विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चिन्योत त ह सि ल — ही पंजाब प्रांताच्या झंग जिल्ह्यांतील एक तहसिल असून हिचें क्षेत्रफळ १०१६ चौ. मैल आहे. १९११ सालीं हिची लो. सं. १८३९६६ होती. हिच्यांत १ गांव ३५४ खेडीं आहेत. १९०५-६ सालीं हिचें एकंदर उत्पन्न २.६४ लाख रु. होतें. या तहसिलींतील प्रदेशांत झेलम व चिनाब नद्यांचे कालवे असून त्यामुळें बहुतेक पडीत जमीन लागवडीस आली आहे.
श ह र.— तहशिलीचें मुख्य ठिकाण असून झंग शहराच्या ईशान्येस ५२ मैलांवर वसलें आहे. १९११ सालीं याची लोकसंख्या १४०८५ होती. हें गांव फार जुनें आहे. पुरातनकालीं याला साकल (संगल) हीं संज्त्रा असून हें श्वेतहूण लोकांचें राजधानीचें शहर होतें. येथें ह्युएनत्संग हा चिनी प्रवासी आला होता. दुराणीच्या स्वार्यांमुळें हें बरेंच मोडकळीस आलें होतें; व १८४८ च्या अस्वस्थतेमुळेंहि या शहराचा बराच नाश झाला. सध्यां हें भरभराटींत आहे. शहाजहानबाद येथील सुभेदार नबाब सादुल्लाखान यानें बांधलेली एक मशीद असून शहा बुर्हान या फकीराचें एक देवालय आहे. या देवालयास हिंदू व मुसलमान सारखेच पूज्य मानतात. येथें पितळेचीं भांडीं व लांकडावरील कोरिव काम होतें. येथील गवंड्यांची फार प्रसिद्धि आहे. ताजमहाल व अमृतसर येथील सोन्याचें देवालय येथील गवंड्यांनींच बांधलें असें म्हणतात. येथें गहूं, कापूस वगैरेंचा व्यापार चालतो. येथील म्युनिसिपालिटीची स्थापना सन १८६७ सालीं झाली.