विभाग तेरावा : घ - जलपैगुरी

चीनी — हें पंजाबांतील मशहूर संस्थानच्या कनावारनामक विभागाचें मुख्य ठिकाण असून सतलज नदीच्या उजव्या तीरापासून सुमारें एक मैल अंतरावर वसलें आहे. हें नदीसपाटीपासून १५०० फूट उंचीवर आहे. याच्या आसपास द्राक्षाचे मळे आहेत. लॉर्ड डलहौसीला हें ठिकाण फार आवडत असे. येथें मोरेव्हियन मिशनचें एक ठाणें असून तहसिलीची एक सुंदर इमारत आहे.