विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चारदुआर - हें आसामच्या दरंग जिल्ह्यांतील राखून ठेवलेलें ( रिझर्व ) जंगल आहे. याचें क्षेत्रफळ १२१ चौ. मैल आहे. यांपैकीं २८७२ एकरांत रबराच्या झाडांची लागवड केली आहे. ही लागवड सन १८७३ त प्रथम सुरू झाली व १९०४ पर्यंत त्याच्याकरितां खर्च २ लाख रू. झाला.