विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
छंदःशास्त्र — एक वेदांग व वैदिक वृत्तांचे शास्त्र. वैदिक छंदःशास्त्रावर छंदोविवृत्ति नांवाचा पिंगल मुनीचा एक अति प्राचीन ग्रंथ आहे; यालाच (छंदःशास्त्रीय) वेदांग म्हणतात. ॠग्वेदांतील छंदांचे उल्लेख, वेदग्रंथ व इतरत्र उल्लिखित वृत्तांचीं नांवें व संख्या, वेदोत्तर ग्रंथांतील खास छंदः- शास्त्रीय भाग व निदानसूत्रें, छंदःशास्त्राची वाढ, संस्कृत छंदःशास्त्राचा प्राकृत छंदःशास्त्राशीं संबंध, मराठी वृत्तें, तेलगू व चिनी छंदःशास्त्र, इत्यादि विवेचन 'विज्त्रानेतिहास' (प्रकरण ५ वें) या ज्त्रानकोशाच्या ५व्या विभागांत सविस्तर आलेंच आहे.