विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चिंदविन नदी — ही ब्रह्मदेशाच्या उत्तरेकडील हुकौंग दरीच्या सभोंवतालच्या टेंकड्यांत उगम पावून झिंकलिंग, कम्ती, शानसंस्थान, उत्तर व दक्षिण चिंदविन जिल्हे वगैरे प्रदेशांतून वहात जाते व पकोक्कू व मिंग्यान या शहरांच्या दरम्यान इरावतीस मिळते. इला यू म्यित्या वगैरे नद्या मिळतात. इची लांबी ६०० मैल असून कांहीं ॠतूंत मुखापासून आंत ४०० मैलपर्यंत आगबोटी जाऊ येऊं शकतात. या नदीच्या तिरावर तंबाखूचें उत्पन्न होतें.