विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चुडा संस्थान -- मुंबई इलाख्याच्या काठेवाड प्रदेशातील एक संस्थान असून याचें क्षेत्रफळ ७८ चौ.मे.आहे. १९०१ सालीं याची लोकसंख्या १२००५ होतीं. यांत एक गांव व १३ खेडीं यांचा समावेश होतो. १९०३-४ सालीं सार्याचें उत्पन्न १.२ लाख होतें. हें तिसर्या दर्जाचें संस्थान असून वढवाण संस्थानाची एक शाखा आहे. १८०७ मध्यें इंग्रजांचा या संस्थानाशीं संबंध जडला. येथील राजास ठाकूर म्हणतात.
गांव.— मुंबई इलाख्याच्या काठेवाड प्रदेशांतील त्याच नांवाच्या संस्थानाचें मुख्य ठिकाण आहे. येथील लोकसंख्या १९११ सालीं ५८६० होती. हें भावनगर वढवाण नांवाच्या आगगाडीच्या फांट्यावरील एक स्टेशन आहे