विभाग तेरावा : घ - जलपैगुरीछ — तारखेकरितां खूण म्हणून पूर्वीच्या पत्रांतून छ सारखे अक्षर काढीत; उदा. प॥ छ २७ रविलावल. या वर्णाच्या चार अवस्था आहेत. १ ली अशोकाच्या गिरनार लेखांत; २ री इ.स. पहिल्या व दुसर्या शतकांतील मथुरेच्या लेखांत; ३ री ११ व्या शतकांतील उज्जनी येथील लेखांत व ४ थी तिसर्या अवस्थेपासून बनलेली आहे.