प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग तेरावा : घ - जलपैगुरी

चैतन्य — एका वैष्णव पंथाचा संस्थापक व धर्मसुधारक. हा बंगाल्यांत होऊन गेला. वल्लभपंथ व चैतन्यपंथ या दोहोंतील मुख्य भेद हा आहे कीं, एकानें (वल्लभपंथानें) धार्मिक आचारांवर म्हणजे बाह्य लक्षणांवर भर दिला होता तर दुसर्‍यानें भावनांवर म्हणजे अंतस्थ वृत्त्तींवर सर्व भर दिला होता. चैतन्यानें भावनांचा परिपोष करण्याकडेच विशेष लक्ष दिलें. राधा व कृष्ण यांचें प्रेम, त्याचप्रमाणें इतर भक्तिविषयक विषयांसंबंधीं कीर्तनें करून लोकांचीं मनें (धर्माकडे) वळविण्याचा चैतन्यानें प्रयत्‍न केला. जयदेवादि संस्कृत कवींनीं व कांहीं प्राकृत कवींनीं सुद्धां कृष्ण व राधा यांच्या प्रेमासंबंधीं अनेक सुरस व मनोहर गीतें रचिलीं होती. त्या काळीं प्रचलित असलेल्या हिंदुधर्माच्या निवळ तान्त्रिक बाबतीची यथेच्छ निर्भर्त्सना करून त्याऐवजीं आध्यत्मिक भक्ति करण्याचा चैतन्यानें उपदेश केला. त्याचप्रमाणें जातिभेदाचा निषेध करून त्यानें मुसलमानांसकट सर्वीस आपल्या शिष्यशाखेंत घेतलें. यावरून चैतन्य अधिक धैर्यशाली धर्मसुधारक होता असें म्हणावयास हरकत नाहीं.

चैतन्याचें मूळचें नांव ''बिसंभर'' (विश्वंभर) मिश्र असून त्याच्या पित्याचें नांव जगन्नाथमिश्र व आईचें नांव सची देवी होतेत्त्. जगन्नाथमिश्र प्रथम पूर्वबंगाल्यांत सिलहट येथें रहात असें; पण कनिष्ठ मुलगा जो विसंभर त्याच्या जन्मापूर्वी तो कलकत्त्याच्या उत्तरेस ६० मैलांवर भागीरथीच्या तारीं असणार्‍या नडिया अगर नवद्वीप येथें जाऊन राहिला होता. ज्येष्ठ पुत्राचें नांव विश्वरूप असून त्यास नित्यानंद असेंहि म्हणतात. जगन्नाथास मुलगे असे हे दोघेच या दोहोंच्या मध्यें आठ मुली झाल्या; पण त्या सर्व लहानपणींच वारल्या. श. १४०७ इ.स. १४८५ फाल्गुन शु. पौर्णिमा या दिवशीं चैतन्य जन्मला. पुढें कांहीं काळानंतर त्यास कृष्ण चैतन्य हें नांव मिळाले; त्याचे शिष्य त्यास कृष्णाचा अवतार समजत; व त्या नात्यानें गांवच्या स्त्रियांबरोबर तो पोरखेळ खेळला असेंहि सांगतात. पण ऐतिहासिक दृष्ट्या ही हकीकत खरी म्हणतां येत नाहीं. लहानपणीं भगवद्‍गीता व भागवत पुराण या ग्रंथांचा त्यानें विशेष अभ्यास केला होता. व बौद्धधर्माचा त्याच्या मनावर चांगला पगडा बसला होता असें समजण्यांत येतें. गौरंग व गौरचंद्र अशीं आणखींहि चैतन्यास दोन नांवें आहेत. अठराव्या वर्षी लछमी देवी (वल्लभाचार्याची कन्या) नांवाच्या एका स्त्रीशीं लग्न करून त्यानें गृहस्थाश्रम पत्करला व शिष्य जमवून त्यांस प्रापंचिक शिक्षण देण्याचा क्रम सुरू केला. थोड्यच दिवसांत त्यानें प्रवास करावयास सुरूवात करून पूर्वबंगालमधील पुष्कळ ठिकाणें पाहिलीं. भिक्षा मागणें व गाणें हा त्याचा धंदा होता व यावर त्यानें बराच पैसा मिळावला. प्रवासांत त्याची बायको वारली. तेव्हां गृहीं परतल्यावर त्यानें दुसरें लग्न केलें. तो विसाव्या वर्षी गयेस पितृक्रिया करण्यास गेला व तेथून परत आलावर त्यानें आपल्या आयुष्यांतील मुख्य कामास सुरूवात केली. ब्राम्हणांच्या धार्मिक विधींचा अगर बाह्य आचारांचा निषेध करून मुक्ति मिळविण्याचा खरा व एकच मार्ग म्हटला म्हणजे श्रीहरीवर श्रद्धा ठेवून त्याची भक्ति व नामसंकीर्तन करणें हा होय असें त्यानें प्रतिपादिलें. त्याचप्रमाणें जातिभेदाची निर्भर्त्सना करून विश्वबंधुत्वाचा उपदेश त्यानें केला.

ईश्वरावर श्रद्धा ठेवावी व त्याची भक्ति करावी ह्या दोन तत्त्वांचा उपदेश चैतन्याच्या पूर्वी अद्वैताचार्य नांवाच्या एका गृहस्थानें केला होता; दैनिक ब्रम्हकर्म संपल्यावर गंगातटाकीं जाऊन ''धार्मिक बाह्य विधींच्या ऐवजीं श्रद्धा व भक्ति या दोन गोष्टी प्रस्थापित करण्याकरितां ईश्वरा तूं अवतार घे'' असें ओरडण्याचा सदर ब्राम्हणाचा परिपाठ असे. असेंहि सांगतात कीं, सदर आचार्य चैतन्याचे गुरू असून पुढें चैतन्याचे शिष्य बनले. कांहींहि असलें तरी, इतर गोष्टी सोडून या दोनच तत्त्वांचा जाहीररीतीनें प्रसार प्रथमतः कृष्ण चैतन्यानेंच केला असें म्हणावयास हरकत नाहीं. त्याचा भाऊ नित्यानंद याचें त्यास सहाय्य असे. नित्यानंदास बलरामाचा अवतार समजत. श्रीहरींचे नामसंकीर्तन व यशवर्णन करण्यास यापुढें चैतन्यानें लोकांचा जमाव जमविण्यास आरंभ केला. आरंभीं आरंभीं अशीं कीर्तनें खासगी रीतीनें श्रीबास नांवाच्या (चैतन्याच्या) शिष्याच्या घरीं होत असत. लोक, विशेषतः कालीचे उपासक या वैष्णवांचा तिरस्कार व उपहास करीत. एकानें तर हीं कीर्तनें जेथें होत असत त्या घराच्या पायर्‍यांवर बकर्‍याचें रक्त शिंपडून तांबडीं कुलें पसरून ठेवलीं. अशा कीर्तनप्रसंगीं भक्तीची तीव्रता इतक्या पराकाष्ठेस पोहोचे कीं, मोठ्यादा हरिनामाचा गजर करणारे व विशेषतः चैतन्य यांची ''ब्रम्हानंदी लागली टाळी, कोण देहातें सांभाळी'' अशी स्थिती होई. १५१० सालीं कट्व येथील केशवभारती यानें चैतन्यास संन्यासाश्रमाची दीक्षा दिली. संन्यास घेतल्यावर चैतन्य प्रथम पुरीस जगन्नाथाचें दर्शन घेण्यास गेला व तेथून सर्व देशभर आपल्या मताचा उपदेश करीत करीत ६ वर्षे हिंडला. एके प्रसंगीं तो काशीस गेला व तेथें शंकराचार्यांच्या अद्वैतपर मताच्या प्रकाशानंदाशीं त्यानें वादविवाद केल्याचें सांगतात. वेदांतसूत्रांवरील शंकराचार्याचें भाष्य त्याज्य ठरवून त्यानें मुळांतील अर्थ उलट अधिकच गूढ करून ठेवला आहे असें चैतन्यानें म्हटलें आहे. बादरायणाचार्याच्या शब्दांचा मूळ साधा, सरळ अर्थ न घेतां शंकराचार्यांनीं त्यांवर आपला स्वतःच्या अर्थ लादला आहे. बादरायणाचार्यानीं परिणामवादाचा पुरस्कार केला आहे पण शंकराचार्यानीं तो टाकून देऊन त्याऐवजीं विवर्तवाद प्रतिपादिला आहे. चैतन्याच्या मतें पहिला परिणामवादच बरोबर आहे. येणें प्रमाणें सर्व देशभर हिंडल्यावर तो पुनः पुरीस परत आला; तेथें त्यानें आपल्या आयुष्याचीं शेवटचीं अठरा वर्षे काढली व इ.स. १५३३ (शके १४५५) मध्यें तो निवर्तला. माबेल डफच्या मतें तो १५२७ त वारला. त्याच्या देहावसानाची कथा अशीं सांगतात कीं, एकदा त्याला दृष्टांत झाला कीं श्रीकृष्ण जलविहार करीत आहेत. तेव्हां त्याला भेटण्याकरितां तो समुद्रांत उतरला व बुडून मेला. कोणी म्हणतात तो देहासकट वैकुंठाला गेला.

चैतन्याच्या नांवावर जीं कांहीं मते आहेत त्यांपैकीं कांहीं येणेंप्रमाणें :- कृष्ण हा परमेश्वर असून तो स्वतः इतका सुंदर आहे कीं प्रत्यक्ष मदनाच्या देखील मनांत त्याजविषयीं प्रेम उत्पन्न होतें. येवढेच नव्हे तर स्वतःविषयींच तो कामुक होतो. त्याची परब्रम्ह शक्ति सर्व विश्वाला व्यापून त्याच्याच मायाशक्तीच्या योगेकरून ती सावयवरूप धारण करते. तो स्वतः सर्व वस्तूंचा आत्मा आहे. त्याच्या अंगीं बिलासशक्ति असून ती द्विविध आहे. एकीच्या योगानें, गोपींशीं रासक्रीडा खेळत असतां, जितक्या गोपी तितकीं रूपें कृष्णानें धारण केलीं; ह्या शक्तीस ''प्राभवविलास'' म्हणतात. दुसर्‍या शक्तीच्या योगानें त्यास चतुर्व्यूह स्वरूप (वासुदेव, संकर्षण इत्यादि) धारण करतां येतें; हिला ''वैभवविलास'' म्हणतात. वासुदेव चित् अगर बुद्धीचा दर्शक आहे; संकर्षण आत्मसंवितचा, प्रद्युम्न प्रेमाचा व अनिरूद्ध विलासाचा दर्शक आहे. यांपैकीं एका व्यूहापासून नेहेमींच्या अवतारांची उत्पत्ति आहे. सत्त्व, रज, तम हे तीन गुण ज्या मानानें प्रमुख भाग घेतात त्या मानानें श्रीकृष्ण हा अनुक्रमें विष्णु, ब्रम्हदेव, शिव हीं रूपें धारण करतो. सूर्याच्या उदयास्ताप्रमाणेंच श्रीकृष्णाचे विलासहि नित्य चालतात; त्याचे नित्य अगर शाश्वत स्वरूपाचें विलास गोलोकांत चालू असतात, श्रीकृष्णाच्या ठायीं तीन शक्ती आहेत. अंतःशक्ति म्हणजे चित्शक्ति बाह्यशक्ति, म्हणजे जी आभास उत्पन्न करते ती; व विशिष्ट (गुणान्वित) शक्ति म्हणजे जी जीवस्वरूप धारण करते ती. त्याची मुख्य शक्ति म्हणजे जी मनाचा बिकास करते अगर आनंद उत्पन्ना करते ती; ही प्रेमशक्ति असावीसें वाटतें. हें प्रेम भक्ताच्या अंतःकरणांत जेव्हां स्थिर होतें तेव्हां त्यास महाभाव म्हणतात. प्रेम जेव्हां अगदीं परमावधीस पाहोंचतें तेव्हां तें राधास्वरूप बनतें. राधा ही सर्वांत अत्यंत प्रेम करण्यास योग्य (प्रिय) अशी असून ती सर्व गुणान्वित आहे. श्रीकृष्णाच्या परम प्रेमास ती पात्र झाली असून तीस प्रेमस्वरूप बनविल्यामुळें, अंतःकरणांतील कांहीं सुखकर भावना तिचीं भूषणें म्हणून समजण्यांत येतात. गोपींनीं विलास निर्व्याज प्रेमानेंच केले होते. परमात्मा अमित अगर मर्यादारहित असून तो चिन्मय असा एक परमाणु आहे. या दोघांचा एकमेकांशीं अगदीं नित्य संबंध असून, सदर संबंध कधींहि तोडून टाकतां येत नाहीं. भगवान श्रीकृष्ण हा ''आश्रय'' असून जीव हा ''आश्रित'' आहे. या दोहोंमधील संबंध अद्वैतपर त्याचप्रमाणें द्वैतपरहि आहे. म्हणजे चैतन्याचा वेदान्तविषयक सिद्धांत निंबार्काच्या सिद्धांताप्रमाणेंच आहे. ज्याप्रमाणें मधमाशी ही मधाहून वेगळीं अगर भिन्न असून त्याभोंवती ती घिरट्या घालते व मधुपान केल्यानंतर ती मधानें युक्त अशी होते. म्हणजे मधवती होते तद्वत् जीव हा परमात्म्याहून वेगळा असून तो परमात्म्याचेंच सतत एकसारखें चिन्तन करतो. (त्याच्या सहवासांत रहावयास पहातो.) व नंतर प्रेमामुळें तो परमात्ममय होतो. तेव्हां व्यक्तिशः स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव तो विसरतो व त्याच्याच (परमात्म्याच्या) ठायीं तो लीन होतो. म्हणजे जीव व ईश्वर वस्तुतः भिन्न असूनहि ज्या ब्रम्हानंदाच्या स्थितींत जीव ईश्वराशीं पूर्ण तादात्म्य पावतो ती स्थिती या ठिकाणीं वर्णिली आहे. श्रीकृष्ण हा मायेचा स्वामी असून जीव हा तिचा दास आहे. जीव ज्या वेळीं मायापाश तोडतो तेव्हा त्यास आपलें स्वतःचें स्वरूप व ईश्वराशीं असलेला वास्तविक संबंध स्पष्ट कळून येतो. श्री कृष्णाची प्राप्ति फक्त भक्तीनेंच करून घेतां येते.

कृष्णचैतन्य, नित्यानंद व अद्वैतानंद हे या संप्रदायाचे तीन 'प्रभु' समजले जातात. नित्यानंदाचे वंशज नडिया येथें व अद्वैताचे शांतिपुर येथे रहातात. हे या संप्रदायाचे (आध्यात्मिक बाबतींत) गुरू होत. खुद्द चैतन्यानेंच नित्यानंदास पीठाचा मुख्य अधिकारी नेमले. नित्यानंदाचे स्त्रीवंशज बाले गार येथें, व पुरूषवंशज बराकपुराजवळ खोर्दु येथें राहतात. चैतन्यसंप्रदायाचीं मथुरा, वृंदावन येथें देवळें आहेत; मुख्य तीन देवळें बंगाल्यांत आहेतः- १ नडिया येथील चैतन्याच्या नांवाचें; २ अम्बिका येथील नित्यानंदच्या नांवाचें; ३ व अग्रद्वीप येथील गोपिनाथाच्या नांवाचें. सिल्हट जिल्ह्याच्या उत्तरभागांत (येथेंच चैतन्याचा बाप प्रथम रहात होता) धाकादक्षिण गांवाजवळच चैतन्याचें एक देऊळ आहे. जिल्ह्याच्या सर्व भागांतून येवढेंच नव्हें तर बंगालमधून सुद्धां पुष्कळ यात्रेकरू या ठिकाणाचें दर्शन घ्यावयास येतात. 'राजशाही' जिल्ह्यांत ''खेतुर'' येथें त्याचें एक देऊळ बांधलें आहे. या ठिकाणीं ऑक्टोबर महिन्यांत जत्रा भरते. त्यावेळीं सुमारे २५००० माणसें येतात.

चैतन्य संप्रदायाचे लोक कपाळी पांढरा ''नाम'' लावतात. एक रेघ नाकाच्या शेंड्यापर्यंत आलेली असते. गळ्यात तुळशीच्या मण्यांची तीन पदरी माळ घालतात व तशीच दुसरी एक माळ श्रीहरीनामाचा जप करतांना वापरतात. गुरूस देव समजून त्याची पूजा करणें हा ह्या पंथाचा विशेष होय. अद्वैतानंदाचे बहुतेक सर्व अनुयायी जातिभेद पाळतात. तथापि कांहीं थोडे (बैरागी) सदर भेद पाळीत नाहींत; या संप्रदायाच्या एका शाखेंत जोगी व जोगिणी आहेत. ते एकाच मठांत रहातात; ते परस्परांशीं शारीरिक प्रेमसंबंधानें बांधलेले नसून अध्यात्मिक अगर सात्त्विक प्रेमसंबंधानें बांधलेले असतात. ''सद्‍गोप'' जातींतील राम सरम पाल नांवाच्या एका माणसानें सुमारे २०० वर्षांपूर्वी या पंथाची ''कर्ताभाज'' नांवाची शाखा स्थापन केली (कर्ताभाज म्हणजे कर्ता अगर मुख्य त्याचे उपासक). या शाखेंत सर्व जातींच्या लोकांस घेतलें जातें; भेदभाव असा मुळींच पाळण्यांत येत नाहीं. मूळ प्रस्थापक (याला कर्ता बाबा असेंहि म्हणत) घोषपुर येथें निवर्तला. त्याच्या सन्मानार्थ त्याचे भक्त नियमितपणें जमतात. चैतन्यसंप्रदायाचे गुरू, मग ते पुरूष असोत अगर स्त्रिया असोत, अविवाहित असतात.

वर जे तीन प्रभू सांगितले त्यांनीं मुळींच ग्रंथ लिहिले नाहींत. तथापि चैतन्याच्या शिष्यांनीं विशेषतः ''रूप'' व ''सनातन'' यांनीं बरेच ग्रंथ लिहिले. सनातनानें लिहिलेल्या ग्रंथांपैकीं ''रसामृतसिंधु'' नांवाच्या एका ग्रंथांत भक्तिवृत्तीचें विशदीकरण करून भक्तिवृत्तीप्रत नेणार्‍या निरनिराळ्या मानसिक अवस्था व भक्तीचे निरनिराळे प्रकार विशदपणें समजाऊन सांगितले आहेत. या संप्रदायाचें पुष्कळ वाङ्‌मय तयार झालें आहे.

[वरील माहिती बहृंशी डॉ. भांडारकर यांच्या 'वैष्णविझम् अँड मायनर रिलीजियस सिस्टिम्स' या ग्रंथावरून घेतली आहे. याशिवाय एच्.एच्. विल्सनचे रोस्टनें प्रसिद्ध केलेले ग्रंथ; हॉपकिन्स-रिलिजन्स ऑफ इंडिया; मोनियर विल्यम्स-ब्रॅम्हनिझम अँड हिंदुइझम बार्थ-रिलिजन्स ऑफ इंडिया, इत्यादि उपयुक्त ग्रंथ आहेत वृंदावनदासनें लिहिलेलें चैतन्यचरित्र बरेंच विश्वसनीय म्हणतां येईल.]

 

   

खंड १३ : घ - जलपैगुरी  

 

 

 

  घंटय्याकवि
  घटोत्कच
  घटोत्कच लेणीं
  घड्याळ
  घनी
  घनौर
  घांट
  घाटगे
  घाटाळ
  घातमपूर
  घानची
  घायपात
  घारगड किल्ला
  घारघोडा
  घारापुरी
  घाशीराम कोतवाल
  घांसदाणा
  घासी
  घिरथ
  घिसाडी
  घुगुस
  घुंड
  घुबड
  घुराम
  घेरिया
  घेवडा
  घोटकी
  घोडबंदर
  घोडा
  घोडाघांट
  घोडाबारी
  घोडासर
  घोडें
  घोडेघांस
  घोरपड
  घोरपडी
  घोरपडे
  घोरी घराणें
  घोशी
  घोसाळे
  घोसी
  घोळ
 
 
  चउमू
  चकमा
  चकला रोषनाबाद
  चकवाल
  चकिया
  चक्कियर
  चक्कीनोआरो
  चक्रपाणि
  चक्रवर्ती
  चक्राप्पा
  चंगनाचेरी
  चंगर
  चच, चचनामा
  चचान
  चटया
  चडार
  चंडी
  चतुरमहाल
  चतुर साबाजी
  चतुरसिंग
  चतुर्थ
  चत्रा
  चॅथॅम
  चंदगड
  चंद घराणे
  चंदन
  चंदभाट
  चंदरभान
  चंदावरकर, नारायण गणेश
  चंदासाहेब
  चंदीपुर
  चंदेरी
  चंदेल्ल
  चंदौली
  चंदौसी
  चंद्र
  चंद्रकोना
  चंद्रगिरी
  चंद्रगुप्त
  चंद्रगोमिन्
  चंद्रनगर
  चंद्रभागा
  चंद्रहास
  चंद्रावती अथवा चंद्रावली
  चन्नगिरी
  चन्नपट्टण
  चन्नबसव
  चन्नरायपट्टण
  चंपा
  चंपानेर
  चपारण
  चंपावत
  चंपाषष्ठी
  चंबळा नदी
  चबा संस्थान
  चमारडी
  चरक
  चरखा
  चरखारी
  चरणदासी
  चरणव्यूह
  चरबी
  चरबीचें झाड
  चरी
  चर्मण्वती
  चलत-चित्रें
  चलन
  चल्लाकेरे
  चवळी
  चहा
  चक्षुर्मंनु
  चाकण
  चाकवत
  चागई
  चांगदेव
  चांगभकार
  चांगा केशवदास
  चाघताइखान
  चांचेगिरी
  चाचो
  चांडोद
  चाणक्य
  चातुर्मास्य
  चातुर्मास्य याग
  चातुर्वर्ण्य
  चात्सु
  चादचा
  चांदपूर
  चांदबिबी
  चांदभाट
  चांदला
  चांदवड
  चांदा
  चांदूर
  चांदूर बाजार
  चांद्रायण
  चानन शानन
  चानस्मा
  चानाल
  चानोड
  चाप्रा
  चाफळ
  चाबुआ
  चांभार
  चाम
  चामखीळ
  चामन
  चामराजनगर
  चामुंड
  चामुर्शी
  चार
  चारखा
  चारण
  चारदुआरं
  चारसद
  चारा
  चारीकार
  चार्टिझम
  चार्लंमांट, अर्ल ऑफ
  चार्वाक
  चालुक्य घराणें
  चालसिस
  चावडा
  चावंद
  चास-कमान
  चॉसर
  चासा
  चाहमान उर्फ चौहान
  चाळिसगांव
  चिक
  चिकंजी
  चिकबळ्ळापूर
  चिकाकोल
  चिकोडी
  चिक्कणर्ति
  चिक्केरूर
  चिक्टीआबर
  चिक्नायकन्हळ्ळी
  चिक्मगळूर
  चिखलदरा
  चिखली
  चिंगलपट
  चिंच
  चिचगड, जमीनदारी
  चिंचलीगदड
  चिंचवड
  चिचेवाडा
  चिंचौली
  चिंच्यु
  चिटणीस
  चितलनगर जमीनदारी
  चितळ
  चितळदुर्ग
  चिताकुल
  चिंतामणी
  चिंतामणी कवि
  चिंतामणी रघुनाथाचार्य
  चितारी
  चिति
  चितोड
  चित्तगांग
  चित्तगांग डोंगराळ प्रदेश
  चित्ता
  चित्तूर
  चित्फिरोझपूर
  चित्रकला
  चित्रकाव्य
  चित्रकूट
  चित्रकोट
  चित्रगुप्त
  चित्ररथ
  चित्रसंग्रहालयें
  चित्रळ
  चित्रांगदा
  चित्रावाव
  चिदंबर दीक्षित
  चिदंबरम्
  चिंदविन
  चिंदविन नदी
  चिदानंद स्वामी
  चिनडोंगर
  चिनमुलगुंद
  चिन लोक
  चिनसुरा
  चिनाब
  चिनीमाती किंवा केओलिन
  चिन्नविरन्ना
  चिन्नूर
  चिन्योत
  चिपळूण
  चिपळूणकर, कृष्णशास्त्री
  चिपळूणकर, विष्णुशास्त्री
  चिफू
  चिमणाजीआप्पा
  चिमणाजी दामोदर
  चिमणी
  चिरक्कल
  चिराबा
  चिलखत-वेदकालांतहि
  चिलिअनवाला
  चिली
  चिल्का सरोवर
  चिस्ती
  चीझी, अॅंटोनें लिओनार्ड डि
  चीन
  चीनी
  चीपुरुपल्ले
  चीर
  चीराल
  चुका
  चुकचि
  चुटिया
  चुडा
  चुडा संस्थान
  चुडेश्वर
  चुना
  चुनार
  चुंबकजन्य विद्युद्यंत्र
  चुंबकत्व
  चुंबकीय दृकशास्त्र
  चुंबन
  चुमल्हारी
  चुरू
  चूडामण
  चेकोस्लोव्हेकिया
  चेंगीझखान
  चेचेंझे
  चेटवई
  चेट्टी
  चेदूब बेट
  चेंबर्स रॉबर्ट
  चेयूर
  चेर घराणें
  चेरात
  चेरापुंजी
  चेरिअल
  चेरुमन
  चेरो
  चेर्रा
  चेल
  चेसेलडेन, विल्यम
  चेस्टरफील्ड
  चेस्टरफील्ड फिलिफ
  चैतन्य
  चैतसिंग
  चैत्य
  चैन
  चैबासा
  चोखामेळा
  चोवो
  चोडवरम
  चोध्रा
  चोपडे
  चोपदार
  चोबारी
  चोंभा
  चोरांग्ल
  चोरासी
  चोरी
  चोल
  चोल घराणें व चोल साम्राज्य
  चोवीस परगणा जिल्हा
  चौंगू
  चौघाट
  चौथाई, चौथ
  चौधरी
  चौबे जहागीर
  चौल
  चौलमुग्रा
  च्यवन
 
  छछरौली
  छट्टू
  छतारी
  छत्तरपूर
  छत्तिसगड विभाग
  छत्रपूर तहशील
  छत्रसाल
  छत्रे, केरो लक्ष्मण
  छत्रे, विष्णु मोरेश्वर
  छत्रे, सदाशिव काशीनाथ
  छंद:शास्त्र
  छप्पन देशचे राजे
  छप्रौली
  छब्रा
  छलाल
  छात
  छापखाना
  छापिआ
  छाप्री
  छायाचित्रपेटिका
  छाल
  छालिअर
  छिंद, लल्ल
  छिंदवाडा
  छिंपा
  छिब्रामऊ तहसील
  छुईखदान
  छुटिया
  छोटा उदेपूर
  छोटानागपूर
  छोटी साद्री
 
  जकात
  जॅक्सन अॅंड्र
  जॅक्सन व्हिल्ले शहर
  जखमा
  जगजीवनदास
  जगत्याल
  जगदलपूर
  जगदीशपूर
  जगन्नाथ
  जगन्नाथपंडित
  जगन्नाथपुरी
  जगन्नाथ शंकरशेट, मुर्कुटे
  जंगम
  जगय्या पेटा
  जंगल
  जंगल महाल
  जगलूर
  जगाध्री
  जग्रांव
  जंगीपूर
  जघाशूल
  जंजिरा
  जझिया
  जटलंड
  जटामांसि
  जटायु
  जटासूर
  जठरदाह
  जठरव्रण
  जडजीवघाद
  जडद्रव्य
  जडभरत
  जडवाद
  जडान्नविषबाधा
  जडावाचें काम
  जत
  जतिंग रामेश्वर
  जंतुजन्य रोग
  जतोई
  जत्रा
  जंदिआल गुरु
  जंदिआला
  जंदोला
  जनक
  जनजसवंत
  जननेंद्रियांचे गुप्तरोग
  जनमेजय
  जनस्थान
  जनाबाई
  जनार्दनस्वामी
  जनावरें
  जनीजनार्दन
  जपान
  जपानी वार्निस
  जबलपुर
  जंबुकेश्वरस्
  जंबुद्वीप
  जबूसर
  जमखिंडी
  जमदग्नि
  जमरुड
  जमाखर्च
  जमाबंदी
  जमालखान
  जमालपुर
  जमिकुंता
  जमीन
  जमीनदार व कुळें
  जमीनमहसूल
  जमुई
  जमेका
  जमेसाबाद
  जम्नोत्री
  जम्मलमडुगु
  जम्मू
  जयगड
  जयचंद
  जयदेव
  जयद्रथ
  जयनगर
  जयपाल
  जयपूर
  जयपुर जमीनदारी
  जयपुर संस्थान
  जयमल्ल
  जयरथ शृंगार
  जयरामस्वामी
  जयरामात्मज
  जयविजय
  जयसिंह
  जर उतणें
  जरतार
  जरत्कारु
  जरदाळू
  जरा
  जरासंघ
  जरीपटका
  जर्मन सिल्व्हर
  जर्मनी
  जलंगी
  जलजन्य विद्युतशक्ति
  जलघा
  जलपैगुरी

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .