विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चैबासा— बिहार-ओरिसा प्रांतांतील सिंगभूम जिल्ह्यांतील मुख्य ठिकाण. १९११ मधील लोकसंख्या ९००९. १८७५ मध्यें येथें म्युनिसिपालटी स्थापन झाली. जिल्हातुरूंगांत कैद्यांकडून, तेल काढणें, गालिचे तयार करणें, दोर्या वळणें इत्यादि कामें घेतात.