विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
छापिआ — संयुक्तप्रांताच्या गोंडा जिल्ह्याचा उत्रौला तशसिलींत हे खेडें आहे. हे बंगाल आणि नार्थ वेस्टर्न रेल्वेवरील एक स्टेशन आहे. येथील लोकसंख्या इ.स.१९०१ त ७३२ होती. या ठिकाणी सहजानंद साधूचा जनम झाला. पुढें हा महात्मा स्वामी नारायण या नावानें प्रसिद्धीस आला. त्यास कृष्णाचा अवतार मानीत. या ठिकाणीं एक मोठें देऊळ आहे. त्यांत या साधूची समाधी आहे. येथें वर्षांतून दोनदा यात्रा भरतात.