विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
जगलूर - हा तालूका म्हैसूर संस्थानांत चितलदुर्ग जिल्ह्यांत आहे. ह्याचें क्षेत्रफळ ३७२ चौ.मै. आहे व येथील लोकसंख्या (१९११) ५३५७४ होती. ह्या तालुक्यांत जगलूर शहर व १२९ खेडीं आहेत. ह्या तालुक्यांत जगनहल्ला नांवाची नदी आहे. ह्या तालुक्यांत कापूस, पांढरा 'जोला' व ऊंस व तांदुळ हीं पिकतात.