विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चेटवई — मद्रासच्या मलबार जिल्ह्याच्या पोन्नानी तालुक्यांतील एक खेडें. येथील लोकसंख्या इ.स. १९०१ सालीं ३२१६ होती. हें झामोरिनपासून इ.स. १७१७ त डच लोकांनीं घेतलें. व त्यांत किल्ला बांधून आपल्या पप्पिनिवतम प्रांताच्या राजधानीचें ठिकाण केलें. हैदरअल्लीनें इ.स. १७७६ त हा किल्ला सर केला. इ.स. १७९० त जेव्हां हें ठिकाण इंग्रजांच्या ताब्यांत आलें तेव्हां त्यांनीं कोचीनच्या राजास इ.स. १८७५ पर्यंत मक्त्यानें दिलें. त्यानंतर कंपनीं सरकारनें हें आपल्या राज्यास जोडिलें.