विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चेचेंझें — हे लोक पूर्व काकेशस पर्वतावर रहातात. त्यांनीं सर्व दघिस्थान व्यापलेलें आहे. ते जंगली व क्रूर असून १८ व १९ व्या शतकांत रशियन लोकांनीं त्यांच्यावर केलेल्या स्वार्यांनां त्यांनीं चांगलेंच तोंड दिलें. ते स्वातंत्र्यप्रिय व समतावादी आहेत. उत्तम पोषाख करण्याची त्यांनां फार आवड आहे. परंतु त्यांचीं घरें भिकार असतात. ते उदार व आदरशील परंतु सूड घेणारे आहेत. ते मुसुलमानी संप्रदायाचे आहेत; तथापि त्यांनां कांहीं ख्रिस्ती संप्रदायांतीलहि तत्त्वें व विधी मान्य आहेत.