विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
जगय्या पेटा — ह्या नांवांचें शहर मद्रास इलाख्यांत कृष्णा जिल्ह्यांत आहे. येथील लोकसंख्या सन १९११ सालीं ८८०२ होती. 'उत्तर सरकार' व निझाम सरकारचें राज्य ह्यांमध्यें चालणार्या व्यापाराची हें शहर मोठी पेठ आहे. या शहरचें मूळचें नांव बेटावलु होतें; पण एका स्थानिक सरदारानें व्यापारी लोकांस मुद्दाम बोलावून त्या गावास आपल्या वडिलांचें नांव दिलें. ह्याच शहराजवळ कांहीं वर्षांपूर्वी ६६ फूट व्यास असलेला बुद्धाचा एक स्तूप सांपडला.