विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चेर्रा— आसामच्या खासी टेकड्यांमध्ये एक लहान संस्थान आहे. इ.स.१९११ त येथील लोकसंख्या ९१९८ होती. याचें उत्पन्न १९०३-०४ सालांत ७९०० रू. होतें. यांत कोळशाची व लोखंडाची खाण आहे. यांत बटाटे, संत्रे, कापूस, बाजरी, सुपारी, विड्याची पानें, मोहरी, सुंठ व मद्य होतात. याचा संस्थानिक ठरलेला नाही. सन १९०१ त जेव्हां नवा संस्थानिक नेमण्यांत आला त्या वेळेस दंगेधोपे झाले होते.