प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग तेरावा : घ - जलपैगुरी

चेकोस्लोव्हेकिया - चेकोस्लोव्हेकियाच्या लोकसत्तात्मक राष्ट्राची प्राणप्रतिष्ठा, महायुद्धाच्या अखेरीस १९१८ च्या आक्टोबर महिन्याच्या २८ व्या तारखेस झाली. तत्पूर्वी यांतील बराचसा भाग ऑस्ट्रियाच्या साम्राज्यांत अंतर्भूत होता. बोहोमिथा, मोरेव्हिया, सायलेशिया वगैरेंसारख्या छोट्या संस्थानांनीं १७ व्या शतकांत कांहीं कालपर्यंत आपलें स्वातंत्र्य प्रस्थापित केलें होतें पण १९१८ मध्यें या सर्व घटकांचें मिळून स्वतंत्र असें राष्ट्र प्रथमतः निर्माण झाले.

१९२१ सालच्या खानेसुमारीवरून पहातां चेकोस्लोव्हेकियाचें क्षेत्रफळ ५५००० चौ.मै. व लोकसंख्या १३५९५८१८ होती. या राष्ट्रांत बाहेमिया, सायलेशिया, स्लोव्हेकिया, रशियाना इत्यादि प्रदेशांचा समावेश झाला आहे. या लोकसत्ताक राष्ट्राच्या चतुःसीमा व्हर्सेलीस व ट्रियनन येथील शांतता परिषदेच्या चालकांनीं ठरविल्या. त्याप्रमाणें चेकोस्लोव्हेकियाच्या पश्चिमेस व उत्तरेस मोठेमोठे पर्वत असून दक्षिणेस आस्ट्रिया हंगेरी, रूमानियाच्या सरहद्दीपर्यंत मोठा सपाट प्रदेश पसरला आहे. या वैराज्यांत स्नेझका (५२१६ फूट उंची), कार्पेथियन, हायटट्रा (७ ते ८०० फूट) इत्यादि पर्वत आहेत. डान्यूब, लबे (एल्बे), मार्च इत्यादि नद्यांनीं या वैराज्याचा मुलूख भिजविला आहे. बहुतेक भागांत जंगलें पसरलीं आहेत. या वैराज्याची हवा समशीतोष्ण आहे. वैराज्याची राजधानी प्राग हें क्लाटव्हा नदीवर बसलेलें असून त्याची लोकसंख्या ६७७००० आहे. याची कलाकौशल्याबद्दल फार प्रसिद्धी आहे. स्लोव्हेकियाची राजधानी ब्राटिस्लाव्हा हें डान्यूब नदीच्या कांठचें मोठें बंदर असून यूरोपच्या पूर्वेशी व बाल्कन प्रदेशाशीं या बंदरामार्फत मोठा व्यापार चालतो. याशिवाय ब्रनो, पिल्सेन, कोसीस यूझोरॉड, लिबटेस, चॅब्लोनेक, कार्ल्सबाद, मरीनबाद, इत्यादि प्रसिद्ध शहरें आहेत. ब्रनो येथील विणकाम फार प्रसिद्ध आहे, पिल्सेन हें दारू व लोखंडाच्या कामासाठी फार प्रसिद्ध आहे. कोसीस हें व्यापाराचें मोठें केंद्र आहे. त्याचप्रमाणें लिबरेस, जॅब्लोनेक हींहि व्यापाराचीं मोठीं शहरें आहेत. चेकोस्लोव्हेकिया हें यूरोपमधील संपन्न संस्थान असून खनिजसंपत्ति व सुंदर पाणी यांबद्दल याची फार ख्याति आहे. या संस्थानांत सुमारें २०० तलाव आहेत. जॅचीमोव्ह येथें रेडियम उत्पन्न होतें. या वैराज्यांत पांच प्रकारचे लोक आहेत. चेक लोकांची वस्ती सर्वांत अधिक म्हणजे सत्तर लक्ष आहे. त्याच्या खालोखाल स्लाव लोकांचा नंबर लागतो. चेकोस्लोव्हेतर लोकांत जर्मन, रूथेनियन, पोल इत्यादि लोकांची वस्ती आहे. अल्पसंख्यांक जातीचे लोक येथें पुष्कळ असून त्यांच्या हितसंबंधांच्या रक्षणासाठीं शांततापरिषदेनें खबरदारी घेतली आहे.

इतिहास.- ऑस्ट्रियानें सर्व्हियाविरूद्ध चढाईचें धोरण स्वीकारून महायुद्धाला सुरूवात केली. पण या गोष्टीला चेक्स व स्लाव्ह लोक हे विरूद्ध होते. त्यांनीं ऑस्ट्रिया व जर्मनीच्या धोरणावर कडक टीका करण्यास सुरूवात केली. अर्थातच ऑस्ट्रियन साम्राज्यवादी सत्ताधार्‍यांनीं या लोकांची मुस्कटदाबी करण्यास प्रारंभ केला. मुद्रणस्वातंत्र्यावर घाला घालून व या चेक व स्लाव्ह लोकांच्या पुढार्‍यांनां कैदेंत टाकून या लोकांनां गप ठेवण्याची आस्ट्रियानें खटपट सुरू केली. कांहीं पुढार्‍यानीं आपली कशीबशी सुटका करून घेऊन व साम्राज्यांतून पळ काढून परराष्ट्रांत वास्तव्य केलें व तेथून पुन्हां शेक्स व स्लाव लोकांमध्यें ऐक्य घडवून आणून ऑस्ट्रेलियाला शह देण्याची व आपल्या स्वातंत्रयाची चळवळ सुरूं केली. अशा पुढार्‍यांपैकीं, प्रो.थॉमस गॅरिग, मसरिक व डॉ. डाड्यूफर्ड वेनेस हे प्रमुख होत. ऑस्ट्रियाच्या जुलमामुळें चेकोस्लोव्हेकियन लोकांपैकीं मवाळ, जहाल, बंडखोर सर्वच पक्षांचे लोक एकत्र झाले व त्यांनीं आपलें ध्येय स्वातंत्र्याप्राप्‍तीचें आहे असा जाहीरनामा काढला. १९१८ च्या जानेवरी महिन्याच्या ६ व्या तारखेस त्यांनीं प्राग येथें 'ट्वेल्थ नाइट मॅनिफेस्टो' काढून आपल्या राष्ट्राला पूर्ण स्वातंत्रय हवें असल्याचें जाहीर केलें व यूरोपच्या शांततेच्या परिषदेस आपले प्रतिनिधी पाठवले. खुद्द युद्धांतहि जे चेक लोक ऑस्ट्रियाच्या बाजूनें लढत होते त्यांनीं भर रणांत दोस्तांच्या बाजूस मिळण्याचा प्रयत्‍न केला व तो यशस्वी झाला. चेकोस्लाव लोकांनीं दोस्तांच्या बाजूनें लढून चांगला पराक्रम गाजविला. प्रो. मसरिक यानें परदेशस्थ चेकोस्लाव लोकांची संघटना करून त्यांनां आपल्या स्वातंत्र्यप्राप्‍तीच्या प्रयत्‍नांनां अनुकूल करून घेतलें. यामुळें दोस्त राष्ट्रांवर बराच परिणाम होऊन त्यांनीं चेकोस्लोव्हेकियाला तात्पुरतें स्वतःचें सरकार नेमण्यास परवानगी दिली. त्याप्रमाणें सर्वपक्षीय प्रतिनिधींचें संयुक्त मंडळ प्राग येथें स्थापन करण्यांत आलें. ब्रिटिशांनीं चेकोस्लोव्हेकिया स्वतंत्र आहे या अर्थाचा जाहीरनामा काढला व त्याला फ्रान्स, इटली, अमेरिका, जपान, इत्यादि राष्ट्रांनीं आपली संमति दिली. हें पहातांच ऑस्ट्रियाचे डोळे उघडले व त्यानें आपल्या साम्राज्यांतील सर्व संस्थानांनां साम्राज्यन्तर्गत स्वराज्य दिल्याचें जाहीर केलें पण ऑस्ट्रियाचें हें कृत्य वरातीमागून घोडें अशा स्वरूपाचें झालें. त्यामुळें ऑस्ट्रियाच्या या जाहीरनाम्याला कोणीच विचारिलें नाहीं. आक्टोबरच्या १८ व्या तारखेस प्राग येथील व संयुक्त राष्ट्रीय मंडळानें चेकोस्लेव्हेकिया राष्ट्र स्वतंत्र आहे असा जाहीरनामा काढला; व पुढें एक आठवड्यानीं ऑस्ट्रियानें नाखुषीनें कां होईना पण या जाहीरनाम्याला आपली संमति दिल्याचे जाहीर केलें.

अशा रीतीनें चेकोस्लोव्हेकियानें स्वातंत्र्य प्राप्‍त करून घेतल्यानंतर नोव्हेंबरच्या १६ व्या तारखेस राज्यकारभारासाठीं राष्ट्रीय मंडल निर्माण करण्यांत येऊन त्या मंडळाचें अध्यक्षस्थान प्रो.मसरिक यांस एकमतानें देण्यांत आलें. डॉ.क्रामर हा प्रधान झाला व डॉ. बेनेस यांस परराष्ट्रमंत्र्याची जागा देण्यांत आली. पुढें एक आठवड्याच्या आंतच, स्लाव लोकांनीं आपला प्रदेश या राष्ट्रांत मोडला जाण्यास संमति दिली. रूसिनियानेंहि तोच कित्ता गिरविला. अशा रीतीनें थोडक्याच दिवसांत बोहेमिया, मोरेव्हिया, सायलेशिया, सोव्हेकिया, रूसिनिया वगैरे प्रदेशांचा या राष्ट्रांत अंतर्भाव झाला. यानंतर लोकांनीं आपल्या चेकोस्लोव्हेकिया वैराज्याला बळकटी आणण्यासाठीं व आणण्यासाठीं व एल्ब ते डान्यूब नदीपर्यंतच्या राज्यांत आपली सत्ता बद्धमूल करण्यासाठीं कंबर बांधली. राष्ट्राची घटना ठरविण्यासाठीं एक कमिटी ठरविण्यांत येऊन त्या कमिटीच्या मताप्रमाणें चेकोस्लोव्हेकिया हें वैराज्य असल्याचें जाहीर करण्यांत आलें. राज्यकारभार चालविण्याकरितां दोन कायदेमंडळें स्थापन करण्यांत आलीं. सीनेटमध्यें १५० लोक असावेत व चेंबर ऑफ डेप्युटीमध्यें ३०० प्रतिनिधी असावेत असें ठरविण्यांत आलें.  २१ वर्षांवरच्या स्त्रीपुरुषांनां मताधिकार देण्यांत आला.  सीनेटच्या निवडणुकीसाठीं मात्र मतदाराचें वय २६ व्या वर्षावर असावें असें ठरवण्यांत आलें.  या दोन्ही मंडळांनीं वैराज्याचा अध्यक्ष निवडावयाचा, त्याची मुदत सात वर्षाची असावी. दोन्हीपेक्षां अधिक वेळां एकाच माणसाला अध्यक्षाच्या मानासाठीं उभें रहातां येणार नाहीं इत्यादि पोटनियम करण्यांत आले. अध्यक्षाची सत्ता अनियंत्रित असून तो कायदेमंडळांनां जबाबदार नसतो. त्याच्या चुकीबद्दल तो जबाबदार नसून त्या त्या खात्याचा प्रधान हा त्या चुकीबद्दल जबाबदार धरला जातो. पार्लमेंटच्या २/५ हून अधिक प्रतिनिधींचें मत असल्यास, घटनेमध्यें फरक सुचवितां येतो. सीनेटची व चेंबर ऑफ डेप्यूटीची निवडणूक अनुक्रमें ६ व ८ वर्षांनीं व्हावयाची असें ठरविण्यांत आलें आहे. लष्करी खर्च व जमाबंदी यांसंबंधींचें बिल प्रथम राष्ट्रीय सभेपुढें मांडलें पाहिजे. कोणताहि कायदा चेंबर ऑफ डेप्यूटीनें पास केल्यास तो कायदा सीनेटविरूद्ध असतांनां सुद्धा बंधनकारक होतो. अध्यक्ष हा आपलें कॅबिनेट निवडतो व त्यांत दोन्ही गृहाबाहेरच्या प्रतिनिधींनां घेण्याचा अधिकार त्याला आहे. मुद्रणस्वातंत्र्य, भाषणस्वातंत्र व धर्ममतस्वातंत्र्य या वैराज्यांत आहे. कार्यकारी मंडळांत निरनिराळ्या खात्याचे असे १५ मंत्री असून हे १५ हि मंत्री प्रत्येक मंत्र्याच्या कृत्याबद्दल जबाबदार आहेत. अध्यक्षाचें स्वतःचें स्वतंत्र्य खातें आहे. वैराज्याचे कारभाराच्या सोयीसाठीं स्वतंत्र भाग पाडण्यांत आले असून था भागांचे अधिकारी कायदेमंडळाला जबाबदार असतात. ब्रनो येथें वरिष्ठ न्यायकोर्ट असून प्राग व ब्रनो येथें हायकोर्टे स्थापन करण्यांत आली आहेत. चेकोस्लोव्हेकियांत एकंदर ३३ प्रांतिक व ४१० जिल्हा न्यायकोर्टें स्थापण्यांत आलीं आहेत. या न्यायकोर्टानीं आपलें स्वतंत्र कायदेकोड करण्यासाठीं प्रयत्‍न चालविले आहेत.

परराष्ट्र विषयक धोरण.— चेकोस्लोव्हेकियाचें परराष्ट्रीय धोरण मुख्यतः स्वराष्ट्रसंरक्षण स्वरूपाचें आहे. आपल्या राष्ट्राची प्रगति व्हावी व आपल्या राष्ट्रांत व इतर राष्ट्रांत चांगल्या प्रकारचे हितसंबंध असावेत. यासाठीं चेकोस्लोव्हेकियाचे प्रयत्‍न चालू आहेत. या दृष्टीनें, चेकोस्लोव्हेकियानें जुगोस्लाव्हिया, रूमानिया यांच्याबरोबर करारनामा केला. ऑस्ट्रियाशीं जरी या राष्ट्राचें वांकडें होतें. तथापि स्वातंत्र्यप्राप्‍तीनंतर ऑस्ट्रियाशीं व हंगेरीशींहि चेकोस्लोव्हेकियानें सलोख्याचें धोरण ठेवलें आहे.  ऑस्ट्रिया व हंगेरीशीं व्यापारी हितसंबंध या राष्ट्रानें ठेवले आहेत. टेशनच्या प्रदेशावर चेकोस्लोव्हेकिया वा पोलंड या दोघांनींहि आपला हक्क सांगितला होता. शांततापरिषदेनें या प्रदेशाची दोघांमध्यें वांटणी करून दिली. त्यामुळें चेकोस्लोव्हेकियाचें बरेंच नुकसान झालें. पण पोलंडशीं सख्य ठेवण्यासाठीं चेकोस्लोव्हेकियानें हाहि स्वार्थत्याग केला. रशियाशीं चेकोस्लोव्हेकियाचें धोरण तटस्थपणाचें पण सहानुभूतीचें आहे. मध्ययूरोपमधील निरनिराळ्या राष्ट्रांशीं व्यापारी तहहि चेकोस्लोव्हेकियानें केलेले आहेत इतर राष्ट्रांप्रमाणें याहि राष्ट्रांत पुष्कळच राजकीय पक्ष आहेत. त्यांत चेकोस्लोव्हेकियन सोशलडेमोक्रॅट हा पक्ष प्रबल आहे. त्याशिवाय, कम्यूनिस्ट, पॉप्यूलर, अग्रेरियन, नॅशनल सोशिआलिस्ट, नॅशनल डेमोक्रॅट, जर्मन पक्ष हे प्रमुख पक्ष आहेत.

इ.स. १९२२ च्या आक्टोबरमध्यें डॉ.बेनीस या मंत्र्यानें राजीनामा दिला. त्याच्या बदलीं, अ‍ॅन्टोनिन स्वेहला हा अग्रेरियन पक्षाचा पुढारी प्रधान झाला. त्यानें आपल्या मंत्रिमंडळांत बेखिन (सोशल डेमोक्रट), रसिन (नॅशनल डेमोक्रॅट), स्त्रिब्रनो (चेकसोशालिस्ट), चमेक (कॅथोलिक), डॉबेनीस परराष्ट्रमंत्री अशा पांच निरनिराळ्या पक्षांच्या पुढार्‍यांनां निवडलें.

इ.स. १९२२-२३ मध्यें इमारती बांधण्यासाठीं सरकारनें ३२३ दशलक्ष क्राऊन खर्च करावयाचे ठरविले. रेल्वेमध्येहि बर्‍याच सुधारणा करण्यांत आल्या. त्यामुळें दळणवळणाची सोय झाल्यानें चेकोस्लोव्हेकियाचा व्यापार भराभरा वाढत चालला. पाण्याचा मुबलक पुरवठा व्हावा या हेतूनें १९२४ मध्यें लतवा व सझवा या नद्याचें पाणी आणण्यासाठी १७ नवीन विद्युतगृहें बांधण्यांत आली व आणखीहि बांधण्याचें काम चालू आहे. स्लोव्हाक लोकांनीं स्वातंत्र्यप्राप्‍तीसाठीं जी चळवळ चालविली होती, तिला कांहीं लोक विरूद्ध होते. अशा प्रमुख लोकांचा खुन करण्याचा कट टेररिस्ट नांवाच्या एका संघामार्फत करण्यांत आला. पण पोलिसांच्या चतुराईमुळें तो सिद्धिस गेला नाहीं. डॅन्यूब येथें दरवर्षी जी प्रचंड यात्रा भरते त्यावेळीं बैलांची झुंज करण्यासाठीं एक स्वतंत्र फंड उभारण्यात आला होता. ही झुंज पहाण्यासाठीं एक स्वतंत्र सभागृह बांधण्यांत आलें होतें. या कार्याचा लोकांनीं ताबडतोब निषेध केला पण शेवटी झुंज व्हावयाची ती झाली.

इ.स. १९२४ त चेकोस्लोव्हेकियाजवळ १५०,००० सैन्य होतें व १२८ विमानें होतीं. १९२३ मध्यें लंडन, कोलोन, प्राग, व बुडापेस्ट यांमध्यें रोजच्या रोज वैमानिक दळणवळण सुरू ठेवण्यांसाठी एक कंपनी उघडण्यांत आली. यूरोपांत व्यापाराला वांव मिळावा यासाठीं इंग्लंड, फ्रान्स यांच्याशीं तह करण्याचे चेकोस्लोव्हेकियामध्यें प्रयत्‍न चालले होते. १९२३ मध्यें मसरिक हा पॅरिस येथें गेला असतां त्याचें तेथें जंगी स्वागत करण्यांत आलें व त्याचा परिणाम फ्रान्स व चेकोस्लोव्हेकिया यांचा तह होण्यांत झाला. या तहाप्रमाणें यूरोपमध्यें अशांततेचा भंग होण्याची वेळ आल्यास परस्परांनीं परस्परांच्या सल्ल्याप्रमाणें वागावें. होएन झोलर्न व हॅप्सबर्ग या राजघराण्यांनीं आपली सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्‍न केल्यास त्याला दोन्ही राष्ट्रांनीं विरोध करावा असें ठरविलें. त्याचप्रमाणें लष्करविषयक कांहीं अटी त्या तहांत ठरविल्या. त्या अटीप्रमाणें चेकोस्लोव्हेकियांत शस्त्रें तयार करण्याचा कारखाना स्थापन झाला असून तो फ्रेंचांच्या ताब्यांत आहे. चेकोस्लोव्हेकियाचा युद्धाध्यक्ष फ्रेंच माणूस आहे. हा जो तह झाला तो फ्रेंचांच्या दृष्टीनें फार उपयुक्त होता. पण त्यामुळें इतर राष्ट्रांनां या तहाचे भावी परिणाम अनर्थकारी होतील असें वाटूं लागलें. या तहामुळें इटलीच्या व्यापाराला धक्का बसेल असें इटालियन मुत्सद्याला वाटलें तर फ्रान्स व रशियाचें नातें या तहामुळें अधिक निकटचें होऊन दोघांच्या कचाटींत जर्मनी सांपडणार असें जर्मनीनें ध्वनित केलें. ब्रिटनलाहि अशाच प्रकारची भीति वाटूं लागली. या तहामुळें पोल व झेकोस्लोव्हिकन लोकांत लवकरच तह होईल व पोलंडचा या छोट्या राष्ट्रसंघांत समावेश होईल असा रंग दिसत आहे.

सामाजिक कायदे— इ.स. १९९७ सालीं अपघात व आजाराविषयींचा इन्शुअरन्स अ‍ॅक्ट पास करण्यांत आला. कामकर्‍यांचे कामाचे तास आठ ठरविण्यांत आले व मजुरीसंबंधीचे नियम आंखून देण्यांत आले. घरभाड्यासंबंधीहि स्वतंत्र कायदा करण्यांत आला.

   

खंड १३ : घ - जलपैगुरी  

 

 

 

  घंटय्याकवि
  घटोत्कच
  घटोत्कच लेणीं
  घड्याळ
  घनी
  घनौर
  घांट
  घाटगे
  घाटाळ
  घातमपूर
  घानची
  घायपात
  घारगड किल्ला
  घारघोडा
  घारापुरी
  घाशीराम कोतवाल
  घांसदाणा
  घासी
  घिरथ
  घिसाडी
  घुगुस
  घुंड
  घुबड
  घुराम
  घेरिया
  घेवडा
  घोटकी
  घोडबंदर
  घोडा
  घोडाघांट
  घोडाबारी
  घोडासर
  घोडें
  घोडेघांस
  घोरपड
  घोरपडी
  घोरपडे
  घोरी घराणें
  घोशी
  घोसाळे
  घोसी
  घोळ
 
 
  चउमू
  चकमा
  चकला रोषनाबाद
  चकवाल
  चकिया
  चक्कियर
  चक्कीनोआरो
  चक्रपाणि
  चक्रवर्ती
  चक्राप्पा
  चंगनाचेरी
  चंगर
  चच, चचनामा
  चचान
  चटया
  चडार
  चंडी
  चतुरमहाल
  चतुर साबाजी
  चतुरसिंग
  चतुर्थ
  चत्रा
  चॅथॅम
  चंदगड
  चंद घराणे
  चंदन
  चंदभाट
  चंदरभान
  चंदावरकर, नारायण गणेश
  चंदासाहेब
  चंदीपुर
  चंदेरी
  चंदेल्ल
  चंदौली
  चंदौसी
  चंद्र
  चंद्रकोना
  चंद्रगिरी
  चंद्रगुप्त
  चंद्रगोमिन्
  चंद्रनगर
  चंद्रभागा
  चंद्रहास
  चंद्रावती अथवा चंद्रावली
  चन्नगिरी
  चन्नपट्टण
  चन्नबसव
  चन्नरायपट्टण
  चंपा
  चंपानेर
  चपारण
  चंपावत
  चंपाषष्ठी
  चंबळा नदी
  चबा संस्थान
  चमारडी
  चरक
  चरखा
  चरखारी
  चरणदासी
  चरणव्यूह
  चरबी
  चरबीचें झाड
  चरी
  चर्मण्वती
  चलत-चित्रें
  चलन
  चल्लाकेरे
  चवळी
  चहा
  चक्षुर्मंनु
  चाकण
  चाकवत
  चागई
  चांगदेव
  चांगभकार
  चांगा केशवदास
  चाघताइखान
  चांचेगिरी
  चाचो
  चांडोद
  चाणक्य
  चातुर्मास्य
  चातुर्मास्य याग
  चातुर्वर्ण्य
  चात्सु
  चादचा
  चांदपूर
  चांदबिबी
  चांदभाट
  चांदला
  चांदवड
  चांदा
  चांदूर
  चांदूर बाजार
  चांद्रायण
  चानन शानन
  चानस्मा
  चानाल
  चानोड
  चाप्रा
  चाफळ
  चाबुआ
  चांभार
  चाम
  चामखीळ
  चामन
  चामराजनगर
  चामुंड
  चामुर्शी
  चार
  चारखा
  चारण
  चारदुआरं
  चारसद
  चारा
  चारीकार
  चार्टिझम
  चार्लंमांट, अर्ल ऑफ
  चार्वाक
  चालुक्य घराणें
  चालसिस
  चावडा
  चावंद
  चास-कमान
  चॉसर
  चासा
  चाहमान उर्फ चौहान
  चाळिसगांव
  चिक
  चिकंजी
  चिकबळ्ळापूर
  चिकाकोल
  चिकोडी
  चिक्कणर्ति
  चिक्केरूर
  चिक्टीआबर
  चिक्नायकन्हळ्ळी
  चिक्मगळूर
  चिखलदरा
  चिखली
  चिंगलपट
  चिंच
  चिचगड, जमीनदारी
  चिंचलीगदड
  चिंचवड
  चिचेवाडा
  चिंचौली
  चिंच्यु
  चिटणीस
  चितलनगर जमीनदारी
  चितळ
  चितळदुर्ग
  चिताकुल
  चिंतामणी
  चिंतामणी कवि
  चिंतामणी रघुनाथाचार्य
  चितारी
  चिति
  चितोड
  चित्तगांग
  चित्तगांग डोंगराळ प्रदेश
  चित्ता
  चित्तूर
  चित्फिरोझपूर
  चित्रकला
  चित्रकाव्य
  चित्रकूट
  चित्रकोट
  चित्रगुप्त
  चित्ररथ
  चित्रसंग्रहालयें
  चित्रळ
  चित्रांगदा
  चित्रावाव
  चिदंबर दीक्षित
  चिदंबरम्
  चिंदविन
  चिंदविन नदी
  चिदानंद स्वामी
  चिनडोंगर
  चिनमुलगुंद
  चिन लोक
  चिनसुरा
  चिनाब
  चिनीमाती किंवा केओलिन
  चिन्नविरन्ना
  चिन्नूर
  चिन्योत
  चिपळूण
  चिपळूणकर, कृष्णशास्त्री
  चिपळूणकर, विष्णुशास्त्री
  चिफू
  चिमणाजीआप्पा
  चिमणाजी दामोदर
  चिमणी
  चिरक्कल
  चिराबा
  चिलखत-वेदकालांतहि
  चिलिअनवाला
  चिली
  चिल्का सरोवर
  चिस्ती
  चीझी, अॅंटोनें लिओनार्ड डि
  चीन
  चीनी
  चीपुरुपल्ले
  चीर
  चीराल
  चुका
  चुकचि
  चुटिया
  चुडा
  चुडा संस्थान
  चुडेश्वर
  चुना
  चुनार
  चुंबकजन्य विद्युद्यंत्र
  चुंबकत्व
  चुंबकीय दृकशास्त्र
  चुंबन
  चुमल्हारी
  चुरू
  चूडामण
  चेकोस्लोव्हेकिया
  चेंगीझखान
  चेचेंझे
  चेटवई
  चेट्टी
  चेदूब बेट
  चेंबर्स रॉबर्ट
  चेयूर
  चेर घराणें
  चेरात
  चेरापुंजी
  चेरिअल
  चेरुमन
  चेरो
  चेर्रा
  चेल
  चेसेलडेन, विल्यम
  चेस्टरफील्ड
  चेस्टरफील्ड फिलिफ
  चैतन्य
  चैतसिंग
  चैत्य
  चैन
  चैबासा
  चोखामेळा
  चोवो
  चोडवरम
  चोध्रा
  चोपडे
  चोपदार
  चोबारी
  चोंभा
  चोरांग्ल
  चोरासी
  चोरी
  चोल
  चोल घराणें व चोल साम्राज्य
  चोवीस परगणा जिल्हा
  चौंगू
  चौघाट
  चौथाई, चौथ
  चौधरी
  चौबे जहागीर
  चौल
  चौलमुग्रा
  च्यवन
 
  छछरौली
  छट्टू
  छतारी
  छत्तरपूर
  छत्तिसगड विभाग
  छत्रपूर तहशील
  छत्रसाल
  छत्रे, केरो लक्ष्मण
  छत्रे, विष्णु मोरेश्वर
  छत्रे, सदाशिव काशीनाथ
  छंद:शास्त्र
  छप्पन देशचे राजे
  छप्रौली
  छब्रा
  छलाल
  छात
  छापखाना
  छापिआ
  छाप्री
  छायाचित्रपेटिका
  छाल
  छालिअर
  छिंद, लल्ल
  छिंदवाडा
  छिंपा
  छिब्रामऊ तहसील
  छुईखदान
  छुटिया
  छोटा उदेपूर
  छोटानागपूर
  छोटी साद्री
 
  जकात
  जॅक्सन अॅंड्र
  जॅक्सन व्हिल्ले शहर
  जखमा
  जगजीवनदास
  जगत्याल
  जगदलपूर
  जगदीशपूर
  जगन्नाथ
  जगन्नाथपंडित
  जगन्नाथपुरी
  जगन्नाथ शंकरशेट, मुर्कुटे
  जंगम
  जगय्या पेटा
  जंगल
  जंगल महाल
  जगलूर
  जगाध्री
  जग्रांव
  जंगीपूर
  जघाशूल
  जंजिरा
  जझिया
  जटलंड
  जटामांसि
  जटायु
  जटासूर
  जठरदाह
  जठरव्रण
  जडजीवघाद
  जडद्रव्य
  जडभरत
  जडवाद
  जडान्नविषबाधा
  जडावाचें काम
  जत
  जतिंग रामेश्वर
  जंतुजन्य रोग
  जतोई
  जत्रा
  जंदिआल गुरु
  जंदिआला
  जंदोला
  जनक
  जनजसवंत
  जननेंद्रियांचे गुप्तरोग
  जनमेजय
  जनस्थान
  जनाबाई
  जनार्दनस्वामी
  जनावरें
  जनीजनार्दन
  जपान
  जपानी वार्निस
  जबलपुर
  जंबुकेश्वरस्
  जंबुद्वीप
  जबूसर
  जमखिंडी
  जमदग्नि
  जमरुड
  जमाखर्च
  जमाबंदी
  जमालखान
  जमालपुर
  जमिकुंता
  जमीन
  जमीनदार व कुळें
  जमीनमहसूल
  जमुई
  जमेका
  जमेसाबाद
  जम्नोत्री
  जम्मलमडुगु
  जम्मू
  जयगड
  जयचंद
  जयदेव
  जयद्रथ
  जयनगर
  जयपाल
  जयपूर
  जयपुर जमीनदारी
  जयपुर संस्थान
  जयमल्ल
  जयरथ शृंगार
  जयरामस्वामी
  जयरामात्मज
  जयविजय
  जयसिंह
  जर उतणें
  जरतार
  जरत्कारु
  जरदाळू
  जरा
  जरासंघ
  जरीपटका
  जर्मन सिल्व्हर
  जर्मनी
  जलंगी
  जलजन्य विद्युतशक्ति
  जलघा
  जलपैगुरी

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .