विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चुका.— (सं. चुक्रिका, गुज. चुका, चांगेरी) चुक्याचें झाड वीत दीडवीत उंच वाढतें. देशावर व गुजराथेंत या भाजीचें बरेंच पीक होतें. यास पांढरें फुल येतें. ही भाजी बारामास होते. चुका अग्निदीपक, उष्ण, रूचिकर, पित्तल, सारक असून शूल, गुल्म, अग्निसांद्य, आमवात वगैरें रोगांवर परिणामकरी असतो. धोत्र्याच्या विषावर याचा उतारा देतात.