विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चेल — पंजाबमध्ये पतियाळा संस्थानांतील पिंजार तहसिलींत पतियाळाच्या महाराजांचें उन्हाळ्यांतील हवा खाण्याचें मुख्य ठिकाण. सिमल्याच्या दक्षिणेस १९ मैल आहे. गुरख्यांबरोबर झालेल्या लढाईमध्ये इंग्रज सरकारनीं हें ठिकाण १८१५ मध्यें पतियाळा संस्थानास जोडलें.