विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चिदंबर दीक्षित —पेशवाईअखेरचा एक सिद्धपुरुष. हा गुर्लहोसुर येथें रहात असे. चिदंबरचरित्र नांवाचा एक याच्यावर रचलेल्या ओवीबद्ध ग्रंथ आहे. याचा जन्म शके १६८० मध्यें झाला. यानां अवतारी पुरुष समजत. खुद्द पेशवे, रास्ते, गोखले वगैरे संस्थानिक सरदार लोक याच्या सेवेस येऊन रहात. गुर्लहोसुरास याचे वाडेहि अद्याप दिसतात. चिदंबर दीक्षितांचे शिष्य राजारामबुवा होत. या राजाराम बुवाची मराठी कविता पुष्कळच आहे; पण ती बहुतेक सर्व अप्रकाशित आहे.