प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग तेरावा : घ - जलपैगुरी

चित्रसंग्रहालयें —सामान्यत: चित्रसंग्रहालय या शब्दाचा अर्थ 'कलासंग्रहालय' याहून भिन्न असून त्यावरून फक्त चित्रांचा संग्रह जेथें आहे असें ठिकाण, इतकाच बोध घ्यावयाचा. चित्रांचा संग्रह करणें एवढाच केवळ या संग्रहालयांचा उद्देश नसून, त्यांत मानवी विचारांची व कल्पनांचीं अनेक अवस्थांतरें पहावयास सांपडतात, हा त्यांचा अत्यंत महत्वाचा उपयोग आहे. एकतर अशा संग्रहालयांत सौंदर्य व कला या दृष्टीनें पाहतां रंगकाम, आकृतिविशेष व निर्माणकौशल्य या गुणांतील अनेक चित्रकारांची करामत दृष्टीस पडते. दुसर्‍या म्हणजे ऐतिहासिक दृष्टीनें पाहतां त्या ठिकाणीं गतकालीन थोर पुरुषांच्या हुबेहूब आकृती पहावयास सांपडतात; त्या पुरुषांच्या संवयी, चालीरीती, पोशाख, त्या काळचीं कलाकुसरीचीं कामें व धार्मिक पूजनार्चनादि प्रकार यांची माहिती मिळते. शिवाय कोणत्याहि देशांतील एकंदर चित्रकलेवरून ती चित्रें निर्माण करणार्‍या लोकांच्या उत्कर्षापकर्षाचीहि यथायोग्य कल्पना  बांधतां येते. शेवटला सर्वांत महत्त्वाचा उपयोग म्हणजे मनोविकारजागृतीचा; कारण कोणत्याहि खरोखर प्रेक्षणीय अशा चित्रांमध्यें मनांतील निदान एक तरी भावना उद्दीपित करण्याचा गुण असलाच पाहिजे. उदाहरणार्थ ब्रिटिश नॅशनल गॅलरीमधील फ्रान्सियाच्या 'पीटा' या चित्रामध्यें ओतप्रोत करूणरस भरलेला आहे; व्हेलाझक्वेझनिर्मित अ‍ॅडमिरल पॅरेजच्या चित्रांत महानुभावपणा आहे; येणेंप्रमाणे कोठें कौटुंबिक भावना, कोठें पूज्यभाव इत्यादि अनेक भावना मनावर बिंबतात. आणखी असें कीं अशा चित्रसंग्रहालयांमध्यें जाऊन सर्व सभोंवार सुंदर व रमणीय चित्रांचे देखावे पहात असतां अवर्णनीय सुखसमाधान वाटतें, त्यामुळें अशा संग्रहालयांची मनाला व नेत्राला आनंद देणारीं स्थानें या नात्यानें समाजाला अत्यंत उपयुक्तता व आवश्यकता आहे. मोठमोठ्या चित्रसंग्रहालयामध्यें अनेक कालांची व पद्धतीची चित्रें जमवून ठेवलेलीं असल्यामुळें कोणालाहि स्वतःच्या आवडीप्रमाणें विशिष्ट देशांतील किंवा काळांतील, किंवा विशिष्ट प्रकारचीं व विशिष्ट भावनादर्शी पाहिजे ती चित्रें पाहण्यास सांपडतात. तात्विक दृष्ट्या पाहतां अशा संग्रहालयांच्या योगानें समाजाच्या अभिरुचीला योग्य वळण लागून त्याच्या ज्त्रानांत व विद्वत्तेंत मोठी भर पडते.

हल्ली बहुतेक देशांत सर्व पद्धतींच्या चित्रांचा संग्रह असलेलीं राष्ट्रीय चित्रसंग्रहालयें असून शिवाय फक्त विशिष्ट पद्धतीच्या चित्रांचा संग्रह असलेली म्युनिसिपालट्या, चर्चे, देवालयें व खासगी व्यक्ती यांची चित्रसंग्रहालयें आहेत. इंग्लंडमध्यें ब्रिटिश नॅशनल गॅलरी हें सर्वांत उच्च दर्जाचें संग्रहालय आहे. त्यांतील संग्रह पार्लमेंटच्या ५००० ते १०००० पौंडापर्यंतच्या वार्षिक देणगींतून होत आला आहे. शिवाय प्रसंगानुसार विशेष देणगी देऊनहि पार्लमेंटनें उत्तमोत्तम चित्रें खरेदी केलीं आहेत. उदाहरणार्थ, १८७१ मध्यें ७५००० पौंड देऊन ७७ चित्रें खरेदी केलीं; १८८५ मध्यें अ‍ॅन्सिडी मॅडोनाचें चित्र ७०००० पौंडांनां व १ ल्या चार्लसचें चित्र १७५०० पौंडांनां विकत घेतलें. याप्रमाणें मोठाल्या किंमती देऊन उत्कृष्ट चित्रें मिळविण्याचा पार्लमेंटाचा क्रम चालूच आहे.

बर्लिन येथें केसर फ्रेडरिक म्यूझियम आहे. यांतहि सर्व पद्धतीची चित्रें असून डच व इटालियन चित्रांचा भरणा विशेष आहे. शिवाय ड्रेसडेन व म्यूनिच येथें मोठाले चित्रसंग्रह आहेत. व्हिएन्ना येथील इंपीरियल गॅलरीमध्यें चित्रें १७०० च पण निवडक आहेत. चित्रांचा संग्रह प्रमाणाच्या बाहेर न वाढवितां तो आटोपशीर व निवडक करणें हा मुद्दा महत्त्वाचा आहे. रशियांत पिटर दि ग्रेट यानें स्थापलेला (सेंट पीटर्सबर्ग, हर्मिटेज) चित्रसंग्रह प्रसिद्ध आहे; त्यांत सुमारें १८०० चित्रें आहेत. सर्वांत फ्रेंच लोकांचा (लूव्हर पॅलेस, पॅरिस) चित्रसंग्रह महत्त्वाचा आहे १८००  पर्यंत तर युरोपमध्यें त्याचाच पहिला नंबर होता. शिवाय तेथें प्रत्येक पद्धतींतील सर्वांत उत्तम चित्रें निवडून ती एकत्र स्वतंत्र जागेंत ठेवण्यांत आलीं आहेत. शेवटला महत्त्वाचा चित्रसंग्रह फ्लॉरेन्स येथील रॉयल गॅलरीज हा होय. तो पिट्टी व युफिझी या दोन राजवाड्यांत मिळून ठेवलेला आहे. त्यांत १५व्या व १६व्या शतकापासूनचा संग्रह असून जगांतील सर्वांत मोठा संग्रह हाच होय.

विविक्षित राष्ट्रीय पद्धतीच्या चित्रांचा संग्रह असलेलीं चित्रसंग्रहालयेंहि चांगल्या योग्यतेचीं आहेत. उदाहरणार्थ ब्रिटिश चित्रकलेचा संग्रह असलेली नॅशनल गॅलरी, पॅरिस फ्रेंच चित्रकलेचा संग्रह व याप्रमाणें बर्लिन, रोम, ड्रेसडेन, व्हिएन्ना, मॅड्रिड वगैरे ठिकाणीं तद्देशीय चित्रांचा संग्रह आहे. ब्रुसेल्स व अँटवर्प येथें फ्लेमिश चित्रकलेचे उत्तम नमुने आहेत. म्यूझियो डेल पेड्रो स्पॅशिन चित्रकलेचे नमुने आहेत. खिश्चियाना, स्टॉकहोम व कोपनहेगन येथें स्कँडिनेव्हियन चित्रकलेचा मोठा संग्रह आहे. रोम येथें इटालियन चित्रकलेचे सर्वोत्कृष्ट नमुने आहेत. पण विशेषत: फ्लॉरेन्स येथील अ‍ॅकेडेमियांत इटालियन चित्रकलेचा फार महत्त्वाचा संग्रह आहे. येथेंच बॉटिसेलीचें 'प्रायमाव्हेरा' व फ्रा अ‍ॅन्जेलिकोचें 'लास्ट जजमेंट' हीं अत्यंत प्रख्यात चित्रें आहेत. मिकेलॅन्जेलो डेव्हिडचा पुतळाहि येथें आहे. तथापि एकंदरीनें या नॅशनल गॅलरीची व्यवस्था चांगलीशी नाहीं. या बहुतेक संग्रहालयांनां प्रवेश फी असतेच; रविवारीं व सणाच्या दिवशीं मात्र मोफत प्रवेश होतो. या संग्रहालयांत नवीन भर फारशी होत नसते.

पुष्कळ नगरांमध्यें म्युनिसिपालट्यांनीं केलेले चित्रसंग्रह नांवाजण्यासारखें आढळतात. इटालीमध्यें असल्या संग्रहांचा बराच सुकाळ आहे. हॉलंडमध्यें हार्लेम, लीडेन, रॉटरडॅम, हेग येथील संग्रहालयें पहाण्यालायक आहेत. बर्मिंगहॅम व मँचेस्टर येथें ब्रिटिशकलेचा संग्रह चांगला आहे. कोलोन येथें र्‍हेनिश चित्रकलेचा निवडक संग्रह आहे. ग्रेटब्रिटनमध्यें लिव्हरपूल व ग्लासगो येथें म्युनिसिपालटीचीं उत्तम संग्रहालयें आहेत. अमेरिकेंत बोस्टन, न्यूयॉर्क, फिलाडेल्फिया, शिकागो व वॉशिंग्टन येतील संग्रह अलीकडील असूनहि बर्‍यापैकीं आहेत.

ख्रिस्ती देवळांत प्रथम शोभेकरितां जमविलेल्या चित्रांमुळें हल्लीं त्यांची बर्‍याच ठिकाणीं चित्रसंग्रहालयें बनवितां आलीं आहेत. उदाहरणार्थ अँटवर्प कॅथिड्रल, घेंट, पिसा वगैरे ठिकाणीं चर्चेसमध्यें विशिष्ट पद्धतीच्या चित्रांचा संग्रह पाहण्यास सांपडतो.

व्हॅटकिन गॅलरीजमध्यें (पोपांच्या राजवाड्यांतील चित्रसंग्रहालयांमध्यें) पुतळ्यांचा संग्रहच विशेष असला तरी इटालियन पद्धतींतील चित्रांचा संग्रहहि चांगला आहे. इंग्लंडमध्यें तीन राजवाड्यांतील संग्रह लोकांस पाहण्यास मोकळे असतात. हॅम्पटन कोर्ट, विंडसर व केनसिंगटन या तिन्ही राजवाड्यांतील संग्रह पहाण्यासारखे आहेत. बर्‍याच कॉलेजांचे व युनिव्हर्सिट्यांचे संग्रह निमखासगी स्वरुपाचे आहेत. ग्रेटब्रिटनमध्यें अनेक लोकांच्या खासगी वाड्यांतून बहुमोल किंमतीचे जिन्नस सांठविलेले आहेत, पण त्यांची नक्की माहिती देतां येत नाहीं. शिवाय नियतकालिक प्रदर्शनें अनेक ठिकाणीं भरत असतात.  गिल्डहालमध्यें वार्षिक प्रदर्शन फुकट असतें. लंडन, बर्लिन, रोम, व्हिएन्ना व इतर अनेक यूरोपीय शहरांमध्यें अशी प्रदर्शनें उघडत असतात, व त्यांत चित्रकलेचीं नवीं नवीं कामें ठेवण्यांत येतात.

हिं दु स्था नां ती ल चि त्र सं ग्र हा ल यें :— हिंदुस्थानांत यूरोपच्या धर्तीवर स्वतंत्र चित्रसंग्रहालयें फारशीं नाहींत. राजेरजबाडे व संस्थानिक यांनीं आपापल्या राजधानींच्या ठिकाणीं उत्तम चित्रांचा संग्रह केलेला आढळतो. सातारच्या महाराजांच्या संग्रहीं अनेंक तजबिरा होत्या. त्यांची शके १७४१ मध्यें केलेली यादी रा. राजवाडे यांनीं इतिहास-ऐतिहासिक मासिकांत प्रसिद्ध केली आहे. शहाजी व शिवाजी स्वकालीन व पूर्वकालीन प्रसिद्ध स्त्रिपुरुषांच्या तसबिरा काढवून संग्रहीं ठेवीत. १७४१ त पुढील फक्त तसबिरा शिल्लक राहिल्या होत्या.

शाहूमहाराज छत्रपती घोड्यावरील, संभाजी महाराज, शाहूमहाराज छत्रपती हुकावढतेत, शाहुमहाराज मांडीवरी मुलगी घेतली, शाहुमहाराज तीरंदाजी करतात, राजाराम महाराज घोड्यावरी स्वारी, संभाजीमहाराज मांडीवरी शाहूमहाराज, शाहूमहाराज मांडीवरी मुली दोघी २, रोडके घोडेस्वार पांढरे, वृद्ध पुरूष हत्तीबाज, बादशहाज्यादी, तसबीर सांबराची, बाला गोपीनाथ, शीदोजी नींबाळकर, बाजीराव बलाल, बसापा खोजे, शाहाज्याह-पातशहा, आलावरिदीखान, स्वारी पादशहाची, झुलपुकरखान, आलीईदलशहा, स्त्री पुरूषास पायास धरीते, मुलना तुप्याजा, चेतरशींगटोके, रोडके घोडमनुष्य, पठाण, आली आदलशहा पादशहा, पादशहा व पादशहाज्यानीं, हुसेनखा मैणा, नबी साहेब, घोडा कुमाईत, अमरसिंग राणा, तसबीर पादशहाची पारसी नांव, ज्वालामुखी, बाला गोपीनाथ, गुलाबाचे फुलांचे झाड, फत्तेसिंग भोसले, रामरावणाची लढाई, शीपाई ढालतरवारवाला (पारसी नांव आहे), खवासखान माहाराणा, हमेतखान, कागद यक तसबीरा तीन, (पालखीत, उभा पंखा हातीं, उभा चौरी हातीं) आजमशाह पातशाह, बाहादरशाह पातशाह, बाबा याकूब पातशाह, वृक्षाखाली स्त्री पुरूष त्रीवर्ग, आलमगीर पातशाह खंड्या कुत्रा, माहाराणाजी, बादशाहाज्यादी, गीरधरलाला, पुरूषाच्या हाता वरी बाज, महाराज नाथजी, पाछ्यायजादा, जानू सेवाला, मायाजी फडतरे, तसबीर ईमान मुसुलमानी, नारायणगौरी, हात्तीची तसबीर, मलकपीरशहाषहा, तसवीर कागद यक, (ख्वाज खुतमतदीन, ख्वाज महीदीन), आलमगीर पातशाहाचा चरणबाज, अलमगीर पातशहाचा घोडा नीळा थोरला.

हे सर्व संग्रह लहान प्रमाणावर आहेत असेंच म्हटलें पाहिजे. हिंदी चित्रकलेत हिंदु, मुसुलमान (मोंगल) व बौद्ध असे तीन विभाग करतां येतील. त्यासंबंधीं सविस्तर विवरण 'भारतीय चित्रकला' या सदराखालीं सांपडेल. अजिंठा बेरुळ व कार्ल्याची लेणीं हीं भरतखंडांतील पूर्वकालीन कलेचीं स्मारकें आहेत. प्रसिद्ध चित्रकार राजा रविवर्मा याच्या हातीचीं पुष्कळ चित्रें श्रीमंत गायकवाडसरकार यांनीं आपल्या लक्ष्मीविलास राजवाड्यांत काढविलीं आहेत व परदेशीय चित्रांचाहि संग्रह त्यांनी बराच केला आहे. तसेंच जयपूर, दिल्ली वगैरे चित्रकलेच्या मूलस्थानीं अद्यापीहि या कलेचे उत्तम नमुने पाहण्यास मिळतात. ह्याखेरीज हिंदुस्थानांतील मुख्य शहरीं असणारे अजबखाने अवश्य पाहण्यासारखे आहेत. त्यांत इतर वस्तुसंग्रहाबरोबरच साधीं रंगीत चित्रें यांचेहि नमुने पाहण्यांत येतात. त्यांचीं नावें (१) इंडियन म्यूझिअम, कलकत्ता (२) व्हिक्टोरिया आल्बर्ट म्यूझिअम, मुंबई (३) सेंट्रल गव्हर्मेट म्युझिअम, मद्रास; (४) सोसायटी ऑफ ओरिएंटल आर्ट, कलकत्ता, (५) जमशेटजी जीजीभाई आर्टस्कूल, मुंबई, (६) बांबे आर्ट सोसायटी, मुंबई, (७) मद्रास फाईन आर्ट सोसायटी, (८) व्हिक्टोरिया मेमोरिअल कलेक्शन, बेल्व्हेडीर, कलकत्ता, (९) खुदाबक्ष लायब्ररी, वांकीपूर, (१०) सेंट्रल म्यूझिअम, लाहोर, (११) आर्केऑलॉजी म्यूझिअम, दिल्ली, (१२) भूरिसिंग म्यूझिअम, चंबा, पंजाब. याशिवाय पुदुकोट्टा व तंजाबर राजवाड्यांत तसेंच बरद्वान, बनारस, रामपूर, वगैरे संस्थानिकांचे संग्रह व जी. एन. त्रागोर, कलकत्ता, बाबू सीताराम लाल, बनारस व मनुक नांवाचे बांकीपूरचे गृहस्थ यांचे संग्रहहि वाखाणण्यासारखें आहेत.

   

खंड १३ : घ - जलपैगुरी  

 

 

 

  घंटय्याकवि
  घटोत्कच
  घटोत्कच लेणीं
  घड्याळ
  घनी
  घनौर
  घांट
  घाटगे
  घाटाळ
  घातमपूर
  घानची
  घायपात
  घारगड किल्ला
  घारघोडा
  घारापुरी
  घाशीराम कोतवाल
  घांसदाणा
  घासी
  घिरथ
  घिसाडी
  घुगुस
  घुंड
  घुबड
  घुराम
  घेरिया
  घेवडा
  घोटकी
  घोडबंदर
  घोडा
  घोडाघांट
  घोडाबारी
  घोडासर
  घोडें
  घोडेघांस
  घोरपड
  घोरपडी
  घोरपडे
  घोरी घराणें
  घोशी
  घोसाळे
  घोसी
  घोळ
 
 
  चउमू
  चकमा
  चकला रोषनाबाद
  चकवाल
  चकिया
  चक्कियर
  चक्कीनोआरो
  चक्रपाणि
  चक्रवर्ती
  चक्राप्पा
  चंगनाचेरी
  चंगर
  चच, चचनामा
  चचान
  चटया
  चडार
  चंडी
  चतुरमहाल
  चतुर साबाजी
  चतुरसिंग
  चतुर्थ
  चत्रा
  चॅथॅम
  चंदगड
  चंद घराणे
  चंदन
  चंदभाट
  चंदरभान
  चंदावरकर, नारायण गणेश
  चंदासाहेब
  चंदीपुर
  चंदेरी
  चंदेल्ल
  चंदौली
  चंदौसी
  चंद्र
  चंद्रकोना
  चंद्रगिरी
  चंद्रगुप्त
  चंद्रगोमिन्
  चंद्रनगर
  चंद्रभागा
  चंद्रहास
  चंद्रावती अथवा चंद्रावली
  चन्नगिरी
  चन्नपट्टण
  चन्नबसव
  चन्नरायपट्टण
  चंपा
  चंपानेर
  चपारण
  चंपावत
  चंपाषष्ठी
  चंबळा नदी
  चबा संस्थान
  चमारडी
  चरक
  चरखा
  चरखारी
  चरणदासी
  चरणव्यूह
  चरबी
  चरबीचें झाड
  चरी
  चर्मण्वती
  चलत-चित्रें
  चलन
  चल्लाकेरे
  चवळी
  चहा
  चक्षुर्मंनु
  चाकण
  चाकवत
  चागई
  चांगदेव
  चांगभकार
  चांगा केशवदास
  चाघताइखान
  चांचेगिरी
  चाचो
  चांडोद
  चाणक्य
  चातुर्मास्य
  चातुर्मास्य याग
  चातुर्वर्ण्य
  चात्सु
  चादचा
  चांदपूर
  चांदबिबी
  चांदभाट
  चांदला
  चांदवड
  चांदा
  चांदूर
  चांदूर बाजार
  चांद्रायण
  चानन शानन
  चानस्मा
  चानाल
  चानोड
  चाप्रा
  चाफळ
  चाबुआ
  चांभार
  चाम
  चामखीळ
  चामन
  चामराजनगर
  चामुंड
  चामुर्शी
  चार
  चारखा
  चारण
  चारदुआरं
  चारसद
  चारा
  चारीकार
  चार्टिझम
  चार्लंमांट, अर्ल ऑफ
  चार्वाक
  चालुक्य घराणें
  चालसिस
  चावडा
  चावंद
  चास-कमान
  चॉसर
  चासा
  चाहमान उर्फ चौहान
  चाळिसगांव
  चिक
  चिकंजी
  चिकबळ्ळापूर
  चिकाकोल
  चिकोडी
  चिक्कणर्ति
  चिक्केरूर
  चिक्टीआबर
  चिक्नायकन्हळ्ळी
  चिक्मगळूर
  चिखलदरा
  चिखली
  चिंगलपट
  चिंच
  चिचगड, जमीनदारी
  चिंचलीगदड
  चिंचवड
  चिचेवाडा
  चिंचौली
  चिंच्यु
  चिटणीस
  चितलनगर जमीनदारी
  चितळ
  चितळदुर्ग
  चिताकुल
  चिंतामणी
  चिंतामणी कवि
  चिंतामणी रघुनाथाचार्य
  चितारी
  चिति
  चितोड
  चित्तगांग
  चित्तगांग डोंगराळ प्रदेश
  चित्ता
  चित्तूर
  चित्फिरोझपूर
  चित्रकला
  चित्रकाव्य
  चित्रकूट
  चित्रकोट
  चित्रगुप्त
  चित्ररथ
  चित्रसंग्रहालयें
  चित्रळ
  चित्रांगदा
  चित्रावाव
  चिदंबर दीक्षित
  चिदंबरम्
  चिंदविन
  चिंदविन नदी
  चिदानंद स्वामी
  चिनडोंगर
  चिनमुलगुंद
  चिन लोक
  चिनसुरा
  चिनाब
  चिनीमाती किंवा केओलिन
  चिन्नविरन्ना
  चिन्नूर
  चिन्योत
  चिपळूण
  चिपळूणकर, कृष्णशास्त्री
  चिपळूणकर, विष्णुशास्त्री
  चिफू
  चिमणाजीआप्पा
  चिमणाजी दामोदर
  चिमणी
  चिरक्कल
  चिराबा
  चिलखत-वेदकालांतहि
  चिलिअनवाला
  चिली
  चिल्का सरोवर
  चिस्ती
  चीझी, अॅंटोनें लिओनार्ड डि
  चीन
  चीनी
  चीपुरुपल्ले
  चीर
  चीराल
  चुका
  चुकचि
  चुटिया
  चुडा
  चुडा संस्थान
  चुडेश्वर
  चुना
  चुनार
  चुंबकजन्य विद्युद्यंत्र
  चुंबकत्व
  चुंबकीय दृकशास्त्र
  चुंबन
  चुमल्हारी
  चुरू
  चूडामण
  चेकोस्लोव्हेकिया
  चेंगीझखान
  चेचेंझे
  चेटवई
  चेट्टी
  चेदूब बेट
  चेंबर्स रॉबर्ट
  चेयूर
  चेर घराणें
  चेरात
  चेरापुंजी
  चेरिअल
  चेरुमन
  चेरो
  चेर्रा
  चेल
  चेसेलडेन, विल्यम
  चेस्टरफील्ड
  चेस्टरफील्ड फिलिफ
  चैतन्य
  चैतसिंग
  चैत्य
  चैन
  चैबासा
  चोखामेळा
  चोवो
  चोडवरम
  चोध्रा
  चोपडे
  चोपदार
  चोबारी
  चोंभा
  चोरांग्ल
  चोरासी
  चोरी
  चोल
  चोल घराणें व चोल साम्राज्य
  चोवीस परगणा जिल्हा
  चौंगू
  चौघाट
  चौथाई, चौथ
  चौधरी
  चौबे जहागीर
  चौल
  चौलमुग्रा
  च्यवन
 
  छछरौली
  छट्टू
  छतारी
  छत्तरपूर
  छत्तिसगड विभाग
  छत्रपूर तहशील
  छत्रसाल
  छत्रे, केरो लक्ष्मण
  छत्रे, विष्णु मोरेश्वर
  छत्रे, सदाशिव काशीनाथ
  छंद:शास्त्र
  छप्पन देशचे राजे
  छप्रौली
  छब्रा
  छलाल
  छात
  छापखाना
  छापिआ
  छाप्री
  छायाचित्रपेटिका
  छाल
  छालिअर
  छिंद, लल्ल
  छिंदवाडा
  छिंपा
  छिब्रामऊ तहसील
  छुईखदान
  छुटिया
  छोटा उदेपूर
  छोटानागपूर
  छोटी साद्री
 
  जकात
  जॅक्सन अॅंड्र
  जॅक्सन व्हिल्ले शहर
  जखमा
  जगजीवनदास
  जगत्याल
  जगदलपूर
  जगदीशपूर
  जगन्नाथ
  जगन्नाथपंडित
  जगन्नाथपुरी
  जगन्नाथ शंकरशेट, मुर्कुटे
  जंगम
  जगय्या पेटा
  जंगल
  जंगल महाल
  जगलूर
  जगाध्री
  जग्रांव
  जंगीपूर
  जघाशूल
  जंजिरा
  जझिया
  जटलंड
  जटामांसि
  जटायु
  जटासूर
  जठरदाह
  जठरव्रण
  जडजीवघाद
  जडद्रव्य
  जडभरत
  जडवाद
  जडान्नविषबाधा
  जडावाचें काम
  जत
  जतिंग रामेश्वर
  जंतुजन्य रोग
  जतोई
  जत्रा
  जंदिआल गुरु
  जंदिआला
  जंदोला
  जनक
  जनजसवंत
  जननेंद्रियांचे गुप्तरोग
  जनमेजय
  जनस्थान
  जनाबाई
  जनार्दनस्वामी
  जनावरें
  जनीजनार्दन
  जपान
  जपानी वार्निस
  जबलपुर
  जंबुकेश्वरस्
  जंबुद्वीप
  जबूसर
  जमखिंडी
  जमदग्नि
  जमरुड
  जमाखर्च
  जमाबंदी
  जमालखान
  जमालपुर
  जमिकुंता
  जमीन
  जमीनदार व कुळें
  जमीनमहसूल
  जमुई
  जमेका
  जमेसाबाद
  जम्नोत्री
  जम्मलमडुगु
  जम्मू
  जयगड
  जयचंद
  जयदेव
  जयद्रथ
  जयनगर
  जयपाल
  जयपूर
  जयपुर जमीनदारी
  जयपुर संस्थान
  जयमल्ल
  जयरथ शृंगार
  जयरामस्वामी
  जयरामात्मज
  जयविजय
  जयसिंह
  जर उतणें
  जरतार
  जरत्कारु
  जरदाळू
  जरा
  जरासंघ
  जरीपटका
  जर्मन सिल्व्हर
  जर्मनी
  जलंगी
  जलजन्य विद्युतशक्ति
  जलघा
  जलपैगुरी

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .