प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग तेरावा : घ - जलपैगुरी

चार्वाक -एक नास्तिक तत्वज्त्रानी. यास नास्तिकशिरोमणी असें नांव सायणाचार्यांनीं सर्वदर्शनसंग्रहांत दिलें आहे.

चार्वाक कधीं जन्मला व मरण पावला याविषयीं ज्या एका जैन ग्रंथांत लिहिलें आहे, त्याचा नामनिर्देश न करतां त्या ग्रंथाचा सारांश अर्वाचीन कोशकार देतात तो असा:-अवंती देशांत क्षिप्रा नदी व चामला नदी यांच्या संगमींवर शंखोद्धार नामक क्षेत्र आहे. तेथें कलियुगाचीं अथवा युधिष्ठिर शकाचीं ६६० वर्षें गेल्यावर ६६१ व्या वर्षीं प्रभवसंवत्सर चालला असतां उत्तरायणांत वैशाख शुद्ध १५ रविवारीं मध्यान्ह समयास चार्वाकाचा जन्म झाला. याच्या बापाचें नांव इंदुकांत व आईचें सृग्विणी असें होतें. पुढें पुष्कळरतीर्थीं यज्त्रनामक गिरीच्या ठायीं भाद्रपद शुद्ध १२ सोमवारीं क्षीमुख संवत्सर असतां युधिष्ठिर शकाचीं ७२५ वर्षें गेल्यावर ७२७ व्या वर्षीं दक्षिणायनांत चार्वाक मरण पावला. ही माहिती सत्य म्हणून ग्राह्य धरण्यात बर्‍याच अडचणी आहेत. सर्व दर्शनसंग्रहांत माधवाचार्यानीं याचें मत काय होतें तें थोडक्यांत पुढीलप्रमाणें मांडलें आहे.

पृथ्वी, आप तेज आणि वायु हीं चार भूतें परस्पर संयोग पावून देहाच्या रूपानें परिणाम पावलीं म्हणजे त्यांत आपोआपच जीवचैतन्य उत्पन्न होतें. जशीं कित्येक द्रव्यें संयोग पावलीं म्हणजें त्यांपासून मद्य होतें. अथवा पान, सुपारी, चुना, कात हे पदार्थ एकत्र मिळाल्यानें तांबडा रंग उत्पन्न होतो त्याचप्रमाणें जीवचैतन्य म्हणून कांहीं निराळें आहे असें नाहीं. चार भूतांचा जो परस्परसंयोग त्याचें नांव जीवचैतन्य आणि वियोग तो त्याचा नाश होय. सारांश, प्रत्यक्ष चैतन्ययुक्त जो देह तोच आत्मा असें चार्वाकाचें म्हणणें आहे. कारण मी स्थूल, मी कृश असा प्रयोग हें यास प्रत्यक्ष प्रमाण आहे. आतां माझा देह असा जरी प्रयोग होतो, आणि त्यावरून माझा असें म्हणणारा कोणीतरी निराळा असेलसें वाटतें. तरी तो प्रयोग राहचें शिर या म्हणण्याप्रमाणें औपचारिक आहे. कारण राहू तोच शिर असेंच लोकप्रसिद्ध आहे.

आतां द्रव्यसंपादन आणि स्त्रीसंभोग यांपासून होणार्‍या सुखांत दु:खमिश्रितता आहे. यास्तव अर्थ आणि काम हे पुरूषार्थ नव्हेत, असें कोणी म्हणूं नये. धान्य घेऊं गेलें असतां त्या समागमें भूस येतें. किंवा मत्स्यादिकांसमागमें कंटक इत्यादि येतात म्हणून जसा कोणी धान्य व मत्स्य टाकीत नाहीं, तर भूस व कंटक यांचा त्याग करून सुखार्थी मुख्यार्थ ग्रहण करून सुखोपभोग घेतो, त्याचप्रमाणें द्रव्य आणि स्त्रीसंभोग यांतील दु:खाचा त्याग करून शहाणे आहेत ते सुख मात्र घेतात. मूर्खाप्रमाणें दु:खभीतीनें सुख टाकीत नाहींत. उदा., धान्यास उपद्रव देणारे पशू आहेत म्हणून किंवा अन्न मागणारे मधुकरी आहेत म्हणून त्या भयानें कोणी शेती करीत नाहींत व पाक करीत नाहींत काय? तर धान्य पेरतात आणि पाकहि करितात. याप्रमाणें हीं उदाहरणें प्रत्यक्ष सिद्ध असतां जो कोणीं दु:खभयानें सुख टाकितो तो पशूच जाणावा.

देहोत्पत्तीस कर्माची अपेक्षा नाहीं. कारण कर्म आहे अशाविषयीं प्रत्यक्ष प्रमाण नसून तें केवळ अनुमानसाध्य आहे. अनुमानप्रमाण हें तर मुळीं मिथ्याच आहे. तर मग जग कसें उत्पन्न होईल? हें एक आणि दुसरें एक रोगी, एक निरोगी, एक गरीब, एक श्रीमंत असें कां ? याचें उत्तर असें आहे कीं, जगाची उत्पत्ति व त्यांतील वैचित्र्य हीं स्वाभाविकच आहेत. म्हणजे स्वभावेंकरूनच तीं तशीं उत्पन्न झालीं आहेत. जसा अग्नि हा सहजउष्ण आणि पाणी व वायु हीं सहज शीतल आहेत त्याप्रमाणें.

परलोक नाहीं, परलोकीं गमन करणारा आत्मा नाहीं व तेथें सुखहि नाहीं. वर्णाश्रमांच्या क्रियांपासून कांहीं फल प्राप्त होतें असें म्हणतात; परंतु त्यांत कांहीं हां शील नाहीं. कोणी म्हणेल जर हें काहींच नाहीं, तर मोठमोठे विद्वान द्रव्यसाध्य व कष्टसाध्य अशीं वेदोक्त अग्निहोत्र, यज्त्र इत्यादि कर्में करण्यास कसें प्रवृत होतात? तर असें समजावें कीं जे बुद्धिहीन व पौरूष म्हणजे पराक्रमहीन पुरूष आहेत, त्यांस हा जीवनोपाय आहे, दुसरें कांहीं नाहीं. कारण वेदच मुळीं भंड, धूर्त आणि निशाचर म्हणजे थट्टेखोर, ठक आणि राक्षस यांनीं केले आहेत तर त्यांतील कर्में तशींच आहेत.

यज्त्रांत पशु मारलां असतां जर त्यांस स्वर्ग प्राप्त होतो, तर असें करण्यापेक्षां यजमानानें पित्यासच कां मारूं नये? श्राद्धानें पितरांची तृप्ति आहे म्हणावें तर गांवास जाणारानें बरोबर फराळाचें ओझें वागवावें यांत हांशील काय? घरीं मुलानें श्राद्ध करावें म्हणजे झालें. जर येथें अन्नादिक दान केल्यानें स्वर्गास पोंचतें तर घराच्या खालच्या मजल्यांत केलेलें दान वरच्या मजल्यांतल्यास पोहोंचावें तसें कां घडत नाहीं? देहाहून भिन्न असा आत्मा परलोकास जर गेलाच आहे तर बंधु इत्यादिकांच्या स्नेहास्तव त्यांस तो कधीं कां येऊन भेटत नाहीं? यास्तव जीव आहे. तोंपर्यंत खुशाल खावें प्यावें व वेळेस कांहीं नसेल तर बेलाशक ऋण काढून तूप प्यावें; ऋणाचें भय बिलकुल बाळगूं नये. कारण भस्म झालेला देह पुन्हां जन्मास येत नाहीं. आणि जन्मच नसल्याकारणानें ऋण फेडण्याची पंचाइतहि नाहीं. सारांश ‘घोड्याचें शिश्र पत्‍नीस ग्राह्य’ हें वाक्य जसें थट्टेचें आहे, तशाच वेदामधील गोष्टी असून मांसभक्षण करण्यास राक्षस मात्र शिकवितील; दुसरें कोणी शिकविणार नाहींत. तस्मात् परलोकप्राप्तीच्या आशेनें जे कोणी येथें सध्या कष्ट सोशितात ते कंटकादिकांपासून होणार्‍या वेदनांप्रमाणें नर्कदु:खच अनुभवितात. सारांश, प्रत्यक्ष जें कष्टरूप दु:ख, याचेंच नांव नरक, स्त्रीसंभोगादिक जें सुख तोच स्वर्ग, प्रत्यक्ष प्रमाण तेंच प्रमाण, लोकप्रसिद्ध जो राजा तोच परमेश्वर आणि देहपात हाच मोक्ष. याहून स्वर्ग, नरक, ईश्वर, अनुमानादिक प्रमाणें व मोक्ष हीं दुसरीं नाहींत. याप्रमाणें शुक्राचार्य तपश्चर्येस गेले असतां बृहस्पतीनें त्यांचें रूप धारण करून दैत्यांच्या बुद्धीस मोह पाडण्यासाठी विरोचन सिद्धातांचें पुष्टीकरण केलें व त्यांस जें मत शिकविलें त्या मताचा अनुयायी चार्वाक आहे.

चार्वाकदर्शनाचा स्वतंत्र ग्रंथ नाहीं. अन्य दर्शनकरांनीं त्याच्यावर केलेल्या पूर्वपक्षात्मक टीकांवरून या दर्शनांतील विषय़ाची माहिती मिळते. या दर्शनाला सुखापेक्षकर्मवाद असें म्हणतां येईल व उघड जरी नाहीं तरी आचरणांत याचे अनुयायी शेंकडा ९९ वर आढळतील. [ अर्वाचीन कोश; सर्वदर्शनसंग्रह ].

   

खंड १३ : घ - जलपैगुरी  

 

 

 

  घंटय्याकवि
  घटोत्कच
  घटोत्कच लेणीं
  घड्याळ
  घनी
  घनौर
  घांट
  घाटगे
  घाटाळ
  घातमपूर
  घानची
  घायपात
  घारगड किल्ला
  घारघोडा
  घारापुरी
  घाशीराम कोतवाल
  घांसदाणा
  घासी
  घिरथ
  घिसाडी
  घुगुस
  घुंड
  घुबड
  घुराम
  घेरिया
  घेवडा
  घोटकी
  घोडबंदर
  घोडा
  घोडाघांट
  घोडाबारी
  घोडासर
  घोडें
  घोडेघांस
  घोरपड
  घोरपडी
  घोरपडे
  घोरी घराणें
  घोशी
  घोसाळे
  घोसी
  घोळ
 
 
  चउमू
  चकमा
  चकला रोषनाबाद
  चकवाल
  चकिया
  चक्कियर
  चक्कीनोआरो
  चक्रपाणि
  चक्रवर्ती
  चक्राप्पा
  चंगनाचेरी
  चंगर
  चच, चचनामा
  चचान
  चटया
  चडार
  चंडी
  चतुरमहाल
  चतुर साबाजी
  चतुरसिंग
  चतुर्थ
  चत्रा
  चॅथॅम
  चंदगड
  चंद घराणे
  चंदन
  चंदभाट
  चंदरभान
  चंदावरकर, नारायण गणेश
  चंदासाहेब
  चंदीपुर
  चंदेरी
  चंदेल्ल
  चंदौली
  चंदौसी
  चंद्र
  चंद्रकोना
  चंद्रगिरी
  चंद्रगुप्त
  चंद्रगोमिन्
  चंद्रनगर
  चंद्रभागा
  चंद्रहास
  चंद्रावती अथवा चंद्रावली
  चन्नगिरी
  चन्नपट्टण
  चन्नबसव
  चन्नरायपट्टण
  चंपा
  चंपानेर
  चपारण
  चंपावत
  चंपाषष्ठी
  चंबळा नदी
  चबा संस्थान
  चमारडी
  चरक
  चरखा
  चरखारी
  चरणदासी
  चरणव्यूह
  चरबी
  चरबीचें झाड
  चरी
  चर्मण्वती
  चलत-चित्रें
  चलन
  चल्लाकेरे
  चवळी
  चहा
  चक्षुर्मंनु
  चाकण
  चाकवत
  चागई
  चांगदेव
  चांगभकार
  चांगा केशवदास
  चाघताइखान
  चांचेगिरी
  चाचो
  चांडोद
  चाणक्य
  चातुर्मास्य
  चातुर्मास्य याग
  चातुर्वर्ण्य
  चात्सु
  चादचा
  चांदपूर
  चांदबिबी
  चांदभाट
  चांदला
  चांदवड
  चांदा
  चांदूर
  चांदूर बाजार
  चांद्रायण
  चानन शानन
  चानस्मा
  चानाल
  चानोड
  चाप्रा
  चाफळ
  चाबुआ
  चांभार
  चाम
  चामखीळ
  चामन
  चामराजनगर
  चामुंड
  चामुर्शी
  चार
  चारखा
  चारण
  चारदुआरं
  चारसद
  चारा
  चारीकार
  चार्टिझम
  चार्लंमांट, अर्ल ऑफ
  चार्वाक
  चालुक्य घराणें
  चालसिस
  चावडा
  चावंद
  चास-कमान
  चॉसर
  चासा
  चाहमान उर्फ चौहान
  चाळिसगांव
  चिक
  चिकंजी
  चिकबळ्ळापूर
  चिकाकोल
  चिकोडी
  चिक्कणर्ति
  चिक्केरूर
  चिक्टीआबर
  चिक्नायकन्हळ्ळी
  चिक्मगळूर
  चिखलदरा
  चिखली
  चिंगलपट
  चिंच
  चिचगड, जमीनदारी
  चिंचलीगदड
  चिंचवड
  चिचेवाडा
  चिंचौली
  चिंच्यु
  चिटणीस
  चितलनगर जमीनदारी
  चितळ
  चितळदुर्ग
  चिताकुल
  चिंतामणी
  चिंतामणी कवि
  चिंतामणी रघुनाथाचार्य
  चितारी
  चिति
  चितोड
  चित्तगांग
  चित्तगांग डोंगराळ प्रदेश
  चित्ता
  चित्तूर
  चित्फिरोझपूर
  चित्रकला
  चित्रकाव्य
  चित्रकूट
  चित्रकोट
  चित्रगुप्त
  चित्ररथ
  चित्रसंग्रहालयें
  चित्रळ
  चित्रांगदा
  चित्रावाव
  चिदंबर दीक्षित
  चिदंबरम्
  चिंदविन
  चिंदविन नदी
  चिदानंद स्वामी
  चिनडोंगर
  चिनमुलगुंद
  चिन लोक
  चिनसुरा
  चिनाब
  चिनीमाती किंवा केओलिन
  चिन्नविरन्ना
  चिन्नूर
  चिन्योत
  चिपळूण
  चिपळूणकर, कृष्णशास्त्री
  चिपळूणकर, विष्णुशास्त्री
  चिफू
  चिमणाजीआप्पा
  चिमणाजी दामोदर
  चिमणी
  चिरक्कल
  चिराबा
  चिलखत-वेदकालांतहि
  चिलिअनवाला
  चिली
  चिल्का सरोवर
  चिस्ती
  चीझी, अॅंटोनें लिओनार्ड डि
  चीन
  चीनी
  चीपुरुपल्ले
  चीर
  चीराल
  चुका
  चुकचि
  चुटिया
  चुडा
  चुडा संस्थान
  चुडेश्वर
  चुना
  चुनार
  चुंबकजन्य विद्युद्यंत्र
  चुंबकत्व
  चुंबकीय दृकशास्त्र
  चुंबन
  चुमल्हारी
  चुरू
  चूडामण
  चेकोस्लोव्हेकिया
  चेंगीझखान
  चेचेंझे
  चेटवई
  चेट्टी
  चेदूब बेट
  चेंबर्स रॉबर्ट
  चेयूर
  चेर घराणें
  चेरात
  चेरापुंजी
  चेरिअल
  चेरुमन
  चेरो
  चेर्रा
  चेल
  चेसेलडेन, विल्यम
  चेस्टरफील्ड
  चेस्टरफील्ड फिलिफ
  चैतन्य
  चैतसिंग
  चैत्य
  चैन
  चैबासा
  चोखामेळा
  चोवो
  चोडवरम
  चोध्रा
  चोपडे
  चोपदार
  चोबारी
  चोंभा
  चोरांग्ल
  चोरासी
  चोरी
  चोल
  चोल घराणें व चोल साम्राज्य
  चोवीस परगणा जिल्हा
  चौंगू
  चौघाट
  चौथाई, चौथ
  चौधरी
  चौबे जहागीर
  चौल
  चौलमुग्रा
  च्यवन
 
  छछरौली
  छट्टू
  छतारी
  छत्तरपूर
  छत्तिसगड विभाग
  छत्रपूर तहशील
  छत्रसाल
  छत्रे, केरो लक्ष्मण
  छत्रे, विष्णु मोरेश्वर
  छत्रे, सदाशिव काशीनाथ
  छंद:शास्त्र
  छप्पन देशचे राजे
  छप्रौली
  छब्रा
  छलाल
  छात
  छापखाना
  छापिआ
  छाप्री
  छायाचित्रपेटिका
  छाल
  छालिअर
  छिंद, लल्ल
  छिंदवाडा
  छिंपा
  छिब्रामऊ तहसील
  छुईखदान
  छुटिया
  छोटा उदेपूर
  छोटानागपूर
  छोटी साद्री
 
  जकात
  जॅक्सन अॅंड्र
  जॅक्सन व्हिल्ले शहर
  जखमा
  जगजीवनदास
  जगत्याल
  जगदलपूर
  जगदीशपूर
  जगन्नाथ
  जगन्नाथपंडित
  जगन्नाथपुरी
  जगन्नाथ शंकरशेट, मुर्कुटे
  जंगम
  जगय्या पेटा
  जंगल
  जंगल महाल
  जगलूर
  जगाध्री
  जग्रांव
  जंगीपूर
  जघाशूल
  जंजिरा
  जझिया
  जटलंड
  जटामांसि
  जटायु
  जटासूर
  जठरदाह
  जठरव्रण
  जडजीवघाद
  जडद्रव्य
  जडभरत
  जडवाद
  जडान्नविषबाधा
  जडावाचें काम
  जत
  जतिंग रामेश्वर
  जंतुजन्य रोग
  जतोई
  जत्रा
  जंदिआल गुरु
  जंदिआला
  जंदोला
  जनक
  जनजसवंत
  जननेंद्रियांचे गुप्तरोग
  जनमेजय
  जनस्थान
  जनाबाई
  जनार्दनस्वामी
  जनावरें
  जनीजनार्दन
  जपान
  जपानी वार्निस
  जबलपुर
  जंबुकेश्वरस्
  जंबुद्वीप
  जबूसर
  जमखिंडी
  जमदग्नि
  जमरुड
  जमाखर्च
  जमाबंदी
  जमालखान
  जमालपुर
  जमिकुंता
  जमीन
  जमीनदार व कुळें
  जमीनमहसूल
  जमुई
  जमेका
  जमेसाबाद
  जम्नोत्री
  जम्मलमडुगु
  जम्मू
  जयगड
  जयचंद
  जयदेव
  जयद्रथ
  जयनगर
  जयपाल
  जयपूर
  जयपुर जमीनदारी
  जयपुर संस्थान
  जयमल्ल
  जयरथ शृंगार
  जयरामस्वामी
  जयरामात्मज
  जयविजय
  जयसिंह
  जर उतणें
  जरतार
  जरत्कारु
  जरदाळू
  जरा
  जरासंघ
  जरीपटका
  जर्मन सिल्व्हर
  जर्मनी
  जलंगी
  जलजन्य विद्युतशक्ति
  जलघा
  जलपैगुरी

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .