विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चासा— एक शेतकरी जात.(बंगाली चाश, हिंदी चास=शेती) यांची एकंदर लो.सं. ८५१८९४ असून बहुतेक वस्ती बिहार-ओरिसांत आहे. आसामांतहि या जातीची लो.सं.४४५० असून बहुतेक चहाच्या मळ्यांतून मजूरी करीत असतात. ओरिसांतील शेतकरी लोकांत ह्या जातीच्या लोकांनां बरेच वरच्या वर्गांतील समजतात. यांच्यांत मृतांनां पुरण्याची असलेली चाल अनार्यत्व द्योतक आहे व त्यामुळें ह्यांच्या ब्राम्हणांनां खंडाइत, करण या ब्राम्हणांच्या दर्जाचे समजत नाहींत. चासा हे वैष्णवपंथी आहेत. [रिस्ले. से री.]