरावा : घ - जलपैगुरी

जठरव्रण - हा रोग पुरूषांपेक्षा स्त्रियांमध्यें व त्यांतले त्यांत विशेष श्रम पडणार्‍या नोकरवर्गातील स्त्रियांमध्यें आढळतो. या रोग्यांनां अगोदर पंडुरोगाप्रमाणें फिकटपणा असून जठरांतील रूधिराभिसरण नीट न चालल्यामुळें रक्तवाहिन्यांत एखादी रक्ताची गुटळी अडकून त्यां जठरांतील भागास रक्ताचा पुरवठा कमी पडतो. पंडुरोगांतील निःसत्व रक्त मुळें तर हा रोग होतोच पण बरेच दिवस अपचन चालून त्याची शेवटहि या रोगांत होण्याचा संभव असतो.

रक्तवाहिनींत रक्ताची गुठळी अडकली असतां त्या विवक्षित भागामध्यें जठराचें पोषण नीट न होऊन तेवढ्या वाटोळ्या जागेवर जठरांतील आम्ल पाचक रसामुळें त्यावरील त्वचा निघून जाते; म्हणजेच तेथें व्रण पडतो. तो अगदी वाटोळा अगर दीर्घ वर्तुळाकार असतो. व साधारणतः पावलीच्या आकाराएवढा असतो. आंत खोलपर्यंत व्रण असल्यामुळें त्याचे कांठ अगदीं शस्त्रानें कापल्याप्रमाणें रेखीव दिसतात, व छिद्रहि आरपार जठराच्या वेष्टणासहि पडलेलें असतें. जठराचा वरील वक्रभाग असतो त्याच्या मागील अंतराच्छादनावर हा व्रण बहुधा असतो. व आंतड्यानजीकच्या छिद्रजवळ असतो. हा अगदीं साफ बरा झाला तर त्याची खूण, वण वगैरे फारसें मागाहून रहात नाहीं. पण कधीं असें होतें कीं, तो बरा होतांना आंखडून भोवतालच्या जठराचा भागहि आकुंचित करतो व त्यामुळें जठराच्या आंतड्यांकडील छिद्र अगर त्याचा मध्यभाग वाळूच्या घड्याळाप्रमाणें मध्येंच चिंचोळा होतो. हा व्रण फुटून रक्तस्त्राव झाला असतां प्राणास अपाय होण्याची धास्ती असते. पण जर अगोदर जठर एखाद्या इंद्रियास चिकटून राहिलें तर किंवा शस्त्रक्रिया करून रूधिरस्त्राव थांबविला तर रोगी बरा होतो. बहुधा एकच व्रण असतो पण क्कचित् दोनतीनहि असतात.

लक्षणें - कांही रोग्यांनां स्पष्ट लक्षणें फारशीं होत नाहींत. व कांही रोग्यांनां प्राणघातक रक्तस्त्राव सुरू होतो तेव्हां जठर व्रण असल्याचें कळतें.

याचें मुख्य लक्षण म्हणजे पोटांत अन्न खाल्ल्यावर शूळ उभ्दवणें. हा शूळ उरास्थिच्या खालच्या बाजूस किंवा पाठीच्या मध्यभागीं असतो. कधीं शूळ उजव्या किंवा डाव्या कुशींतहि असतो. या वेदना मात्र अति तीव्र असतात. वेदनेच्या ठिकाणीं दाबले असतां दुखतें व तेथें कांही फुगवटी सूज आहे अशी रोग्यास जाणीव असते. पोटावर घट्ट पट्टयानें बांधले तर रोग्यास तें सहन करवत नाहीं. पोटांत अन्न गेलें म्हणजे निसर्गाच्या नियमाप्रमाणें त्यांत तें अन्न पचविण्यासाठी हालचाल आपोआप सुरू होते. व्रणामध्यें मज्जातंतूंचीं टोकें असतात. त्यांनां त्या वेदनाचें ज्ञान होऊन हें लक्षण उदभवतें.

दुसरें महत्वाचें लक्षण ओकारी होय. अन्ना खाल्यानंतर लागलीच ओकारी होते अगर कांहीं वेळानें होते. पण ती एकदा झाली म्हणजे वेदना थांबतात व अस्वस्थता नाहींशी होते. या ओकारींत बहूधा रक्त असतें व तें असलें म्हणजे मोठें महत्वाचें लक्षण निदानासाठीं आहे असें समजावें. हें रक्त काळसर व ताजें, आंत गुठळ्या असलेलें असतें किंवा पिंगट अगर काफीच्या गाळाच्या रंगाचे असतें. एक किंवा अनेक रक्तवाहिन्या फुटून त्यांतून हें रक्त येतें. मळावाटेहि रक्त पडतें व त्यामुळें मळ काळा, अगर डांबरसारखा दिसतो. रोग्याची एकंदरीत स्थिती व चर्या प्रकृति फारच बिघडली आहे हें स्पष्ट दर्शविते. जीभ लाल असते. शौचास बद्धकोष्ट झालेला असतो. बरेच रोगी दीर्घकालीन व्रणामुळें हैराण स्थितींत असतात. चेहरा फिकट, शरीरयष्टि रोड व अतिअशक्तपणा अशी स्थिती असते. रोग कित्येक महिने किंवा वर्षेपर्यंत असतो. अनेक मोठाले व्रण असले म्हणजे ते अर्धवटच बरे होऊन पुनः पुनः जास्त प्रकृति बिघडवितात. या व्रणापासून बाह्य लक्षणें क्कचित् दिसतहि नाहींत, हें वर सांगितलें आहे. अवचित प्राणघातक रक्तश्राव होऊन व्यवच्छेद परीक्षण केलें असतां हे मोठाले जुनाट व्रण आढळतात. हा रोग एकंदरीत घातुक खरा पण पुष्कळ रोगी बरेहि होतात. फारतर रोग्याचें जठर अंमळ नाजूक स्थितींत मागाहूंन रहातें इतकेंच, व त्यामुळें त्यास पथ्यानें रहावें लागतें. प्राणघात होण्याचें मुख्य कारण वास्तविकपणें रक्तस्त्राव हें मुख्य नसून व्रण फुटल्यामुळें आंतील अन्नादि द्रव पदार्थ अंन्नावरणांत प्रवेश करून बारापासून अठ्ठे चाळीस तासांत शस्त्रक्रिया यशस्वी न झाल्यास दाहामुळें किंवा अंतःसंक्षोभामुळें प्राणघात करतात. मात्र कधीं कधीं वरील क्रिया सावकाश घडत गेल्यामुळें जठरास शेजारील एखाद्या इंद्रियास चिकटून त्यामुळें छिद्र बंद होण्यास अवसर सांपडतो व मग मात्र रोगी रक्तस्त्रावानें मरण न पावतां जन्मभर जठराची चलनशक्ति अमलांत न आल्यामुळें अजीर्ण अपचनादिनीं पिडलेला असतो किंवा आंतड्याकडील जठर फारच आंखडून मार्ग जवळ जवळ बंद होऊन त्यामुळें जठर विस्तीर्ण होतें.

उपचारः - अशा रोग्यांनां पूर्ण विश्रांति बिछान्यांत निजवून ठेवून दिली पाहिजे. खाण्यास दूध, किंवा दूध व पाणी अगर दुध व चुन्याची निवळ हें द्यावें. रक्तस्त्राव नुकताच होऊन गेला असल्यास अन्नतर बिलकूल देऊं नये. व फक्त गुदव्दारावाटे पोषक बस्ति रोग्यास देत जावा. पुढें जस जशीं लक्षणें हटत जातील त्याप्रमाणें दूध, अंडी, मांस, रस अगर मांसविरहीत पेयें-जीं पचनास हलकीं व पुष्टिदायक आहेत अशीं-रोग्याच्या पचनशक्तीचे मानानें द्यावींत. यानंतर पाव व दूध यासारखें व इतर हलकें व पौष्टिक अन्नाहि द्यावें. लोह हें औषध फार उपयोगी आहे पण तें गोळ्यांच्या रूपांत देऊं नये. येणें प्रमाणे पथ्य पाळून, पडून राहिलें असतां हे व्रण बरे होतात यांत शंका नाहीं. प्रेत व्यवच्छेदन करतांना कित्येक रोग्यांच्या जठरांत पूर्वी बर्‍या झालेल्या व्रणाच्या स्पष्ट अगर पुसट खुणा नेहमीं पहाण्यांत येतात ही गोष्ट वरील म्हणण्याची सत्यता पटविते. शस्त्रवैद्यासहि शस्त्रक्रिया करतांना उदरामध्यें जठरांत अशा खुणा आढळतात. वर सांगितलेल्या उपचाराप्रमाणें वागलें तर व्रणांतून प्राणघातक रक्तस्त्राव होईल हे संभवनीयच नाहीं. आणि शस्त्रवैद्यास प्रकृति जरी दाखविली तरी शस्त्रक्रिया करावी असा सल्ला देणार नाहीं. कारण त्याची जवळ जवळ खात्रीच असते. उदर चिरून जठराच्या बाहेर व्रण फुटला आहे किंवा काय हें पाहिलें किंवा जठर चिरून आंत जरी पाहिलें तरी व्रण सहसा सांपडणार नाही अशा प्रकारचा भयंकर रक्तस्त्राव सुरू झाला. तरच मात्र शस्त्रवैद्यानें उदर चिरून रक्तस्त्राव कोठून येत आहे तें ठिकाण नक्की अजमावून तेथील धमनीबंधनानें रक्तस्त्राव थांबवावा; म्हणजे रोग्याचा मृत्यू टळेल.

व्रण फुटून त्या मागें जे जठरांत असणारे निरूपद्रवी जंतू असतील ते अन्नासह अन्नावरणाच्या पोकळींत प्रवेश करितात. अशा फुटण्याचा तात्कालिक परिणाम उदराच्या वरील भागांस असह्य तीव्र वेदना व अंतःक्षोभाची लक्षणें हे होत. त्यामुळें रोगी मृत्युपंथास लागेल काय अशी भीती पडते. पोटाचे स्नायू टणक होऊन ताठतात. नंतर अंन्नावरणदाह झाला म्हणजे आंतड्यांत वायु कोंडून उदर मोठें होतें व उदरांत तणावा बसतो व श्वासोछ्वासाच्या वेळीं दम लागतो. नंतर ताप येतो. जर शस्त्रक्रियोपचार केला नाहीं तर अंन्नावरणजन्य विषशोषणानें मृत्यु खास येतो. धमनी फुटून रक्तस्त्राव व्रणांतून सुरू झाला असतां शस्त्रक्रिया एकदम करण्यांत आली पाहिजे. ती येणें प्रमाणें - उदराच्या मध्यरेषेच्या वरील भागीं चिरावें आणि व्रण कोठें फुटला आहे तो तपास करावा. जेथें फुटकी जागा असते त्यावर लस जमून त्याचें कीट सांठलेले असतें. यावरून व्रण शोधणें बहुधा अवघड नसतें. शिवाय त्या जागीं दाह, लाली हीं लक्षणें असतात; व अन्नादि जठरांतील पदार्थहि त्या छिद्रावाटे पाझरत असतात. हें छिद्र बंद करण्यासाठीं बटव्याला किंवा कशास ज्या प्रकारानें दोरी ओवून घालतात तशी शिंवण घालतात.छिद्राच्या भोंवती दाहरहित जागेमध्ये टांके घालावे म्हणजे ती जागा घड्या पडण्यानें दुमडून त्याच्यावरील व खालील जागा टांके घालून मजबूत करावयाची. यानंतर जठराच्या बाहेरील बाजूवर व शेजारील आंतडी, यकृत, प्लीहादि इंद्रियांवर पोटांतील अन्नमय व जंतुमिश्रित द्रव पदार्थ चिकटलेले असतात. ते जंतुघ्र धावनांत बुडविलेल्या बोळ्यांनी साफ पुसून काढावे लागतात. म्हणजे अंन्नावरणदाह होण्याची भीति नसते.

यानंतर उदरांतील जखम अगोदर तींतून मलपूयोत्सर्जन होईल अशी व्यवस्था करून मिटवावी. बरेच रोगी अशा शस्त्रक्रियेनें बरे होतात.

   

खंड १३ : घ - जलपैगुरी  

 

 

 

  घंटय्याकवि
  घटोत्कच
  घटोत्कच लेणीं
  घड्याळ
  घनी
  घनौर
  घांट
  घाटगे
  घाटाळ
  घातमपूर
  घानची
  घायपात
  घारगड किल्ला
  घारघोडा
  घारापुरी
  घाशीराम कोतवाल
  घांसदाणा
  घासी
  घिरथ
  घिसाडी
  घुगुस
  घुंड
  घुबड
  घुराम
  घेरिया
  घेवडा
  घोटकी
  घोडबंदर
  घोडा
  घोडाघांट
  घोडाबारी
  घोडासर
  घोडें
  घोडेघांस
  घोरपड
  घोरपडी
  घोरपडे
  घोरी घराणें
  घोशी
  घोसाळे
  घोसी
  घोळ
 
 
  चउमू
  चकमा
  चकला रोषनाबाद
  चकवाल
  चकिया
  चक्कियर
  चक्कीनोआरो
  चक्रपाणि
  चक्रवर्ती
  चक्राप्पा
  चंगनाचेरी
  चंगर
  चच, चचनामा
  चचान
  चटया
  चडार
  चंडी
  चतुरमहाल
  चतुर साबाजी
  चतुरसिंग
  चतुर्थ
  चत्रा
  चॅथॅम
  चंदगड
  चंद घराणे
  चंदन
  चंदभाट
  चंदरभान
  चंदावरकर, नारायण गणेश
  चंदासाहेब
  चंदीपुर
  चंदेरी
  चंदेल्ल
  चंदौली
  चंदौसी
  चंद्र
  चंद्रकोना
  चंद्रगिरी
  चंद्रगुप्त
  चंद्रगोमिन्
  चंद्रनगर
  चंद्रभागा
  चंद्रहास
  चंद्रावती अथवा चंद्रावली
  चन्नगिरी
  चन्नपट्टण
  चन्नबसव
  चन्नरायपट्टण
  चंपा
  चंपानेर
  चपारण
  चंपावत
  चंपाषष्ठी
  चंबळा नदी
  चबा संस्थान
  चमारडी
  चरक
  चरखा
  चरखारी
  चरणदासी
  चरणव्यूह
  चरबी
  चरबीचें झाड
  चरी
  चर्मण्वती
  चलत-चित्रें
  चलन
  चल्लाकेरे
  चवळी
  चहा
  चक्षुर्मंनु
  चाकण
  चाकवत
  चागई
  चांगदेव
  चांगभकार
  चांगा केशवदास
  चाघताइखान
  चांचेगिरी
  चाचो
  चांडोद
  चाणक्य
  चातुर्मास्य
  चातुर्मास्य याग
  चातुर्वर्ण्य
  चात्सु
  चादचा
  चांदपूर
  चांदबिबी
  चांदभाट
  चांदला
  चांदवड
  चांदा
  चांदूर
  चांदूर बाजार
  चांद्रायण
  चानन शानन
  चानस्मा
  चानाल
  चानोड
  चाप्रा
  चाफळ
  चाबुआ
  चांभार
  चाम
  चामखीळ
  चामन
  चामराजनगर
  चामुंड
  चामुर्शी
  चार
  चारखा
  चारण
  चारदुआरं
  चारसद
  चारा
  चारीकार
  चार्टिझम
  चार्लंमांट, अर्ल ऑफ
  चार्वाक
  चालुक्य घराणें
  चालसिस
  चावडा
  चावंद
  चास-कमान
  चॉसर
  चासा
  चाहमान उर्फ चौहान
  चाळिसगांव
  चिक
  चिकंजी
  चिकबळ्ळापूर
  चिकाकोल
  चिकोडी
  चिक्कणर्ति
  चिक्केरूर
  चिक्टीआबर
  चिक्नायकन्हळ्ळी
  चिक्मगळूर
  चिखलदरा
  चिखली
  चिंगलपट
  चिंच
  चिचगड, जमीनदारी
  चिंचलीगदड
  चिंचवड
  चिचेवाडा
  चिंचौली
  चिंच्यु
  चिटणीस
  चितलनगर जमीनदारी
  चितळ
  चितळदुर्ग
  चिताकुल
  चिंतामणी
  चिंतामणी कवि
  चिंतामणी रघुनाथाचार्य
  चितारी
  चिति
  चितोड
  चित्तगांग
  चित्तगांग डोंगराळ प्रदेश
  चित्ता
  चित्तूर
  चित्फिरोझपूर
  चित्रकला
  चित्रकाव्य
  चित्रकूट
  चित्रकोट
  चित्रगुप्त
  चित्ररथ
  चित्रसंग्रहालयें
  चित्रळ
  चित्रांगदा
  चित्रावाव
  चिदंबर दीक्षित
  चिदंबरम्
  चिंदविन
  चिंदविन नदी
  चिदानंद स्वामी
  चिनडोंगर
  चिनमुलगुंद
  चिन लोक
  चिनसुरा
  चिनाब
  चिनीमाती किंवा केओलिन
  चिन्नविरन्ना
  चिन्नूर
  चिन्योत
  चिपळूण
  चिपळूणकर, कृष्णशास्त्री
  चिपळूणकर, विष्णुशास्त्री
  चिफू
  चिमणाजीआप्पा
  चिमणाजी दामोदर
  चिमणी
  चिरक्कल
  चिराबा
  चिलखत-वेदकालांतहि
  चिलिअनवाला
  चिली
  चिल्का सरोवर
  चिस्ती
  चीझी, अॅंटोनें लिओनार्ड डि
  चीन
  चीनी
  चीपुरुपल्ले
  चीर
  चीराल
  चुका
  चुकचि
  चुटिया
  चुडा
  चुडा संस्थान
  चुडेश्वर
  चुना
  चुनार
  चुंबकजन्य विद्युद्यंत्र
  चुंबकत्व
  चुंबकीय दृकशास्त्र
  चुंबन
  चुमल्हारी
  चुरू
  चूडामण
  चेकोस्लोव्हेकिया
  चेंगीझखान
  चेचेंझे
  चेटवई
  चेट्टी
  चेदूब बेट
  चेंबर्स रॉबर्ट
  चेयूर
  चेर घराणें
  चेरात
  चेरापुंजी
  चेरिअल
  चेरुमन
  चेरो
  चेर्रा
  चेल
  चेसेलडेन, विल्यम
  चेस्टरफील्ड
  चेस्टरफील्ड फिलिफ
  चैतन्य
  चैतसिंग
  चैत्य
  चैन
  चैबासा
  चोखामेळा
  चोवो
  चोडवरम
  चोध्रा
  चोपडे
  चोपदार
  चोबारी
  चोंभा
  चोरांग्ल
  चोरासी
  चोरी
  चोल
  चोल घराणें व चोल साम्राज्य
  चोवीस परगणा जिल्हा
  चौंगू
  चौघाट
  चौथाई, चौथ
  चौधरी
  चौबे जहागीर
  चौल
  चौलमुग्रा
  च्यवन
 
  छछरौली
  छट्टू
  छतारी
  छत्तरपूर
  छत्तिसगड विभाग
  छत्रपूर तहशील
  छत्रसाल
  छत्रे, केरो लक्ष्मण
  छत्रे, विष्णु मोरेश्वर
  छत्रे, सदाशिव काशीनाथ
  छंद:शास्त्र
  छप्पन देशचे राजे
  छप्रौली
  छब्रा
  छलाल
  छात
  छापखाना
  छापिआ
  छाप्री
  छायाचित्रपेटिका
  छाल
  छालिअर
  छिंद, लल्ल
  छिंदवाडा
  छिंपा
  छिब्रामऊ तहसील
  छुईखदान
  छुटिया
  छोटा उदेपूर
  छोटानागपूर
  छोटी साद्री
 
  जकात
  जॅक्सन अॅंड्र
  जॅक्सन व्हिल्ले शहर
  जखमा
  जगजीवनदास
  जगत्याल
  जगदलपूर
  जगदीशपूर
  जगन्नाथ
  जगन्नाथपंडित
  जगन्नाथपुरी
  जगन्नाथ शंकरशेट, मुर्कुटे
  जंगम
  जगय्या पेटा
  जंगल
  जंगल महाल
  जगलूर
  जगाध्री
  जग्रांव
  जंगीपूर
  जघाशूल
  जंजिरा
  जझिया
  जटलंड
  जटामांसि
  जटायु
  जटासूर
  जठरदाह
  जठरव्रण
  जडजीवघाद
  जडद्रव्य
  जडभरत
  जडवाद
  जडान्नविषबाधा
  जडावाचें काम
  जत
  जतिंग रामेश्वर
  जंतुजन्य रोग
  जतोई
  जत्रा
  जंदिआल गुरु
  जंदिआला
  जंदोला
  जनक
  जनजसवंत
  जननेंद्रियांचे गुप्तरोग
  जनमेजय
  जनस्थान
  जनाबाई
  जनार्दनस्वामी
  जनावरें
  जनीजनार्दन
  जपान
  जपानी वार्निस
  जबलपुर
  जंबुकेश्वरस्
  जंबुद्वीप
  जबूसर
  जमखिंडी
  जमदग्नि
  जमरुड
  जमाखर्च
  जमाबंदी
  जमालखान
  जमालपुर
  जमिकुंता
  जमीन
  जमीनदार व कुळें
  जमीनमहसूल
  जमुई
  जमेका
  जमेसाबाद
  जम्नोत्री
  जम्मलमडुगु
  जम्मू
  जयगड
  जयचंद
  जयदेव
  जयद्रथ
  जयनगर
  जयपाल
  जयपूर
  जयपुर जमीनदारी
  जयपुर संस्थान
  जयमल्ल
  जयरथ शृंगार
  जयरामस्वामी
  जयरामात्मज
  जयविजय
  जयसिंह
  जर उतणें
  जरतार
  जरत्कारु
  जरदाळू
  जरा
  जरासंघ
  जरीपटका
  जर्मन सिल्व्हर
  जर्मनी
  जलंगी
  जलजन्य विद्युतशक्ति
  जलघा
  जलपैगुरी

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .