विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चेदूब बेट— खालच्या ब्रम्हदेशाच्या क्यउकप्यू जिल्ह्याच्या आराकान किनार्यापासून कांहीं मैलांवर हें बेट आहे. याचें क्षेत्रफळ ३०८ चौ.मैल आहे. सन १९११ त याची लोकसंख्या ३०१९७ होती. याचा आकार त्रिकोणासारखा आहे. याच्या वायव्येकडील भागांत एक ज्वालामुखी टेकडी आहे. यांतून तांदूळ व तंबाखू बाहेर जातात. मुख्य शहर चेदूब. लो.सं. (१९०१) १५४०.