प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग तेरावा : घ - जलपैगुरी

चिली — चिली हें दक्षिण अमेरिकेंतील प्रजासत्ताक राज्य असून पेरू व दक्षिण टोंक यांच्यामधील या खंडाच्या पश्चिमेकडील अरुंद उतरणीच्या प्रदेशांचा या राज्यांत समावेश होतो. याची लांबी २६६१ मैल व रुंदी ४६ ते २२८ मैल आहे. क्षेत्रफळ ३०४७७४ चौरस मैल आहे. उत्तरेस पेरू, पूर्वेस बोलिव्हिया व अर्जेटिना, दक्षिण व पश्चिम या बाजूस पॅसिफिक महासागर आहे.

भौ गो लि क व र्ण न (पर्वत) — अँडीज पर्वताच्या पश्चिमेकडील उतरणी, व कॉर्डिलेरा मॅरिटिमा वगैरे पर्वत आहेत. बिओ बिओ, पॅलेना व लासहेरास या नद्या आहेत. सेरोबोल्सोन, सेरोडोनाइन्स हीं मुख्य शिखरें आहेत. चिलीमधील अँडीज पर्वताचें शिखर अ‍ॅकोनकाग्वा हें २३०९७ फूट उंच आहे. दक्षिण चिलीचा समुद्रकिनारा फार डोंगराळ आहे. 'माउन्ट माका', 'माउन्ट अ‍ॅरेनालेस', व 'कॅथेड्रल पीक' हीं उंच शिखरें आहेत. सँटिआगो व मेंडोझा यांच्यामध्यें उस्पालाटाचा घाट आहे. अँडीज पर्वताच्या ज्वालामुखी पर्वतामुळें चिलीमध्यें पुष्कळ भूकंप झाले आहेत.

स मु द्र कि ना रा.— चिलीच्या किनार्‍यावर चिलोई बेटापासून केपहॉर्नपर्यंत असंख्य बेटें आहेत. टेटाव द्वीपकल्पाच्या उत्तरेस चिलोई, ग्वेटेकास व चोनोस द्वीपसमूह आहेत. हीं बेटें मुख्य देशापासून उत्तरेस चाकाव व कोर्कोव्हाडोचीं आखातें व दक्षिणेस मोरॅलेडाखाडी यांनीं अलग केलीं आहेत. टेटाव द्वीपकल्पाच्या खालीं पेनासवें आखात आहे. या भागांतील मोठीं बेटें आझोपार्डो, प्रिन्स हेनरी, कॅम्पाना, लिटलवेलिंगटन, ग्रेट वेलिंग्टन, मॉर्निग्टन, मॅड्रेडिडिओस, ड्यूक ऑफ यॉर्क, चाथाम, हॅनोव्हर, केमब्रिज, कॉन्ट्रेरास, रेनेल, क्वीन अ‍ॅडेलीडा हीं शहरें आहेत. मॅगेलन सामुद्रधुनीच्या दक्षिणेस फ्युजिअन द्वीपसमूह आहे.

टिएराडेल फ्वेगोचा पश्चिमेकडील भाग चिलीचा आहे. केपहॉर्नच्या नैॠत्येस 'डीगो रॅमिरेझ' द्वीपसमूह आहे. अगदीं पश्चिमेकडे सॅला इ-गोमोझ व ईस्टर बेटें आहेत. चिलीच्या किनार्‍यालगत 'जुआन फर्नांडीज' बेटें आहेत. सॅन अ‍ॅम्ब्रोसिओ व सॅन फेलिक्स, चिलोइच्या उत्तरेस लामोथा, सेन्टमेरिया व क्विरिक्विना हीं इतर बेटें आहेत.

बं द रें.— व्हालपारैसो, कोक्विम्बो, इक्विक्वे, व अ‍ॅरिका हीं मुख्य बंदरें आहेत. मध्यचिलीच्या किनार्‍यालगत सॅन अँटेनिओ, कॉन्स्टिट्यूशन, लिको, हीं लहान बंदरें आहेत. एलटोमे, पेंको व टाल्काहॉनो हीं बंदरें कन्सेप्शन आखातावर आहेत. याच्या दक्षिणेस आरॉको आखातावर कोरोनेल व लोटा हीं बंदरें आहेत. व्हालडिव्हिया नदीच्या मुखाजवळ एलकोरल बंदर आहे. चिलोईच्या उत्तर किनार्‍यावर सॅन कार्लोस आखातांत अ‍ॅन्कड बंदर आहे. मॅगेलन सामुद्रधुनीच्या मध्यभागीं पुन्टा एरेनास नांवाचें दक्षिणेकडचें बंदर आहे.

न द्या.— सामा, टॅक्ना, कॅमारोनेस, लोआ, केपिआपो, हुआस्को, एलक्वी, लिमारी व चोआपा या मोठ्या नद्या अँडीज पर्वतांत उगम पावून पॅसिफिक महासागराला मिळतात. मध्यभागाच्या नद्या मायपो, रापेल, माटाक्विटो, मॉले, इटाटा, बिओबिओ, इंपिरियल, टोल्टन, व्हाल्डिव्हिया, ब्युनो व मॉलिन या आहेत. काचापोल रापेलला मिळते. क्लारो मॉलेला मिळते. न्युबल इटाटाला मिळते. लाजा, कॉटिन इंपिरियलला  मिळते. प्युलोप्युलो ही सरोवरांत उगम पावून रेलोनकाव्हि आखाताला मिळते. मान्सो प्युलोला मिळते. पेट्रोह्यू रेलोनकाव्हिला मिळते. शिवाय कोमन, येल्पो, पॅलेना, रिओपिको, फिआस, ऐसेन, लासहेरास, टोरो, कॉयले या इतर नद्या आहेत.

सरोवरें :— लॅगुना डिला लाजा व लॅगुना डेल मॉले हीं मध्यचिलीतील सरोवरें आहेत. व्हिलारिका, रिनिह्यु, रँको, लानाक्विह्यु, लेकटोडोस, लॉस सँटोस, जनरल पाझ, ब्युनॉस एरीस, प्युइरेडन, सॅनमार्टिन, लॅगोआ ब्लँका, ऑटवे वॉयर व स्कायरिंग वॉटर हीं इतर सरोवरें आहेत.

ह वा, झा डें व प्रा णी :— येथील हवा सर्व प्रकारची असूनहि आरोग्यदायक आहे. बटाट्याचें पीक मूळचें येथलेंच म्हणतात. त्याचप्रमाणें स्ट्राबेरी फळें होत. मका, मिरच्या, वाटाणें, हीं झाडें युरोपियन येण्यापूर्वीचीं होत. गहूं, बार्ली, अ‍ॅपल, पीयरसारखीं फळें हीं यूरोपियनांबरोबर आलीं. येथें मोठाले सस्तन प्राणी नाहींत. घोडे, गुरें, शेळ्या, मेंढ्या, डुकरें हे युरोपियन प्राणी होत. सरपटणारें प्राणी येथें फार नाहींत.

लो क सं ख्या :— १९१७ च्या खानेसुमारीप्रमाणें लोकसंख्या ३८७०००२ आहे. बहुतेक लोक यूरोपियन बीजाचे आहेत. मूळच्या लोकांत तीन जाती आहेत. फ्यूजियन, अरौकन व चांगो.

द ळ ण व ळ णा चे मा र्ग.— १८५० पासून चिलीमध्यें रेल्वे घालण्यांत आल्या आहेत. रेल्वेशिवाय येथें २०७७६ मैल सार्वजनिक रस्ते, ५२८ मैल नदीमार्ग व ६६८ मैलांचे सरोवरमार्ग आहेत. रिपब्लिकमधून दक्षिणोत्तर जाणारी लाँजिट्यूडिनल रेल्वे सरकारी आहे. १९१८ त ८५१२ किलोमिटरइतकी रेल्वे होती. पैकीं ४५६७ किलोमिटर सरकारच्या ताब्यांत होती. सर्व मुख्य शहरांमध्यें तारघरें व ऑफिसें आहेत. ब्युनोस एरीसच्या मार्गानें यूरोपशीं १८७५ मध्यें तारेचें दळणवळण स्थापन करण्यांत आलें. पानामाच्या मार्गानें पश्चिम किनार्‍यावरील तारेनें यूरोप व उत्तर अमेरिकेचीं संस्थानें जोडलेलीं आहेत. १९१८ त १५६८७ किलोमिटर अंतरापर्यंत तारायंत्राचीं स्टेशनें नवीन करण्यांत आलीं आहेत. मुख्य शहरांत टेलिफोन आहेत. पोष्टखातें चांगलें आहे. वर्तमानपत्रें वगैरेंचा प्रसार पोष्टानें मोफत होतो व डाकेच्या महसुलाचे दर फार हलके आहेत.

व्या पा र.— गुरें, मासे, कॉफी, चहा, साखर, लांकूड व त्यांचे बनवलेले पदार्थ, इमारती लोखंड व पोलाद, लोखंडी सामान, यंत्रें, रेल्वे व तारायंत्राचें सामान, चुना, सिमीट, कांच, मातीचीं भांडी, कापूस, लोंकर व रेशीम यांचे पदार्थ, कोळसा, पेट्रोलियमन रंग इत्यादि पदार्थ बाहेर देशांतून येथें येतात. सोनें, रूपें, तांबें, कोबल्ट, शिसें, व्हॅनॅडियम अशुद्ध धातु, मँगनीज, कोळसा, सोरा (सोड्याचा नायट्रेट) लाइमचा बोरॅट, आयोडिन, गंधक, गहूं, ग्वानो हे जिन्नस येथून बाहेर देशीं रवाना होतात. १९१७ सालीं २५९२०६०३ पौंडांची आयात व ५१९९७०९९ पौंडांची निर्गत होती.

शे ती :-चिलीचे निम्मे लोक शेतीवर निर्वाह करतात मध्यचिली हा प्रदेश शेतीला विशेष लायक आहे. येथें नारिंगें, लिंबे, अंजीर, कलिंगड, अननस, केळीं फार विकतात. द्राक्षाची लागवड होते. चिचा नांवाची दारू हें सार्वजनिक पेय असून ती इंडियन कॉर्न (धान्य) पासून बनवितात. गहूं, जव, मका चिलीच्या प्रत्येक भागात पिकतो. मका श्रीमंत व गरीब या दोन्ही प्रतीच्या लोकांचें अन्न आहे. येथें बटाटे होतात. ''किडनो बीन'' हें कडधान्य सर्व भागांत पिकते व बहुतेक लोक खातात. वाटाणे, आक्रोड, आलिव्ह, सफरचंद, पीच, बोरें, मनुका, चेरी, व स्ट्राबेरी यांची येथें लागवड होते. हवा गुरें पाळण्याच्या लायक आहे. गुरें, घोडे, खेचरें, शेळ्या, डुकरें यानां पाळून वाढविण्याचा धंदा चालतो. लोणी व चीज (चक्का दहीं,) बनविण्याच्या धंद्यास थोडेसें महत्त्व प्राप्‍त होत आहे. मधमाशा पाळण्याच्या धंद्यास महत्त्व येत आहे.

प क्का मा ल — खाण्याचे पदार्थ, पेयें, कापड, पांघरण्याचें कापड, कमावलेलीं कांतडीं व त्यांचे बनविलेले पदार्थ, लांकडी सामान, मातीची भांडीं, रासायनिक द्रव्यें, लोखंडी सामान इत्यादि पदार्थ बनविण्याचे कारखाने आहेत. अशुद्ध धातु गाळण्याचें कारखाने, कांतडें कमविणें, बूट व जोडे बनविणें, दारूच्या भट्टया, लांकडी सामानाचें कारखाने, फळें व भाज्या यांचे मुरांबे करण्याचे कारखाने, रेल्वेचें सामान बनविण्याचें लोखंडी कारखाने, 'बीट' नांवाच्या मुळांपासून साखर बनविण्याचे कारखाने, कापडाचे कारखानें, खनीज पदार्थ खणणें, रासायनिक द्रव्यें, औषधें, सुंगधी पदार्थ, साबण मेणबत्त्या वगैरे तयार करण्याचे असे पुष्कळ कारखाने येथें आहेत.

ख नि ज प दा र्थ — खाणी खणणें हा एक फार महत्त्वाचा राष्ट्रीय धंदा आहे. सोनें बहुतेक सर्वत्र सांपडतें. परंतु पुष्कळ प्रमाणांत सांपडत नाहीं. उत्तरेकडील ओसाड प्रदेशांत अँडीज पर्वताचें उंचवटे व उतरणी यावर रूपें सांपडतें. तांबे बर्‍याच प्रांतांत सांपडतें. लोखंड, मँगनीज, शिसें, कोबॅल्ट व व्हॅनॅडियम ह्या इतर धातू सांपडतात. सिंधुनत्रित, कोळसा, मीठ, गंधक, आयोडाइन, गंधकाम्ल वगैरे पदार्थ येथें सापडतात. १९१७ सालची उकरून काढलेलीं खनिजसंपत्ति ३६८३७५०० पौंड होती.

रा ज्य व्य व स्था — राज्यकारभाराची कायदे करणारें, कार्यकारी व न्यायखातें अशीं तीन निरनिराळीं खातीं आहेत. कायदे करण्याचें काम ''सीनेट'' व 'डेप्युटीचीं चेंबर' या दोन सभांची बनलेली राष्ट्रीय सभा हिच्या हातीं आहे. चेंबरचे प्रतिनिधी प्रत्येक ३०,००० लोकांतून एक असे निवडतात. चेंबरमध्यें ११८ सभासद असतात, व सीनेंटमध्यें ३७ सदस्य असतात. सीनेटचे मेंबर प्रांतनिहाय निवडले जातात व त्यांची काम करण्याची मुदत ६ वर्षांची असते.  दर तीन वर्षांनीं सीनेटच्या निम्मे सदस्यांची फिरून निवडणूक होते. प्रतिनिधी तीन वर्षे काम करतात. प्रतिनिधी व सदस्य यांचे वय कमीतकमी ३६ असलेंच पाहिजे, व त्यांचें उत्पन्न विवक्षित असलें पाहिजे. त्यांनां बिनपगारी काम करावें लागतें. प्रत्येक वर्षी काँग्रेस जून पहिलीस भरते व सप्टेंबर पहिलीला संपते सरकारच्या कृत्याला पाठिंबा देणें किंवा न देणें यासंबंधीं काँग्रेसला अधिकार आहे.

कार्यकारी सत्ता प्रांतांनीं निवडलेल्या अध्यक्षाच्या हातीं असते. त्याची मुदत पांच वर्षांची असते. याला न्यायखातें, राजकीय, पोलीस खातें प्रांताधिकारी सुभेदार यांच्या नेमणुका करण्यासंबंधीं अधिकारी आहेत. अध्यक्षांचें वय ३० पेक्षां कमी असतां कामा नयें. तो एतद्देशीय असला पाहिजे व 'चेंबर सभेमध्यें' निवडून येण्यालायक असला पाहिजे. याचा पगार सालीना १३८४ पौंड असतो. याच्या मदतीस अंतर व परराष्ट्रीय कारभार, धर्म व वसाहती, न्याय, सार्वजनिक शिक्षण, लष्कर व आरमार, जमाबंदी, धंदे व सार्वजनिक कामें या खात्यांवरील सहा मंत्र्यांचें एक मंडळ असतें. अध्यक्ष, काँग्रेसनें निवडलेले सहा सभासद व अध्यक्षानें निवडलेले पांच सभासद अशा बारा सभासदांचें राष्ट्रीय सल्लागारमंडळ असतें. याला सल्ला देण्याचा अधिकार असतो व याच्या संमतीवाचून नेमणुका व इतर कार्ये करतां येत नाहींत.

न्या य :— वरिष्ठ न्यायसत्ता राष्ट्रीय राजधानींच्या ठिकाणीं स्थापिलेल्या व सात मेंबरांच्या बनविलेल्या एका वरिष्ठ कोर्टाच्या हातांत असते. याच्या हातीं राज्यांतील सर्व कोर्टांवर देखरेख करण्याची सत्ता असते. सात अपील कोर्टे, प्रांतांच्या राजधानीच्या ठिकाणीं अव्वल दर्ज्याचीं कोर्टें व कनिष्ठ कोर्टें व जस्टीस ऑफ धी पीस असतात. पंचांच्या साहाय्यानें न्याय देण्याची पद्धति येथें नाहीं. पोलीस अधिकार्‍यांच्या हातीं कांहीं न्यायसत्ता असते.

से ना.— लष्करी सोईकरितां या राज्याचे चार विभाग केलेले आहेत. जर्मन पद्धतीवर सैन्यरचना असून यूरोपियन अधिकार्‍यांकडून कवाईत शिकविलेली आहे. इ. स. १९१६ त एकंदर खडें सैन्य १०२० अंमलदार व १७२८३ सैनिक हाते. १९०० च्या कायद्यान्वयें १८ व ४५ वर्षांच्या आंतील प्रत्येक पुरुषनागरिकास लष्करी नोकरी करावी लागते. एकवीस वर्षे वयाच्या प्रत्येक तरुणास कांहीं ठराविक वर्षेपर्यंत लष्करी नोकरी करणें भाग आहे. सँटिआगो येथील लष्करी शाळेंत चांगले लष्करी शिक्षण दिलें जातें.

आ र मा र — चिली देशाचें आरमार ब्रिटिश पद्धतीचें आहे, व यांतील बहुतेक लढाऊ जहाजें ब्रिटिश गोदींत बनविलेलीं आहेत. मुख्य ठाणें व्हालपरैसो येथें असून या ठिकाणीं एक आरमारी शिक्षणाची शाळा आहे. स. १९१८ त ५५९५ लोक आरमारी खात्यांत होते. कन्सेशन आखातांत टाल्काहुआनो येथें लष्करी बंदर आहे. स १९१८ त वैमानिक दळ तयार करण्यांत आलें.

शि क्ष ण — सर्वांनां सार्वजनिक शाळांचा फायदा घेतां यावा म्हणून सरकार नेटाचे प्रयत्‍न करीत आहे. कायद्यानें शिक्षण मोफत दिलें जातें, परंतु तें सक्तीचें नाही. शेंकडा ७५ लोक अशिक्षित आहेत. चिलीचें विश्वविद्यालय व सँटिआगो येथील राष्ट्रीयसंस्था व प्रांतानिहाय व मोठ्या शहरांतील हायस्कूलें, शिक्षक तयार करण्याकरितां नॉर्मल स्कूल, धंदेशिक्षण, व लष्करी शिक्षणाच्या शाळा व प्राथमिक शिक्षण शाळा अशी येथील शिक्षणरचना आहे. या शिवाय रोमन कॅथॅलिक विश्वविद्यालय आहे. व खासगी शाळा आहेत. सँटिआगो येथें संगीत व कलाकौशल्याच्या शाळा आहेत. शेतकीशाळा, खनिज शिक्षणाच्या शाळा व इतर धंद्यांच्याहि शाळा आहेत. स. १९१८ त ३५८१ प्राथमिक शिक्षणाच्या शाळा, १९ उच्च शिक्षणसंस्था होत्या. विसाव्या शतकाच्या आरंभी येथें २४०,००० ग्रंथ असलेलीं ४१ पुस्तकालयें होती. सँटिआगोच्या राष्ट्रीय पुस्तकालयात ११६,३०० ग्रंथ आहेत. स. १९१८ त ६९८ वर्तमानपत्रें व नियतकालिकें  चिली देशांत निघत होतीं. १९१६ सालच्या रिपोर्टावरून येथें १०८ साधीं इस्पितळें व २ वेड्यांचीं इस्पितळें होतीं.

ध र्म.— कायद्यानें रोमन कॅथोलिक हा राष्ट्रीय धर्म ठरविण्यांत आला. धर्मसंबंधीं खर्च इतर सार्वजनिक खात्यांच्या खर्चाप्रमाणें सरकारी तिजोरींतून चालवितात. इतर धर्म पाळण्याची मनाई नाहीं.

ज मा बं दी.— नायट्रेटवर बसविलेले कर, जकातीचें उत्पन्न, आल्कोहोलवरचा कर, रेल्वे, डाक व तार या खात्यांचें उत्पन्न या सरकारी उत्पन्नाच्या बाबी आहेत. चिली प्रजासत्ताक राज्याची १९१६ सालची एकंदर जमा १३८१४१०१ पौंड व खर्च ११३०५४९८ पौंड होता.

ना णें.— पेसो (१८ पेन्साचा) या चलनी सुवर्ण प्रमाणावर येथील कागदी नाण्यांचा प्रसार होतो. सोन्याचें पेसो हें नाणें पाडलेलें नाहीं. येथें सोन्याची कोंडोर, पेसो, एस्क्युडो व रुप्याचीं व ब्राँझचीं सेंटाव्हो, पेसो हीं नाणीं कायद्यानें मंजूर केलीं आहेत. मेट्रीक पद्धतीची वजनें व मापें कायदेशीर प्रमाणवजनें आहेत. परंतु व्यवहारांत जुनी स्पॅनिश वजनें व मापें चालतात. चिलियन क्विन्टल (१०१.४१ पौंड), मेट्रिक क्विन्टल (२२०.४६ पौंड) रुपें व तांब्याच्या खाणींत अशुद्ध धातूंचे प्रमाण मार्क (८ औंस) नें दाखवितात. धान्य अ‍ॅरोबा अथवा फॅनेगानें विकतात. व्हारा हें लांबी मोजण्याचें माप आहे. व जमीन मोजण्याकरितां क्युआड्रा हें माप आहे.

इ ति हा स — उपलब्ध इतिहासाच्या सुरुवातीपासून हा देश चिली नांवानेंच प्रसिद्ध आहे. पूर्वी या प्रदेशांत इंडियन लोकांच्या जाती रहात असत. हे लोक अगदीं रानटी नव्हते तरी मेक्सिको व पेरू या देशांतील रहिवाशांपेक्षां कमी सुधारलेलें होते. पंधराव्या शतकांत पेरूच्या इंकानें या देशाचा कांहीं भाग काबीज केला होता. यानें या लोकांत सुधारणा करून त्यांचे सामर्थ्यं कमी केलें होतें व याचमुळें स्पॅनिश लोकांनां या देशावर स्वारी करणें सुलभ झालें. पूर्वी हे लोक अडाणी व उद्धट असून यांच्यामध्यें एक प्रकारची लष्करी शिस्त होती. प्रत्येक समाजाचा उल्मेन (नायक) असे व टोक्वीच्या नेतृत्वाखालीं हे लोक एकत्र लढत असत.

डायगो डे आल्माग्रो, पिझारोचा प्रतिस्पर्धी, यानें १५३५ मध्यें पहिली स्पॅनिश स्वारी केली. परंतु त्याला जोराचा प्रतिकार झाल्यामुळें तो सगळ्या सैन्यानिशीं १५३८ मध्यें पेरूला परत गेला. १५४० मध्यें पिझारोनें पेड्रो डिव्हॉलडिव्हि याला देश काबीज करून वसाहत करण्याकरितां पाठविलें. यानें १५४१ मध्यें सँटिआगो शहर वसवून लासेरिना, कन्सेप्शन, व्हिलारिका, इंपिरियल, व्हॉलडिव्हिया, व अंगोल हीं इतर शहरें बांधण्यास सुरुवात केली. परंतु इंडियन लोक फार निकरानें लढले व १५५३ मध्ये सार्वत्रिक बंड होऊन व्हॉलडिव्हियाचा पराभव झाला व तो मारला गेला; आणि बर्‍याच वसाहतींचा नाश झाला. शंभर वर्षेपर्यंत सारखी लढाई चालली होती. १६४० मध्यें क्विलीनच्या तहान्वयें बिओ-बिओ नदीच्या दक्षिणेकडचा प्रदेश इंडियन लोकांच्या ताब्यांत राहिला. १६५५, १७२३ व १७६६ मध्यें लढाया होऊन हा तह मोडला गेला. अखेरीस १८०० मध्यें तह होऊन अ‍ॅरॉकानियन (इंडियन लोकांच्या टोळीचें नांव) लोकांनां सँटिआगो येथें एक मंत्री ठेवण्याचा अधिकार प्राप्‍त झाला.

व सा ह त प द्ध ति.— स्पॅनिश वसाहतपद्धतीनें पक्का माल बनविण्याच्या धंद्यास प्रतिकार झाला. स्पेनमधील फक्त केडिझ बंदराशीं व्यापार करण्याची मुभा होती. त्यामुळें पेरू व अर्जेंटिनाच्या मार्फत वसाहतवाल्यांस व्यापार करावा लागे. येथील लोकांचा शेती हाच कायतो धंदा असून गहूं पिकवीत असत; त्यांनां ऑलिवह व द्राक्षें यांची लागवड करण्याची मनाई होती. स्पॅनिश हद्दींतील इंडियन लोकांनां गुलामांप्रमाणें वागविण्यांत येत असे. परंतु याच सुमारास दोन्ही जातींचें मिश्रण होण्यास सुरुवात झाली. अ‍ॅकरॉनियन लोक मात्र स्वतंत्र राहिले.

अठराव्या शतकांत या वसाहतीची स्थिति सुधारत चालली. स्पेनचें बुर्बोन राजे फार उदारमतवादी होते. चिली देशांत व्यापारी जहाजें येऊं लागलीं व फ्रान्सशीं व्यापार खुला झाला. स्पेनच्या बिस्के प्रांतांतील बरेच काटक लोक येथें पाठविण्यांत आले. इंडियन लोकांशी होणार्‍या लढाया बंद झाल्यामुळें गव्हर्नर अधिकार्‍यांनां देशाचें कल्याण करण्यास सवड मिळाली. १७४७ मध्यें सँटिआगो येथें विश्वविद्यालय स्थापण्यांत येऊन पुष्कळ शहरें बांधण्यांत आलीं, व शेती आणि उद्योगधंदे यांनां उत्तेजन दिलें गेलें व किनार्‍यावरील व्यापार वाढला. परंतु राज्यकारभारामध्यें लोकांचा मुळींच हात नसे. गव्हर्नर सर्वसत्ताधारी असे व बहुतेक मोठ्या अधिकारांच्या जागेवर स्पेनमधील लोक नेमले जात असत, हे लोक बराच वेळ लांचलुचपत व बळजबरीनें संपत्ति मिळविण्याच्या कामांत गुंतलेले असत. यामुळें स्पॅनिश लोक व एतद्देशीय वसाहतवाले यांच्यामध्यें मत्सर वाढला. इतर स्पॅनिश वसाहतींप्रमाणें याहि भागांत धर्मोपदेशकाचें वजन लोकांत फार असे. हे लोकांनां उद्योगधंदे व शेतकी यांचें शिक्षण देत असत. यांनीं देशांतील बहुतेक संपत्ति जमविली होती. परंतु सरकारी अधिकारी व धर्माध्यक्ष यांच्यामध्यें तंटे होऊन देशांत गोंधळ उडून जात असें.

स्वा तं त्र्य यु द्ध.— इंग्लंडच्या उत्तरअमेरिकन वसाहतींचें बंड व फ्रेंच राज्यक्रांति यामुळें स्पॅनिश वसाहतवाल्यांनां बंडाच्या कल्पना सुचल्या व नेपोलियननें सातव्या फर्डिनँड राजाला पदच्युत केल्यावर त्यांनां आयती संधी प्राप्‍त झाली. व १८०९ मध्यें व्हेनेझुएला, इक्वेडोर, वरचा पेरू व अर्जेंटिना येथें बंडें झाल्यामुळें १८१० मध्यें सँटिओगाच्या कॅबिल्डोनें (म्युनिसिपालिटी) गव्हर्नरला राजिनामा द्यावयास लावून सात सभासदांच्या एका जंटोच्या (मंडळ) स्वाधीन राज्यकारभार केला. चिलीच्या स्वातंत्र्याचा हा प्रारंभ होय. बरेच लोक अडाणी असून त्यांच्यामध्यें दळणवळण फार थोडें होतें. व बरेच लोक जुन्या राज्यपद्धतीचे भक्त होते. स्वातंत्र्यवाद्यांचा पक्ष प्रथम अल्पसंख्याक होता; व सँटिआगो आणि कन्सेप्शनच्या देशभक्तांमध्यें तंटे होते. या देशभक्तांचा १८१४ मध्यें रॅन्कागुआच्या लढाईंत पेरुच्या व्हाइसरॉयनें पाठविलेल्या स्पॅनिश सैन्यानें पराभव केला. स. १८१७ पर्यंत हा देश स्पॅनिश लोकांच्या ताब्यांत राहिला. नंतर देशभक्त ओ ' हिजिन्स व जोसे डि सॅन मार्टिन यांच्या संयुक्त सैन्यानें चॅकाबुकोच्या लढाईंत राजपक्षीय लोकांचा पराभव केला, ओहिजिन्सला चिलीचा डायरेक्टर जनरल नेमण्यांत आलें व मार्टिननें पेरूवर स्वारी करून मायपो नदीवरील लढाईंत पेरूच्या सैन्याचा १८१८ मध्यें पूर्ण पराभव केला. यामुळें चिलीचें स्वातंत्र्य कायमचें स्थापित झालें.

प्र जा स त्ता क रा ज्य.— पुढील कांही वर्षांत चिलीच्या दक्षिण भागांतून राजपक्षीय लोकांना हांकून लावण्यांत येऊन एक लहानसें आरमार सज्ज करण्यांत आलें. यामुळें स्पॅनिश लोकांच्या हल्ल्यांची भीति नाहींशीं झाली. या आरमाराच्या सहाय्यानें सॅन मार्टिननें पेरूवर स्वारी करून पेरूचें स्वातंत्र्य १८११ त जाहीर केलें. आतां राज्यव्यवस्थेची आवश्यकता भांसू लागली. उदारमतवादी संस्थांनां सवलती न देतां जोरदार राज्यव्यवस्था स्थापावी असे ओ' हिजिन्सचें मत होतें, परंतु त्याला पुष्कळ वैरी उत्पन्न  झाल्यामुळें १८२३ मध्यें त्यानें राजिनामा दिला. १८३० पर्यंत निरनिराळ्या दहा राज्यव्यवस्था निर्माण झाल्या. देशांत निरनिराळे लहान पक्ष झाले; दक्षिणेंत इंडियन लोकांची व चिलोई बेटांत राजपक्षीय लोकांचीं बंडें झालीं; आणि धर्मोपाध्यायांचा नवीन प्रजासत्ताक पद्धतीस अडथळा होऊं लागला; अशी एकंदर विस्कळीत स्थिति होती. १८३० पर्यंत उदारमतवादी पक्षाची वरचढ होती. परंतु कान्झर्व्हेटिजव्ह (पुराणमतवादीपक्ष) लोक आणि व त्यांचा पुरस्कर्ता बंडखोर जनरल प्रीस्टो यांनीं जय संपादन केला. १८३१ मध्यें प्रीस्टोला प्रेसिडेंट निवडलें, व नवीन राज्यपद्धति बनवून ती १८३३ मध्यें प्रचलित करण्यांत आली. या पद्धतीनें कार्यकारी अधिकार्‍यांच्या हातांत बहुतेक सर्व सत्ता देण्यांत आली. याच पद्धतींत कांहीं सुधारणा होऊन सध्यांचीं पद्धति निर्माण झाली आहे. यानंतर पुराणमतवादी लोक बराच काळपर्यंत सत्ताधारी राहिलें.

पुराणमतवादीपक्षाचें धोरण बळकट व खंबीर राज्यपद्धति स्थापन करण्याचें होतें. म्हणून सत्ता थोड्या लोकांच्या हातात देण्यांत आली. लोकांच्या स्वातंत्र्याला आळा घालून सर्व प्रकारचें अडथळे सत्तेच्या जोरावर नाहीसें करण्यांत आले. १८३५, १८५१ व १८५९ मध्यें उदारमतवाद्यांचीं बंडें झाली. १८३६ मध्यें पेरू व बोलिव्हिया यांच्याशीं लढाई होऊन चिलीचा जय झाला. पुराणमतवादी पक्षानें लोकांनां राज्यकारभारांत मुळींच हात घालूं दिला नाही; व त्यांचें कांहीं चालूहि दिलें नाहीं. मात्र यांच्या कारकिर्दीत देशाची भरभराट फार त्वरेनें झाली. शिक्षणाची व्यवस्था करण्यांत आली, शेती व इतर धंदे वाढले, कायदा बनविण्यांत आला व यामुळें या नवीन स्थापिलेल्या प्रजासत्ताक राज्यास बरीच बळकटी आली. १८६१ नंतर उदारमतवाद्यांची चळवळ सुरू झाली, व प्रेसिडेंट पेरेझ व इरॅझुरिझ यांनीं पूर्वीच्या प्रेसिडेंटांचें धोरण सोडून देऊन उदारमतवाद्यांची सहकारिता संपादन केली. यामुळें राष्ट्राचें राजनीतिविषयक ज्त्रान वाढलें. शाळा, रेल्वे, डाक व तारघरें यांचा फैलाव करण्यांत आला व राज्याला स्थायिकत्व प्राप्‍त झालें. यावेळीं इंडियन लोकांशीं युद्ध सुरू होतें. १८८० मध्यें अर्जेंटिनाशीं बरेच दिवस चाललेल्या सरहद्दीविषयक भांडणाचा निकाल झाला. व १८६५ मध्यें चिलीनें पेरूचा पक्ष घेतल्यामुळें या देशास स्पेनशीं लढावें लागलें. या वेळेपासून चांगले आरमार सज्ज करण्यांत आलें.

पे रू शीं ल ढा ईं :— ही लढाई १८७९-८२ पर्यंत चालली होती. १८८१ मध्यें चोरिलोस व मिरॅफ्लोअर्स येथें बराच काळ निकरानें युद्ध होऊन अखेरीस चिली सैन्याचा जय झाला. यानंतर चिली सैन्यानें लिमा व इतर पेरूंतील ठाणीं ताब्यांत ठेविलीं. या विजयाचें श्रेय चिलीचा प्रेसिडेंट पिंटो याला दिलें पाहिजे. १८८१ त पिंटोच्या मागून सँटामॅरिया प्रेसिडेंट झाला. १८८३ त पेरू सैन्याचा फिरून पराभव झाला व १८८४ त पेरू व चिली यांच्यामध्यें प्रेसिडेंट सँटा मॅरिया यानें तह घडवून आणला. बोलिव्हियाशीं काहींच तह न झाल्यामुळें चिली लोकांनी बोलिव्हियाचा समुद्रकिनारा आपल्या ताब्यात ठेविला.

सें टा मॅ रि या प्रे सि डें ट :— या प्रेसिडेंटनें नोंदविलेल्या लग्नाचा कायदा सुरू केल्यामुळें व रजिष्टरांत जननमरणाची नोंद करणें व स्मशानभूमींत सर्व धर्मांच्या लोकांस प्रेतें पुरण्याची मोकळीक ठेवणें या नियमांमुळें पुराणमतवादी लोकांचा याला फार अडथळा झाला. पूर्वी जननमरणाची नोंद धर्मोपाध्याय करीत असे व रोमन कॅथोलिक पंथाच्या संस्कारांव्यतिरिक्त झालेलीं लग्नें कायदेशीर मानलीं जात नसत; व रोमन कॅथोलिक पंथाशिवाय इतर पंथाच्या लोकांनां स्मशानभूमींत प्रेतें गाडण्याची परवानगीहि नसे. हे सर्व निर्बंध यानें काढून टाकले व इतर धर्म पाळण्याची परवानगीहि यानें दिली. यामुळें १८८६ मध्यें याची मुदत संपल्यावर सेनॉर जोसे बॅकमेसेडा हा प्रेसिडेंट झाला.

प्रे सि डें ट बॅ ल मॅ से डा व १ ८ ९ १ ची रा ज्य क्रां ति :— बॅलमॅसेडा प्रेसिंडेट जरी उदारमतवादी होत तरी त्याला कांहीं उदारमतवादी व पुराणमतवादी लोकांचा प्रतिकार झाला. शाळा वाढविणें लोकोपयोगी कामें करणें व सैन्य आणि आरमार सज्ज करणें या बाबतींत बराच खर्च करण्याचें या प्रेसिडेंटनें ठरविलें व यांचे मक्ते देण्यांत आले. परंतु या मक्त्यांत पैशाची बरीच अफरातफर झाली. यामुळें बराच विरोध उत्पन्न झाला. अखेरीस १८८९ मध्यें काँग्रेसनें प्रेसिडेंटच्या अगदीं विरुद्ध पक्ष घेतला व यामुळें यादवीची चिन्हे स्पष्ट दिसूं लागलीं. १८९१ मध्यें कोनकोन येथें काँग्रेस पक्षाचें सैन्य व बॅलमॅसेडाचे लोक यांच्यामध्यें निकराची लढाई  होऊन बॅलमॅसेडाचा पराभव झाला व अतोनात नुकसान झालें. राजद्रोहाच्या आरोपावरून बॅलमॅसेडाने सॅन लोरेंझो येथील लष्करी शाळेंतील कांहीं विद्यार्थ्यांनां गोळी घालून ठार मारण्याचा हुकूम सोडला. यामुळें लोकांचीं मनें फारच बिथरली व पॅसिलच्या लढाईत प्रेसिडेंटचे दोन्ही सेनापती मारले जाऊन बंडखोरांचा पूर्ण जय झाला. यानंतर प्रेसिडेंट निराश होऊन अर्जेंटाईन वकिलातींत आश्रय घेऊन लपून बसला. त्याची मुदत १८ सप्टेंबर १८९१ रोजीं संपली व याच दिवशीं त्यानें आपणास गोळी घालून आत्महत्या केली. याच्या मरणानें भांडणाचें कारण नाहींसें झालें व यादवी संपली.

राज्यक्रांतीनंतर राज्यकारभार जंटाच्या हातीं आला व निवडणूक होऊन सर्वानुमतें जॉर्ज माँट प्रेसिडेंट झाला. तो कर्तबगार मनुष्य होता. यानें बॅलमॅसिडाच्या पक्षाच्या लोकांनां माफी देऊन देशांत येण्याची परवानगी दिली. याच्या कारकीर्दीतील पहिलें राजकीय कृत्य म्हटलें म्हणजे म्युनिसिपालिट्यांनां आपल्या उत्पन्नाचा आल्या इच्छेनुरूप खर्च करण्याची परवानगी मिळाली व याप्रमाणें म्युनिसिपालिट्यांनां स्थानिक स्वराज्याचें हक्क देण्यांत आलें.

प्रे सि डें ट माँ ट. — आपापसांतील यादवीमुळें झालेलें देशाचें नुकसान भरून काढण्याकडे नंतर या प्रेसिडेंटनें लक्ष लावले. १८८७ मध्यें सुरू केलेलीं लोकोपयोगी कामें फिरून चालविण्यांत आलीं, व सैन्य व आरमार यांचें सामर्थ्य वाढविण्यांत आलें. नाण्यांची पद्धत सुधारण्याचें काम नंतर यानें हाती घेतलें. १८९५ मध्यें अर्जेंटिनाच्या सरहद्दीचें भांडण उपस्थित होऊन याचा निकाल ग्रेटब्रिटनच्या मध्यस्थीवर सोपविण्यांत आला. १८९६ मध्यें माँटची मुदत संपून सेनॉर इरॅझुरिझ प्रेसिडेंट निवडून आला.

प्रे सि डें ट इ रॅ झु रि झ.— याच्या कारकिर्दीत अर्जेटिनाच्या सरहद्दीचा लढा उपस्थित झाला. दोन्ही पक्षांनीं लढाईची तयारी केली. १८९८ मध्यें चिली सरकारनें १८९६ च्या कराराच्या अव्वल मसुद्याचीं कलमें पाळलीं पाहिजेत अशी अर्जेंटिना सरकारास मांगणी केली. भांडण पॅटॅगोनियन राज्यासंबंधीं होतें व याचा निकाल ग्रेट ब्रिटनच्या मध्यस्थीवर दोन्ही पक्षांनीं सोंपवून या तंट्याचा शेवट केला. तरी पेरू व बोलिव्हिया या देशांचा प्रश्न शिल्लकच होता. १८९५ च्या अव्वल मसुद्यान्वयें चिलीनें बोलिव्हियाला अ‍ॅरिका बंदर अथवा पॅसिफिक महासागराच्या किनार्‍यावर दुसरें एखादें सोईस्कर ठिकाण देण्याचें कबूल केलें. चिली सरकारनें अ‍ॅरिकाच्या थोडेसें दक्षिणेस असलेलें व्हिटोर ठिकाण देऊं केलें परंतु हें ठिकाण तहाच्या अटींविरुद्ध म्हणून बोलिव्हिया सरकारनें नाकारलें व चिली अ‍ॅरिका पेरूला देतो कीं काय हें पाहण्याचें ठरविलें.

या प्रेसिडेंटच्या कारकीर्दीत कोणतेंच मंत्रिमंडळ फार वेळ टिकलें नाही. काँग्रेसमधील राजकीय पक्षाचा विरोध इतका जोराचा होई कीं मंत्रीमंडळास वारंवार राजीनामा देण्याची पाळी येत असे. यामुळें कोणतेंच राजकीय धोरण स्वीकारतां येईना. १९०० मध्यें अर्जेंटिनामध्यें चिलीविरुद्ध लोकमत पुन्हां क्षुब्ध झालें, कारण चिली पोलिसांनीं उल्टिमाएस्पिरँझा या वादग्रस्त भागांतून अर्जेंटिना वसाहतवाल्यांनां हांकून दिलें. परंतु दोन्ही देशांच्या सरकारांनीं चढाईचें धोरण न स्वीकारतां सलोख्यानें समेट करण्याचें ठरविलें.

प्रे सि डें ट रा य स्को.— प्रकृति नीट नसल्यामुळें इरॅझुरिझनें राजिनामा दिला व प्रेसिडेंट रायस्को निवडून आला. अर्जेंटिनाच्या सरहद्दीची पहाणी करण्याकरिता ग्रेटब्रिटननें सर टि. एच् हॉल्डिच याला पाठविलें. त्यानें आठ महिनेंपर्यंत पहाणी करून रिपोर्ट केला; व एडवर्ड बादशहानें १९०२ मध्यें सरहद्द ठरविली व ही दोन्हीं देशांनां पसंत पडली. १९०५ मध्यें बोलिव्हिया व चिली यांच्यामध्यें तह होऊन असें ठरविण्यांत आलें कीं चिलीनें आपल्या खर्चानें अ‍ॅरिकापासून लाणेझपर्यंत आगगाडी करावी व बोलिव्हिया सरकारला या रेल्वेचा उपयोग करूं द्यावां व याबद्दल बोलिव्हिया सरकारनें पॅसिफिक महासागरावरील बंदरांची मागणी सोडून द्यावी. ३००००० पौंड नुकसानभरपाई देण्याचेंहि ठरलें होतें. दोन्ही देशांना हा तह फार फायदेशीर होता.

व्हॉ ल पा रै सो चा भू कं प.— १९०६ मध्यें भूकंप होऊन व्हॉलपारैसो शहराचा पूर्ण नाश झाला व सँटिआगो व इतर शहरें यांनां जबर धक्के बसले. ३००० लोक प्राणास मुकून १००००० लोक गृहहीन झाले; मालमत्तेचें नुकसान अपरिमित झालें. यानंतर शहरास आग लागून दुःखाची परमावधि झाली. परंतु लोकांनां मदत देण्याच्या उपायांची योजना त्वरित करण्यांत आली.

पे ड्रो माँ ट — १९०६ मध्यें सेनॉर पेड्रोमाँट प्रेसिडेंट निवडून आला. पूर्वीच्या दिवसांपेक्षा अलिकडच्या चिली देशावर याचें वजन कमी पडत असें. सर्व कार्यकारी सत्ता काँग्रेसच्या हातांत गेल्यामुळें प्रधानमंडळाला वर्षांतून कैक वेळां राजीनामा देण्याची पाळी येत असे. यामुळें कोणतेंच निश्चित राजकीय धोरण ठरवितां येत नसे. व्हॉलपारैसौ व ब्युनॉसएरीसमधील ट्रॅन्स-अँडीयन रेल्वे पुरी होऊन व उत्तरेकडील नायट्रेटचा प्रांत व दक्षिणेकडचा प्यूर्टोमाँट प्रांत सँटिआगो शहराशीं जोडणारी रेल्वे सुरू झाल्यामुळें देशाचें औद्योगिक व व्यापारी महत्त्व वाढलें.

१९१० सालीं डॉन पेड्रोमाँट हा अध्यक्ष वारल्यामुळें डॉ. रॅमॉन बॅरॉस हा अध्यक्ष्य म्हणून निवडला गेला. हा उदारमतवादी असल्यानें याच्या अमदानींत उदारमतवादी पक्षाचें प्राबल्य फार माजलें. याच्या कारकीर्दीत ब्यूनॉस एरीस, व्हालपॅरैसो व सँटियगो यांमध्यें रेल्वे सुरू झाली. ही रेल्वे ट्रॅन्संडाईनच्या भल्या मोठ्या बोगद्यांतून नेण्यांत आली होती. याशिवाय याच्या कारकीर्दीतील दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, १९१० च्या सप्टेंबर महिन्यांत चिलीमध्यें स्वातंत्र्यप्राप्‍तीचा शतसांवत्सरिक उत्सव मोठ्या थाटानें करण्यांत आला ही होय. या वेळीं अर्जेंटीन रिपब्लिकमधील पुष्कळ प्रसिद्ध व्यक्तींनां, निरनिराळ्या पदव्या बहाल करण्यांत आल्या व त्यामुळें चिली व अर्जेंटीन यांच्यामध्यें जो द्वेषाग्नि धुमसत होता तो शांत होण्यास बरीच मदत झाली. १९१३ सालीं अ‍ॅरिका व बोलिव्हिया प्रांतांतील ला पाझ या शहरांमध्यें आगगाडी सुरू करण्यांत आली. पण या रेल्वेवर ताबा कोणाचा असावा यासंबंधीं अनेक भानगडीचे प्रश्न उपस्थित झाले व तो प्रश्न तात्पुरता लांबणीवर टाकण्यांत आला. महायुद्धाला सुरुवात झाल्यानंतर चिली हा जर्मनीच्या बाजूनें युद्धांत भाग घेणार कीं दोस्तांच्या वतीनें युद्धांत पडणार यासंबंधीं वादविवाद सुरू झाला. चिलीमधील पुष्कळच लोक जर्मनीच्या बाजूचे होते. चिलीमधील सैन्य जर्मन अधिकार्‍यांच्या तालमींत वाढलें होतें. चिलीच्या व्यापाराला जर्मनींनें उत्तेजन दिलें होतें. याशिवाय जर्मन लोकांनी चिलीनें आपल्या बाजूनें युद्धांत पडावें यासंबंधीं खटपट सुरू केलीं होती. यामुळें चिलींतील बहुमत जर्मनीच्या बाजूला होतें. पण चिलीचा इंग्लंडमध्यें असलेला परराष्ट्रमंत्रि आगस्टाइन एडवर्डस् हा दोस्तांच्या बाजूचा होता. चिलीनजीक ड्रेसडेन हें जर्मन जहाज ज्यावेळीं ब्रिटिशांनीं अन्यायानें बुडविलें त्यावेळीं ऑगस्टाईन एडवर्ड्सनें मोठ्या मुत्सद्देगिरीनें दोस्तांची बाजू सांवरली नसती तर चिलीनें जर्मनीच्या वतीनें लढाई पुकारली असती. पुढें महायुद्धाच्या अखेरीस चिलीला जर्मनीच्या अत्याचारांचा वीट येऊन दोस्तांच्या बाजूनें तिचा कांटा झुकूं लागला. तरी पण चिलीनें अखेरपर्यंत तटस्थ वृत्तीच स्वीकारली.

१९१५ सालीं जुआन ल्युइस सॅनफ्यूएंटिस हा अध्यक्षपदावर आरूढ झाला. या सालीं चिलीची सांपत्तिक स्थिति फारच खालावली होती. १९१६ मध्यें ही स्थिति हळू हळू सुधारली. याचें कारण दोस्तराष्ट्रांनी चिलीमधील पुष्कळ माल विकत घेतला हें होय. १९१८ मध्यें इक्यूक व अँटोफगस्टा, या ठिकाणीं पेरूमधील लोकांविरुद्ध बंड झाल्यामुळें चिली व पेरूमध्यें धुसफूस उत्पन्न झाली. पण चिलीनें ग्रेटब्रिटनशीं गुप्‍त तह करून चिली व पेरूमधील, तसेंच चिली व बोलीव्हियामधील जे गुंतागुंतीचे प्रश्न होते ते मिटविण्यासाठीं कमिशन नेमण्याची विनंति करून हा वाद मिटविला.

महायुद्धानंतर इतर सर्व राष्ट्रांप्रमाणेंच चिलीमध्येंहि मजुरीसंबंधाचे भानगडीचे प्रश्न उपस्थित झाले. १९२० मध्यें अध्यक्षाच्या निवडणुकीसंबंधाची चिलीमध्यें धामधूम सुरू झाली. अध्यक्षपदासाठी अरटयूरो अलेसांड्री व ब्यूस बॅरास बॉरगॅनो हे दोन उमेदवार होते.  अलेसांड्री हा मजुरांचा कैवारी होता. त्यामुळें तोच अध्यक्ष म्हणून निवडून आला. अलेसांड्री याच्या निवडणुकीमुळें लोकशाहीपक्षाला उत्तेजन मिळालें. महायुद्धांत चिलीनें कोणताहि भाग न घेतल्यामुळें वास्तविक चिलीला राष्ट्रसंघामध्यें स्थान नव्हतें पण चिलीचा माजी अध्यक्ष सान फ्यूएंटीस यानें १९१९ सालीं राष्ट्रसंघाला आपला दुजोरा दिला हातो. त्यामुळें राष्ट्रसंघाच्या अधिवेशनाला, चिलीला आमंत्रण आलें. या बैठकीला परराष्ट्रमंत्री अँटोनियो ह्युनीयस याच्या हाताखालीं एक प्रतिनिधीमंडळ देऊन पाठवण्यांत आलें होतें.

चि ली ब द्द ल  अ ली क डी ल  मा हि ती.— १९२० सालच्या खानेसुमारींत चिलीची लोकसंख्या ३७,५४,७२३ म्ह. दर चौरस मैलास १२.९२ इतकी मारली. सँटिआगो शहराची वस्ती ५०७,२९६ भरली. १९२० पासून सक्तीचें शिक्षण सरकारी खर्चानें सुरू झालें आहे.

अलीकडे अनियंत्रित लष्करी राज्यकारभार चिलींत सुरू झाला आहे हा फरक एकदम घडून आला नाहीं. या देशाचीं नैसर्गिक रचना (अरुंद व लांबट) असल्या राज्यपद्धतीला पोषक आहे. चिली देश स्वतंत्र झाल्यापासून सॅनटिआगो ते चिलनपर्यंतच्या प्रदेशांत अधिकारी वर्ग व श्रीमंत जमीनदारांचा वर्ग एकत्रित होत गेला. हा प्रदेश मध्यभागीं असून धर्माधिकारी व जमीनदार या पुराणमताभिमानी वर्गाच्या हातीं आहे. आर्जेंटाईन देशांतून येणार्‍या मालावर जबर जकात बसवावी असें या पक्षाचें मत आहे. उत्तरेकडील भागांत समाजसत्तावादी व समतावादी (सोशॅलिस्ट व कम्यूनिस्ट) पक्ष आहे. किनार्‍यालगत उदारपक्षाचे लोक रहातात. दक्षिणेकडे विरोधी पक्ष असून तो सॅन्टिआगो येथील काँझर्व्हेटिव्ह पक्षाला नेहमीं विरोध करीत असतो. काँझर्व्हेटिव्ह पक्षाच्या विरुद्ध असलेल्या सर्व लोकांनी मिळून 'अलायन्स लिबरल' नांवाचा पक्ष तयार करून आर्टुरो आलेक्झांड्री नांवाच्या हुशार महत्त्वाकांक्षी व बेशक इसमास त्याचा पुढारी केलें. त्यावेळीं सरकारची सांपत्तिक स्थिति चांगली नव्हती. कारण पेरूबरोबर युद्ध करण्याच्या तयारीकडे मोठा खर्च केला गेला होता. आलेक्झांड्रीनें स्वत: कायदेपंडित असल्यामुळें इतर विद्वानांनां जवळ केलें होतें. त्यांनीं राजकीय सुधारणेच्या मोठाल्या योजना केल्या; पण व्यापारांत गोंधळ माजला. त्यामुळें १०० मिलियन (१००,०००,०००) डॉलर कर्ज झालें. कित्येक महिने अधिकार्‍यांनां पगार देण्यास खजिन्यांत पैसा मिळेना. त्यामुळें लष्करी अधिकारी १९२२ मार्च मध्यें सीनेटवर वजन घालूं लागले, व शेवटीं पार्लमेंटनें सर्व सत्ता लष्कराच्या हातीं दिली; व पार्लमेंट मोडलें. नंतर एक नवें कॅबिनेट वरिष्ट मुलकी अधिकार्‍यांचें बनविलें गेलें आहे; परंतु त्यांच्यावर सर्व देखरेख लष्कराची आहे. अशा रीतीनें एक मोठी क्रांति घडवून आणण्यांत आली. सांप्रतच्या सरकारवर राष्ट्राचा विश्वास आहे. खासगी बँकांनीं सरकारला कर्ज दिलें आहे.

[संदर्भग्रंथ-कँटोचिली अ‍ॅन अ‍ॅकाऊंट ऑफ इट्स वेल्थ अँड प्रोग्रेस (१९१२); कोएवेल—मॉडर्न चिली (१९१३); मिल्स—चिली फिजिकल फीचर्स, नॅचरल रिसोर्सेस एटसेटरा].

   

खंड १३ : घ - जलपैगुरी  

 

 

 

  घंटय्याकवि
  घटोत्कच
  घटोत्कच लेणीं
  घड्याळ
  घनी
  घनौर
  घांट
  घाटगे
  घाटाळ
  घातमपूर
  घानची
  घायपात
  घारगड किल्ला
  घारघोडा
  घारापुरी
  घाशीराम कोतवाल
  घांसदाणा
  घासी
  घिरथ
  घिसाडी
  घुगुस
  घुंड
  घुबड
  घुराम
  घेरिया
  घेवडा
  घोटकी
  घोडबंदर
  घोडा
  घोडाघांट
  घोडाबारी
  घोडासर
  घोडें
  घोडेघांस
  घोरपड
  घोरपडी
  घोरपडे
  घोरी घराणें
  घोशी
  घोसाळे
  घोसी
  घोळ
 
 
  चउमू
  चकमा
  चकला रोषनाबाद
  चकवाल
  चकिया
  चक्कियर
  चक्कीनोआरो
  चक्रपाणि
  चक्रवर्ती
  चक्राप्पा
  चंगनाचेरी
  चंगर
  चच, चचनामा
  चचान
  चटया
  चडार
  चंडी
  चतुरमहाल
  चतुर साबाजी
  चतुरसिंग
  चतुर्थ
  चत्रा
  चॅथॅम
  चंदगड
  चंद घराणे
  चंदन
  चंदभाट
  चंदरभान
  चंदावरकर, नारायण गणेश
  चंदासाहेब
  चंदीपुर
  चंदेरी
  चंदेल्ल
  चंदौली
  चंदौसी
  चंद्र
  चंद्रकोना
  चंद्रगिरी
  चंद्रगुप्त
  चंद्रगोमिन्
  चंद्रनगर
  चंद्रभागा
  चंद्रहास
  चंद्रावती अथवा चंद्रावली
  चन्नगिरी
  चन्नपट्टण
  चन्नबसव
  चन्नरायपट्टण
  चंपा
  चंपानेर
  चपारण
  चंपावत
  चंपाषष्ठी
  चंबळा नदी
  चबा संस्थान
  चमारडी
  चरक
  चरखा
  चरखारी
  चरणदासी
  चरणव्यूह
  चरबी
  चरबीचें झाड
  चरी
  चर्मण्वती
  चलत-चित्रें
  चलन
  चल्लाकेरे
  चवळी
  चहा
  चक्षुर्मंनु
  चाकण
  चाकवत
  चागई
  चांगदेव
  चांगभकार
  चांगा केशवदास
  चाघताइखान
  चांचेगिरी
  चाचो
  चांडोद
  चाणक्य
  चातुर्मास्य
  चातुर्मास्य याग
  चातुर्वर्ण्य
  चात्सु
  चादचा
  चांदपूर
  चांदबिबी
  चांदभाट
  चांदला
  चांदवड
  चांदा
  चांदूर
  चांदूर बाजार
  चांद्रायण
  चानन शानन
  चानस्मा
  चानाल
  चानोड
  चाप्रा
  चाफळ
  चाबुआ
  चांभार
  चाम
  चामखीळ
  चामन
  चामराजनगर
  चामुंड
  चामुर्शी
  चार
  चारखा
  चारण
  चारदुआरं
  चारसद
  चारा
  चारीकार
  चार्टिझम
  चार्लंमांट, अर्ल ऑफ
  चार्वाक
  चालुक्य घराणें
  चालसिस
  चावडा
  चावंद
  चास-कमान
  चॉसर
  चासा
  चाहमान उर्फ चौहान
  चाळिसगांव
  चिक
  चिकंजी
  चिकबळ्ळापूर
  चिकाकोल
  चिकोडी
  चिक्कणर्ति
  चिक्केरूर
  चिक्टीआबर
  चिक्नायकन्हळ्ळी
  चिक्मगळूर
  चिखलदरा
  चिखली
  चिंगलपट
  चिंच
  चिचगड, जमीनदारी
  चिंचलीगदड
  चिंचवड
  चिचेवाडा
  चिंचौली
  चिंच्यु
  चिटणीस
  चितलनगर जमीनदारी
  चितळ
  चितळदुर्ग
  चिताकुल
  चिंतामणी
  चिंतामणी कवि
  चिंतामणी रघुनाथाचार्य
  चितारी
  चिति
  चितोड
  चित्तगांग
  चित्तगांग डोंगराळ प्रदेश
  चित्ता
  चित्तूर
  चित्फिरोझपूर
  चित्रकला
  चित्रकाव्य
  चित्रकूट
  चित्रकोट
  चित्रगुप्त
  चित्ररथ
  चित्रसंग्रहालयें
  चित्रळ
  चित्रांगदा
  चित्रावाव
  चिदंबर दीक्षित
  चिदंबरम्
  चिंदविन
  चिंदविन नदी
  चिदानंद स्वामी
  चिनडोंगर
  चिनमुलगुंद
  चिन लोक
  चिनसुरा
  चिनाब
  चिनीमाती किंवा केओलिन
  चिन्नविरन्ना
  चिन्नूर
  चिन्योत
  चिपळूण
  चिपळूणकर, कृष्णशास्त्री
  चिपळूणकर, विष्णुशास्त्री
  चिफू
  चिमणाजीआप्पा
  चिमणाजी दामोदर
  चिमणी
  चिरक्कल
  चिराबा
  चिलखत-वेदकालांतहि
  चिलिअनवाला
  चिली
  चिल्का सरोवर
  चिस्ती
  चीझी, अॅंटोनें लिओनार्ड डि
  चीन
  चीनी
  चीपुरुपल्ले
  चीर
  चीराल
  चुका
  चुकचि
  चुटिया
  चुडा
  चुडा संस्थान
  चुडेश्वर
  चुना
  चुनार
  चुंबकजन्य विद्युद्यंत्र
  चुंबकत्व
  चुंबकीय दृकशास्त्र
  चुंबन
  चुमल्हारी
  चुरू
  चूडामण
  चेकोस्लोव्हेकिया
  चेंगीझखान
  चेचेंझे
  चेटवई
  चेट्टी
  चेदूब बेट
  चेंबर्स रॉबर्ट
  चेयूर
  चेर घराणें
  चेरात
  चेरापुंजी
  चेरिअल
  चेरुमन
  चेरो
  चेर्रा
  चेल
  चेसेलडेन, विल्यम
  चेस्टरफील्ड
  चेस्टरफील्ड फिलिफ
  चैतन्य
  चैतसिंग
  चैत्य
  चैन
  चैबासा
  चोखामेळा
  चोवो
  चोडवरम
  चोध्रा
  चोपडे
  चोपदार
  चोबारी
  चोंभा
  चोरांग्ल
  चोरासी
  चोरी
  चोल
  चोल घराणें व चोल साम्राज्य
  चोवीस परगणा जिल्हा
  चौंगू
  चौघाट
  चौथाई, चौथ
  चौधरी
  चौबे जहागीर
  चौल
  चौलमुग्रा
  च्यवन
 
  छछरौली
  छट्टू
  छतारी
  छत्तरपूर
  छत्तिसगड विभाग
  छत्रपूर तहशील
  छत्रसाल
  छत्रे, केरो लक्ष्मण
  छत्रे, विष्णु मोरेश्वर
  छत्रे, सदाशिव काशीनाथ
  छंद:शास्त्र
  छप्पन देशचे राजे
  छप्रौली
  छब्रा
  छलाल
  छात
  छापखाना
  छापिआ
  छाप्री
  छायाचित्रपेटिका
  छाल
  छालिअर
  छिंद, लल्ल
  छिंदवाडा
  छिंपा
  छिब्रामऊ तहसील
  छुईखदान
  छुटिया
  छोटा उदेपूर
  छोटानागपूर
  छोटी साद्री
 
  जकात
  जॅक्सन अॅंड्र
  जॅक्सन व्हिल्ले शहर
  जखमा
  जगजीवनदास
  जगत्याल
  जगदलपूर
  जगदीशपूर
  जगन्नाथ
  जगन्नाथपंडित
  जगन्नाथपुरी
  जगन्नाथ शंकरशेट, मुर्कुटे
  जंगम
  जगय्या पेटा
  जंगल
  जंगल महाल
  जगलूर
  जगाध्री
  जग्रांव
  जंगीपूर
  जघाशूल
  जंजिरा
  जझिया
  जटलंड
  जटामांसि
  जटायु
  जटासूर
  जठरदाह
  जठरव्रण
  जडजीवघाद
  जडद्रव्य
  जडभरत
  जडवाद
  जडान्नविषबाधा
  जडावाचें काम
  जत
  जतिंग रामेश्वर
  जंतुजन्य रोग
  जतोई
  जत्रा
  जंदिआल गुरु
  जंदिआला
  जंदोला
  जनक
  जनजसवंत
  जननेंद्रियांचे गुप्तरोग
  जनमेजय
  जनस्थान
  जनाबाई
  जनार्दनस्वामी
  जनावरें
  जनीजनार्दन
  जपान
  जपानी वार्निस
  जबलपुर
  जंबुकेश्वरस्
  जंबुद्वीप
  जबूसर
  जमखिंडी
  जमदग्नि
  जमरुड
  जमाखर्च
  जमाबंदी
  जमालखान
  जमालपुर
  जमिकुंता
  जमीन
  जमीनदार व कुळें
  जमीनमहसूल
  जमुई
  जमेका
  जमेसाबाद
  जम्नोत्री
  जम्मलमडुगु
  जम्मू
  जयगड
  जयचंद
  जयदेव
  जयद्रथ
  जयनगर
  जयपाल
  जयपूर
  जयपुर जमीनदारी
  जयपुर संस्थान
  जयमल्ल
  जयरथ शृंगार
  जयरामस्वामी
  जयरामात्मज
  जयविजय
  जयसिंह
  जर उतणें
  जरतार
  जरत्कारु
  जरदाळू
  जरा
  जरासंघ
  जरीपटका
  जर्मन सिल्व्हर
  जर्मनी
  जलंगी
  जलजन्य विद्युतशक्ति
  जलघा
  जलपैगुरी

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .