विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चौघाट — मद्रास इलाख्याच्या मलबार जिल्ह्यांतील पोनानी तालुक्यांतील एक गांव. याची लोकसंख्या १९०१ सालीं ७४२६ होती. येथें मुन्सफाची व डेप्युटी तहसिलदाराची कचेरी आहे. याच्या पूर्वेस पलयुर येथें रोमोसीरियन पंथाचें स्त्रिस्ती देवालय आहे. हें मलबारांतील मूळच्या सात देवळांपैकी एक आहे असे म्हणतात. हें समुद्रालगतच्या सरोवरावर वसलें असून येथून पोनानीं व त्रावणकोर या शहरीं कालव्यामधून जातां येतें.