विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
जगत्याल (जगतियाल) ता लु काः— हैद्राबाद संस्थानांत करीमनगर जिल्ह्यांत हा तालुका आहे. क्षेत्रफळ ८६० चौ.मै. येथील लोक संख्या (१९११) ४६८२८ होती. ह्या तालुक्यांत तीन गांवें व २३५ खेडी आहेत. जमीन सुपीक असून महसूल सन १९०१ सालीं ३.९ लाख रूपये होता. येथें तादुंळ तलावाच्या पाण्यानें पुष्कळ उत्पन्न होतो.
गांव.— जगत्याळ तालुक्याचें मुख्य ठिकाण. येथील लोकसंख्या १९११ सालीं ११६८८ होती. ह्याच शहराजवळ जाफरूद्दवला नांवाच्या सरदारानें सन १७४७ त बांधलेला जुन्या काळचा प्रसिद्ध किल्ला आहे. येथें साळी लोक रेशमी लुगडी तयार करतात. ह्या शहरी सरकारी शाळा व दवाखाना आहे.