विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चेरिअल — हैद्राबाद संस्थानच्या नलगोंड जिल्ह्याचा तालुका आहे. याचे क्षेत्रफळ ७३९ चौ.मैल आहे. लोकसंख्या १९११ त १८७२६५. यांत १९१ खेडी आहेत; व त्यापैकी २७ जहागिर्या आहेत. यातील जमीनीचें उत्पन्न १०७ लाख आहे. पहिल्यानें तालुक्याने ठाणें चेरियल येथें होते. इ.स.१९०५ त वरंगळ जिल्हा जेव्हां रद्द करण्यांत आला तेव्हां त्या जिल्ह्याच्या वर्दन्नापेठ तालुक्यातील पुष्कळ खेडीं यास जोडण्यांत आलीं व येथील मुख्य ठाणें जंगाव येथें नेण्यांत आलें. जंगाव निझाम स्टेट रेस्वेवर स्टेशन आहे. यांत तांदूळ पिकतात व जमिनीस तळ्याचें पाणी देतात.