विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
जग्रांव तहसीलः - पंजाबमध्यें लुधिआना जिल्ह्यांत ही तहसील आहे; व हिचें क्षेत्रफळ ४१७ चौ. मै. आहे. येथील लोकसंख्या सन १९११ सालीं १४६६५९ होती. ह्या तहसिलींत जग्रांव व रायकोट हीं दोन शहरें आहेत व १७० खेडी आहेत. या तहसिलीचा जमीनमहसूल ३.३ लाख सन १९०३-०४ सालीं होता शीख युद्धामधलें अलिवालचें रणक्षेत्र याच तहसिलींत आहे.
शहर. - तहसिलीचें मुख्य ठिकाण आहे. येथील लो.सं. सन १९११ सालीं १५०३९ होती. हें व्यापारी शहर आहे व येथें गहू, साखर, हस्तिदंती कोरीव जिनसा व बिलियर्डचे खेळण्याचे चेंडू ह्या जिनसांचा व्यापार जोरांत चालतो. येथें म्युनिसिपालिटी आहे. येथे सरकारी दवाखाना व म्युनिसिपालिटीच्या अग्लोव्हर्नाक्युलर स्कूल्स आहेत.