विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चिताकुल. — मुंबई इलाख्याच्या उत्तरकानडा जिल्ह्याच्या कारवार तालुक्यांतील एक खेडें. हें कारवारपासून ४ मैल अंतरावर आहे. १९०१ सालीं याची लो. सं. ४७९६ होती. याचा ९०० पासून १६६० पर्यंतच्या अरब व इंग्रजी प्रवाशांनी ठिकठिकाणीं उल्लेख केलेला आढळतो. सोंदचा राजा बस्व लिंग (१६९७-१७४५) यानें येथें कालीनदीच्या उजव्या तीरावर सदाशिवगड नांवाचा किल्ला बांधला. १७५२ त तो पोर्तुगीज लोकांनीं काबीज केला. पुढें दोन वर्षांनीं त्यांनीं तो सोंदच्या राजास परत दिला. १७६३ तो हैदरअल्लीनें काबीज केला. १७९९ त तो टिपूच्या ताब्यांत होता.