विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
छत्रपूर तहशील— मद्रास. गंजम (छत्रपूर) जिल्हा. कालीकोट, बिडी, हुम्मा आणि पालूरू या चार वतनांनीं (इस्टेट्स) मिळून ही जमीनदारी (तालुका) बनली आहे. क्षेत्रफळ ३०० चौ.मै. आहे. हा भाग नेहमीं मोठा रमणीय असून समुद्राकडे टेंकड्या कमी कमी उंच होत गेल्यानें नेहमी थंडहि असतो. यांत ३२४ खेडीं आहेत. लोकसंख्या (१९२१) १५९५८० व उत्पन्न (कुंडलचें धरून) साडेचार लाखांवर आहे.